*संघर्ष*
*भाग 1*
Struggle म्हणजे संघर्ष हा आयुष्यात असतोच आणि हा पार करून पुढे जाऊन यश दिसते. हा period खरंतर शिकवत असतो. पक्के बनवतो. सोनं तावून सुलाखून जास्त निखरते. जसे कुंभार मातीचे मडके बनवतो त्याला भट्टीत तापवले जाते मग पक्क होतं मडके वाजवले की चांगला पक्क्याचा आवाज येतो खात्री होते..!
एक असे मडके वरच्याने बनवायला घेतले. सोहळा सुरू झाला. माती चांगली मळून घेतली.... त्या चालू चाकावर मडके आकार घेऊन त्यावर तयार झाले.... म्हणजे माझी कथेची नायिका राणी जन्माला आली
वटपौर्णिमेला. साडे सात महिन्याची झाली. मडके ओले असले की त्याला अलगदपणे हाताळावे लागते. अशी राणी,नाकी-डोळी सरळ, गोरीपान, कुरळ्या केसांची, ओठ अगदी डाळींबी.. राणी फुलात वाढविली आई बाबांनी.. मडके तयार करताना 1 हात आतुन असतो अलवार असतो. आई आंजारणे- गोंजारणे करायची. 1 हात वरून फटके मारले की मडके तयार होते. फटके मारायचे कडक शिस्तीचे धडे बाबा गिरवून घ्यायचे.बाबांच्या तालमीत राणी तयार होत होती. आईला ऑफिस असायचे.बाबा घरी असायचे पक्के ज्योतिषी होते.. राणीची 1 मोठी बहीण होती. थोडे तयार मडकं ऊन्हात वळवावे लागते. बहिण सायली जरा उन्हाचा चटका होती. साडे अकरा वर्षाचे आंतर होते. ती इतके वर्ष एकुलती एक मुलगी होती अतिलाडाची. राणीच्या जन्माच्या वेळी हिला तिच्या आत्या कडे ठेवले. आत्या ने त्रास दिला आणि सायली च्या मनात हिच गोष्ट पक्की बसली की राणी झाली तिला आत्या कडे रहावे लागले आणि त्रास झाला. हि नसताना एकुलती एक मिरवले की कशाला झाली वाटेकरी. सायली कडक असायची राणीच्या बाबतीत. राणी 6वीत असताना सायली चे लग्न झाले.

राणी आई बाबांच्या छत्रछायेखाली हळूहळू मोठी होत होती. शिक्षण घेत होती. शिकत होती. आई, बाबा दमले होते. अॅडमिशन, परीक्षा एकटीने जायची. आईला 42 व्या वर्षी झालेली आणि वडीलांना 50 व्या वर्षी झालेली दुसरी मुलगी होती आणि लग्नानंतर 17 वर्षानी झाली..
वडीलांना सिगारेट, चहा प्यायला फारच आवडायचे. बाबा ऊंच धिप्पाड 6.3 ऊंची. 5 -7 भाषांवर प्रभुत्व होते. इंग्रजी पक्की.. ज्योतिषीय शास्त्रात पारंगत होते. पेपर 3 वाचण्याची आवड ज्ञानी होते.
आई शिक्षिका नंतर क्रिडा क्षेत्रात बदली करून घेतली. सरकारी नोकरीत. 18 ते 58 असे 40 वर्ष नोकरी केली. पेन्शन सुरू झाली.
घरी 2 हिटलर 1 बाबा कडक आणि दूसरी मोठी बहिण असल्यामुळे राणी घरी रहात नसे बाहेर खेळायला 7वी पर्यंत बहिणीचे लग्न होईपर्यंत. माया करणारी आई ऑफिस मध्ये जायची. राणीचे बालपण खेळण्यात जास्त अभ्यासात कमी असे 7वी पर्यंत गेले. बालपणाच्या रम्य आठवणी, निखळ आनंद.... शब्दात सांगता येणार नाही प्रयत्न करते.... बाहेर खेळणे लिंगोरचा, कोपरा पाणी, पिंकी पिंकी व्हॉट कलर, गाडीच्या चाकाला काठीने मारत खेळणे, लपंडाव, पळणे, जमिनीवर चौकोनी रकाने करून लगंडी घालत फरशीचा तुकडा टाकायचा उचलायचा, विटी दांडू, वाळूत किल्ले करणे, क्रिकेट बॉल एकदा गच्चीवर गेला आणि राणीला आणायला सांगितले ज्यांच्या जिन्यावरून जायचे त्या मागे मरायला तयार मग बॉल तर मिळाला परत जिन्यातून जाणे शक्य नाही. मग या गच्चीवरून खाली भरपूर बांधकामाची वाळू होती यावर उडी मारली लागणार नाही. बस्स राणीने गच्चीवरून वाळू वर उडी मारली. काहीही झाले नाही.. गल्लीतल्या मुलींनी ऑफिस मधून आल्या आल्या राणी चा कारनामा आईला सांगितला. राणी लगेच आईच्या समोर गेली राणीला काही झाले नव्हते. आईचा जीव भांड्यात पडला.
राणीने आईकडे 1 रूपया खाऊला मागितला. आईने दिले 2-4 रूपये. राणीने 1 रूपायाला 1 तास भाड्याने सायकल आणली आणि बाबांना दाखवली बाबा चिडले. बाबांनी सांगितले आता 4 तास त्या ओळखीच्या मुलाकडे जा तो शिकवेल. राणी सायकल घेऊन त्यांच्याकडे जातांना त्याच पॅडल निघाले होते. लांब लोखंडी पायाला घासत पायातून रक्त येत होते. कसेबसे त्यांच्या कडे नेली हातात धरून. मग त्या मुलाने धरून शिकवण्याचा प्रयत्न केला खुप वेळ. थोड्या वेळाने त्याचे वडील काही म्हणाले मग राणीला राग आला. राणीने सायकल घेऊन चालवत निघाली बांधकामाच्या विटांच्या रचलेल्या ढिगाऱ्याला धडकून पडली. गुडघे फुटले. असे भाड्याने सायकल आणून सायकल शिकली राणी. एक वेगळाच आनंद असतो. शब्दात सांगण्यासारखा नाही. राणी वडीलांच्या सारखी ऊंच असल्याने सायकल लवकरच शिकली. चौथी पाचवीत असताना.
आई - बाबा दोघेही लाड करायचे बाबा दर शनिवारी पहिली, दुसरीत शाळेत असताना घ्यायला यायचे ते अंड्याच्या आकाराचे बिस्कीट त्यावर लाल चिकट पदार्थ त्यावर साखर लावलेली ते बिस्किटे बाबा राणीला द्यायचे ते फारच आवडायचे. बाबांनी चालतांना हात धरलेला असायचा राणीचा अचानक हातात चाॅकलेट यायचे बाबा म्हणायचे जादू छू.. राणी खुप खुश..
आई लाड करायची राणी तुला किती जड पिशवी उचलता येईल तितके आंबे घ्यायचे आंबे मिळणार राणी मोठी नायलॉन पिशवी घेऊन निघायची. मोठ्या मार्केट मध्ये आंबे घ्यायचे. आई ऑफिस ला तिकडून जायची परस्पर. राणी आणि तिची मोठी बहिण घरी यायचे. पिशवी भरून आंबे घेऊन. घरी आल्यावर लगेच आंबा धुऊन पिळून चोखायचा.. तोंड, कोपऱ्या पर्यंत हात, फ्राॅक सगळे भरायचे.. 2-4 आंबे खाल्ले की तोंड, हात सगळे धुवायचे....
ताई शाळेजवळ बटाटेवडा खुपच छान मिळायचा ताई खाऊ घालायची. त्यावेळी 1 - 2 रूपयात असेल. पण चव, आठवण, आनंद अनमोल आहे त्याचे मोल होऊ शकत नाही....
आई रोज शाळेत असताना डब्यात राणीच्या फर्माईश प्रमाणे डब्यात पहाटेच तयार करून द्यायची. कधी पोह्यांचा चिवडा, कधी तिखटा मीठाच्या पुऱ्या, कधी गुळपापडी, कधी उपमा.... अमृततुल्य डबा.... शाळेतल्या मुलींना आवडायचा माझा डब्यातला मेनू. आवडीचा चपटा लांब मोठा डबा.... शाळा लांब बसने प्रवास करून जावे लागायचे. बसचा महिन्याचा पास काढलेला असायचा....
खुपच आठवणी आहेत बालपणाच्या.. खुपच गोड राणीच्या..
क्रमशः
*सौ. भाग्यश्री चाटी सांबरे*
©® 12.9.2021
©® 12.9.2021
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा