Login

ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं - भाग -2

Sudya

ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरं - भाग - 2


गावात मोहनकाका नावाचे एक व्यक्ती राहत होते.
थोडे हट्टी, थोडे चिडचिडे, गावात बऱ्याच लोकांशी भांडण असलेले.


एके दिवशी रात्री त्यांच्या घराला आग लागली.
सगळे पळाले…
पण कुणीही आत जायला धजलं नाही.


सुद्याने पळत जाऊन त्यांच्या नातवाला बाहेर काढलं.


मोहनकाका वृद्ध, नीट हालचाल करू शकत नव्हते.
सुद्याने स्वतः आत जाऊन त्यांना बाहेर आणलं.


आग थोडी वाढली…
सुद्याचा हात भाजला.
मोहन काका वाचले.


गावात दुसऱ्या दिवशी कौतुक —
“सुद्या तर देव आहे!”

पण…
मोहन काकांनी मात्र सगळ्यांना वेगळंचं सांगितलं.


सभेत लोकांना म्हणाले,
“सुद्याने घर वाचवलं असतं तर माझं नुकसान झालंच नसतं.”
“तोच सरपंच, त्याची जबाबदारी नव्हती का?”
“मी तर म्हणतो, त्याने उशीर केला!”


गाव हादरलं.
सुद्या थोडा दुखावला.
पण हसून म्हणाला —
“काकांचं वय झालंय. ते रागाने बोलले असतील,काही हरकत नाही.”


पण मनात खोल जखम झाली.
पहिल्यांदा त्याला जाणवलं,
“भलं केलं तरी दोष माझाचं?”


त्या रात्री अनिरुद्ध सुद्याला म्हणाला...


“भाऊ, तू फारच साधा आहेस.
लोकांकरता जीव धोक्यात घाल,
आणि तेच म्हणतात की चूक तुझी?”


सुद्या हसला आणि म्हणाला,
“लोकांचं काय? ते रागात बोलतात. मी मनाला लाऊन घेत नाही.”


पण अनिरुद्ध काही थांबला नाही,
“तू सगळ्यांचं भलं करतोस, पण सगळेच ‘माझंच खरं’ म्हणतात.
असं चालणार नाही. एक दिवस तूच जळून जाशील.”


सुद्या शांत.
पण अनिरुद्धच्या शब्दांनी काहीतरी मनाला चटका दिला.


काळ पुढे सरकत गेला.


एक दिवस गावात शेजारी भिडे आणि त्यांच्या बहिणीमध्ये जमीन वाटपावरून मोठा वाद झाला.


सुद्या मध्यस्थ.
त्याने न्यायाने दोघांना वाटणी करून दिली.


दोघांनी त्याला धन्यवादही दिले.


पण दोन महिन्यांनी काय झालं?

भिडेकाका म्हणाले —
“सरपंचाने माझं नुकसान केलं. मी काही नाकारलं होतं, हेच खरं!”


त्यांची बहीणही म्हणाली —
“सुद्याने मला जबरदस्ती पटवून दिलं.”


दोनही बाजू सुद्याच्याच विरोधात उभ्या राहिल्या.
ज्यांचं भलं केलं…
त्यांचं म्हणणं माझंच खरं’.


पाच वर्षानंतर पुन्हा सरपंचाची निवडणूक आली.


लोक म्हणाले —
“सुद्या गावाचा आधारस्तंभ आहे. तोच होईल सरपंच.”

पण…

गावात अफवा पसरली.
कोणीतरी अनिरुद्धला उचकवलं —
“तू सरपंच का होऊ नये? तुच खरं पात्र आहेस. सुद्या जास्त भावनाशील आहे.”


अनिरुद्धच्या मनात लोभ निर्माण झाला.
तो सुद्याच्या विरोधात उभा राहिला.

सुद्याला हे ऐकून खूप वाईट वाटलं.
पण तो म्हणाला —
“लोकांना जे योग्य वाटेल ते करतील.”


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- अनिरुद्ध की सुद्या कोण सरपंच होणार)
0

🎭 Series Post

View all