ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं - भाग -3 ( अंतिम भाग )
निवडणुकीच्यां दिवशी…
ज्यांना सुद्याने मदत केली होती,
ज्यांच्यासाठी पाण्याची सोय करून दिली होती,
घर बांधून दिलं,
उपचार केले…
ज्यांच्यासाठी पाण्याची सोय करून दिली होती,
घर बांधून दिलं,
उपचार केले…
तेच लोक अनिरुद्धच्या बाजूला गेले...
कारण अनिरुद्धने त्यांना वचनं दिली होती,
थोडे पैसे वाटले, लोकांना गावात बदल घडवून आणेन, शाळा सुधारेन, रस्ते सुधारेन, गार्डन बांधेन, रस्त्यावर लाईट्स लावले जातील, अशी खूप आश्वासन अनिरुद्धने दिली.
आणि “माझंच खरं” असं म्हणणारे सगळे लोक त्याच्याकडे झुकले.
आणि या सर्वाचा परिणाम असा झाला की....
अनिरुद्ध सरपंच झाला.
सुद्या हसला.
त्याने भावाला शुभेच्छा दिल्या.
पण मनात फार मोठी वेदना झाली.
अनिरुद्ध निवडून आल्यानंतर सगळं बदललं,
त्याचा हट्टी स्वभाव,
लोकांना ओरडायची सवय,
निरर्थक भांडणं…हे नित्याचंचं झालं.
त्याचा हट्टी स्वभाव,
लोकांना ओरडायची सवय,
निरर्थक भांडणं…हे नित्याचंचं झालं.
गावाला जाणवायला लागलं –
“सुद्याचं मन मोठं होतं, त्याचा चेहरा नाही.”
एक दिवस गावातील किशोर नावाच्या मुलाच्या कुटुंबाला मोठी अडचण आली.
रात्री अपघातात वडील गेले.
घरात काहीच नव्हतं.
अनिरुद्ध सरपंच –
पण अनिरुद्धच्या घरासमोर हे लोक गेल्यावर त्याने म्हटलं, आता खूप रात्र झाली आहे,
“मी उद्या पाहीन.”
आणि त्याने दार बंद केलं.
पण त्या रात्री…
सुद्या स्वतः त्यांच्या घरी गेला.
जेवण दिलं.
आर्थिक मदत केली.
शेवटची मदत म्हणून आपल्या बायकोची सोन्याची बांगडीही गहाण ठेवायला दिली.
जेवण दिलं.
आर्थिक मदत केली.
शेवटची मदत म्हणून आपल्या बायकोची सोन्याची बांगडीही गहाण ठेवायला दिली.
गाव पुन्हा नतमस्तक झाला.
गावात हळूहळू लोक बोलायला लागले —
“सरपंच खरं सुद्या होता. तोच आमचं भलं बघणारा होता.”
“सरपंच खरं सुद्या होता. तोच आमचं भलं बघणारा होता.”
अनिरुद्धला जाणवायला लागलं.
की ज्याच्यावर तो जळत राहिला, तोचं सुद्या खरा माणूस होता.
एका रात्री त्याने सुद्याला मिठी मारून रडत सांगितलं.
“भाऊ, मी चुकलो.”
“ज्यांचं तू भलं केलंस, तेच तुझ्याविरुद्ध गेले.
आणि मीही त्यात सामील झालो.”
“ज्यांचं तू भलं केलंस, तेच तुझ्याविरुद्ध गेले.
आणि मीही त्यात सामील झालो.”
सुद्या शांतपणे म्हणाला —
“भलं केल्यावर लोक काय बोलतात याने माझं भलं कमी होत नाही.
भलं करणं ही सवय आहे, व्यवहार नाही.”
गावाच्या सभेत पुन्हा प्रस्ताव आला,
“सुद्याला सरपंच बनवूया.”
“सुद्याला सरपंच बनवूया.”
पण सुद्या म्हणाला —
“माझं काम सरपंच बनणं नाही,
माझं काम माणसांचं मन जिंकणं आहे.”
गाव टाळ्यांच्या कडकडाटात उभा राहिला.
आणि त्या दिवशी गावाला एक मोठा धडा मिळाला,
ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे.
पण भलं करणाऱ्या माणसाची किंमत कधीच कमी होत नाही.
काळ स्वतः त्या माणसाची ओळख करतो.
पण भलं करणाऱ्या माणसाची किंमत कधीच कमी होत नाही.
काळ स्वतः त्या माणसाची ओळख करतो.
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा