Login

सुगंध नात्याचा

आजी सारखी काळी होशील कॉफी प्यायली तर.

सुगंध नात्याचा

सुलभाताईंना सकाळी नित्यनेमाने जाग आली. में महिना सुरू झाला होता, आजपासून शाळां कॉलेज ला सुट्टी त्यामुळे सून नातवंड सर्व डाराडूर झोपलेली.
आपले प्रातर्विधी आटपून त्या किचन मध्ये चहा करायला आल्या .पाणी साखर उकळायला लागले , पाहतात तर चहा पूड चा डब्बा जागेवर नाही.
‘अरे देवा सुलभाताईंनी इकडेतिकडे रॅक मधे शोधले .,आता सुरेखा ला झोपेतून उठवणे बरे नाही असा विचार करून गॅस बंद केला.’

काही न पिता तरतरी येणार कशी? नाईलाजाने कॉफी केली व कप घेत टेरेसवर आल्या….

नुकताच वैशाख सुरू झाला होता. सुर्योदय ही लवकरच झाला. आजूबाजूला झाडावर पक्षी कूजन करत होते.
कडू कॉफीचे दोन चार घोट घशाखाली कसेबसे ढकलून झाले मग नको वाटले तशी कप गच्चीच्या कठड्यावर ठेवला व त्या फेऱ्या मारू लागल्या.

समोरच्या झाडावर एक कावळा काव काव करत बसला होता. अचानक तो आला व ठेवलेल्या कपा वरुन गोल गिरकी मारून त्याने कप आडवा केला व त्यातली सांडलेली कॉफी आपली चोच बुडवून पिऊ लागला .

सुलभाताई आश्चर्याने पाहू लागल्या, कावळा कॉफी पीतो?
कोणी पूर्वज तर– आणि अचानक त्यांना सुखम्मा आजी ची आठवण आली. आज दोन ता.मे महिन्या ची.सुखम्मा आजी ची तारीख!
सुखंम्मा आजी , अशीच काळी कॉफी प्यायची.

.आजोबां आजी च लव मॅरेज ,सुखम्मा आजी तमिळ आणि आजोबा पक्के कोकणस्थ अगदी गोरे घारे तर आजी काळीसावळी.आजी च्या रुपा पेक्षा तिच्या गुणांवर लुब्ध झाले असावे आजोबा, कारण आजी च्या कर्तव्यदक्षते मुळे त्याची भरभराट झाली होती.

लहानपणी आजी ला कॉफी पिताना पाहून छोट्या सुलभा ला ही काॅफी प्यायची असायची. तो काॅफी बिया भाजताना येणारा सुगंध अsहाsहा आजी साठी आजोबा खास काफी च्या बिया मागवून देत. एक दोन दिवसाने त्या मिक्सर मधून बारीक करून मग आजी काॅफी बनवायची. तिला इंस्टंट काफी आवडत नसे.तिचा कप ही वेगळाच असे.मग सुलभा ला त्या काफीचा तो सुगंध आकर्षित करे.
आई धपाटा घालत हळुच म्हणायची “आजी सारखी काळी होशील कॉफी प्यायली तर” मग भीतीने ती तेव्हा दूर व्हायची .
थोडी मोठी झाल्यावर तिला समजायला लागले आणि ती आई ची नजर चुकवून बशीभर काॅफी प्यायची .
आता आजी ला जावून ही किती तरी काळ लोटला पण तरिही, आजीचा आत्मा तर नसेल ना आला?चला तिला काॅफी पाजली या कल्पनेने मनाला बर वाटल पणडोळे भरून आले. आणि मग त्यांनी कप तिथेच सोडून दिला

. खरंतर कॉफीच्या कडवट चवीसारख्या अजून काहीकडू आठवणी मनाच्या तळातून आज वर आल्या.
सौरभ सुलभाचा क्लासमेट कॉलेजचा, तिच्या अवतीभवती पिंगा घालणारा, सुलभालाही आवडायचा. त्याचे ते भुरभुरणारे केस, ती मोटरसायकल वरून तिच्या अवतीभवती मारलेली चक्कर सगळेच तिच्या हृदयाची धडधड वाढवणारे होते. काॅलेज चे शेवटचे वर्ष होते,एक दिवस सौरभ ने तिला भेटायला कॉफी हाउस मध्ये बोलावले होते.
त्यावेळी एकट बाहेर जाण्याची मुलींना, तेही संध्याकाळी सात नंतर ?घरातून परमिशन मिळवणं कठीण पण् सौरभच्या ओढिने ती कशीबशी निघाली.
तिला जरा उशीर झाला पोचेपर्यंत, कोण जाणे तो निघून गेला तर नसेल या कल्पनेने ती घाईघाईने कॉफी हाऊसच्या दारापर्यंत पोहोचली, आणि काचेतून आतले दृश्य पाहून दचकली. सौरभ आणि माया ,तिची मैत्रीण, दोघं एका कपातून कॉफी पीत होते आणि हसत खिदळत होते. ते पाहून तिचा संताप झाला ती माघारी फिरली. त्यानंतर ती सौरभ ला कधिच भेटली नाही आणि तिने कॉफी पिणे ही सोडून दिले.

अशोक शी लग्न झाले, इकडे सगळे चहा बाज. अशोकाच्या सोबत संसार छान झाला , त्या काळात कधी कुठे काॅफी पाहीली की सौरभ आणि माया आठवायला लागायचे आणि आपली झालेली फसवणूक ही.

“ आजी– एकटीच काय बसली आहे? चल खाली !चहा झालाय. सुलभा ची नात रश्मी वर येत म्हणाली.तिची चाहूल लागताच कावळा उडून गेला..
कप उचलताना तिन पाहिले “आजी यात काय होतं काॅफी?अग काल आम्ही कॉफी हाउस ला गेलो होतो तिथे नवीन कॉफी प्यायली,कॅपेचिनो खूप मस्त होती.

“आम्ही म्हणजे?कोणा सोबत डेट वर कि काय?”

“छट्ट हिला कोण डेट वर नेतोय नकटूला या ? पराग ने नातवा ने वर येत मुद्दाम बहिणीला चिडवल.

े आजी बघ न “आम्ही सगळ्या मैत्रिणीच होतो आणी डेट वर जाईन तर तुला सांगुन जाईन बर मोठा हिरो समजतो स्वतः ला.जशी काही मुलींची रांग मागे लागलीय. तुझ्या सोबत डेट करता…”रश्मी चिडून म्हणाली.

‘अरे किती भांडताय ?’

“मी नाही हा पराग,-- बरं ते जाऊ दे तर, आज
मी घरी तशीच बनवणार आहे काॅफी. तुलाही आवडेल “म्हणत नात कॉफीच वर्णन करत होती.

संध्याकाळी नात कॉफी बनवत होती व त्यांचे वर्णन करतहोती.तसा पराग मोबाईल वर शुटींग करु लागला.
१/३, एस्प्रेसो,१/३दूध१/३मिल्क फोम अशी असते ही कॅपेचिनो.
एका मिक्सिंग बोल मधे शुगर,काॅफीपावडर,व थोडे थोडे पाणी टाकून बीटर नी फेटायचे,फेटताना त्यावर फोम येईल ,काफी क्रीम रेडी.. मग त्यात गरम दूध घालून मिक्स करावे आणि वरुन काफीक्रीम, चाकलेट स्प्रिंकल करायचे.
“झाला न विडिओ?
आता पाहू कशी लागते?”

.”बघ- बघ माझ्या कपातल्या काफी वर हार्ट बनलय अगदी चित्रात असतं तसं” रश्मी आनंदाने चित्कारली.

कॉफीचा घोट घेतात सुलभाताईंच्या तोंडून” वाव काय मस्त चव आहे ग ! काय नाव म्हणाली? कॅपेचिनो “?

“आवडली ना? बघ मी म्हटले होते ना त्या जुन्या टाईपच्या कॉफीपेक्षाही कितीतरी टेस्टी आहे ना!”
“आजी तुला मिश्या आल्या आहेत काॅफी च्या सुलभाताई कडे पहात हसत हसत पराग म्हणाला तशी ओठांवर जीभ फिरवत चाटत त्याही हसल्या .


नव्या कॉफीच्या सुगंधा बरोबरच मागच्या काॅफी बरोबर च्या सर्व जुन्या कडू आठवणी विसरून नव्या कॅपेचिनो बरोबर जीवनाचा आनंद सुलभाताईंच्या तना मनात झिरपायला लागला….
—----------------------------------------------लेखन प्रतिभा परांजपे