भाग २
त्या संध्याकाळी शरद कविता वाचू लागला. सुरुवातीला थोडा अडखळला, थोडा थांबला, पण शेवटी हळूहळू शब्द त्याच्या स्वतःच्या आवाजात खुलले, पण कदाचित तो त्याच्या हातातील लिहिलेली कविता वाचत नव्हता, तर काही क्षणासाठी मृणालशी बोलल्यामुळे तिच्या चेहऱ्याला पाहून त्याला उस्फुर्ततेने सुचलेली शीर्घ कविता तो बोलू लागला.
तू आलीस तेव्हा,
आकाशात एखादं धुकं उतरावं तसं,
शब्दांच्या ओलाव्यावर चालत…
माझ्या कवितेच्या कोपऱ्यात तू स्थिरावलीस.
आकाशात एखादं धुकं उतरावं तसं,
शब्दांच्या ओलाव्यावर चालत…
माझ्या कवितेच्या कोपऱ्यात तू स्थिरावलीस.
तुझ्या हास्याचा मंद प्रकाश,
पानगळीच्या उन्हासारखा.
कधीच तापवला नाही,
पण सावली मात्र सोबत ठेवलीस.
पानगळीच्या उन्हासारखा.
कधीच तापवला नाही,
पण सावली मात्र सोबत ठेवलीस.
तुझ्या पदरातून येणारा गंध…
मी ओळखू शकलो नाही,
पण तोच माझ्या श्वासात अडकून राहिला
आणि प्रत्येक श्वास तुझं नाव घेत गेला.
मी ओळखू शकलो नाही,
पण तोच माझ्या श्वासात अडकून राहिला
आणि प्रत्येक श्वास तुझं नाव घेत गेला.
तू जेव्हा माझ्या समोर असतेस,
कविता स्वतः लिहून घेतात स्वतःला,
माझ्या मनाची शाई बनतेस,
आणि डोळ्यांच्या टोकावरून शब्द उगवतात.
कविता स्वतः लिहून घेतात स्वतःला,
माझ्या मनाची शाई बनतेस,
आणि डोळ्यांच्या टोकावरून शब्द उगवतात.
तू नसताना…
मी लिहीत राहतो,
पण प्रत्येक ओळ संपताना
एक हळवी शांतता उरते
जणू तू जरा वेळ थांबून गेलीस…
आणि सुगंध मात्र मागे राहिला.
मी लिहीत राहतो,
पण प्रत्येक ओळ संपताना
एक हळवी शांतता उरते
जणू तू जरा वेळ थांबून गेलीस…
आणि सुगंध मात्र मागे राहिला.
कविता शरदने पहिल्यांदाच लोकांसमोर स्वतःहून सादर केली होती, आणि ती ऐकून मृणालच्या डोळ्यांत जी चमक आली होती, ती त्याच्या कवितेपेक्षा अधिक बोलकी होती. मृणाल टाळ्या देत राहिली. पहिल्यांदा नजरेतून ओळख निर्माण झाली… आणि मग सुंगधित गंधासारखे प्रेम हळूहळू दरवळू लागले.
---
त्या दोघांनी अनेकवेळा भेटायची ठिकाणे ठरवली होती — पाषाणच्या डोंगरावरची छोटी टेकडी, लाल महालाच्या मागचे लपलेले गच्चीवरचे मंडप, आणि खास — अत्तराच्या बाटल्या विकणारे लहानसे दुकान — ‘निळकंठ अत्तर भांडार’! जे मंडई भागात होते.
त्या दुकानात अनेक वेळा गेल्यावर त्याने एक दिवस ती कुपी विकत घेतली होती — जी त्याला मृणालच्या अंगावर असणाऱ्या वासाशी सर्वात जवळची वाटली होती.
“हेच ते,” तिने हळूच कानाजवळ सांगितले, “माझ्या आजीला माझ्या आजोबांनी लाहोरहून आणलेली होती. पण आता पुण्यात देखील मिळत आहे, ही मला खूप जवळची वाटते
शरदने ती कुपी घेऊन ठेवली होती, खास लग्नाच्या रात्री देण्यासाठी.
पण त्यांचे नाते त्या काळाच्या चौकटीत बसत नव्हते. त्या वेळी मृणालच्या घरी प्रेम विवाह हा शब्दच माहीत नव्हता.
मृणालच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवले. तिच्याच घरात तिचा निर्णय ऐकण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. आणि शरदला तिचा निरोप एका पत्राद्वारे मिळाला, जिथे फक्त एक वाक्य लिहिले होते
"आपली भेट आता फक्त स्वप्नातच राहिली आहे."
शरदने त्या दिवसापासून आजपर्यंत कधीच लग्न केले नाही.
त्यांचे आयुष्य शांत होते, पण आतून अगदी कोरडे. एकटे राहणे, पुस्तके, कविता, आणि मृणालच्या अगणित आठवणी याच त्याच्या सोबत होत्या.
अत्तराची ती कुपी त्यांच्या कपाटात जपून ठेवलेली होती, अगदी काळजीपूर्वक. दर वर्षी १५ जानेवारीला, ज्या दिवशी त्यांची पहिली भेट झाली होती, त्या दिवशी तो ती कुपी उघडून एक मोठा श्वास घेत असे आणि पुन्हा बंद करून जपून ठेवत असे.
आणि आज… तोच दिवस होता. पण आज शरदच्या हातांत एक वेगळे पत्र होते.
पोस्टातून आलेले. पाठवणारी होती डॉ. मृणाल देशपांडे, अरोरा वृद्धाश्रम, सातारा.
त्यांने हलत्या हातांनी पत्र उघडले.
प्रिय शरद,
इतक्या वर्षांनी तुला लिहावे वाटतंय, हीच गोष्ट मनाला थरारून जातेय.
माझे वय आता सत्तरी पार झालंय. शरीर थकते, आठवणी ताज्या होतात… आणि त्यातली एक प्रमुख आठवण म्हणजे तू.
हो, मी अजूनही जिवंत आहे, आणि खरे सांगायचे तर, तुझ्या आठवणींमुळेच.
हो, मी अजूनही जिवंत आहे, आणि खरे सांगायचे तर, तुझ्या आठवणींमुळेच.
आता वाटते, आयुष्याने मला खूप काही दिले– कुटुंब, नातवंडे, नाव, काम… पण जे 'प्रेम' दिले नव्हते, ते तू दिले होतेस. अगदी नि:स्वार्थ, न मागणाऱ्या स्वरूपात.
त्या शनिवारवाड्याच्या गच्चीवरची संध्याकाळ अजूनही आठवते. तुझा पहिला आवाज, थोडे अडखळलेला, पण तितकाच प्रामाणिक. तुझ्या कवितेतली शांतता, आणि त्यातून उमटणारी हळुवार तुझी मनःस्थिती, तीच माझ्या जीवनाचे अदृश्य औषध झाली.
शरद, मी तुझ्या संध्याकाळच्या कविता आजही वाचते. मला त्या तु पाठवायचास, आणि म्हणायचा, ‘त्या तुझ्यासाठी आहेत’. कधी मी नकार दिला नाही, कारण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जाणवायचे, की त्या ओळींमागे तुझे अजूनही माझ्यावर असलेले प्रेम आहे.
आज मी अरोरा वृद्धाश्रमात आहे — साताऱ्याजवळ.
इथल्या सायंकाळी मी एकटी बसलेली असते, आणि तेव्हा तुझी आठवण अधिक गडद होत जाते. येथल्या अंगणात वारा झुलतो, आणि त्या झुळकीत मला तोच गंध जाणवतो…
तोच गंध, जो कधी माझ्या पदरात होता, आणि तुझ्या श्वासात मिसळून जात होता.
तोच गंध, जो कधी माझ्या पदरात होता, आणि तुझ्या श्वासात मिसळून जात होता.
शरद…
आता जेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी मी उभी आहे, तेव्हा एक शेवटची इच्छा आहे, तू येऊन मला भेटावे.
कदाचित काही बोलायचे नसेल, नसेल काही सांगायचे, पण एक नजर तरी… जी सांगेल, की आपण खरंच एकमेकांचे होतो — वेळेच्या आड जरी काहीही उभे राहिले, तरी.
येशील का?
तुझी,
मृणाल
अरोरा वृद्धाश्रम, सातारा.
मृणाल
अरोरा वृद्धाश्रम, सातारा.
पत्र वाचताच शरद पुन्हा आपल्या भूतकाळात शिरला, त्याची आणि मृणालची शेवटची भेट त्याला अजून पर्यंत स्पष्ट आठवत होती.
क्रमशः
©®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा जुलै २०२५
जलद लेखन स्पर्धा जुलै २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा