पुस्तकाचे नाव: सुखाचा शोध.
लेखक - वि. स. खांडेकर.
सुखाचा शोध हे वि. स. खांडेकर यांनी लिहिलेले पुस्तक. पुस्तकाचे मुखपृष्ठावर एक मोठा नारंगी रंगाचा गोल आहे, त्याला जर सूर्य म्हंटले तर इथे तो सुखासारखा भासतो. त्याच चित्रात पाण्यात एक मासा आहे तो घडा ही पूर्ण भरलेला नाहीये पण तो मासा म्हणजे मनुष्य आणि त्याच्यापासून लांब असणारा सूर्य म्हणजे सुख असे वाटते.
सुखाचा शोध या पुस्तकाची सुरुवात होते आप्पा या पात्रापासून ! प्रथम दर्शनी हेच कथेतील मुख्य पात्र आहे असे वाटते, परंतु जसजसे पहिला पाठ संपल्यानंतर जेव्हा दुसरा पाठ 'आनंद' या शीर्षकाखाली येतो, तेव्हा खरंच आनंद होतो. कारण आनंद हा एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, हे हळूहळू समजायला लागते.

आनंद त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेली उषा आणि नंतर त्याची बायको माणिक या तिघां भवती कथा फिरत राहते. मध्ये मध्ये आप्पासाहेब, धनंजय आणि नंतर चंचला ही पात्रे सुद्धा ह्यात आहेत. प्रत्येक पात्र हे कसे वेगळे आहे आणि त्यांच्या मनातील ठाव घेणारा प्रत्येक धडा हा काही ना काहीतरी नक्कीच शिकून जातो.
आपला भाऊ देशप्रेमासाठी घरापासून दूर आहे, तर त्या पूर्ण घराची, त्यांच्या मुलांची आणि विधुर असलेल्या आईची काळजी घेण्यामध्येच तब्बल नऊ वर्षापेक्षा जास्त काळ आनंद स्वतःला झोकून देतो. त्यानंतर अचानक आलेली उषा तिला तो आत्मघात करण्यापासून तर तिला घरी आणल्यानंतर त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल कसा होतो, यामध्ये उत्तमरीत्या दाखवले आहे.
आनंद ही अशी व्यक्ती होती की, ज्याच्यामध्ये वडीलधाऱ्या माणसांचे ऐकणे जाण्याची वृत्ती होती, म्हणून त्याने माणिकशी लग्न केले. लग्न त्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेला बदल सोबतच संसार एकतर्फी करण्याचा त्याचा प्रयत्न खूप काही शिकवून जातो. चंचला जेव्हा आयुष्यामध्ये येते, तेव्हा खरच तिने आनंदचे आयुष्य कसे बदलले हेही यातून समजते.
शेवट तर अगदी अनपेक्षितच आहे! सुखाचा शोध कथेचे शीर्षक त्यात, सुख नेमकं कशात आहे याचा माणूस जन्मापासून शोध घेत असतो, परंतु प्रत्येकालाच वि. स. खांडेकर यांच्या कादंबरीतून व्यक्तिगत ऋण, कुटुंब ऋण आणि समाजऋण याचा माणसावर कसा परिणाम होतो. हे या कादंबरीतून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच स्वार्थी माणसे आणि त्याग करणारी माणसे यातील फरक त्यांनी या त्यांच्या कादंबरीतल्या पात्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची लेखनशैली ही तृतीय पुरुषी जरी असली तरी प्रत्येक पात्र त्यांनी कसे वेगळे आहे, हे त्यांच्या लेखनशैलीतून उत्तमरीत्या शब्दबद्ध केले आहे.
ही कादंबरी जरी १९३९ साली लिहिली असली तरी ही आताच्या काळात समाजाला का उपयोगी आहे, हेही कादंबरी वाचल्यावर नक्कीच समजते.
समाप्त.
© विद्या कुंभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा