Login

नाव मोठे - लक्षण खोटे - भाग -2

Sukane Vada
रहस्यकथा : नाव मोठे, लक्षण खोटे - भाग - 2


आर्याने गावात चौकशी सुरु केली,तिने पहिली भेट सुमन नावाच्या वृद्ध महिलेची घेतली, तिचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी गायब झाला होता,सुमन रडत म्हणाली,
“श्रीधरने कर्जमाफी देतो म्हटलं… माझा गणेश त्याच्या वाड्यात गेला. आणि परत आला नाही. म्हणतात तो परदेशात गेला… पण मला वाटतं त्याला काहीतरी झालंय.”

दुसरी भेट तिने एका गायब झालेल्या मुलीचे वडील माधवची घेतली.
“जर ती जिवंत असती, दिवसातून एकदा तरी फोन केला असता.” असं रडतं तो बोलत होता.

“सगळे पुरावे एकाचं दिशेला जात होते ते म्हणजे - सुकाणे वाडा.
पण श्रीधरचं नाव इतकं मोठं की कुणी काही बोलत नाही.”

आर्या जास्त निर्धारीत झाली,त्या रात्री ती परत वाड्यात शिरली पण यावेळी मात्र लपून.गजानन दिसला नाही. श्रीधर कुठेतरी बाहेर गेला होता.आर्याने कॅमेरा चालू केला,ती काळ्या दरवाज्याजवळ पोहोचली.कुलूप उघडण्यासाठी ती वाकली तेवढ्यात, कुलूप आपोआप टक करत उघडलं.

खोलीत प्रवेश करताच तिला दोन गोष्टी दिसल्या,
१) एक मोठा टेबल
२) आणि भिंतींवर गायब झालेल्या सगळ्या लोकांचे फोटो



प्रत्येक फोटोखाली लाल मार्क...मिसिंग..जणू प्रत्येक प्रकरणावर शिक्का.
“हे काय चाललंय…?”आर्या थरथरत म्हणाली,तेवढ्यात तिला टेबलाखाली एक पेटी दिसली.तिने पेटी उघडली.पेटीत सगळ्या गायब झालेल्या लोकांची ओळखपत्रं, आधार कार्ड, अंगठ्या, चेन, घड्याळं…


तेव्हा पाठीमागून आवाज आला“ ताई ते उघडू नकां.”आर्याने वळून पाहिलं.दारात गजानन उभा होता. आर्या ओरडून म्हणाली गजानन मला सगळं खरं सांग, नाहीतर मी पोलिसांना तुला पकडायला सांगेन.”गजानन शांतपणे म्हणाला, ताई“श्रीधर जसा दिसतो, तसा नाही.”“म्हणजे?”
“तो लोकांना मदत करत नाही… त्यांना कैद करतो.”

आर्या घाबरली.
“कुठे कैद करतो?”

गजाननने पायरीखालील गुप्त दार उघडलं.“इथे. या तळघरात.”आर्या खाली उतरू लागली.अंधार, दमट हवा, आणि रडण्यासारखा दाबलेला आवाज.ती पुढे गेली, आणि प्रकाश पाडला ती थरथरली.

समोर लाकडी कोठड्या.आत…गायब झालेले लोक जिवंत होते!कमजोर, भेदरलेले, हातात साखळ्या - एक युवक ओरडला—“आम्हाला वाचवा! आम्ही काहीच केलं नव्हतं… त्याने आम्हाला फसवलं!”

आर्या हादरली.“तो तुम्हाला इथे का ठेवतो?”

एका मुलीने सांगितलं, तो सायकीक आहे, जादूटोणा करतो “तो म्हणतो— आम्ही समाजासाठी ओझं आहोत. तो आम्हाला ‘शांती’ देतो म्हणे… पण इथे आम्ही मरत आहोत.


अचानक वरून पावलांचा आवाज आला, श्रीधर खाली उतरत होता,गजानन घाबरला आणि बोलला.“ताई..लपून बसा!”  आर्या आणि गजानन लपून बसले.


श्रीधर खाली येऊन टॉर्च फिरवू लागला.आणि ओरडून बोलू लागला, “गजानन… मला माहितीय तू कोणाला खाली आणलं आहेस.”त्याच्या आवाजात क्रूर शांतता होती.“पत्रकार बाईं… तुम्हाला कळलं असेल की माझं काम काय आहे.”


आर्याने स्वतःला सावरत विचारलं.
“तू हे का करतोस?”


श्रीधर जवळ येत म्हणाला,“समाजात निकम्मे लोक वाढलेत. कर्जबाजारी, पलायनवादी, गुन्हेगार.


मी त्यांना ‘मोकळं’ करतो आहे.”“हे वेडेपण आहे!”“नाही. ही सेवा आहे. माझं नाव मोठं म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. त्यात त्यांची चूक नाही… माझं लक्षण कुणालाच दिसत नाही.”


तो पुढे म्हणाला,“तुम्हीही आता इथून बाहेर जाऊ शकत नाही.”तो आर्याच्या दिशेने जाऊ लागला.त्या क्षणी गजानन मध्ये पडला,“मालक, बस झालं! तुम्ही लोकांना मदत करत नाही… त्यांना मारत आहात!”

श्रीधर वेड्यासारखा ओरडला,

“तू मला धोका देतोस?!”

त्याने गजाननला ढकललं.
गजानन खाली पडला—डोक्याला मार लागला.

आर्या गजाननकडे पळाली,श्रीधर तिच्याकडे धावला.

आर्या मागे सरकली. तिचा हात एका लोखंडी पाईपला लागला.
तिने क्षणाचाही विचार न करता तो पाईप श्रीधरच्या हातावर फेकून मारला.

तो संतापाने तिच्याकडे झेपावला,पण त्या क्षणी…गावाच्या पोलिसांच्या आवाजाने तळघर दणाणलं.श्रीधर थबकला.

आर्या श्रीधरकडे बोट दाखवत ओरडली,
“हा माणूस गुन्हेगार आहे! लोकांना बंदिस्त करून ठेवतो!”

पोलिसांनी श्रीधरला पकडलं,गायब झालेल्या लोकांना बाहेर काढलं,गजाननला वर नेलं—त्यानेच पोलिसांना फोन करून बोलावलं होतं.

श्रीधरला हँडकफ लावताना तो शांतपणे हसत म्हणाला,
लोक माझं नाव विसरणार नाहीत.


त्याचा हशा तळघरात घुमला.


आर्याला खात्री होती,
हे रहस्य इथे संपत नाही.

कारण तिने तळघरातील भिंतीवर पाहिलं होतं,
एक नवीन फोटो जुळवला जात होता.

तो फोटो होता… गजाननचा.

जणू श्रीधर दुसऱ्या कोणासाठी काम करत होता.
कोणाचं?
कशासाठी?

आणि या गावात अजून कोण कोण श्रीधरच्या या काळोख्या जाळ्यात सामील आहे?

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - हे रॅकेट अजून खूप मोठं असतं, आणि ह्यात अजून कोण- कोण सामील असतं.)
0

🎭 Series Post

View all