रहस्यकथा – नाव मोठे लक्षण खोटे - भाग - 3
श्रीधरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, पण वाड्यात अजूनही एक थंड, दाबलेलं वातावरण जाणवत होतं,जणू भिंतीच काहीतरी सांगू पाहत होत्या.
आर्या वाड्यातून बाहेर पडली, पण तिची नजर सतत त्या एका फोटोवर अडकून राहिली - गजाननचा फोटो.“हे कशाचं संकेत असतीलं?”तिच्या मनात सतत प्रश्नांचा मारा होत होता,ती विचार करून हैराण झाली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या गजाननला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली.
तो अजून होशात नव्हता.नर्स म्हणाली,“त्याला खोल जखम झाली आहे. ” शेजारीच त्याच्या बेडजवळ बसलेल्या एक वृद्ध आजीबाई दिसल्या, माझं नाव सुलक्षणा. मी गजाननची आत्या.”
त्या म्हणाल्या,
“तूच ना गं आर्या?
“तूच ना गं आर्या?
आर्या बसली आणि बोलू लागली, “गजानन मला काही सांगायचं म्हणाला होता… पण तो इतका का घाबरला होता? की काहींचं अजून बोलू शकला नाही.
सुलक्षणांचा चेहरा काळवंडला.त्या हळूहळू बोलू लागल्या,“गजानन एकटा नाही… त्याच्या आधी त्याचा भाऊ राघव सुकाणे वाड्यात काम करत होता.”
आर्या दचकली आणि म्हणाली, “त्याचा भाऊ? मग तो कुठे आहे?”
सुलक्षणा शांतपणे म्हणाल्या,“गायब झाला.”आम्ही शोधायला गेलो तर त्याने सांगितलं,‘तुमचा राघव इथे काम करतच नव्हता.’”
आर्या विचारात पडली,आधीचं कोडं आणखी गुंतलं,म्हणजे राघवही… त्या तळघरात?”“राघव गायब झाला त्याबद्दल गजानन काहीच बोलला नाही.
“कदाचित.
पण आम्हाला त्याचा फोटोही नाही दिसला.
श्रीधर सर्व पुरावा मिटवतो म्हणे.”
पण आम्हाला त्याचा फोटोही नाही दिसला.
श्रीधर सर्व पुरावा मिटवतो म्हणे.”
आर्याला आता खात्री झाली,हे प्रकरण एका माणसाने केलेलं नाही.
हा एक गट आहे.एक मोठ्ठ जाळं आहे हे,त्या रात्री आर्या पुन्हा वाड्याकडे गेली.
या वेळेस तिच्यासोबत पोलीस अधिकारी पाटील होते.
हा एक गट आहे.एक मोठ्ठ जाळं आहे हे,त्या रात्री आर्या पुन्हा वाड्याकडे गेली.
या वेळेस तिच्यासोबत पोलीस अधिकारी पाटील होते.
“ आर्या मॅडम - तुम्हाला खात्री आहे का की आत अजून कोणीतरी आहे?”
“हो. आणि काहीतरी खूप मोठं लपवलं आहे.”वाड्यात शिरताच त्यांना विचित्र शांतता जाणवली.
“हो. आणि काहीतरी खूप मोठं लपवलं आहे.”वाड्यात शिरताच त्यांना विचित्र शांतता जाणवली.
काळ्या दरवाज्याजवळ गेले तेव्हा,तो दार उघडा होता.
“काल तर बंद होतं…”आर्या कुजबुजली.
पाठिमागून पाटील ओरडले,“कोण आहे तिकडे?!”
अंधारातून एक माणूस येताना दिसला,त्याच्या हातात टॉर्च.
अंधारातून एक माणूस येताना दिसला,त्याच्या हातात टॉर्च.
तो म्हणाला,“घाबरू नका. मी इन्स्पेक्टर रानडे. मला वरून चौकशीसाठी पाठवलंय.”
आर्या आणि पाटील थोडे शांत झाले.रानडे आत शिरले, तळघरात खोलपर्यंत गेले.“इथे काहीतरी अजून आहे ?”रानडे म्हणाले,आर्याने मान हलवली, तळघरात पुढे जाताच एका भिंतीमागे एक मोठं लोखंडी दार दिसलं.
“हे काल इथे नव्हतं!”आर्या आश्चर्याने म्हणाली,रानडे टॉर्च लावून दार उघडू लागले,दोन मिनिटांनी- दार उघडलं,आतलं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं, खोल गुप्त कक्ष होता तो – मृतांची फाइल्स - आत शेकडो फाइल्स, कागदपत्रांचे ढीग, संगणक, आणि एका कोपऱ्यात CCTV स्क्रीन होती.
आर्या स्क्रीनजवळ गेली.ती चालू होताच तिचा श्वास अडकला.स्क्रीनवर श्रीधर दिसत होता,पण तो एकटा नव्हता,दुसऱ्या खुर्चीत बसलेला माणूस, त्या चेहऱ्याकडे पाहून आर्या हादरली.
“हा तर… गावचा माजी आमदार माणिक पाटील!?"
“म्हणजे श्रीधर हे सगळं त्याच्या सांगण्यावर करत होता?”
रानडे म्हणाले“जास्त शक्यता आहे—सर्व गायब होणाऱ्या लोकांच्या मागे हे दोघे आहेत.”तेवढ्यात आर्याच्या नजरेस एक खास फाइल दिसली.फाइलच्या कव्हरवर नाव होतं—प्रोजेक्ट शांती – फेज 2
आर्याने फाइल उघडली,त्यात लिहिलं होतं...
• संपत्ती नसलेले लोक
• कर्जबाजारी कुटुंबे
• बेरोजगार युवक
• एकटे, आधार नसलेले वृद्ध
• कर्जबाजारी कुटुंबे
• बेरोजगार युवक
• एकटे, आधार नसलेले वृद्ध
आणि समोर लिहिलं होतं, त्यांना ‘शांत’ करणे आवश्यक आहे.
योजना लवकरच वाढवायची,आर्या थरथरली, आणि म्हणाली,हे तर मास-मर्डर प्लॅन होतं!
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- काय असतो हा सर्व माणसं गायब होण्यासाठीचा प्लॅन )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा