Login

नाव मोठे - लक्षण खोटे - भाग-4

Sukane Vada
नाव मोठे लक्षण खोटे - भाग - 4


तेवढ्यात CCTV च्या स्क्रीनवर वेगळा व्हिडिओ सुरू झाला,आर्या जोरात श्वास घेत मागे सरकली,व्हिडिओमध्ये दिसत होतं, एखाद्या जुन्या गोडाऊनमध्ये, डझनभर लोक कैद- जिवंत,अश्रूंनी रडत,मदत मागत होते.

“हे लोक कुठले? वाड्यात तर इतके नव्हते…”आर्या पुटपुटली.

रानडे म्हणाले,“हे तर गावाबाहेरच्या लोकांसारखे दिसत आहेत.
म्हणजे हे दोघे… आणखीही खूप लोकांना कैद करून ठेवत आहेत!”

तेवढ्यात- तळघराचं मुख्य दार जोरात आपटून बंद झालं.


तीघेही उडाले,रानडे ओरडले,
“कोण आहे?! दार उघडा..


आर्याने टॉर्च लावला,टॉर्चच्या प्रकाशात दिसलं…एक सावली,भिंतीलगत उभी,हळूहळू ती सावली पुढे आली.आर्या आणि पाटील मागे सरकले,सावलीतून चेहरा समोर आला,आणि दोघेही थिजून गेले.

तो होता....राघव...गजाननचा गायब झालेला भाऊ!

पण…

त्याचे डोळे रिकामे,शरीर अशक्त,तोंडातून शब्द नाहीत—फक्त श्वासासारखा आवाज.

तो मान खाली झुकवून हलक्या आवाजात म्हणाला,“म… मला… वाचवा…”

तितक्यात त्याने एक हात पुढे केला,त्याच्या हातात काहीतरी होतं,एक छोटासा, कोरडा कागदाचा तुकडा.

आर्याने कापऱ्या हाताने तो घेतला.

त्यावर लिहिलं होतं...

“तो परत येणार आहे, श्रीधर फक्त प्यादा होता - मालक अजून बाहेर आहे, आर्या चकित झाली- “श्रीधरच्या मागे… आणखी कुणी?!”

राघव पुढे काही बोलणार इतक्यात…तळघरातील दिवे पूफ करून बंद झाले.

जोरात आवाज आला—
बूम!!!जमीन हादरली,तळघर धुराने भरू लागले.

रानडे ओरडले...“बॉम्ब! कोणी तरी ट्रिगर केला आहे! बाहेर पळा!!”

आर्या राघवला पकडून वरच्या पायऱ्यांकडे धावली.धूर, आवाज, पडणारे लाकूड… तळघर जणू कोसळत होतं. तिघेही वर पोहोचले तेव्हा,वाड्याचा मागचा भाग पेटला होता.

दूरवर कोणीतरी पळताना दिसलं—काळे कपडे, टोपी, हातात बॅग.

आर्या ओरडली—“तोच आहे! तोच ‘मालक’!”

पण ती व्यक्ती अंधारात गायब झाली, आर्या आणि पोलिसांनी राघवला सुरक्षित ठिकाणी नेलं,रानडे म्हणाले.“आर्या… हे प्रकरण एका गावापुरतं नाही.
हे एक संपूर्ण नेटवर्क आहे.”


आर्याने फाइल हातात धरून म्हटलं,“हे लोक फक्त नावाने मोठे-लक्षण मात्र खोटं, राक्षसी माणसं आहेत ही.”

राघवने शेवटी एकच वाक्य पुन्हा म्हटलं,“तो… परत येईल…राघवला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तो जणू मृतवत झाला होता, त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती, डोळे खोल गेलेले, ओठाजवळ रक्ताचे थेंब वाळलेले.

आर्या त्याच्यासमोर उभी राहिली, “राघव… फक्त एकदाच सांग. ‘मालक’ कोण आहे?”राघव थरथरला, त्याचा आवाज जवळजवळ थांबत होता.“तो… सगळ्यांना पाहतो, आम्ही… फक्त त्याचे कामगार.
तो वाड्यापेक्षाही मोठ्या जागी… लोकांना ठेवतो…”

आर्या पुढे झुकली.
“कुठे? कुठे ठेवतो?”

राघवने ओठ हलवले.

“अंधगाव?!” आर्या दचकली, तो बोलणार इतक्यात,एसीच्या आवाजात एक काळा सायरनसारखा ‘पीऽऽऽ’ असा आवाज आला.

राघवचा चेहरा पांढरा पडला,त्याच्या हृदयाची धडधड वाढली, मशिन बीप-बीप करू लागलं.डॉक्टर्स आत धावत आले,
“Step back! He is going into shock!”

राघव जोरात ओरडला, “तो आलायतो मला संपवायला आलाय!!”

आणि काही क्षणांतच…
मशिनवरील लाईन सरळ झाली.

राघव… मृत.


आर्याच्या पायाखालची जमीन सरकली.
तो काही बोलणार होता… पण त्याच्याआधीच कोणी तरी त्याचं तोंड कायमचं बंद केलं.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- ह्या सगळ्याचा सूत्रधार कोण असतो)
0

🎭 Series Post

View all