नावं मोठं - लक्षण खोटं- भाग- 5 ( अंतिम भाग)
आर्या, राघवच्या मृतदेहाजवळ उभी असताना, नर्स धावत आली, आणि म्हणाली “मॅडम, तुमच्यासाठी एक लिफाफा आलाय.”
आर्याने तो उघडला,त्यात एकच कागद होता,“जास्त विचार करतेस,तुझीही फाईल तयार आहे.”खाली एक छोटं चिन्ह होतं,काळ्या त्रिकोणात लाल डोळा.
(जसंच तळघरातील फाइल्समध्ये होतं.)
(जसंच तळघरातील फाइल्समध्ये होतं.)
आर्या थिजली,पोलिसांनी CCTV तपासले,
लिफाफा देणारी व्यक्ती सीसीटीव्हीत दिसतच नव्हती.
लिफाफा देणारी व्यक्ती सीसीटीव्हीत दिसतच नव्हती.
दुसऱ्या दिवशी आर्या, रानडे आणि काही पोलीस “अंधगाव”कडे रवाना झाले.अंधगाव… नावाप्रमाणेच गाव नव्हतं,ते एक टेकडीच्या पलीकडे असलेलं निर्जन जंगलातलं ठिकाण, दोन किलोमीटरवर छोटंसं लोखंडी गेट दिसलं, गेटला तेच चिन्ह,काळ्या त्रिकोणात लाल डोळा.
रानडे टॉर्च लावून म्हणाले,
“असं वाटतं… इथेच ‘मालक’चा बेस आहे.”आर्या पुढे झाली.“गेट उघडा.”
“असं वाटतं… इथेच ‘मालक’चा बेस आहे.”आर्या पुढे झाली.“गेट उघडा.”
गेट ढकलताच ते किरकिरतं उघडलं,आत एक रस्ता होता, जो खाली उतरून एका भूमिगत बंकरकडे जात होता, बंकरमध्ये शिरताच सगळ्यांनी टॉर्च लावला,अंधारात एक खोली दिसायला लागली,
• मोठे लोखंडी पिंजरे
• आत कपडे, चप्पल, तुटलेली साखळी
• एका खोलीत ऍन्टीकॅमेरा, माईक, स्क्रीन
• आत कपडे, चप्पल, तुटलेली साखळी
• एका खोलीत ऍन्टीकॅमेरा, माईक, स्क्रीन
आणि एक मोठी भिंत,ज्यावर शेकडो लोकांचे फोटो लावलेले,त्याखाली नंबर लिहिलेले - G-12, S-3, R-41…
पाटील थरथरू लागले.
“हे… हे लोक कोण? सगळे गायब झालेल्या रिपोर्टमधील लोक आहेत!”
“हे… हे लोक कोण? सगळे गायब झालेल्या रिपोर्टमधील लोक आहेत!”
आर्याचे डोळे भरून आले,तो फोटो… गजाननचा भाऊ राघव.
त्याच्या फोटोखाली लिहिलं होतं—
R-17: Neutralized.
R-17: Neutralized.
आर्याने भिंतीला हात लावला,“हे राक्षस आहेत! ते लोकांना क्रमांक देतात! मूल्य मोजतात!”तेवढ्यात दुसऱ्या बाजूला एक रूम दिसली,आत मंद प्रकाश होता,सर्वजण सावधपणे आत शिरले,रूममध्ये दोन संगणक चालू होते,एकावर अनेक गावांचे नकाशे होते.
दुसऱ्यावर- LIVE FEED.
आर्या स्क्रीनसमोर थिजली,Live feed मध्ये दिसत होतं...
आर्या स्क्रीनसमोर थिजली,Live feed मध्ये दिसत होतं...
एक काळी कार,त्या कारमधून उतरलेला माणूस,काळा कोट. काळा मास्क, त्याचं चालणं… व्यवस्थित, हटके, जणू ट्रेनिंग घेतलेलं,तो स्क्रीनकडे तोंड करून उभा राहिला आणि मग… त्याने मास्क काढला.
आर्या भयाने थिजून गेली, पोलिसही अवाक,स्क्रीनवर दिसलेला चेहरा,गावाचा माजी आमदार माणिक पाटील… नव्हता.
नाही श्रीधर.
नाही श्रीधर.
तो होता....तिचा स्वतःचा ऑफिसचा ट्रस्टी … अखिलेश प्रधान!
ज्याच्यासोबत ती दररोज काम करत होती, रानडे अवाक झाले- “तो? पण तो तर… दानशूर, समाजसेवक, ट्रस्टचा प्रमुख....
ज्याच्यासोबत ती दररोज काम करत होती, रानडे अवाक झाले- “तो? पण तो तर… दानशूर, समाजसेवक, ट्रस्टचा प्रमुख....
आर्या बोलली- “नाव मोठं… पण लक्षण खोटं.” तेवढ्यात स्क्रीनवर अखिलेशने एका माइकजवळ झुकून म्हटलं...“आर्या, तू जिथे आहेस… ते सर्व मला दिसतंय, तू उशीर केलास.”तेवढ्यात बंकरमध्ये जोरात अलार्म वाजू लागला,लाल दिवे फिरू लागले.
दरवाजे आपटून बंद झाले,रानडे ओरडले,“सगळे बाहेर! धावा!”आर्या मागे वळून पिंजऱ्यांकडे पाहत ओरडली,“इथे अजून कुणी आहे का??”
एका पिंजऱ्यातून एक मुलगा थरथरत म्हणाला,“दीदी… आम्हाला वाचवा… मालक येतोय…”आर्याला त्याला तसंच सोडणं जमलं नाही,ती त्या पिंजऱ्याकडे धावत गेली.
रानडे भडकल्यागत ओरडले, “आर्या, वेळ नाही! बंकर उडणार आहे!”ती बडबडली....“मी त्याला सोडल्याशिवाय जाणार नाही!”
गतिमान क्षणांत तिने चावी बॉक्स फोडला, आतली साखळी किल्ली घेतली आणि पिंजरा उघडला, मुलगा तिच्या मागे धावत बाहेर आला.ते तिघे धावत-धावत बंकरच्या बाहेर आले,बरोबर त्याच क्षणी...
धडाम!!!
स्फोट झाला,भयंकर आवाजाने भूमी हादरली.धूर आणि धातूचे तुकडे उडले,संपूर्ण बंकर ज्वाळांमध्ये जळून खाक झाला...बाहेर… पण सुरक्षित नाही...आर्या श्वास घेत बसली.
तिने मागे वळून पाहिलं...बंकर संपला होता,पण तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं...“तू उशीर केलास.”
म्हणजेच…अखिलेश पुढचा प्लॅन सुरू करणार होता.त्याच्या नजरेत आर्याही एक “फाईल” बनली होती,ज्या मुलाला आर्याने वाचवलं, त्याचे नाव- विराट...
तो रडत म्हणाला,
“मालक… तो फक्त एक नाही,त्याच्यासोबत आणखी तीन लोक आहेत.
ते सगळे… एक संघटना आहे.”आर्या थिजली.“संघटना? नाव काय आहे?”
“मालक… तो फक्त एक नाही,त्याच्यासोबत आणखी तीन लोक आहेत.
ते सगळे… एक संघटना आहे.”आर्या थिजली.“संघटना? नाव काय आहे?”
तो मुलगा थरथरत म्हणाला,“लाल डोळा संघ.”आणि त्याने आर्याला खास कागदाचा तुकडा दिला, ज्यात कोड लिहिलं होतं..आर्या म्हणाली- ,“म्हणजे… हे अजून संपलेलं नाही....खरं युद्ध आता सुरू होणार आहे…”
बंकर जळून गेलेल्या त्या रात्री आर्याला नीट झोपच लागली नाही.
मनात एकच गोष्ट,“अखिलेश पुढचा डाव खेळणार.”, दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये चर्चा सुरू होती.
रानडे म्हणाले,
“आर्या, अखिलेशकडे प्रचंड पैसा, सत्ता, माणसं…त्याच्यावर थेट हात टाकला तर तो पुरावे गायब करेल.”आर्या शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात ज्वाला.“तो पुरावे गायब करेल… पण मी नाही.”
“आर्या, अखिलेशकडे प्रचंड पैसा, सत्ता, माणसं…त्याच्यावर थेट हात टाकला तर तो पुरावे गायब करेल.”आर्या शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात ज्वाला.“तो पुरावे गायब करेल… पण मी नाही.”
इतक्यात एक कॉन्स्टेबल धावत आला.“सर! आर्या मॅडमचा फोन ट्रेस झाला आहे,
तो ‘इंडस्ट्रियल झोन – 7’ मध्ये सिग्नल देतोय.”
आर्या चकित झाली, तिचा फोन हरवलेला नव्हता… तो तिच्याच बॅगमध्ये होता.
तिने बॅग उघडली - बॅगेत फोन नव्हता.
कुणीतरी तिच्या नकळत तिचा फोन काढून बदलून ठेवला होता.
रानडे म्हणाले,
“आर्या… हे सरळ इशारा आहे.
तो तुला तिथे खेचू इच्छितो.”
“आर्या… हे सरळ इशारा आहे.
तो तुला तिथे खेचू इच्छितो.”
आर्या बोलली,“आणि मी जाणार. पण पूर्ण तयारीनीशी तयार होऊन.”
इंडस्ट्रियल झोन – 7 मध्ये पोहोचताच त्यांना एक मोडकळीस आलेला कारखाना दिसला, कारखान्याचा बाहेरचा बोर्ड गंजलेला दिसला.
“प्रधान इंडस्ट्रियल ट्रस्ट – अनाथ मुलांसाठी सेवा”
“प्रधान इंडस्ट्रियल ट्रस्ट – अनाथ मुलांसाठी सेवा”
आर्या म्हणाली - “… हाच ट्रस्ट चालवतो.”
रानडे गुरगुरले आणि म्हणाले - “दानशूरपणाचा मुखवटा… आणि आत काळोख.”
ते तिघे—आर्या, रानडे आणि दोन कमांडोज—आत शिरले.
अंधार, धुळीचा वास, आणि…लांबून येणारी मुलांच्या रडण्यासारखी कुजबुज,
आर्याचं हृदय धपापू लागलं.“मुलं… अजूनही जिवंत आहेत का?”ते पुढे गेले,लोखंडी दरवाजा ढकलताच एक मोठा हॉल उघडला,आत भिंतींवर लाल दिवे, मध्ये यंत्रणा, आणि भिंतीवर एक मोठा स्क्रीन.
स्क्रीनवर कुणीतरी दिसलं,अखिलेश प्रधान, तो हसत होता.
थंड, अस्सल राक्षसी हसू.
थंड, अस्सल राक्षसी हसू.
“आर्या… शेवटी आलीस.”
आर्या ओरडली...
“हे सगळं थांबव! तू माणसं पळवतोस, त्यांना क्रमांक देतोस, त्यांची खरेदी-विक्री करतोस—तू एक राक्षस आहेस!”
“हे सगळं थांबव! तू माणसं पळवतोस, त्यांना क्रमांक देतोस, त्यांची खरेदी-विक्री करतोस—तू एक राक्षस आहेस!”
अखिलेश शांतपणे म्हणाला...
“स्वप्नाळू लोकं राक्षस म्हणतात…
हक्कदार लोकं ह्याला ‘व्यवसाय’ म्हणतात.”
“स्वप्नाळू लोकं राक्षस म्हणतात…
हक्कदार लोकं ह्याला ‘व्यवसाय’ म्हणतात.”
तो पुन्हा हसला आणि म्हणाला...“पण मला जास्त आनंद तुझ्या जिद्दीचा आहे, आर्या,तू पाहिलंस… समजून घेतलंस…
आता तू आमच्यासाठी धोकाही आहेस.”
आता तू आमच्यासाठी धोकाही आहेस.”
स्क्रीन काळा पडला.
रानडे टॉर्च फिरवत उद्गारले—
“सगळे सावध! तो जवळ असू शकतो!”
“सगळे सावध! तो जवळ असू शकतो!”
तेवढ्यात - टण्ण! एक गोळी सुटली,कमांडो खाली कोसळला,आर्या आणि दुसरा कमांडो आडोसा घेतात,छतावरून आवाज आला...
“खेळ संपला, आर्या.”
“खेळ संपला, आर्या.”
अखिलेश छताच्या क्रेनवर उभा होता. हातात बंदू...
आर्या शांतपणे ऐकत होती,तिला काहीतरी जाणवत होतं…
अखिलेश बोलतच राहिला—“तू समजून घे, आर्या…
लोकं हरवतात. त्यांना कोणी शोधत नाही.
मी त्यांना उपयोगी करतो.
याला बाजार म्हणतात.”
लोकं हरवतात. त्यांना कोणी शोधत नाही.
मी त्यांना उपयोगी करतो.
याला बाजार म्हणतात.”
अचानक...
तिच्या लक्षात आलं.
तिच्या लक्षात आलं.
अखिलेश जिथं उभा होता, तिथल्या खाली क्रेनचा कंट्रोल पॅनेल होता.
आर्याने हलकेच रानडेसोबत नजरांची भाषा केली.
आर्याने हलकेच रानडेसोबत नजरांची भाषा केली.
आणि धप्प!ती कंट्रोल पॅनेलकडे धावली.
अखिलेश ओरडला—
“थांब! आर्या!!”पण उशीर झाला.
“थांब! आर्या!!”पण उशीर झाला.
आर्याने लाल बटण दाबलं.
क्रेनचं लोखंडी हुक जोरात बाजूला झेपावलं—
क्रेनचं लोखंडी हुक जोरात बाजूला झेपावलं—
धाड!तो सरळ अखिलेशला धडकला.
अखिलेश क्रेनवरून खाली कोसळला. बंदूक हातातून पडली.
तो जमिनीवर आदळला आणि हालचालच बंद झाली.
तो जमिनीवर आदळला आणि हालचालच बंद झाली.
आर्याने श्वास सोडला.“हे संपलं…”
रानडे तिच्या खांद्यावर हात ठेवतात.
“तू धाडसी आहेस, आर्या.”
“तू धाडसी आहेस, आर्या.”
अखिलेश मृत झाला,पण कारखाना अजूनही चालूच होता.
त्यांनी आत पुढे जाऊन सुमारे पंधरा मुलांना सोडलं.
त्यांच्या डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधलेले.
त्यांनी आत पुढे जाऊन सुमारे पंधरा मुलांना सोडलं.
त्यांच्या डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधलेले.
त्यात विराटही होता.
तो आर्याच्या हातात हात अडकवत म्हणाला—
“दीदी… मालक मेला का?”
“दीदी… मालक मेला का?”
आर्या हसली आणि म्हणाली—“हो,आता कोणीच येणार नाही.”
मुलं वाचली होती.
अखिलेश संपला होता.
लढाई संपली होती.
आर्याने आकाशाकडे पाहत हळूच म्हटलं...
“नाव मोठं असलं… तरी लक्षण नेहमीच खोटं होतं ह्या अखिलेशचं.”
निरागस मुलांना पाहून तीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.
निरागस मुलांना पाहून तीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा