Login

सुख म्हणजे नक्की काय असतं?( भाग २)

सुख म्हणजे नक्की काय असतं?
सुरेश आणि सुमन यांच बोलणं सुरेशची आई ऐकत असते. ती  सुरेशला मुंबईमध्ये नोकरी शोधण्यासाठी सांगते.
सुरेश बोलतो आई अग पण तुझी तब्येत बरी नसते मी मुंबईला गेल्यानंतर तुझी काळजी कोण घेईल?
"तू माझा विचार  नको करू, तू सध्या सुनबाईंना घरी कसं आणायचं याचा विचार कर".
आपल्या ओळखीच्या नातेवाईकांना सांगून किंवा तुझ्या मित्रांना सांगून लवकरात लवकर नोकरीचा शोध घे आणि सुनबाईंना माहेराहून घरी घेऊन ये.
सुरेश सर्व मित्रांना मुंबईमध्ये कुठे नोकरी मिळते का याची चौकशी करण्यासाठी सांगतो.
त्याला एका ठिकाणी वीस ते पंचवीस हजाराची नोकरी मिळते.
सुरेश सुमन ला फोन करून सांगतो सुमन उद्या आपल्याला मुंबईला जायचे आहे मला एका ठिकाणी नोकरी मिळाली आहे.
काय सांगताय तुम्ही, तुम्हाला मुंबईमध्ये नोकरी मिळाली. "आपणही शहरांमध्ये राहणार या विचाराने सुमनला खूप आनंद होतो. ती लगेच सासरी येण्यासाठी निघते".
घरी आल्यानंतर सुमन लगेचच आपल्याला काय काय सामान लागेल याची जमवाजमव करते.
सुरेश आणि सुमन दोघेही मुंबईला जाण्यासाठी निघतात.

मुंबईमध्ये  चाळीतच सुरेश छोटीशी खोली भाड्याने घेतो. दोघेही मुंबईमध्ये शिफ्ट होतात.
गावाला मोठ्या घरामध्ये राहण्याची सवय असल्यामुळे मुंबईतल्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये सामानाची मांडामांड करताना मात्र सुमनला घाम फुटतो.
खोली बघून सुमन सुरेश वरती पुन्हा बडबड करायला सुरुवात करते.
काय हो जरा मोठी खोली बघताआली नाही का तुम्हाला? एवढ्या लहान खोलीमध्ये कसं राहायचं आपण असे बोलत बोलत सुमन पाणी प्यायला जाते पाणी तोंडात जाताच पटकन ती बाहेर थुंकते आणि बोलते इथल्या पाण्याची चव किती खराब लागते .अहो तुम्ही घेतलेल्या लहान घरात मी कसही राहील पण हे पाणी कसं पिऊ आता. घर लहान आणि पाणी घाण कसं राहणार मी या शहरात?
अगं सुमन मला पगार आधीच थोडा आहे. रूम लहान असल्यामुळे घराचं भाडं कमी आहे. मोठा रूम बघितला तर आपल्याला महिन्याला खर्चायला पैसे कुठून मिळतील. आणि पाण्याचं म्हणशील तर तुला हेच पाणी प्यावं लागणार.....
लग्नानंतर पहिल्यांदा सुमन फक्त दोघांचा स्वयंपाक  बनवते.
दोनच माणसांचा स्वयंपाक असल्यामुळे स्वयंपाक पटकन होतो व तिला आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळतो.
सुरेश सुमनला बोलतो काय मग सुमन आता खुश आहेस ना?
हो हो मी खूप खुश आहे सुमन बोलते...
सुमन तिच्या वडिलांना फोन करते. हॅलो आबा आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो...
आबा, काय मग काय म्हणते मुंबईची हवा....
सुमन,गावाकडच्या हवेत आणि मुंबईच्या हवेत खूप फरक आहे. इथे स्वयंपाक करताना माझा गर्मीने जीव मेटाकुटीला आला. आणि घर तर इतक लहान आहे की एक पाय बाहेरच्या खोली तर दुसरा पाय स्वयंपाकाच्या खोलीत.....
आबा, हसतच बोलतात 'म्हणजे आता शहरातही तू सुखी नाहीस की काय'?
सुमन , मी असं कुठे म्हटलं.
शहरात गेलीस तरी तुझी तक्रार. आबा बोलतात...
मी तक्रार नाही केली. मी फक्त तुम्हाला सांगितलं..
बरं ठेवू का फोन.
हा ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सुमन चहासाठी दूध आणायला सांगते.
सुरेश दुकानातून अर्धा लिटर दुधाची पिशवी आणतो.
फक्त अर्धा लिटर दूध!
गावाला घरी तीन चार लिटर दूध असल्यामुळे अर्धा लिटर दुधामध्ये अख्खा दिवस कसा घालवायचा हे काही सुमनला कळत नाही.
गावाला कोणत्याच गोष्टींमध्ये कधीच बचत करावी लागली नाही पण आता सुमनला सगळ्याच गोष्टींमध्ये बचत करावी लागणार होती.
"बचत कशी करायची हे काही सुमनला माहितीच
नव्हते ".

क्रमशः

🎭 Series Post

View all