Login

सुख म्हणजे नक्की काय असतं? (भाग ३)

सुख म्हणजे नक्की काय असतं?
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन भाजी मंडई मध्ये जाते.
गावाला असताना सुमनला मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी कधीच जावे लागले नव्हते. त्यामुळे भाज्यांचे भाव किती किंवा भाज्या घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात हे तिला ठाऊकच नव्हते.
सुमन भाजी मंडई मध्ये मेथीच्या भाजीची जुडी पाहून मेथीची जुडी कितीला विचारते.
भाजीवाली बोलते 40 रुपये.
मूठभर भाजी चाळीस रुपयाला? अहो एवढी भाजी तर गावाला इकडे तिकडे अशीच पडून खराब होऊन जाते. पण त्याच भाजीची किंमत शहरांमध्ये 40 रुपये.
सुमन एक दोन भाज्या घेऊन घरी येते.
एवढी काटकसर करून घर चालवणे सुमनला जड जाऊ लागले. हळूहळू महिना सरत जातो... तसे घरातील पैसेही संपू लागतात.
आता पगार होईपर्यंत घर कसे चालवायचे या विचाराने सुमन अस्वस्थ होते.
सुरेश बोलतो,अगं महिना संपत आला आणि पगार तर  दहा तारखेला होणार आहे . आपल्याकडे फक्त पाचशे रुपये शिल्लक आहेत. आणि पाचशे रुपयात  दहा दिवस कसे काढायचे?
सुमनला गावाकडचे दिवस आठवू लागतात.
गावाला घरचा भाजीपाला मिळायचा, घरचे दूध , घरचे कडधान्य यामुळे खर्चायला जास्त पैसे लागत नसत.
पण शहरांमध्ये तर सर्वच गोष्टींसाठी पैसे मोजावे लागत असत..... अगदी कोणती छोटी गोष्ट घ्यायची असेल तरी पैशांशिवाय पर्याय नव्हता.
सुमनला आता हळूहळू शहरात राहण्याचा कंटाळा येऊ लागला होता...
एक दिवस अचानक सुमनला चक्कर येते म्हणून ती डॉक्टरांना दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते. डॉक्टरांची फी देण्या इतके  देखील तिच्याकडे पैसे नसतात. बाजूवाल्यांकडून थोडेफार पैसे घेऊन सुमन डॉक्टरांना दाखवण्यासाठी जाते. डॉक्टर सुमनला तपासतात . रक्ताची पातळी खूपच कमी झाली आहे असे तिला सांगतात.
रक्ताची पातळी वाढण्यासाठी सुमनला डॉक्टर काही औषधे घ्यायला सांगतात परंतु ती औषधे खरेदी करण्या इतके देखील पैसे सुमन कडे नसतात...
'दुसऱ्या दिवशी सुमन सुरेशला बोलते आहो ,सविता मुंबईतच राहते ना ? आणि आपण आल्यापासून तिला भेटायला देखील गेलो नाही तेव्हा मी काय विचार करते आपण दोघे मिळून तिच्या घरी जाऊया?
ती मोबाईल वरती एवढे छान छान फोटो टाकते म्हणजे तिच्याकडे नक्कीच चांगले पैसे असले पाहिजेत. तिच्याकडून थोडेफार पैसे  घेऊया आणि नंतर ते तिला परत करूया.
सुरेशला देखील तिचं बोलणं पटतं आपल्या हाताशी थोडेफार पैसे असलेले बरे म्हणून तोही सुमनला सविताला भेटायला जाण्यासाठी होकार देतो.
सुरेश आणि सुमन सविताला भेटण्यासाठी तिच्या घरी जातात तिथे जाऊन बघतात तर काय?

क्रमशः

🎭 Series Post

View all