सुख म्हणजे नक्की काय असतं_
आईचं मन भाग २
आईचं मन भाग २
यथावकाश श्रीकांत आणि विभाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं आणि विभाचा राजेंच्या घरात रीतसर गृहप्रवेश झाला. दोनच खोल्या असल्या तरी मावशी, मामा, काका, आत्या असे सर्व नातेवाईक राहायला आले होते. घरासमोर एक मांडव घालून त्यांची झोपण्याची, जेवण्याची सोय केली होती. शेजारी पण मदतीला हजर होतेच. मालतीताई नातेवाईकांच्या प्रतिक्रिया
आजमावत होत्या. विभाने आपल्या गोड वागण्याने सर्वांना आपलेसे केलं होतं. लग्नानंतर सर्व विधी, पूजा आटोपल्यावर सर्व आपल्या घरी गेले. निघताना सर्वांनी आवर्जून विभा आणि श्रीकांतला रहायला येण्याचा आग्रह केला.
आजमावत होत्या. विभाने आपल्या गोड वागण्याने सर्वांना आपलेसे केलं होतं. लग्नानंतर सर्व विधी, पूजा आटोपल्यावर सर्व आपल्या घरी गेले. निघताना सर्वांनी आवर्जून विभा आणि श्रीकांतला रहायला येण्याचा आग्रह केला.
विभाचं आयुष्य आता खऱ्या अर्थाने नव्याने सुरू झालं होतं. माहेरी फ्लॅटमध्ये राहिलेली विभा आता परळच्या दोन खोल्यांत राहायला आली होती. इथे तिला प्रातर्विधी साठी बाहेर जावं लागत होतं. विभाला सर्वांसमोरून जायला लाज वाटायची म्हणून ती सकाळी लवकर उठून सर्व आवरून घ्यायची. अर्थात ह्या सर्वाची तिला आधी कल्पना दिली होती. अगदी वर्षभराचा प्रश्न होता कारण श्रीकांतने उपनगरात बुक केलेला फ्लॅट वर्षभरात तयार होणार होता. तिचं श्रीकांतवर मनापासून प्रेम होत म्हणून तर तिनेच लवकर लग्न करण्याचा आग्रह धरला.
परळला राहत असल्यामुळे दोघांना ऑफिस जवळ होतं. दोघेही लवकर घरी यायचे. त्यांना एकांत मिळावा म्हणून दोघांसाठी काहीतरी खायला करून ठेवून मालतीताई आणि माधवराव ते यायच्या वेळेस बाहेर पडायचे. श्रीकांत तर खूप खुश होता. दिवसभर एकमेकांशिवाय राहिलेले ते घरी येऊन एकमेकांशी खूप गप्पा मारत. रात्री झोपताना दिवसभर हॉल, दिवाणखाना असलेली पुढची खोली एक पडदा सरकवून बेडरूम व्हायची. असं असलं तरी विभाने कधीही नाराजी व्यक्त केली नाही.
सकाळी ती लवकर उठून स्वयंपाकाचं पाहायची. ती स्वतः सगळ्या कामात तरबेज असली तरी ती मालती ताईंना विचारून सर्व करायची. त्यात पण त्यांना आनंद मिळायचा. कधी सुट्टीच्या दिवशी सगळेजण बाहेर फिरायला जायचे. विभाने दोघांचे वाढदिवस कधी असतात ते श्रीकांतला विचारून ठेवलं होतं. ती आवर्जून त्यांना भेटवस्तू आणायची. इतकंच काय तर स्वतःसाठी गजरा घेताना ती आईंसाठी गजरा घ्यायची. त्या तिला नेहमी म्हणायच्या,
"विभा प्रत्येक वेळी मला कशाला गजरा आणतेस मी तर घरीच असते."
"अहो आई घरी असलात तरी गजरा घातल्यामुळे मन कसं प्रसन्न राहतं आणि आजुबाजूच्या लोकांनाही त्याचा सुवास मिळतो." हे बोलताना तिने मिश्किल नजरेने आप्पांकडे पाहिलं. ते गालातल्या गालात हसत होते. लग्नाला दीड वर्ष झाल्यावर ते मुंबई उपनगरात बोरिवलीला नवीन फ्लॅटमध्ये राहायला आले. आता दोघांना घरी यायला उशीर होऊ लागला. तेव्हा मालती ताई संध्याकाळच्या स्वयंपाकाचं स्वतःहून पाहू लागल्या. विभा त्यांना म्हणायची,
"आई तुम्ही आतापर्यंत खूप केलं आहे. आता थोडा आराम करा. तुमचे काही छंद असतील तर ते जोपासा. मी आल्यावर करत जाईन जेवण."
"अगं तू पण दिवसभर ऑफिसमध्ये काम करून, इतका प्रवास करून दमून येतेस. तुला पण थोडा आराम मिळाला पाहिजे."
दोघींचा असा संवाद ऐकला की अप्पा आणि श्रीकांत एकमेकांकडे बघून खाणाखुणा करायचे जणू त्यांना म्हणायचं असायचं की बघा आधी आईला जातीतली सून हवी होती आता विभाशिवाय पान हलत नाही. ते अगदी खरं होतं. विभाविषयी मालती ताईंच्या मनात धाकधुक होती. पण त्यांचं मन जिंकण्यात ती यशस्वी झाली. आप्पा आणि आई दोघेही सकाळी लवकर उठत. त्यांच्याकडे सर्वांना चहा पोळी खायची सवय होती. आप्पाना रोज चहा पोळीबरोबर थोडं फरसाण लागायचं. ते दोघे बाहेरून चालून आले की विभा त्यांना ते नियमितपणे द्यायची.
नवीन घरात येताच विभाला बाळाची चाहूल लागली. मग काय विचारायलाच नको.
(राजेंच्या घरात पुढे काय घडेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा