दुपारचे चार वाजले होते. आशिष नुकताच चहाचा कप घेत त्याच्या डेस्क पाशी आला होता. तर त्याचे बाकीचे दोघ कलिग अजुन क्युबिकल मध्ये आले नव्हते.
' चला आज पटकन आवरून घेऊ म्हणजे लवकर घरी जाता येईल.आज मस्त पैकी लाँग बाईक राईड वर फिरायला जाऊ. खूप दिवस झाले आम्ही दोघं बाहेर कुठं गेलोच नाही.'
चहाचा आस्वाद घेत तो मनात बडबडत होता. गेल्या आठवड्यात त्यांच्या कंपनीला एक मोठा एक टेंडर भरायच होत. तर महिनाभर सगळे जण कामात गढून गेले होते. आज सकाळी ते काम पुर्ण झालं होत. तर थोडा निवांत वेळ मिळाला होता. तर सगळे जण थोडे रिलॅक्स मध्ये त्यांची इतर काम करत होते.
त्याला पण त्याच काम संपवून लवकर घरी जायचं होत. तर तो मित्रांच्या सोबत टाईम पास करण्या ऐवजी काम पूर्ण करायला क्युबिकॅल मधे परत आला होता.
" आशिष सर, तुम्हाला मोठ्या सरांनी बोलावलं आहे." एक ज्युनियर कलीग येऊन सांगून गेला.
आशिष ने चहाचा शेवटचा घोट घेतला. नी तो केबिन मध्ये गेला.
" मे आय कम इन सर ? "
दरवाज्यावर नॉक करत कार्तिक ने विचारलं.
"अरे आशिष, ये ये. अस येऊ का विचारायची फॉर्मालिटी कशाला ? " कार्तिक म्हणाला.
आशिषला समोरच्या खुर्चीवर बसायचा इशारा केला.
" दोनच मिनिट थांब हा. हा ईमेल हेड ऑफिसला पाठवतो." कार्तिक त्याचं लक्ष पुन्हा लॅपटॉप मधे ठेवत म्हणाला. आशिष ने नुसतीच मान हलवली.
" सॉरी आशिष, ते आजच्या टेंडर बद्दल रिपोर्ट्स पाठवत होतो." कार्तिक दिलगीरी व्यक्त करत म्हणाला.
" काहीचं हरकत नाही. सर. तुम्ही मला बोलावलं ? काही काम आहे का ? " आशिष ने विचारलं.
" आशिष खरं तर माझं तुझ्याकडे पर्सनल काम आहे. पण "कार्तिक बोलताना अडखळला.
" आशिष सर, आपण कलिग् तर आहोतच. पण चांगले मित्र पण आहोत." कार्तिक सरांचा संकोच कमी करण्याच्या प्रयत्नाने आशिष बोलतं होता.
" अरे आईची तब्येत बिघडली आहे. मी दिवसभर ऑफीस मध्ये असतो. तर दिवसभर आई सोबत राहायला म्हणून कोणी सोबत म्हणून आहे का कोणी ओळखीचं ? असेल तर सांगशील का ? "
" हो. मी मधुराला सांगतो. तिच्या ओळखीची कोणी असेल तर काकूंच्या सोबतीला थांबु शकेल का ? तिच्या ओळखी आहेत. ती नक्कीच सांगेल." आशिष म्हणाला.
" थँक्यू. तुझी खूप मदत होईल."
" कार्तिक सर आज कोण आहे का काकूंच्या सोबत ? "
" कोणी नाही. सकाळी येताना मी आईला तिची औषध आणि नाष्टा देऊन आलो आहे. दुपारी एक बाई आहे ती येऊन आईला दुपारी जेवण देइल."
" हम्म्म "
" म्हणून तर आईसोबत दिवस भर थांबु शकेल अस कोणतरी हवं होतं. प्लिज पर्सनल रिक्वेस्ट आहे."
" आज पण त्या एकट्याच आहेत."
" हो. आता आई एकटी असेल. अरे त्या बाईचा नवरा आजारी आहे तर ती तिची काम करून शेवटी आमच्या घरी येते. मग आईला जेवण देऊन निघुन जाते. जाताना संध्याकाळचा स्वयंपाक पण करून जाते. "
" मी सांगतो मधुराला उदया ती थांबेल काकूंच्या सोबत. तुम्हाला उदया मुंबईला जायचं आहे ना."
" हो."
" मग काकूंच्या सोबत कोण आहे दिवस भर ? "
" मी मेडला सांगितल आहे. पण तिला नाही जमणारं. आई म्हणाली आहे. ती थांबेल एकटी म्हणून. दुपारी मेड थांबेल तेंव्हा तिच्या मदतीने तिच सगळं आवरून घेईल."
" मग आता ? "
" सकाळी जातांना आईच करून जाईन म्हणतो. जितकं होईल तितकं."
" आईचं करून म्हणजे.? त्या."
" अरे नाही . तिचं बेडवर वगेरे नाही.तसल काही नाही.आई ठिक आहे. तिचं ती करते सगळ. आणि तिला बी पी चा त्रास आहे.
आठ दिवसांच्या पूर्वी डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. तर गॅस जवळ जायचं नाही आहे. म्हणून मग तिच करून येतो. उदया पण तसचं करून जायच्या विचारात आहे."
आठ दिवसांच्या पूर्वी डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. तर गॅस जवळ जायचं नाही आहे. म्हणून मग तिच करून येतो. उदया पण तसचं करून जायच्या विचारात आहे."
" कार्तिक सर काळजी नका करू. मी मधुराला सांगतो उदया ती दिवसभर थांबेल काकूंच्या सोबत. ती करेल काकूंना मदत त्याचं आवरायला.मी सांगतो तिला तसं.तुम्ही निश्चिंत मनाने मुंबईला जावून या."
" थॅन्क्स आशिष. मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन."
" ऑल द बेस्ट फॉर टूमॉरो मीटिंग."
" थँक्यू."
" अजून काही काम सर ?"
" नाही. तेच जरा पर्सनल काम होत."
" ओके.मी येऊ सर."
" हो."
कार्तिक सरांची परवानगी घेउन आशिष त्याच्या डेस्क पाशी गेला. लवकरच काम संपवून तो घरी पण आला. आज त्याला लवकर आलेलं बघुन मधुरा तर खूप खुश झाली होती. ती संध्याकाळ त्या दोघांनी मस्त पैकी एन्जॉय केली. त्यांनी मूव्ही बघितला. नंतर हॉटल मधे जेवून घरी आले.
रात्री झोपताना त्याने तिला कुशीत घेतल. प्रणयाची धुंदी अजुनही होती. तिला मिठीत घेतले आणि त्याचा मोबाईल फोन वाजला. कार्तिक सरांनी मॅसेज केला होता. त्यांना
'सकाळी सात वाजताच्या ट्रेन ने मुंबईला जावं लागणार आहे. तर मेड येऊन काम करून जाईल. तर प्लिज मधुरा वहिनींना जमल तर लवकर यायला सांगशील का ? म्हणजे त्यांना आईंची काळजी नाही राहणार.'
त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले हावभाव बघून तिने त्याला विचारले,
" अहो काय झालं? कोणाचा मॅसेज आहे ? "
" अग कार्तिक सरांचा. ॲक्च्युअली. त्यांना उदया मुंबईला जावं लागणार आहे. त्यांची आई घरात एकटी आहे." मधुरा त्याचं बोलणं ऐकत होती.
" तर तुला विचारणार होतो, की दिवसभर सोबतीला कोणी बाई मिळेल का ?
तूझ्या ओळखीत कोणी आहे का ? जे काकूंच्या सोबत दिवसभर थांबु शकेल?"
तूझ्या ओळखीत कोणी आहे का ? जे काकूंच्या सोबत दिवसभर थांबु शकेल?"
" का ? काय झालं आहे काकूंना ? "
" त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. तर त्यांना गॅस पासुन दुर राहायच आहे."
" अरे बापरे. मग आता काकूंच्या सोबत कोण आहे ? "
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा