Login

सुखाचा एक धागा भाग २

सुखाचा एक धागा भाग २
" सध्या तरी एक मेड आहे. ती स्वयंपाक आणि घरातील बाकीची काम करतेय.पण ती दिवसभर नाही थांबु शकत तिचा नवरा आजारी आहे."

" हम्म्म. म्हणजे काकू दिवसभर एकट्या असतात."

" मधुरा मेड मिळे पर्यंत तुला जमेल का ग काकूंच्या सोबतीला थांबायला ? फक्त काही दिवस."

" अहो जमेल की ! बाई मिळे पर्यंत मी थांबत जाईन काकूंच्या सोबतीला. दिवसभर तर मी घरी असते. तर मला जमेल."

" चालेल. मी सरांना मॅसेज करून सांगतो."

" चालेल. तसही बाई मिळायला आठ दिवस तरी लागतील."

" ठीक आहे.मी तसं सांगतो सरांना. मधुरा बाई आपल्या विश्र्वासातली मिळायला हवी."

"हो. मी आपल्या मेडला विचारते."

" थँक्यू मधुरा."

दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा ने तिची घरातली काम आटोपली. काकूंच्या साठी पालकच सुप आणि आमटी भात बनवून घेतला. कार्तिक सरांच घर त्यांच्या घरा पासुन पंधरा मिनिटांच्या अंतरावर होत.

या आधी देखील मधुरा त्यांच्या घरी गेलेली होती. त्यांच् तेंव्हा नुकतच लग्न झालं होत. तर कार्तिक सरांच्या बिल्डिंग शेजारच्या बिल्डिंग मध्ये तिची मैत्रीण रहात होती. त्यामुळें तिला घर शोधायला काहीच अडचण आली नाही.

कार्तिक सरांनी त्यांना तिच्या येणा बद्दल आधीच सांगून ठेवलं होत. तिने झटपट पालकच सुप आणि आमटी भात बनवून घेतला. अर्ध्या तासात ती काकूंच्या घरी आली होती. तिने आशिष ना सांगितल होत. घरी येताना तिला सरांच्या घरातून पिक अप करा.

काकूंच्या घरी आल्यावर त्यांना नमस्कार करून मधुरा म्हणाली,

" नमस्कार करते काकू."

" अग मधुरा तू ! ये ये. बस कशी आहेस.?"

" मी ठीक आहे काकू. तुम्ही कशा आहात ? तुमची तब्येत कशी आहे ? "

" मी ठीकच आहे. आता तब्येतीचं काय थोडी नरम गरम असते. तु आज कशी काय आलीस ? "

" ते ह्यांचा फोन आला होता.त्यांच्या कडून समजलं तुमच्या बद्दल. तुम्ही घरात एकट्या आहात.आज सर पण मुंबईला गेले आहेत. म्हणून मग इथ आले." मधुरा म्हणाली.

" अग तू कशाला इतका त्रास घेतलास." त्या आपले पणाने म्हणाल्या.

" त्रास कसला काकू. घरात एकटीच होते. म्हणलं तुमच्या सोबत थोडा वेळ घालवू. तेवढाच थोडा विरंगुळा मिळेल."

" मग येत जा की. तेवढीच मला सोबत मिळेल. माझी तब्येत ठीक असती तर मीच आले असते तुझ्याकडे."

" काही हरकत नाही. तुम्हाला यायचं असेल तर मला सांगा. मी येऊन घेउन जाईन तुम्हाला. नाहीतर मला बोलवून घ्या."

" तुला यायचं तेंव्हा येत जा. "

" आता फक्त हा डोळ्याचा दागिना गेला की येते."

" डोळ्याचा दागिना "

" अग हा काळा गॉगल ग ! दागिना घातल्या सारखा घालावा लागतो." त्यांच्या या मिश्किल उत्तरावर ती खळाळून हसली.

" काकु मला तुमची ही मस्करी आवडली.ती ऐकायला मीच आता दररोज येत जाईन."तिचे निरागस उत्तर ऐकून काकू पण खळाळून हसत होत्या.

" तुला पण घरची काम असतात की."

" काम तर सकाळी लवकरच होऊन जातात. मग दिवसभर मी एकटीच असते. तुमच्या सोबत गप्पा मारायला येत जाईन."

" मग चालेल. मला पण तुझ्यासोबत गप्पा मारायला आवडतील."

" काकू मी हे किचन मध्ये ठेवून येते."

" काय आहे ग ?"

" काकू तुमच्या साठी पालकाच सुप आणि आमटी भात बनवून आणला आहे." मधुरा हतातली पिशवी सांभाळत म्हणाली.

" काकू चहा किंवा कॉफी काहीतरी बनवू ?"

" तु पिणार असशील तर बनव."

" चालेल. मी मस्त जायफळ घालून कॉफी बनवते"

" ठीक आहे. मला गॅस जवळ जाता येणारं नाही. मग"त्या बोलताना अडखळल्या.

" काकू हा दागिना फक्तं अजून पंधरा दिवस घालायचा आहे. नंतर मग तुम्ही करा." मधुरा म्हणाली.

मग मधुरा ने दोघींच्या साठी कॉफी बनवली. गप्पा मारत त्यांनी कॉफी घेतली. त्या स्क्रीन तर बघु शकत नव्हत्या. म्हणून मधुरा ने त्यांच्या साठी एक पुस्तक आणलं होतं. ती त्यांना ते पुस्तक वाचून दाखवत होती. माधव राव पेशवे यांच्या जीवनावर आधारीत रणजित देसाई यांनी लिहिलेली कादंबरी 'स्वामी'.

बाहेर मस्त पाऊस पडत होता. हातात कॉफी चे कप वातावरण खूप छान होते. त्या दोघी बाल्कनीत बसल्या होत्या. तर पावसाचे तुषार वाऱ्या सोबत अंगावर येत होते. वातावरण थोड थंड झाल्यावर तिने काकूंच्या अंगावर शाल पांघरून दिली.

तिची वाचन करण्याची पद्धत, आवाजातील चढ उतार यामुळे ती वाचत असलेला प्रसंग डोळ्या समोर तंतोतंत उभा राहत आहे असे वाटतं होते. पहिला भाग वाचून झाल्यावर त्यांनी ब्रेक घेतला. पहिल्यांदा ती कादंबरी वाचली तेव्हाचे त्यांचे किस्से, मनातील भावना, त्या भागात आवडलेले प्रसंग या वर त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या.

गप्पा मारत त्यांनी जेवण केलं. जेवण झाल्यावर मधुराने काकूंना औषध दिली. डोळ्यात आय ड्रॉप पण घातले. हाताला धरून त्यांना शतपावली पण करायला मदत केली. मग थोड सक्तीने त्यांना विश्रांती घ्यायला लावली.

दुपारी त्यांच्या कडे कामाला येणारी सुशीला बाई पण कामाला आल्या. त्यांनी त्यांची काम केली. मग निघून गेली. ती तर काकूंना औषध द्यायला आणि जेवण वाढून द्यायला आली होती. आज ते काम मधुराने केलं होतं.

संध्याकाळी त्यांनी चहा पण सोबतच घेतला. रात्रीचा स्वयंपाक करायला सुशीला बाई आल्या होत्या. तर त्या काकूंना विचारत होत्या,

" आज जेवायला काय करू ?"

" सुशीला आज चार लोकांचा स्वयंपाक बनव."

" चार लोकांचा ? "

" मधुरा मी कार्तिकला सांगितल आहे.संध्याकाळी येताना आशिषला घेऊन यायला." सुलभा काकू म्हणल्या. मधुरा नुसतीच हसली.

" काय बनवू काकू."

" कार्तिक सांगत होता, तू भरलेली वांगी छान बनवते. ते दोघं एकत्र जेवतात ना ऑफीस मध्ये. तर त्याने एकदा सांगितल होत.तर आज भरलेली वांगी बनव. फ्रिज मध्ये वांगी आहेत बघ."

" ठीक आहे. काकू. मी बनवते. आणखी काही बनवू ? "