Login

सुखाचा एक धागा भाग ३

सुखाचा एक धागा भाग ३
" तुला हवं ते बनव. सुशिला सांगेल तुला किचन मधलं सामान कुठं आहे ते."

" सुशिला सूनबाईला मदत कर." सुलभा काकू सुशिला काकूंना म्हणल्या. त्यांनी मान डोलावली.

" आज तर मस्त पैकी मधुराच्या हातचं जेवण जेवणार आहे."

काकू खुश होउन म्हणल्या. सुशिला काकूंना आज त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे कडे बघून समाधान वाटतं होत. आज खूप दिवसांनी त्यांनी काकूंना हसताना बघितलं होत. मधुरा पण काकूंच्या चेहऱ्याकडे निरखून बघत होती. एक क्षण तिची आई तिच्याकडे बघून हसत आहे. तिला असच वाटलं होतं.

" काकू तुमच्या साठी काय बनवू ?" तिने आपले पणाने विचारले.

" हे काय विचारणं झालं ! मी पण भरलेली वांगीच खाणार ना ! " काकू हसुन म्हणाल्या.

" मग मी तुमच्यासाठी कमी तिखट वांगी बनवते." मधुरा म्हणाली.

" चला काकू, आपण मिळुन स्वयंपाक करू ?"

सुशिला काकू पण जवळपास चाळिशी ओलांडलेली स्त्री होती. तिच अस मान देऊन बोलण त्यांना खूप भावल. त्या पण राजी खुशीने तिला मदत करत होत्या. तिने झटपट मसाला घालून भरलेली वांगी बनवली. ओल खोबर तीळ शेंगदाणा कूट गूळ तिखट मसाला घालून मसाला बनवला.

त्यासोबत वाफाळलेला भात, गरम कढी, मिरची आलं लसूण घालुन छान ठेचा बनवला. सुशिला काकूंनी तो पर्यंत मऊ लुसलुशीत भाकऱ्या बनवल्या. नंतरची आवरा आवर करुन त्या घरी निघून गेल्या.

रात्री नऊ वाजता कार्तिक सर आणि आशिष घरी आले. मधुराने सगळ्यांना जेवायला वाढलं. जेवणं झाल्यावर सगळं अवरून ती घरी निघाली. तेंव्हा पुन्हा एकदा काकूंना वाकून नमस्कार करून म्हणाली,

"काकू उदया नाष्टा घेऊन येईन."

"अग तु कशाला त्रास करुन घेते. सुशिला करेल आल्यावर."

"काकू सुशिला काकू सकाळी साडे दहाला येतात. तो पर्यंत सरांना आणि तुम्हाला नाष्टा बनवून पाठवून देईन. तुम्ही कितीही नाही म्हणलं तरी ऐकणार नाही."

" थँक्यू मधुरा वहिनी. तुम्ही आज दिवसभर आईची काळजी घेतली." कार्तिक सर भावून होऊन म्हणाले.

मधुरा आणि आशिष त्यांना नमस्कार करून घरी निघून गेले.तिच अस आपले पणाने वागणं बघून सुलभा काकू तिचं कौतुक करून थकत नव्हत्या.

रात्री झोपताना आशिष ने तिला मिठीत घेतले होते. प्रणयाची धुंदी तर डोळ्यावर अजूनही होतीच. तो तिचं कौतुक करत होता. आज तिने काकूंची देखभाल केली त्यासाठी. त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले.

" अहो किती ते कौतुक." ती तिच डोकं त्याच्या छातीवर घासून म्हणाली.

" आता माझी बायको आहेच इतकी गोड, तर तिचं कौतुक नको करायला" तो आणखी लाडात येऊन म्हणाला. त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले होते. तिचा सुगंध जास्तच आवडला तर ओठ काही क्षण तिथेच रेंगाळले होते.

" आ ss. अहो. नको ना! " ती थोडी दुर होत म्हणाली. माने पाशी जरा चुरचुरत होत. तर ते चोळत तिने विचारलं,

" अहो, एक विचारू?"

" हम्म्म."

" कार्तिक दादा स्वभावाने किती चांगले आहेत. त्याचं वय पण आहे लग्नाचं. मग ते लग्न का नाही करत ?"

" हम्म्म." आशिष ने एक दीर्घ श्वास घेतला.

" लग्न. ते तर झालं होत."

" मग त्यांची बायको ? "

" ती खूप मोठी स्टोरी आहे."

" म. सांगा ना ? काय झालं होतं ? कार्तिक सर तर किती छान आहेत. स्वभाव पण चांगला आहे. तुम्ही सांगत होतात, ते पण तुमच्या कॉलेज चें विद्यार्थी आहेत."

" हो. मला दोन वर्ष सीनिअर होते. मी एका छोट्या गावातून या मोठया शहरात शिकायला आलो. तेव्हा या शहरातील लोकांचं आणि माझं गणित सुरवातीला जमत नव्हत. त्यात इंग्रजी पण थोड कच्च होत. तेव्हा सरांनी खुप मदत केली होती. ऑफिस मध्ये ते माझे सर आहेत. पण पर्सनल आयुष्यात माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावा सारखे आहेत."

" मग आता सांगा बरं ! काय झालं होतं ? कार्तिक दादांनी लग्न का नाही केलं ?"

" कार्तिक सरांचं लग्न आपल्या लग्नाच्या आधीच दोन वर्षा पूर्वी झालं होतं. कार्तिक आणि शैलजा मॅडम हे कॉलेज मध्ये असल्या पासुन एकमेकांच्या सोबत होते. कॉलेजच लव्ही डव्ही कपल म्हणून प्रसिद्ध होते.

शैलजा मॅडम चे वडील मोठे सरकारी अधिकारी आहेत. त्यांच्या आई डॉक्टर आहेत. मॅडम एका श्रीमंत घरातून आलेल्या होत्या. तर कार्तिक सरांच्या कडे त्या मनाने काहीचं नव्हत.

वडील एका कारखान्यात नोकरीला होते. तर आई घरगुती क्लास घ्यायची. गावी थोडी जमीन आहे. ती पण भावकी मध्ये. त्यामुळे कार्तिक सर जरा बिचकत होते. लग्न करायला.

मग नोकरीला लागल्यावर त्यांनी घरी आई वडीलांना सांगितलं. शैलजा मॅडम पण आल्या होत्या. काका काकूंना भेटायला. तेंव्हा चंदू काकांनी तिला घरच्या परिस्थिती बद्दल सगळी माहिती दिली होती.

त्यांचं घर हे लहान आहे. गावी शेती घर आहे. पण त्यात देखील भावांचे वाटे आहेत. हे सगळं मान्य असेल आणि घरच्यांची परवानगी असेल. तरच लग्न करायचं.

शैलजा मॅडमच्या घरच्यांना असं स्थळ मान्य नव्हत. पण मुलीच्या हट्टा पायी शेवटी त्यांनी होकार दिला. लग्न झाल्यावर सुरवातीला सगळं सुरळीत सुरू होत.

मग हळु हळु वाद व्हायला लागले. मॅडम ना ब्रँडेड वस्तू वापरायची सवय होती. काटकसर करून संसार करायच त्यांना पटतं नव्हत.त्यांच्या खर्चा वर कोणी नियंत्रण ठेवत आहे. हि गोष्ट त्यांना सहन होत नव्हती.

जे काही कार्तिक सरांच्या खिशाला परवडेल ते ते सर्व करत होते. पण मॅडम च्या वाढत्या मागण्या पूर्ण करणं त्यांच्या साठी अवघड होत होत.
त्यांच्या वडिलांनी त्यांच्यां शिक्षणासाठी लोन घेतल होत. तर आता कार्तिक सर नोकरीला लागल्यावर ते रे पे करायचं होत. नोकरी पण नवीनच होती. त्यामूळे पगार पण जास्त नव्हता. मग ते खर्च करायला नकार देत.

नवऱ्याने काही घ्यायला नकार दिला की, मग मॅडम चिडून माहेरी निघुन जात. त्यांच्या कडून त्यांच्या आवडीची वस्तू घेउन येत. त्याच्या मुळे कार्तिक सरांना अपराधी असल्या सारखं वाटायचं.