नवऱ्याने काही घ्यायला नकार दिला की, मग मॅडम चिडून माहेरी निघुन जात. त्यांच्या कडून त्यांच्या आवडीची वस्तू घेउन येत. त्याच्या मुळे कार्तिक सरांना अपराधी असल्या सारखं वाटायचं. कुठेतरी आपण कमी पडतो आहे. एक नवरा आपल्या बायकोची हौस पूर्ण करू शकत नाही. हि बोच मनाला डाचत होती. मग त्या दोघांच्या मध्ये वादावादी व्हायची.
मोठ मोठ्याने भांडायची.त्यांच्या कमी पगाराच्या नोकरीच्या मुळे सतत टोमणे मारायची. घालुन पाडुन बोलायची. शेजारी पाजारी, नातेवाईक मित्र यांच्या समोर त्यांचा अपमान करायची.
घरातील हि सगळी वादावादी कटकटीला बघून काका काकू सतत चिंतेत असायचे. त्यातच हा ताण सहन न होऊन एक दिवस काकांची तब्येत बिघडली. त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. पण ते सुखरूप घरी परत आले.तेंव्हा हॉस्पिटलचा खुप खर्च आला होता.
एक दिवस मॅडम शॉपिंग करायला गेल्या होत्या.त्यांचा भावाच लग्न होत. तर त्यांना एक सोन्याचा राणी हार पसंत पडला. हॉस्पिटल मध्ये खूप खर्च झाला असल्याने त्यावेळी सरांची आर्थिक परिस्थिती जरा नाजूक होती. पण मॅडम हट्ट करून बसल्या होत्या. त्यांना तो हार हवा म्हणजे हवाच. त्या हटून बसल्या होत्या.
या सगळ्या वागण्याचा कार्तिक सरांना खुप त्रास होत होता. त्याचा परिणाम त्यांच्या कामावर आरोग्यावर पण जाणवत होता. सतत कोणत्या तरी दडपण खाली वावरत असावे. असच वाटतं होत.
मी हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे मधुरा. त्यावेळी मी नुकतीच कंपनी जॉईन केली होती. त्यांच्याच हाताखाली काम करत होतो.
त्या दिवशी आम्ही ऑफिस मध्ये एका टेंडर बद्दल काम करत होतो. तेव्हां मॅडमचा फोन आला होता. त्यांना तो राणी हार खरेदी करायचा आहे तर ज्वेलर कडे पैसै पाठवा. सरांनी तयावेळी नकार दिला. त्यावेळी कामाचं प्रेशर आणि शिवाय नुकतच काकांचं झालेलं हॉस्पिटलायझेशन यामुळे खर्च करणं अशक्य होत. तर सरांनी पैसे द्यायला नकार दिला. म्हणून रागात येऊन मॅडम घर सोडून निघुन गेल्या.
इतर वेळी कार्तिक सर मॅडम ना मनवून घरी घेउन यायचे. पण पाणी आता डोक्यावरून जात होत. सर गेलेच नाही. मॅडम पण परत आल्या नाहीत.
त्यांनी सरांना घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. काका काकू त्यांना समजावून सांगत होते. अरे नातं अस तोडू नका म्हणून. पण सरांनी ऐकलं नाही. रागाच्या भरात त्यांनी घटस्फोटाच्या कागद पत्रांवर सह्या केल्या.
त्यांनी सरांना घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. काका काकू त्यांना समजावून सांगत होते. अरे नातं अस तोडू नका म्हणून. पण सरांनी ऐकलं नाही. रागाच्या भरात त्यांनी घटस्फोटाच्या कागद पत्रांवर सह्या केल्या.
दोन्ही बाजूंच्या सह्या झाल्यावर कोर्ट ने घटास्पोट मान्य केला. सहा महिन्यात मॅडम च दुसरं लग्न पण झालं. मुलाचा संसार असा तूटलेला बघून काकांना जबरदस्त धक्का बसला. त्यांना हार्ट अटॅक आला. त्यातून ते वाचु शकले नाहीत. काकु पण मनाने खचल्या आहेत.
कार्तिक सरांना हसलेल बघून आता वर्ष उलटून गेली आहेत. काकू सरांकडे बघून आलेला दिवस पुढे ढकलतात.
तू तर काकुना भेटली आहेस. विचार करवत नाही काय वाटतं असेल काकूंना आपल्या तरण्या ताठ्या मुला कडे बघुन ? "
" खूप वाईट झालं. मग सरांच दुसर लग्न का नाही लावून देत ?"
" मी किती तरी वेळेला समजावून सांगितल. पण पहिल्या लग्नाचा असा अनुभव घेतला आहे ना, की आता लग्न नकोच वाटतं."
" खर आहे. दुधाने तोंड पोळल की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो."
" हम्म."
" अहो, पण अजून अख्ख आयुष्य त्यांच्या समोर उभ आहे. अस एकट्याने तर नाही ना जगता येत ?"
" बर बरोबर बोलत आहेस. पण ते त्यांना समजायला हवं ना. मी समजावण्याच काम करायला हव होत ते केलं. आता अजून काय करू शकतो ? "
" मग करा की काहीतरी. मित्र आहात ना ! "
" मित्र म्हणून त्यांना समजावण्याचा काम करायला हवं होत ते केलं की , आता आणखी काय करू ? "
" बघु. विचार करते. नक्कीच करू काहीतरी." मधुरा स्वतः च्या कपाळाला बोटाने चोळत म्हणाली.
" मॅडम तुम्हाला काय विचार करायचा असेल तो बसा करत. मला उदया ऑफीसला जायचं आहे. तर मी झोपतो आता."
" गूड नाईट बायको." तो तिच्या गालावर ओठ टेकवून म्हणाला.
" गूड नाईट अहो " ती हसुन म्हणाली.
रात्र भर ती विचार करत होती.
'अस काय करता येईल की कार्तिक सर आयुष्यात पुढं जायचा विचार करतील. '
दुसऱ्या दिवशी सकाळी मधुराने तिच सगळं आवरलं. मग आशिष सोबत काकूंच्या घरी नस्ताचा डबा दिला.दुपारी जाताना तिने काकूंच्या साठी खिचडी आणि कढी बनवून घेतली. ती घरी आली तेव्हां काकू त्याचं आवरत होत्या. अंदाजाने त्यांची वेणी घालत होत्या. मधुराने काकूंना छान पैकी तेल लावून दिलं. छान पैकी वेणी घालुन दिली.
नंतर काल वाचत असलेली कादंबरीचा तिसरा आणि शेवटचा भाग वाचत होती. माधव राव पेशवे जेव्हा त्याचं मृत्यू पत्र बनवतात तेव्हां त्यांनी किती सोप्या शब्दात सांगितल, रमा बाईंच्या नावाने कोणतीच तरतूद करावीशी वाटली नाही.त्यांच्या पश्चात त्या जीवंत राहतील का ? नाही.
त्यांच्या मनाने ग्वाही दिली होती. रमा बाईंच्या डोळ्यातील अश्रू साक्ष देत होते त्याचं नवऱ्यावर असलेलं निस्सीम प्रेमाची. नंतर माधव राव पेशव्यांचा अंत ते वाचून तर डोळ्यात पाणी आलं होत. रमा बाई सती जातात. तेव्हाच वर्णन वाचुन तर अंगावर अक्षरशः काटा आला होता. मधूराचा गळा पण भरून आला होता.
आजची दुपार त्यांनी खुप छान एन्जॉय केली होती. नंतर त्या पुस्तकातील चांगल्या आठवणी, माधव राव पेशवे यांच्या लढाई, मुद्स्तेगिरी, युद्ध कौशल्य यांच्या बद्दल चर्चा करत त्यांनी जेवण केलं. नंतर सुशिला काकू येऊन काम करून गेल्या. मधुरा त्यांना दुपारचं जेवण झाल्यावर शतपावली करायला मदत करत होती.
" काकू एक गोष्ट विचारू ? राग तर नाही ना येणारं ? "
" नाही ग. तु माझ्या सुने सारखी आहेस. विचार."
" तुम्ही कार्तिक सरांचं लग्न का नाही लावून देत ? "
" त्याने ऐकलं तर पाहिजे ना ! " त्या म्हणल्या. मग काहीतरी विचार करत पुन्हा म्हणल्या ,
" त्याने ऐकलं तर पाहिजे ना ! " त्या म्हणल्या. मग काहीतरी विचार करत पुन्हा म्हणल्या ,
" मधुरा कदाचित तुला त्याच्या बद्दल काही माहित नाही." त्या बोलताना अडखळल्या.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा