Login

सुखाचा एक धागा भाग ५

सुखाचा एक धागा भाग ५
" काकू मला यांनी सगळं काम सांगितलं आहे." त्यांची अडचण समजुन घेत मधूरा म्हणली.

" हे चागलं झालं. तुला सगळं कळलं आशिष कडून." सुटकेचा श्वास सोडत काकू म्हणाल्या.

" मधुरा आता तुच सांग, याला कसं समजावू ? "

" तुम्ही तयार आहात का ? त्यांचं दुसर लग्न लावून द्यायला ? "

" कोणाला नाही वाटणार ग आपल्या मुलाचा संसार सुखाचा चालु झालेला. पण हे आमच्या मुलाला समजलं तर पाहिजे ना ! मी तर समजावून सांगून थकले. अरे बाबा, आयुष्य असं एकट्याने नाही जगता येत."

" बरोबर बोलत आहात काकु. तुम्ही तयार असाल तर एक विचार आला आहे डोक्यात ! "

" काय ? कोणता ? "

" तुम्ही फक्त मी सांगते तसं कराल ? " तिने खूप आशेने विचारलं.

" हो करेन की! तूझ्या पाहण्यात आहे का कोणी ? "

" हम्म्म. माझी ताई आहे. ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे.ती आता सहा महिने माझ्या कडे राहायला येणार आहे. तुम्ही तिला एकदा नजरे खाली घालुन घ्या."

" तुझी बहिण ? "

" हो "

" मधुरा कार्तिकच हे दुसर लग्न आहे. तू समजत आहे ना मला काय म्हणायचं आहे ते ? ते पण त्यांचा डिव्होर्स झाला आहे."

" हो काकू माहीत आहे. माझ्या ताईच पण काहीसं असच झालं आहे." ती मायुस होऊन म्हणली.

" म्हणजे ?"

" काकू तिचं ठरलेलं लग्न मोडल. मुला कडच्या लोकांनी हुंडा मागितला होता. याशिवाय दाग दागिने , रोख रक्कम आणि चार चाकी गाडी. माझ्या काकांची आर्थिक परिस्थिती तितकी नव्हती तरी देखील आणि कर्ज काढून व्यवस्था केली होती. पण लग्नाच्या वेळी त्यांना आम्ही दिलेली गाडी पसंत नव्हती. म्हणून ते मोठी सहा लोकांना बसता येईल इतकी मोठी गाडी मागत होते. नाहीतर भर मांडवात उठून निघून जाण्याची भाषा बोलत होते. ताईने त्यांच्याशी लग्न करायला नकार दिला. त्या दिवसा नंतर ती अबोल झाली. आम्ही तिला खूप समजावत आहोत. एकट्याने आयुष्य काढणं सोप काम नाही.

ताई तिच्या जागी बरोबर होती. लग्न करायच्या आधी इतक्या मागण्या, लग्न झाल्यावर तर आईं वडीलांना कंगाल करून ठेवतील. यामुळे ताई ने वेळीच आवर घातला. आशा लालची लोकांना.त्यांच्या वृत्तीला.

मला ही वाटतं ताई ने संसार थाटावा. तिच्या हि आयुष्यात तिला सांभाळणारा हक्काचा जोडीदार असावा. काकू तर तिला समजावून थकून गेल्या. मला कार्तिक सरांचा स्वभाव आवडला. माझ्या ताईला ते सांभाळू शकतात. ताई तिच्या प्रेमळ स्वभावाने कार्तिक सरांना हसायला आयुष्य जगायला शिकवेल.दोघ एकमेकांना पूरक आहेत. आपण त्या दोघांची भेट घडवून आणू."

" अग हे दोघ कसे एकमेकांना पूरक आहेत? कसे समजुन घेतील ? "

" काकू हे दोघं हि सध्या एकटे आहेत. त्यांना देखील समाजात एकटे पणामुळे बोलणी ऐकावी लागतात. टोमणे सहन करावे लागतात. ते दोघं एकमेकांच दुःख, एकटेपण लवकर समजू शकतील. आपल्याला बोलाव लागणार नाही. आपण फक्त दोघांच्या भेटण्याच निम्मित बनायचं. बाकी सगळ्या गोष्टी अपसुक घडतील."

" मधुरा."

" काकू ताई सहा महिने इथ राहायला येणारं आहे. तुम्ही स्वतः आधी तिची परीक्षा घ्या. तुम्हाला आवडली तर आपण त्या दोघांची भेट घडवून आणू" मधुरा म्हणली.

आठवड्यात शनिवारी दुपारी अपूर्वा ताई तिच्या घरी आली. त्या दिवशी त्या दोघींनी खुप एन्जॉय केलं. बाहेर मॉल मध्ये गेल्या होत्या. नंतर स्ट्रीट शॉपिंग पण केली. पाणीपुरी पण खाल्ली. घरी आल्यावर मधुराने फक्तं ताक भात खाल्ला होता. पण आशिष साठी तिने सगळा स्वयंपाक केला. डाळ भात भाकरी आणि पालेभाजी. सोबत सॅलड पण कापल.

अपूर्वा ताई सहा महिन्याच्या ट्रेनिंग साठी शहरात आली होती. त्या घटने नंतर तिने जिद्दीने तिच शिक्षण पुर्ण केले होते. आता ती एका कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून शिकवत होती. आता त्याचं कॉलेजच्या ट्रेनिंग साठी ती इथ आली होती. दोन महिने तरी ती मधुरा कडे राहणार होती.

नंतर ती वर्किंग वूमन हॉस्टेल मध्ये किंवा पी जी म्हणून दूसरी कडे शिफ्ट होणार होती. तिला कोणा वरही ओझ बनुन राहायचं नव्हत त्यातून मधुरा आणि आशिषच लग्न अजून नवीन होत. आताशी कुठं दिड वर्ष झालं होत. तिला दोन महिन्यांत नंतर वेगळं राहणार हे सगळं मान्य असेल तरच ती मधुरा कडे राहणार होती. ती खूप स्वाभिमानी स्वभावाची मुलगी होती. पण आई बाबा यांच्या बाबतीत तितकीच हळवी.

ती आली होती. आज दुपारी तिने तिला सुलभा काकूंच्या घरी नेलं होतं. तिला सुलभा काकूंच्या बद्दल बऱ्या पैकी समजलं होत.मधुराच्या बोलण्यात त्या दोघांचा उल्लेख तर खूप वेळा आला होता. तर तिला ही त्यांना भेटायची उत्सुकता होतीच.

अजुन ही काकूंच्या डोळ्यावरचा गॉगल बाजुला झाला नव्हता. त्या अंदाजानेच कपड्यांच्या घड्या घालण्याचा प्रयत्न करत होत्या.मधुराने तिची ओळख करून दिली. मग त्या दोघींना बोलतं बसायला सांगितलं. नी ती किचन मध्ये गेली. तिने तिघींच्या साठी कॉफी बनवली. तो पर्यंत अपूर्वा ने काकुंच्या समोर असलेले कपडे घडी करून ठेवले.

" अग तू कशाला त्रास घेतला. मी करत होते घडी." काकू म्हणाल्या.

" काकू मला जे काम जमतं ते मी करते. तुम्ही तो पर्यंत माझ्याशी गप्पा करा." तिने साडी घडी करत सांगितलं.

काकू काळ्या काचेच्या आतून तिला निरखत होत्या. तिने हक्काने सगळे कपडे घडी घालुन ठेवले. त्यांच्या हाताच्या धक्क्याने खाली पडलेली उशी तिने सरळ करून ठेवली. मग काकूंना विचारून तिने कपडे कपाटात ठेवले.

कपडे कपाटात ठेवताना काही कपडे खाली पडले. तिने ते कपडे पुन्हा नीट घडी केले. मग ते सगळे कपडे व्यवस्थित आवरून ठेवले. नंतर मधुरा ने बनवून आणलेली कॉफी त्यांनी गप्पा करत प्यायली.

संध्याकाळी स्वयंपाक करायला काकू आल्या होत्या. ती त्यांच्याशी देखील व्यवस्थित आदर सन्मान करून बोलतं होती. मधुराला आशिषचा फोन आला होता. तर तिने आज सुलभा काकुंच्या डोळ्यात औषध पण घालुन दिलं. मग त्या दोघी त्यांच्या घरी गेल्या.