आता अपूर्वाच ट्रेनिंग चालु झालं होत. दरम्यानच्या काळात सुलभा काकूंना कामवाली बाई पण मिळाली जी त्यांच्या सोबत दिवस भर थांबु शकेल. त्यामुळे मधुराच त्यांच्या घरी दररोज च येणं जाणं कमी झालं होतं.
एक दिवस आशिषच्या काकांची तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. तर आशिष मधुराला घेऊन काकांच्या कडे गेला होता. अपूर्वा एकटीच घरात होती. दुपारी ती ट्रेनिंग सेंटर मधून घरी आली. ती जेवणं करतं होती. तेव्हां मधुराचा फोन आला.
" ताई तुला लगेच सुलभा काकू सोबत जाशील का ? "
" कुठं ?"
" अग हॉस्पिटल मध्ये "
" का ग ? काय झालं ?"
" अग काकुंचा पाय घसरला. त्या सकाळी अंघोळ करून बाहेर आल्या. तर त्यांना समोरचं पाणी दिसल नाही. नी त्या घसरल्या. आज नेमके कार्तिक दादा पण मुंबईला गेले आहेत. आणि मी इथ आली आहे. ताई प्लिज जाशील का त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन."
" अग त्यांच्या सोबत त्यांची ती मेड आहे ना ?"
" अग ती मेड आज आलीच नाही. तिने सकाळीं नऊ वाजता फोन केला. तिला यायला जमणार नाही म्हणून. सुशीला काकू पण आज नेमक्या गावाला गेल्या आहेत. ताई काकूंच्या सोबत कोणीतरी जायला हवं ग. "
" अग मधुरा. तू नको काळजी करू. मी जाते त्यांना घेउन. तु तूझ्या सासऱ्यांच्या कडे लक्ष दे. मी घेते काकूंची काळजी." अपूर्वा ताई तिला आश्वासन दिलं.
अपूर्वा ने सुलभा काकूंना हॉस्पिटल मध्ये नेल. त्यांची काळजी घेतली. दवाखान्यात नाव नोंदणवण्याच काम पण तिनेच केलं. डॉक्टरांच्या सोबत पण तिचं बोलतं होती. काकूंचा पायाचा एक्सरे काढावा लागला. त्यात पायाला गंभीर दुखापत झाली नव्हती. पायाला क्रेप बँडेज बांधाव लागलं. हे सगळ करायला त्यांना संध्याकाळ झाली होती.
औषधे घेउन मग ती काकूंना घेउन घरी आली. आल्यावर त्यांना फ्रेश व्हायला मदत केली.त्यांच्या साठी चहा बनवला. काकूंना स्वयंपाक घरातील वस्तू विचारून घेउन त्यांच्या साठी उपमा आणि चहा बनवला. त्यांची औषध पण त्यांना दिली.
आज पावसाने मुंबईला झोडपलं होत. तर कार्तिक सरांच् घरी येणं रद्द झालं होतं. त्यांनी त्या मेडला रात्रभर थांबण्याची विनंती केली. तेव्हा त्यांना समजलं आज तर मेड आलीच नव्हती. सुलभा काकूंना फोन केला तर त्यांनी त्यांच्या पायाच दुखणं लेकाला सांगितल नाही. उगाच कशाला त्याला काळजी लागली असती. काहीतरी अताताई पणा करून घरी आले असते. पण त्यांनी असं अविचाराने कोणतही पाऊल उचलु नये म्हणून त्यांनी हे पाय घसरल्या बद्दल लपवलं.
रात्री अपूर्वा काकूंच्या सोबत घरी राहिली होती. दोन दिवस लागले कार्तिक सरांना घरी यायला. शहरात येणाऱ्या महा मार्गावरची दरड कोसळली असल्याने दळण वळण बंद झालं होत. या काळात अपूर्वा ने सुलभा काकूंची खुप काळजी घेतली.
त्यामुळे त्या दोघींच्या मधला बॉण्ड खुप स्त्राँग झाला होता.
त्यामुळे त्या दोघींच्या मधला बॉण्ड खुप स्त्राँग झाला होता.
आशिष मधुरा परत आल्यावर ती पण तिच्या ट्रेनिंग मध्ये रमली. तिने काकुंच्या घेतलेल्या काळजीनं तर ती काकूंच्या मनात घर करुन गेली. आता तर तिलाच काकूंच्या सोबत बोलल्या शिवाय करमत नसे. ट्रेनिंग सेंटर मधून परत येताना ती दररोज काकूंना भेटायला जात. त्यांच्या सोबत वेळ घालवत असे त्यांची घरातील काम करायला मदत करत असे. आता काकूंच्या डोळ्याचा दागिना पण काढून ठेवला होता. अपूर्वा ताई च घरात असं मिसळून जाणं, घरातील सदस्या सारखी घराची काळजी घेणं.
कार्तिकची काम त्यांच्या नकळत करणं. त्यांच कपाट आवरून देणं. खोली स्वच्छ ठेवण. घर टाप टीप ठेवण. हे कार्तिकच्या लक्षात येत होत. पण पहिल्या लग्नाचा असा जबरदस्त अनुभव बघता त्याचं मन पुढं पाऊल टाकायला कचरत होत.सुलभा बाई कार्तिक कडे त्याच्या दुसऱ्या लग्ना विषयी बोलत होत्या. त्याला आईला नाराज करायचं नव्हत. पण पुन्हा एकदा लग्नाचा प्रस्ताव त्याला गोंधळात टाकत होता. आईचा बोलण्याचा इशारा अपूर्वा कडेच आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं.
अपूर्वा दिसायला खूप सुंदर आहे अस नाही. पण नाकी डोळी नीटस आहे. लघवी स्वभावाची मुलगी आहे.त्याच्या आईचा मान ठेवणारी आहे. पण त्याला नेहमी प्रश्न पडयचा,
इतक्या प्रेमळ स्वभावाची मुलगी, संस्कारी, शिकलेली, नोकरी करणारी मुलगी अजून बिन लग्नाची कशी काय ?
इतक्या प्रेमळ स्वभावाची मुलगी, संस्कारी, शिकलेली, नोकरी करणारी मुलगी अजून बिन लग्नाची कशी काय ?
त्याला अजुन अपूर्वाच्या भूत काळा बद्दल काहीचं माहिती नव्हत ना. ती त्यांच्याशी बोलतं होती. पण त्यांचे विषय हे खास करून आई मधुरा आणि आशिष यांच्या बद्दल असायचे. ते पण त्यांच्या पैकी एक ना एक जण त्यांच्या आसपास असतं तेव्हाच बोलणं होत. इतकचं नव्हे तर त्यांना अजून एकमेकांचे फोन नंबर पण माहिती नव्हते. कधी फोन करून बोलायची गरजच पडली नव्हती. कार्तिकला अपूर्वा आवडायला लागली होती. पण पुन्हा मन गुंतवण्याची त्याची तयारी नव्हती.
दुसरी कडे अपूर्वा पण कार्तिकच्या साध्या सरळ मार्गी स्वभावाच्या प्रेमात पडली होती. तिला मधुरा आणि सुलभा काकूंच्या कडून त्यांच्या आधीच्या असफल लग्नाच्या बद्दल समजल होत. पण पुन्हा लग्न करायचं म्हणजे आई वडीलांना हुंडा द्यावा म्हणून तगादा लावणाऱ्या लोकांना आमंत्रण दिल्या सारखं वाटतं. कदाचित कार्तिक देखील तिच्या भूत काळा बद्दल जाणून घेतल्यावर नकार देत असतील. कोण लग्न करायला तयार होईल, अशा मुली सोबत जिने तिच्या लग्नाच वऱ्हाड हुंडा देणार नाही. अस ठणकावून सांगत परत पाठवली होती ?
त्या दोघांची मनस्थिती या तिघांना समजत होती. त्यांनी त्या दोघांना एकत्र बोलता येइल म्हणून बरेच वेळा भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण तो नेहमीचं अयशस्वी झाला होता. मधुराने एक दिवस स्पष्ट शब्दात अपूर्वाला विचारलेच,
" ताई तुला कार्तिक दादांच्या बद्दल काय वाटतं ? "
" ताई हे बघ आयुष्य असच एकट्याने नाही जगता येत. ताई तो माणूस हुंडा घेण्यासाठी अडून बसला. तू त्याला नकार दिला. ते योग्य केलंस. पण त्या नंतर तु का नाही तूझ्या आयुष्यात पुढं जात. त्यांनी तर लग्न पण केलं. ते नाही तिथं अडकून राहिले. मग तु का थांबते ? .
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा