Login

सुखाचा एक धागा भाग ७(अंतिम भाग)

सुखाचा एक धागा भाग ७(अंतिम भाग)
ताई काका काकुला तुला मनापासून सुखी आनंदी झालेलं बघायचं आहे. हे वर वरचं खोटं नकली हसू बघून काळीज दुखत ग त्यांचं . तू एकदा तरी या विषयावर विचार कर. उदया तुम्ही दोघ भेटा. बोला. मग ठरवा.

ताई तु काका काकुची एकुलती एक मुलगी आहेस. स्वाभाविक आहे तुला त्यांच्या बद्दल कर्तव्य पार पाडण. त्याची चिंता लागून राहणं. पण ताई कार्तिक दादा तुला आडकाठी नाही करणारं. उलट सपोर्ट करतील. तू या विषयावर बोलून बघ. आयुष्य एकदा तरी आपल्याला हसुन जगण्याची संधी देत. ती संधी कार्तिक दादा असतील ? " मधुरा ने तिला समजावलं होत तिच्या परीने. निदान आज तरी अपूर्वा ताई कार्तिकना भेटायला तयार झाली होती. ते पण तिचा जोडीदार म्हणून कसा आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायला ?

दुसरी कडे सुलभा काकूनी त्याला समजावून सांगितल. पण कार्तिक अजिबात ऐकायला तयार नाही म्हणल्या वर त्यांनी आपलं ठेवणीतल अस्त्र बाहेर काढल.

" कार्तिक आता माझं देखील वय झालं आहे. मला देखील कोणाची तरी हक्काची सोबत हवी आहे. मी एकटीने किती दिवस अस राहायचं ? अपूर्वा चांगली मुलगी आहे. तू एकदा तिला तूझ्या जोडी दाराच्या नजरेने बघ. तुलाच समजेल. आयुष्य खूप सुंदर आहे. जगण्याचा आनंद घे. आयुष्यात पुढं जाण्याची संधी प्रत्येकालाच मिळते असं नाही. देवा ने तुझ्या साठी ती संधी दिली आहे. अपुर्वाच्या रुपात. हि संधी वाया जाऊ देऊ नकोस “

शेवटी यावर उपाय म्हणून सुलभा काकू नी त्याला अपूर्वाला भेटायला पाठवलच. तिकडे मधुराने देखील कार्तिक दादांच्या सोबत बाहेर भेटायला पाठवल.

आज रविवारी ते दोघं कॅफे मध्ये भेटले होते. आधी तर नेहमी प्रमाणे त्याचे विषय मधुरा आणि आशिष, आणि सुलभा काकू यांच्या भोवती फिरत होते. मग थोड बोलण्यात कंफर्टेबल झाल्यावर इतके दिवस मनात घोळणारा प्रश्न, तिच्या लग्ना बाबतीचा ' त्याने तिला विचारलाच. तिने देखील जे घडलं होत ते खरं आणि स्पष्ट शब्दात सांगितल.

तिच्या या निर्णयाबद्दल समाजाने तिला अशिष्ठ, गविष्ठ, कु संस्कारी, आगावू मुलगी असल्याचे किताब दिले आहेत. हे देखील सांगीतल. या शिवाय तिचे आई वडील तिच्या या निर्णयाबद्दल थोडे नाराज होते. पण नंतर त्यांनी तिला सपोर्ट केला होता. हे पण सांगीतल. तिच्या वर तिच्या आई वडीलांची जबाबदारी आहे. हे पण सांगीतल.

तो तिच्या या बाणेदार स्वभावाच्या प्रेमात पडला . त्याने तिच्या निर्णयाबद्दल तिचं कौतुकच केल. त्याने तिला त्याच्या असफल लग्नाच्या बद्दल पण सांगीतल. ते दोघं एकमेकांच्या सोबत बोलतं होते. तेव्हा शेजारच्या टेबल वर बसलेलं कपल जे मागच पासुन हळू आवाजात बोलतं होत. ते आता तार सप्तकात बोलू लागले. त्यांच् भांडणं हे लोकांच्यासाठी करमणूक झालं होत. रागा रागात त्या माणसाने पाण्याचा ग्लास खाली फेकून दिला. काचेचा ग्लास पडून फुटला. आजू बाजूला पाणी सांडल. काचेचे तुकडे विखरले होते.

" तू कधीच नाही सुधारू शकणार. माझं डोकं फिरल होत की मी तूझ्या बापाच्या पैशाच्या अमिषाला बळी पडलो."

" तू माझ्या बापाच्या पैशाच्या अमिषाला बळी पडला. तर भोग आता. हे बघ माझ्या बापाच्या पैशाच्या मिजास करतो. मला नाही शिकवायला जायचं."

त्या दोघांचा मोठा आवज ऐकून बाकीची लोकं खाणं बंद करून त्याचं भांडणं बघत होते.

" गेट आउट." कॅफे चा मॅनेजर म्हणाला.

" प्लिज मॅडम, प्लिज सर तुमचं जे काही भांडणं आहे ते घरी जाऊन सोडवा बाकिच्या लोकांना त्रास देऊ नका."

" तूझ्या मुळे असल्या लोकांचं बोलणं ऐकावं लागतं." तो म्हणाला.

" याचे पैसे दे. आणि मॅटर मिटवून टाक." तिने त्याला ऑर्डर दिली. नी टक टक सँडल वाजवत निघून गेली.

तिचा तो बेपरवाईचा अवतार, अंग प्रदर्शन करणारे ते छोटे कपडे, चालताना कंबर लचकवत चालण्याची तिची अदब बघून लोकं तिच्या कडे बघत होती. तिच अस वागणं बघून तो मुलगा खूप लाचार झाला होता. काही पावलं ती पुढं गेली असेल तर ती समोर कार्तिक आणि तिच्या सोबत एका मुलीला बघून एक क्षण थांबली. पण नंतर त्यांना इग्नोर करून चालु लागली.

इतक्यात तिचा फोन वाजला. तिने उचलला तर समोरून एक माणूस बोलतं होता. तिला तिने केलेल्या वायफळ खर्चा बद्दल जाब विचारत होता. ती खाली मान घालून ऐकून घेत होती. राग आवरायला म्हणून तिने स्वतः चा ओठ दाता खाली दाबला. ती कार्तिकच्या टेबल पासुन जवळच उभी होती. त्यांच्या भांडणा मुळे वातावरण थोड शांत झालं होतं. तर कार्तिकला तिच्या फोनवरच बोलणे ऐकायला येत होत.

त्या माणसाने पैसे दिल्यावर तो तिच्या मागे खाली मान घालुन चालत होता. जस एक पिल्लू आपल्या मालकाच्या मागे लुटू लुटू जातं. तसचं काहीसं दिसत होत. कार्तिक आणि अपूर्वा ने त्या दोघांना अविश्र्वासाने बघितलं. पण एकमेकांच्या समोर बसलेल्या त्या काय रीॲक्शन द्यावी तेच समजत नव्हत. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. ते दोघं आपली आपली कॉफी पित होते. डोक्यात नुकतच घडलेलं भांडणं फिरत होत. हा अबोला सहन न होऊन कार्तिक ने बोलायला सुरुवात केली.

" ही शैलजा आहे."

तो शांत आवाजात म्हणाला. अपूर्वा ने चमकून वर बघितलं.

" हा तोच मुलगा होता. ज्याला मी नकार दिला होता." शून्यात नजर ठेवत अपूर्वा म्हणली.
काही वेळ कोणीच काही बोललं नाही.

" आयुष्य एकदाच मनमुराद जगायची संधी देत. देवाने माझ्या साठी ती संधी तूझ्या रुपात पाठवली आहे. मला साथ देशील या संधीच सोन करायची अपूर्वा ? " हळुवार स्वरात कार्तिक नी विचारलं.

त्याच्या त्या भावुक आवाजाने तिच्या मनातली तार झंकारली. तिच्या गालावर गुलाबी साज चढला. नजर झुकली होती. चेहरा आनंदने उजळून गेला होता.

" बोला ना अपूर्वा, कराल माझी सोबत, माझी बायको बनुन ? "

" हो. मला ही आयुष्यात पुढं जायचं आहे. मनमुराद आनंद लुटायचा आहे. माझ्या साठी देव बाप्पाने तुम्हाला पाठवल आहे. माझा जोडीदार म्हणून. मी तयार आहे."ती खाली मान घालुन म्हणली.

" मग हे माझ्या कडे बघून बोल ना !" तो तिला झेडत म्हणाला.

" अहो, लग्नासाठी हात मागायला माझ्या घरी यावं लागेल."

" अहो ss. किती गोड वाटलं कानांना. मग कधी येऊ मागणी घालायला. आता जायचं ? "

" इश्श. अहो हळू बोला ना ! सगळे आपल्या कडेच बघत आहेत." ती लाजून म्हणाली.

" मग बघू दे की. मी माझ्या होणाऱ्या बायको सोबत बोलतं आहे."

तो तिच्या गुलाबी चेहऱ्याकडे बघत होता त्याची ती नजर बघून ती लाजून चूर चूर झाली होती. आनंदातच ते दोघं घरी आले. घरी येऊन बघतात तर समोर अपूर्वाचे आई वडील आणि मधुरा आणि आशिष सुलभा काकूंच्या सोबत बोलतं होते. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना समजायला वेळ लागला नव्हता.

मुलांची हि भेट वाया गेली नाही. मधुराने काका काकूंना आज अपूर्वाला भेटायला बोलवलं होत. तसचं अपूर्वा ताई साठी कार्तिक सरांचं स्थळ पण सुचवलं होतं.त्यांच्या बद्दल सगळी माहिती पण सांगितली होती.अपूर्वा ताईच मन थोड त्यांच्या प्रती झुकत आहे.याची देखील कल्पना दिली होती.ते दोघं त्या मुलाला आणि त्यांच्या आईला भेटायला आले होते. त्यांनाही आपल्या मुलीला सुखी झालेलं बघायचं होतं ना.

त्या सगळ्यांना एकत्र मोकळे पणाने बोलता यावं म्हणून त्यांनी मुलांना भेटायला बाहेर पाठवल होतमुलगा मुलगी एकमेकांना पसंत आहे. तर लगेचच लग्न ठरलं.

अपूर्वा ताईच ट्रेनिंग संपल्यावर लग्न करायचं ठरवलं. तूर्तास तरी त्यांनी साखर पुडा करून घेतला. साध्या पद्धतीने त्याचं लग्न झालं. अपूर्वा ने सुलभा काकूंना आईच्या स्थानी मानलं.त्यांच्या कर्तव्यात कसूर ठेवली नाही. ती तिची नोकरी घर आणि काकूंची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत होती. कार्तिक ने तिच्या आई वडीलांना त्याच्या आई वडिलांच्या प्रमाणे मानलं होत. त्यांच्या घरापासून दोन बिल्डिंग सोडून त्याने अपूर्वा च्या आई वडीलांना राहायला आणलं होतं. तिच माहेर जपल होत.

काळ पुढं सरकत होता. त्यांचा संसार फुलत होता. आशिष मधुराला एक मुलगी झाली. तर कार्तिक आणि अपूर्वा ला एक मुलगा झाला. सुलभा काकू नातवंडांच्यात रमल्या होत्या. त्यांचा बी पी चा त्रास तर कुठेतरी गायब झाला होता.

समाप्त.

©® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.