Login

सुखाची ओंजळ... भाग 16 #मराठी- कादंबरी

Barach wel zala sumnni dar ughdlela nvhata aarohila bajuchi khidaki ughdi disli

सुखाची ओंजळ भाग 16
आधीच्या भागात आपण पाहिले की,


निधी सुमनला बाहेर फिरायला घेऊन गेली, पण बाहेर लोकांच्या नजरा सुमन वर खिळल्या, सुमनला खूप वाईट वाटलं,  निधीने तिला सांभाळून पार्कमध्ये नेलं, तिथेही एक प्रसंग घडला आणि तिथून सुमन निघाली..


 निधीने शोधलं तिला, सावरलं आणि तिच्या सोबत वेळ घालवला, काही वेळाने  बाकीच्या मैत्रिणी आल्या त्याही एकेक करून तिच्याशी बोलल्या, तिच्याशी संवाद साधला...आज खूप महिन्यानंतर सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटल्या.. सगळ्यांना खूप बरं वाटलं आणि सुमनच्या चेहर्‍यावरचा जो आनंद होता तो बघून सगळ्यांना खूप प्रसन्न वाटलं.. निधी तर खूप खुश झाली की आज खुप दिवसानंतर सुमनच्या चेहऱ्यावर हास्य आलं, हे बघून तिला खूप बरं वाटलं..  पार्कमधून घरी आले, त्यानंतर प्रीतीच्या आईने  फोन केला आणि सुमनच्या बाबांना खूप काही ऐकवलं.. सुमनला खूप वाईट वाटलं, ती रूम मध्ये गेली, तिने दार लावला.. संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी तीनी दार उघडला नाही म्हणून बाबा गेले.. बाबांनी खूप विनवण्या केल्या..


 आता पुढे,


बराच वेळ झाला सुमननी दार उघडलेला नव्हता, आरोहीला बाजूची खिडकी उघडी दिसली, म्हणून तिने खिडकीचा पल्ला उघडला तर सुमन तिला काहीतरी करताना दिसली तिच्या हातात ब्लेड होता.. आरोही घाबरली ती ओरडली,


“दि.. असं काही करायचं नाही, दार उघड.. नाहीतर आता आम्ही दार तोडून आत येऊ, आधी दार उघड... असं काहीच करायचं नाही...

“ तुम्ही सगळेजण जा इथन...मला माझ्या हालवर सोडून द्या ...मला  आता नाही जगायचंय, हे असं जीवन जगून काय करायचंय.….. माझ्यामुळे बाबांना किती त्रास होत आहे, प्रीतीची आई त्यांना किती काय बोलून गेली.. आता मला सहन होत नाही.....” 

“दि असं काही करायचं नाही, उघड दार आधी, ..
 आई बाबांच्या लक्षात आल आणि बाबांनी बाजूच्या काकांना वगैरे बोलावंल, कसा तरी दार उघडून घेतला आणि सुमन ला आपल्या जवळ घेऊन तिला थोपटलं 


“नाही बेटा, असं नाही करायचं...


हे जीवन खुप अनमोल आहे, याचा असा राग नाही करायचा बेटा.. ही देवाने दिलेली देणगी आहे...त्यानी दिलय  ना मग तोच काय करायच ते ठरवेल, आपण नाही ठरवायचं बेटा...


“ सॉरी बाबा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला.. पण प्रॉमिस यापुढे तुम्हाला त्रास होईल असे मी नाही वागणार, मला माफ करा बाबा.. मला माफ करा...


 बाबांनी तिला बसवलं आणि घास भरवून दिला...
ते रूम मध्ये निघून गेले


 दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनची मावशी आणि तिची मावस बहीण प्रीती दोघ्याही सुमन ला भेटायला घरी आल्या..
“ सुमन... आरोही... आहात का गळ...
 आरोही बाहेर आली..


“ मावशी... कशी आहेस मावशी?... प्रीती कशी आहेस?...
“ बऱ्या आहोत आम्ही दोघी.

“ तू कशी आहेस बाळा?.

“ मी बरी आहे...
“  तुझी आई कुठे गेली?..


“ आई आहे ना बाजारात गेली आहे तू बस ना मावशी ,मी चहा आणते तोपर्यंत..

आरोहिनी सगळ्यांना  चहा दिला, तोपर्यंत आई-बाबा बाहेरून आले
“ अग मंगला, तू?.. तू कधी आलीस?...


“ अग आत्ताच आले,तू बाजारात गेली  ना,?...


“ सुमन कुठे आहे?..


“ सुमन आत मध्ये आहे.. रूम च्या रूम मध्ये असते जास्त कोणाशी काही बोलत नाही... त्या दिवशी तिची मैत्रीण निधी आली आणि तिला घेऊन गेली होती बाहेर फिरायला...  तिच्या बाकीच्या पण मैत्रिणी आल्या होत्या तर तिच्या एका मैत्रिणीच्या आईने फोन करून सुमनच्या बाबांना काही काही ऐकवलं.. आता तिचही मन उडालय...


 निधी सांगत होती छान दिवस गेला म्हणे खुप दिवसानंतर मैत्रिणी भेटल्या होत्या तिला, तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता पण कोणाला कोणाचं चांगल बघवत नाही, माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचं हास्य तिच्या मैत्रिणीच्या आईला पहावले नाही म्हणाली तुमच्या मुली मुळे माझ्या मुलीचं नुकसान झालं तर कोण जबाबदार राहील...


 असं होतं का कधी?...


 जाऊदे ग , तू लक्ष नको देऊ.. जग असतं, त्यांना कुणाचं काही बघवत नाही.. आपल्याला सुमन कडे लक्ष द्यायच आहे जगाकडे नाही.. तू काळजी करू नकोस ग, होईल सगळं ठीक.. मी सुमनच्या रूममध्ये जाते. मावशी रुमकडे गेली दाराजवळ उभी राहू,


“ येऊ का ग आत सुमन...
“ अग मावशी, ये ना ये बस...


“ कशी आहेस बाळा?...


“ मी बरी आहे मावशी... तू सांग तू कशी काय इकडे....


“ अरे वा तुला भेटायला यायचं नाही काय?.. काही नाही ग तुला भेटायला आले ,खूप दिवस झाले तुला बघितलं नव्हतं म्हणून तुला भेटावं वाटलं तेवढं तुला बरं वाटेल आणि मलाही बरं वाटेल...


“प्रीती नाही आली?..


“ प्रीती पण आली आहे खाली बसली, काय म्हणतेस बेटा अजून?...
“ अजून बर आहे मावशी...


“ एक विचारू का?..
“ विचार ना मावशी.…


“ राज काही फोन बिन आला होता का?.. तो कुठे आहे?.. काय करतो?.. काही कॉन्टॅक्ट आहे का तुझा त्याच्याशी?....
“ नाही मावशी....


“ असं कसं चालेल ग, त्यानी असं का केलं असेल ..?..
“मावशी आपण त्याच्याबद्दल नको बोलूयात.... 
 “का?...


“कारण मला काहीच माहिती नाही ग ....
“बाबांना सगळं माहीत आहे?....


“ हो आई बाबांना सगळं माहिती आहे.... बाबा जास्त विषय काढत नाही, निधीनी त्यांना सगळं सांगितलं....


“निधीच कस चाललय ग?.. ती समीर बरोबर राहते की एकटीच राहते?....


“ नाही मावशी, आई बाबांजवळ राहते, समीरला सहा महिन्याची शिक्षा झाली आहे...


“ अरे वा, हे खूप छान झालं, पण प्रतीक भेटला का नाही?... 
“ पोलीस तपास करत आहेत...


“अच्छा, तू आराम कर मी खाली बसते...


 मावशी रूममधून गेली..


 सुमनने इन्स्पेक्टर ला फोन लावला...


“ हॅलो साहेब.. मी सुमन बोलते.. “हा बोल बेटा... काय काम काढलेस आज...


“ काम असं काही नाही, पण आता तुम्ही या केस च काम करणार म्हटल्यावर तुमच्याशी कनेक्ट राहावं लागेल... नाही का सर.. काही पत्ता लागला का हो प्रतीकचा?...


“ नाही अजून तरी नाही, काही पत्ता लागला नाही.. काही कळलं की मी कळवतो ना तुला, तू काळजी करू नकोस ग तुला न्याय नक्की मिळेल...


 सुमन फोन ठेवते...


 पोलिसांची नजर त्या पवन वर होतीच, आज पुन्हा पवन विचित्र वागायला लागला होता.. एक हवालदार त्याच्या मागावर होता आणि त्याचं वागणं विचित्र बघून त्याला त्याचा संशय आला म्हणून त्याने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या घरी पोहोचले...


 घरी त्याची बायको होती,  तिला विचारपूस केली,
“ पवन तुमचा नवरा का?...


“ हो साहेब, काय झालं साहेब?.. काही केले का त्यानी?...
“ नाही नाही , काही केले नाही... कुठे आहे तो... 
“आहे ना साहेब, आताच आला, बोलवू का?..


“नाही नाही आम्हाला तुमच्याशीच बोलायचं आहे...
“ कुठे शेती आहे तुमची?..


“ इथे दोन एकड आहे साहेब, आणि याच्या नंतर काही अंतरावर आणखी एक शेती आहे, तिथे झोपडी वगैरे आहे,पवन कधी कधी जातो फिरकायला...
“ आता कोण राहते तिथे?..


“ आता.. कुणीच नाही..
“ आता आम्ही तुमच्या शेतात गेलो होतो तर आम्हाला कंदील सुरू दिसला..  कोणी राहते का तिकडे?..
 “पवन जाऊन आला आताच
 “महागडा मोबाईल आहे त्याच्याकडे, तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल?...


“ नाही साहेब, तो मला काही सांगत नाही, पण एक दिवस मी खूप विचारलं तेव्हा बोलला एका पोरानी दिला म्हणे त्याच प्रतीक नाव आहे..


“पण त्याने का दिला मोबाईल?...
“ काही नाही हो साहेब, त्याच्या बंगल्यावर माझा नवरा काम करायचा म्हणून त्याची ओळख आहे.. 


आणि त्याला तो मोबाईल वापरायचा नव्हता.. म्हणाला मी दुसरा मोबाईल घेणार आहे, तोवर  मोबाईल वापर काही दिवस मग जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुझ्याकडुन घेईल..

बांगला?.. पण त्याचं तर छोटसं घर आहे ना..


“ नाही हो साहेब, ते जून घर होता, आता मोठा बंगला आहे त्याचा...


“ तुम्ही आम्हाला पत्ता द्या आम्ही चौकशी करतो...
“ ठीक आहे साहेब...


 पवनच्या बायकोने पोलिसांना प्रतीकच्या घरचा पत्ता दिला...
 पोलिस ताबडतोब प्रतीकच्या घरी पोहोचले.. चांगलं दोन मजली घर होतं...


 दारावरची बेल वाजली... एका माणसाने दार उघडलं..
“ साहेब आहेत का?..
“हो आहेत, मी बोलावतो... साहेब तुम्ही बसा मी आवाज देतो...


 तो माणूस वरती गेला.. थोड्यावेळाने कोट वगैरे घातलेला माणूस खाली उतरला..


“ नमस्कार, बोला काय काम काढले?...


 पोलीस त्या माणसाकडे बघतच राहिले कारण याआधी प्रतीचे वडील म्हणून त्यांनी ज्या माणसाला बघितलं होतं त्या माणसाच राहणीमान वेगळं होत, चेहरा थोडा मिळता जुळता वाटला...


“ बोला साहेब ...काय काम काढलं इकडे?..
“  प्रतीक तुमचाच मुलगा ना?..
“ हो माझाच मुलगा..


 “तुम्हीच विजय इनामदार का?...
“ हो मीच विजय इनामदार आणि  माझा मुलगा प्रतीक विजय इनामदार...


“पण मागच्या वेळी आम्ही ज्या माणसाला भेटलो तो तर वेगळाच वाटला होता... 


तो म्हणाला होता की तो प्रतीक चा वडील आहे...मग तुम्ही?...
“साहेब तुम्ही आमच्या जुन्या घरी गेला असाल, तिथे माझा भाऊ अजय राहतो ,आम्ही जुळे असल्यामुळे सारखेच दिसतो ,तो आधी गावाकडे राहायचा,आता इकडे आला म्हणून मी त्याला माझ जून घर राहायला दिल.. 


प्रतिक इनामदार माझाच मुलगा आहे आणि हो प्रतीकला मुलगाच मानतो म्हणून बोलला असेल की मीच त्याचा बाबा आहे..पण तुम्ही आता माझ्या मोठ्या बंगल्यात उभे आहात बर का...


“ माफ करा साहेब कदाचित काहीतरी गैरसमज झाला असेल पण मला सांगा साहेब आता तुमचा मुलगा कुठे आहे?..
“ माझा मुलगा सध्या इथे नाहीये तो त्याच्या बायकोसोबत मित्राकडे फार्महाऊसवर गेलाय...


“ त्याला ताबडतोब बोलावून घ्या...
“का पण?.. काय झालं?..


“ तुम्हाला खरच काही माहीत नाही की माहीत असूनही तुम्ही माहीत नसल्याच सोंग करताय...
“ माईंड युवर लैंग्वेज इंस्पेक्टर....


“माफ करा साहेब, तुमच्या मुलाने एवढा मोठा गुन्हा केलाय त्या गुन्ह्यासाठी आम्ही इतक्या दिवसापासून शोधाशोध करतोय, आणि तुम्हाला याची पुसटशी कल्पनाही नाही.. ही गोष्ट काही पचत नाही म्हणून मी बोललो...


“ माझ्या मुलाने काय गुन्हा केला?...
“  खरंच तुम्हाला माहीत नाही का साहेब...
“ नाही माहित...


“ तुमच्या मुलाने ॲसिड हल्ला केलाय एका तरुण मुलीवर...  आयुष्य बरबाद केलं तीच...आणि तेही फक्त तुमच्या मुलाच्या इगोमुळे आणि एकतर्फी प्रेमामुळे प्रेमामुळे....
“ काय बोलताय साहेब... कोणाच्या प्रेमात पडला..


“ ते तुम्ही त्यालाच विचारा... सुमन नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला तेही एकतर्फी प्रेम, तिच्याशी लग्न करायचं होतं त्याला , तिनी नकार दिला म्हणून त्यानी हा असा सूड घेतला...
“ साहेब शक्यच नाही.. माझ्या मुलाचे तर लग्न झाले आहे,  लग्नाला सहा महिने झालेत....


 “काय बोलता तुम्ही?...लग्न आणि प्रतीकच...?.


“ हो आणि आता ते मित्राकडे त्याच्या फ्रेंडसोबत एन्जॉय करायला गेलेत...


“ कसं शक्य आहे त्याचं लग्न?.. इन्स्पेक्टर मनात बोलताना
“  तुम्ही मला अजून काही माहिती देऊ शकाल का प्लीज....
“हो हो साहेब.. तुम्ही बसा.. 


इन्स्पेक्टर बसले..


“ रामू पाणी आण..
 “मालती ये मालती.. अगं प्रतीकच्या लग्नाचा अल्बम घेऊन ये... 
मालती अल्बम घेऊन आली...


क्रमशः

0

🎭 Series Post

View all