Login

सुखाची ओंजळ... भाग 17# मराठी- कादंबरी

Maltine pratikchya lagnacha albam aanala tyanni lagnache photo pahile tewha polis achambit zale

सुखाची ओंजळ भाग 17


आधीच्या भागात आपण पाहिले की


सुमनची मावशी सुमनला भेटायला आली, दोघींच्या छान गप्पा झाल्या राजचा विषय निघाला, पण सुमन बोलायला तयार नव्हती..


 जाऊदे ना मावशी असं म्हणून तिने विषय सोडून दिला..


 पोलीस प्रतीकचा शोध करत होते पोलिसांची पवन वर नजर होती, पोलीस पवनच्या बायकोला जाऊन भेटले, त्याच्या बायकोने सांगितलं की पवन आधी प्रतीकच्या बंगल्यावर काम करायचा, आधी पोलिसांनी पाहिलेलं प्रतीकच जून  घर होत, आता पोलीस प्रतीकच्या नवीन घरी गेले, तिथे त्याच्या बाबांशी भेट झाली, त्यांनी सांगितलं की प्रतीकच सहा महिन्यापूर्वी लग्न झालंय पोलिसांचा विश्वासच बसत नव्हता...


त्यांनी प्रतीकच्या आईला आवाज दिला,


“मालती ,लग्नाचा अल्बम घेऊन ये...


आता पुढे,


मालतीने प्रतिकच्या लग्नाचा अल्बम आणला..


त्यांनी लग्नाचे फोटो पाहिले, तेव्हा पोलीस अचंबित झाले...

हा फोटो त्यांच्या मोबाईल मधल्या फोटोला मॅच करत नव्हता.. त्यांनी तसं सांगितलं तेव्हा प्रतीकचे बाबा  म्हणाले की तुमच्या मोबाईल मध्ये फोटो आहे तो माझाच मुलगा आहे प्रतीक इनामदार... साहेब त्याचा गेटअप बदललाय ,नीट पारखून बघा..


प्रतिकच्या बाबांनी अल्बमकडे बघून हा बघा माझा मुलगा आणि माझी सून मेघा... इन्स्पेक्टर प्रतीक आणि मेघाच्या चेहऱ्याकडे पाहून अगदी अचंबित झालेत आणि ताडकन उठले...


“ नॉट पॉसिबल हे कसे शक्य आहे?..


“ काय झालं साहेब, मी प्रतीक म्हणून ज्याचा चेहरा पाहिला तो चेहरा हा नाहीये...


“ माझाच मुलगा आहे साहेब..


“ तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला इथे लवकरात लवकर बोलू शकाल का मी विनंती करतो तुम्हाला...


 इन्स्पेक्टरनी खिशातून मोबाईल काढला आणि बाबांना दाखवत
“परत एकदा हा फोटो बघाना, हा चेहरा बघा...


प्रतीकचे बाबा हसून,


“ साहेब माझाच मुलगा आहे, त्याला लहानपणापासूनच सवय वेगवेगळे गेटअप करण्याची, मी आता तुमच्यासमोर दहा फोटो ठेवील ना तर दहाही वेगवेगळी दिसतील...
मी एक दोन दिवसात बोलवून घेतो..


“ठीक आहे, आम्ही निघतो आणि थांक यु तुम्ही सहकार्य केल आम्हाला...


पोलिस तिथून निघून सुमन कडे गेले त्यांनी सुमनला मोबाईल मधले फोटो दाखवली आणि प्रतीकच्या घरी पाहीलेली फोटो दाखवली तेव्हा सुमनी म्हटलं की 


सर तुमच्या मोबाईल मध्ये जी फोटो आहे ती प्रतीकचीच आहे, तो नेहमी वेगवेगळ्या गेटअप मध्ये फोटो काढायचा... 


पोलीस तिथून निघाले आणि पुन्हा प्रतीकच्या बाबांकडे गेले... तिथून प्रतीकचा दुसरा मोबाइल नंबर घेतला आणि तो मोबाईल नंबर स्ट्रेस वर लावला.. लोकेशन लोणावळ्यातल दाखवत होत..


 पोलिस लोणावळासाठी रवाना झाले, तिथे गेल्यावर त्यांनी त्या लोकेशनवर असलेल्या फार्म हाऊस वर चौकशी केली, तिथे पोलिसांनी प्रतीकला पकडलं आणि त्याला फरफटवत पोलीस स्टेशनमध्ये आणलं... सोबत त्याची बायको पण आली..


 “साहेब मी काही नाही केलं.. साहेब काही नाही केलं...


“ काही नाही केलं तू, तुझं लग्न झालं होतं ना रे, किती महिने झाले तुझ्या लग्नाला..


“ साहेब सहा महिने होतील आता..


“ मग तुझं लग्न झालेले असतानाही तू तिच्या मागे का लागला..
“ नाही नाही साहेब मी काही केलं नाही..


“ बोल की सगळ खर खर , नाहीतर आम्हाला बोलत करता येत... दंडे पडले कि पोपटासारखा बोलायला लागशील...
 पोलिसांनी त्याला लॉकअप मध्ये बंद केलं, मेघानी प्रतीकच्या बाबांना फोन करून सगळं कळवलं..


 एका तासात प्रतीकचे बाबा पोलिसस्टेशन मध्ये आले.. 


“ साहेब काय केलं तुम्ही?.. माझ्या मुलाला अरेस्ट केलं..
“ त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय...


“ गुन्हा सिद्ध झालेला नाहीये, चोवीस तासाच्या आत माझा मुलगा सुटलेला पाहिजे.. माझे वकील  येतीलच आता..


“ माफ करा साहेब.. पाच वाजलेत आता. आज शनिवार आहे आजची वेळ संपलेली आहे, उद्या रविवार आहे त्याच्यामुळे तुमचा मुलगा आता डायरेक्ट सोमवरलाच सुटू शकेल.. त्यामुळे तुम्ही आता सोमवारी या...


 इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काही बरं केलं नाही, गाठ माझ्याशी आहे...


“ हे बघा साहेब, तुमच्या श्रीमंतीचा माज इथे दाखवू नका.. इथे श्रीमंतीचं काही चालणार नाही.. आम्हाला आमचं काम करू द्या आणि तुम्ही तुमचं काम करा आमचा वेळ वाया घालवू नका...


प्रतीकचे बाबा तिथून निघून गेले, शनिवार रविवार असल्यामुळे प्रतीकला दोन दिवस तिथेच राहावं लागलं.. रात्री त्याची बायको डबा घेऊन आली,


“ साहेब सोडा ना प्रतीकला.. त्याने काही नाही केले..
“तुम्ही बसा इथे..मला सांगा, तुमच्या लग्नाला किती महिने झाले..


 “आमच्या लग्नाला सहा महिने झाले..


“ या सहा महिन्यात तुम्ही प्रतीकला किती ओळखलं?..
“ किती ओळखलं म्हणजे?.


“ म्हणजे एखाद्या व्यक्तीला ओळखायला एक दिवस लागतो आणि त्याच व्यक्तीला कधी कधी ओळखायला आपल्या वर्षानुवर्षे लागतात, तर तुमचा प्रतीक यातला कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो...


हे बघा तुमच्या लग्नाला सहा महिने झाले असतील पण तुमच्या लग्नाच्या नंतरही तुमचा नवरा बाहेर  काय करतो हे तुम्हाला माहितीये का?..


 लग्न झालेले असून देखील एका मुलीच्या मागे लागून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं तिला सांगून सांगून तिला त्रास देऊन आणि त्या नंतर त्या मुलीने त्याला नकार देणे हे त्याला पटलेलं नाही आणि म्हणून त्याने त्या मुलीवर ॲसिड हल्ला केला आहे, तिचा पूर्ण चेहरा जळाला, तिचं जीवन बरबाद केलं...


तुमचा विश्वास बसत नाहीये ना बसवून घ्या , कारण हे सत्य आहे...


 मला एक गोष्ट कळत नाही प्रतीक तर शिक्षण सुरू असताना तुमचं कसं काय लग्न झालं तुमच्या आईवडिलांनी कोणत्या बेसिस वर तुमचं लग्न केलं, मुलगा तर नोकरी करत नाही...

“ नाही नाही त्यांनी लग्नाच्या वेळेस सांगितलं होतं की ते बाबांचा बिजनेस सांभाळतात म्हणून....


“पण त्यावेळी तर तो कॉलेज करत होता ..


तुमच्या लग्नाच्या नंतर तो कॉलेजला नाही गेला..


“खर सांगू का, मलाही नाही माहीत...
विचारपूस झाल्यानंतर मेघा तिथून निघून गेली...


 सुमनच्या बाबांनी शेतावरच घर विकून पैसे जमा केले आणि डॉक्टरांना सर्जरीची तारीख पक्की करायला सांगितले, डॉक्टर म्हणाले की आठ दिवसात आपण सर्जरी करून घेऊया..


दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी फोन करून सांगितलं की आपण उद्याच सर्जरी करून घेऊया.


 बाबा तयार झाले...
 “ सुमन ला आजचा ॲडमिट करावं लागेल...


“ हो डॉक्टर..
“तुम्ही तिला संध्याकाळी घेऊन या..


“ ठीक आहे डॉक्टर, ठेवतो फोन...
सुमनच्या बाबांनी तिला फोन केला, “निधी बेटा येतेस का घरी.. 


“हो काका...


“  थोड्यावेळानी निधी आली, तीने सुमनची बॅग पॅक केली,.. काही वेळ तिच्यासोबत घालवुन ती सुमन सोबत दवाखान्यात गेली..


 रात्रभर निधि सुमन जवळच होती दुसऱ्या दिवशी सकाळी सर्जरीची पूर्ण तयारी झाली...सुमनला सर्जरीसाठी नेण्यात आलं.. चार तास सर्जरी चालली..


 निधी देवासमोर हात जोडून उभी होती ही सर्जरी सफल व्हायला हवी आणि सुमनचा चेहरा चांगला व्हायला हवा हीच ती प्रार्थना करत होती..


 चार तासाच्या सर्जरीनंतर सुमनला रूम मध्ये शिफ्ट केलं गेलं पण सध्या ती अन कॉन्शियस होती, निधी दिवसभर तिच्याजवळ बसून होती...


निधीच्या मोबाईलवर पोलिस इन्स्पेक्टरचा फोन आला,
“ बोला साहेब, कसा काय फोन केला...
“ कशी झाली सर्जरी?..


“सर्जरी छान झाली,सगळं व्यवस्थित पार पडलय... आता अनकॉन्शियस आहे पण येईल थोड्या वेळात शुद्धीवर..
“ तुम्ही सांगा तुमचा तपास काय म्हणतोय...


“ आम्ही प्रतीकला पकडलय, तो आता आमच्या ताब्यात आहे..


“ बोलला का तो काही?..


“ नाही.. सध्या नाही बोलला पण बोलेल आता त्याची केस कोर्टात जाईल आणि निकाल तर लवकर लागेलच.. आता त्याची चिंता नाही त्याला शिक्षा ही होणारच...
“ ठिक आहे मी ठेवते..


“ ठीक आहे, सुमन ची काळजी घे..
“हो साहेब...


पोलीस स्टेशन मध्ये प्रतीकचे बाबा वकिलांना घेऊन आले , त्यांनी कोर्टाकडून नोटिस आणलेली होती पण गुन्हा साधारण नसल्यामुळे पोलिसांनी त्याला सोडण्यास नकार दिला आणि आम्ही कोर्टाकडून परमिशन आणतो, त्यानंतर आम्ही तुम्हाला निर्णय कळवतो असं सांगितलं ...


प्रतीकचे बाबा पोलिसांना धमकावुन गेले...


पोलिसांनी जमून चौकशी करायला सुरुवात केली, प्रतीक काहीच बोलायला तयार नव्हता.. पोलिसांनी प्रतीकला समीर बद्दल पण सांगितलं त्याला सहा महिन्याची शिक्षा झाली हेही सांगितलं, तू जर गुन्हा कबूल केलास तर तुझी शिक्षा कदाचित कमी होईल, म्हणून तू जे काही खरं खरं असेल ते सांग नाहीतर जीवनभर तुला इथेच सडाव लागेल.. बोल आता काय करायचंय तुला...


“मी खरच काही नाही केलं..
“हे सगळं ना त्या समीरनी केलय..


“ कोणी काय केलं हे कोर्टात सिद्ध होईलच तू जरी आता बोलला नाहीस तरी पुरावे मिळतील आणि साक्षीदार निधी आहेच की, ती साक्ष देणार आहे तुझ्या विरोधात.. त्यामुळे तुला काहीही लपवायची गरज नाहीये ..


जे काय सत्त्य असेल ते बोल तू... सुमनसोबत असं का केलंस?.. तुझं लग्न झालं असताना, लग्न होऊन सुद्धा तू एका दुसऱ्या मुलीच्या मागे लागलास आणि तुझी भोळीभाबडी बायको तिला काहीच माहिती नाही असा कसा तू  निर्लज्ज आहेस रे...


 निर्लज्जपणाचा कळस आहेस तू..


 पोलिसांनी थर्ड डिग्री चा वापर करून प्रतीक कडून सगळं काढून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मनाशी ठरवलं होतं की काही बोलणार नाही...


प्रतिकचे वडील प्रतिकला भेटायला आले,
“ बाबा काय झालं वकील येणार होते ना मला सोडवायला.. कधी नेणार आहे मला, आता नाही राहायचं बाबा... कधी घेऊन जाणार मला इथून....


“ शांत.. शांत राहायचं , मी वकिलांना घेऊन आलो होतो पण पोलिसांनी तुला सोडायला जाम नकार दिला आणि हे बघ पोलिसांनी तुला किती मारलं किती झोडलं तरी गुन्हा कबूल करायचा नाही आणि काय रे मला सांग खरं खरं ..गुन्हा खरंच तू केलास?..


“  बाबा मी खरच काही नाही केले..


“ते कोर्टात सगळं सिद्ध करतील, पण आता तू काही बोलायचं नाही गुन्हा कबूल करायचा नाहीस,  ते कितीही मारतील तुला तरीही सुद्धा.. मी तुझ्या जामीनची तयारी करतो.... तू चिंता करू नकोस.. काही दिवसाची वाट बघ...


“हो बाबा..


 प्रतिकचे बाबा त्याच्याशी बोलून तिथून निघाले...


दवाखान्यामध्ये सुमनला शुद्ध आली, निधी कडे बघून तिने चेहऱ्यावर हास्य आणलं, निधीलाही खूप बरं वाटलं... निधीनी सुमनला सुप भरवला , फळ चारून दिली आणि तिच्या हात हातात घेऊन,


“ सुमन आता सगळं नीट होणार आहे, प्रतीक सापडलाय.. आता लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळेल... 
 सुमनलाही खूप आनंद झाला पण काही क्षणातच ती हिरमुसली


“ काय ग, चेहरा का पाडलास?..


“ निधी मला भीती वाटते, मला कोर्टात जावे लागेल.. ते लोक मला काय काय प्रश्न विचारतील.?


“ तर काय झालं, ते जे काही विचारतील त्याची उत्तर द्यायची फक्त..


“ पण त्यांनी उलट सुलट काही विचारलं तर..


“ हे बघ आपण काही केलेच नाही तर आपल्याला घाबरायची काहीही गरज नाही.. तुला जास्त प्रश्न विचारणार नाही पण प्रतीक बद्दल जे काही विचारतील ते सगळं खरं खरं सांगायचं आणि सुमन तू घाबरू नकोस मी तुझ्या सोबत असेन..


 आता जीवनाच्या कुठल्याही वाटेवर तू एकटी नाही आहेस ही निधी तुझ्यासोबत आहे असं म्हणून तिने निधीच्या हाताची मुठी केली आणि


“ हि दोस्ती तुटायची नाही...
    हि दोस्ती तुटायची नाही...


 गाणं गुनगुनू लागली आणि त्यावेळी       

खरंच सुमन खळखळून हसली..


क्रमशः

0

🎭 Series Post

View all