Login

सुखाची ओंजळ... भाग 18 #मराठी- कादंबरी

Aath divsanantar sumnla discharge milala ti ghari aali pratikchi kes kortat geleli hoti

सुखाची ओंजळ... भाग  18


आधीच्या भागात आपण पाहिले की,


पोलीसांनी प्रतीकला पकडून आणल..त्याच्या बाबांनी जामिनासाठी वकील आणला पण पोलिसांनी ते होऊ दिल नाही, त्याच्या बायकोला विचारपूस केली तिलाही प्रतिकबद्दल काही गोष्टी माहीत नव्हत्या...


सुमनची सर्जरी झाली, सगळी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली..


निधीनी सुमनला  सांगितलं की प्रतीकला अरेस्ट केलय तिलाही खूप आनंद झाला पण क्षणात तिला भीती वाटायला लागली की मला कसेही प्रश्न विचारतील पण निधीनी तिला धीर दिला...ते कसेही प्रश्न विचारू देत आपण घाबरायचं नाही आणि मी असेल ग तुझ्यासोबत ,तू घाबरू नकोस.. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माझी साथ असेल तुझ्यासोबत.

आता पुढे,


आठ दिवसानंतर सुमनला डिस्चार्ज मिळाला...ती घरी आली...


प्रतीकची केस कोर्टात गेलेली होती, आठ दिवसानंतर पहिली सुनावणी होणार होती...


सुमनकडे निधी आली,


“सुमन आताच इन्स्पेक्टरचा फोन आला ते म्हणाले की पुढल्या आठवड्यात कोर्टाची तारीख आहे...


सुमानसाठी हे आठ दिवस खूप जड जाणार होते...


सुमनला तिच्या मनाची संपूर्ण तयारी करायची होती... सुमन मनाने खचली होती, पण तिच्या घरचे तिच्या सोबत असल्यामुळे सुमनला आधार वाटत होता....


आज राहवून राहवून सुमनला राजची आठवण येत होती ..  राज एकदा तिला बोलला होता की सुमन काहीही झालं, कितीही काही झालं, मी कुठेही असलो तरी माझी साथ तुझ्यासोबत असेल... मी तुला कधीही एकटं सोडणार नाही..
मग आता तुला माझी आठवण कशी येत नाही आहे?... हा प्रश्न सुमनला त्रास देत होता...


 तिचं मन आतुर होत होतं... तो आता माझ्या डोळ्यासमोर यावा आणि मी त्याला बघावं आणि माझ्या मनाची व्यथा सांगावी असं तिला वाटत होतं..


 तिने पुस्तकातून एक जुना फोटो काढला आणि त्या फोटो वरून हात फिरवत,
“ राज ये ना प्लीज... आज मला तुझी खुप आठवण येत आहे रे.. 


मला तुझी गरज आहे, माझ्या या अवस्थेत तू माझ्या सोबत असावा असं मला वाटतं आणि नेमका आत्ताच तू मला सोडून गेलास...  सुमन आपली व्यथा मांडत होती आणि रेडिओ वर गाणं लागलं..


वो मेरी निंद, मेरा चैन मुझे लौटादो
वो मेरी निंद, मेरा चैन मुझे लौटादो
वो मेरा प्यार, मेरा दर्द मुझे लौटादो
वो मेरा प्यार, मेरा दर्द मुझे लौटादो
निंद जितनी भी मैने खोई है
चैन जितना भी मैने खोया है
वो मेरी निंद, मेरा चैन मुझे लौटादो


गाण्याचे बोल कानावर पडले आणि सुमनला  भावनांवर ताबा ठेवता नाही आला..तिचे अश्रू अनावर झाले..


 दोन दिवसानंतर मावशी परत गेली...


मावशी घरी परतताना रस्त्यात समीरची आई भेटली...
सुमनच्या मावशीला तिच्याकडे बघून खूप आश्चर्य वाटले आणि कीव पण आली तिची अवस्था खूप वाईट होती तिचं एकुलता एक मुलगा दुरावल्यामुळे तिनी धसका खाल्ला होता... तिची तब्बेतही खालावली होती...


अशी तर कधी ती सुमनच्या मावशीसोबत बोलत नव्हती, पण आता ती तिच्याजवळ चक्क रडायला लागली...सुमनच्या मावशींनी पण तिला धीर दिला,


“ बघा ना ताई..हे काय झाले?. माझ्या समीरला सहा महिन्याची शिक्षा मिळाली..


“ समीरची आई, तुम्ही काळजी नका करू नका..आता तुमचे चांगले दिवस येतील, सहा महिन्यानंतर समीर तुरुंगातून बाहेर आला की तुम्ही त्याला घेऊन गावाकडे जा,  इकडे राहून तो काही करणार नाही, वाईट मुलांच्या संगतीत राहून तो वाईटच काम करायला लागला आहे... सोन्यासारखी बायको होती त्याची पण तिच्याशी पण धड वागला नाही आणि तुम्ही पण कधी तिला सुनेचा मान नाही दिला,  काही कमी त्रास नाही दिला तुम्ही... ती पण काय वाईट मुलगी नाहीये , आता किती करते ती सुमन साठी... तिचा स्वभाव चांगला आहे पण तरी तुम्ही कधी तिला समजून घेतलं नाही, कधी तिला आपली मुलगी मानलं नाही, चांगल्या स्वभावाची पोरगी होती ती, आता आई-बाबांसोबत राहते तर ती खुश आहे... तुमचा एकुलता एक मुलगा होता त्याला तुम्ही सावरायला हवं होतं वेळीच,
 हटकायला हवं होत, जेव्हा तो होऊन सुमनसोबत वाईट वागत होता तेव्हा तुम्ही त्याला दम द्यायला हवा होता, पण तुम्ही तसं केलं नाही तुम्ही पण तिच्याशी नेहमी वाईट वागत आलात आणि त्याचाच परिणाम आज तुमचा मुलगा आणि सून तुमच्या जवळ नाहीये...


समीरची आई काहीही न बोलता डोळे पुसत पुसत तिथून निघून गेली..


सुमनच्या कॉलेजचे प्रोफेसर  सुमनला भेटायला आले, 
सुमनचे बाबा दारातूनच


“आपण कोण?.


“मी प्रोफेसर कदम..सुमन चतुर्वेदी च घर हेच आहे...
“हो हो..


“सुमन आमच्या कॉलेज मध्ये होती, बरेच महिने झाले ती कॉलेजला आलेली नाही, आमच्या कोलेजकडून कॉल पण केला होता पण त्यालाही रिप्लाय नाही मिळाला म्हणून मग मीच आलो चौकशी करायला..


“हो, तुम्ही या ना, बसा प्लीज....

प्रोफेसर कदम बसले, आरोहीने पाणी आणलं, बरेच दिवस झाले  सुमन कॉलेज का नाही आली म्हणून म्हटलं चौकशी करावी आणि एक आनंदाची बातमी द्यायची होती.. 


सुमननी कॉलेज मध्ये अव्वल आली आणि तिला स्टुडन्ट ऑफ द इयर चा अवॉर्ड मिळालाय, त्याचा प्रोग्राम सत्तावीस तारखेला ठरलेला आहे, सुमन जर आली तर सगळ्यांना खूप आनंद होईल आणि आम्हाला अभिमानाने  वाटेल की एवढी हुशार मुलगी आमच्या कॉलेज मध्ये आहे..


“ सर खरच खूप आनंदाची बातमी आहे पण सुमन नाही येऊ शकणार...


“ का काय झालं ?...  ती तिला बरं नाही का?.. तसं असेल तर सांग ना आपण समोरची तारीख करुया तिला जेव्हा जमेल तिच्या सोयीने प्रोग्राम ठरवूया..


“ नाही नाही सर, तुम्ही प्रोग्राम तुमच्या तारखेवरच करा, कारण तुम्ही तारीख कितीही बदलली तरी सुमन येणार नाही...
“ काय झालं?.. काही चुकले का माझं?..


“ नाही तुमचं काही चुकलं नाही, सर तिच्यासोबतच नशीबच चुकते.. तिच्यावर संकट येत राहते...


“ मी समजलो नाही, काय झाले?..
“ सुमन वर ऍसिड हल्ला झाला होता...
“ काय?.. कधी?.. कुठे?.. कसा?..
“ तुमच्याच कॉलेजातला मुलगा आहे ,प्रतीक इनामदार.. त्यानी हे सगळ केल


“ पण तुम्ही सगळे असं ठाम पणे कस काय सांगू शकता...
“ निधी, सुमन ची मैत्रीण तिच्या डोळ्या देखत हे सगळे झाले..  ती एकटी साक्षीदार आहे या सगळ्याची..

 पोलीसकेस झाली असेल ना?.. पोलिसांनी अटक केलीये?..
“त्याला अटक झाली आहे, चार-पाच दिवसांनी कोर्टात पहिली सुनवाई आहे..
“ मी सुमन ला भेटू शकतो का?..


“ मी आवाज येतो,
“ सुमन.. सुमन खाली ये बाळा..


 सुमन खाली आली,
 प्रोफेसर कदम कडे बघून


“ सर तुम्ही इथे?..
“ हो तू बरेच दिवस झाले कॉलेजमध्ये आली नाहीस म्हणून म्हटलं काय झालं बघावं म्हणून आलोय,,  फोन केला पण फोनला पण रिप्लाय येत नव्हता...


“ कशी आहेस बेटा?..


“ मी बरी आहे सर, तुझ्यासोबत एवढी मोठी घटना घडली पण तू कोणाला सांगितलं सुद्धा नाही कॉलेजमध्ये तर कोणाला माहित पण नाही...
“ असं काही नाही..


“ अग गरजेच्या वेळेस आम्ही धावून आलो असतो व अशावेळी आपल्याला सगळ्यांची गरज वाटते सगळे आपल्या सोबत असले की धीर वाटतो, मन खंबीर राहते..


“ थँक्यू सर, पण खरंच मी आता बरी आहे, सर माझी एक रिक्वेस्ट होती कॉलेजमध्ये प्लीज कोणाला काही सांगू नका.. 
“ नाही सांगणार बेटा... तू काळजी करू नको सगळे तुझ्या मनासारखं होईल आणि गरज पडली तर फोन कर, तुझ्यासाठी आम्ही नेहमी हजर असू, येतो मी ...
प्रोफेसर कदम गेले,


सगळे बसले होत, थोड्या वेळातच सुमनचे वकिल आले


“ या वकील साहेब.. बसा. काय म्हणता झाली का केसची सर्व तयारी..?


“  सर्व तयारी झाली आहे, मी जरा सुमनशी बोलायला आलो होतो, सुमन बेटा कोर्टात अजिबात घाबरायचं नाही, तुला जे जे प्रश्न विचारले जातील त्याची नीट उत्तरे द्यायची, विरोधी पार्टीचे वकील तुला त्रास देण्यासाठी तुझ मनोबल खच्चीकरण करण्यासाठी तुला कसेही प्रश्न विचारतील, तू शांत राहून उत्तर द्यायची.. रडायचं नाही. आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही, तुला कंफ्यूज करण्यासाठी उलट सुलट प्रश्‍न विचारतील त्याचे नीट विचार करून उत्तर द्यायची, घाबरायचं नाही...


सुमन मान हलवत ‘हो’ म्हणाली...


 थोडा वेळ बसले त्यांनी सुमनला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं आणि ते निघाले ...


थोड्या वेळाने निधि आली, रूम मध्ये जाऊन
“ सुमन चल माझ्यासोबत थोडा वेळ ?...


“कुठे?.. कुठे जायचं?.. नाही प्लीज निधी मी कुठेही येणार नाही.. तू उगाच खोटे कारण सांगून मला इथून नेऊ नकोस..
“ खोटं कारण नाही ग.. आहे काम नक्कीच.. असंच काम आहे ते काम झालं कक आपण परत येऊ...


“ अग पण काय झालं?..


“ मला काही ड्रेसेस घ्यायचे आहेत आणि आई साठी साड़ी घ्यायची आहे तर तू माझ्यासोबत मार्केटमध्ये चल प्लीज ...
“नाही, प्लीज तू जा ना ग , माझी इच्छा नाहीये ...


“अगं मला निवड कोण करुन देईल.. अगं मला नाही करता येत, तू चल ना माझ्यासोबत ... प्लीज.. 


 सुमन तयार झाली पण अचानक तिला मागचा प्रसंग आठवला आणि तिने तिचा एक पाऊल मागे टाकलं..
“ काय झालं सुमन?.


“ काही नाही मागल्या वेळीचा प्रसंग आठवला..


“ सुमन डोन्ट वरी, मागल्यावेळेसारखा नाही होणार कारण आता मी फक्त एकटी तुझ्यासोबत आहे, बाकी कोणी नाही, बाकीच्यांना सांगण्याची पण गरज नाही आणि बोलण्याची पण गरज नाही, आपण दोघे आहोत फक्त दोघी.. चल निघूया.. दोघी मार्केटमध्ये गेल्या..

तिथे काही रिपोर्टर लोकांनी सुमनला घेरलं,
मॅडम आता चार दिवसानंतर तुमची केस आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे..


“ याबद्दल प्लीज तिला आता काही प्रश्न विचारू नका, जाऊ द्या तिला मी रिक्वेस्ट करते, ते पत्रकार ऐकायला तयार नव्हते पण निधीनी पोलिसांचा नाव घेऊन त्यांना हाकलून लावल

तेव्हा कुठे सुमन शांत झाली, तिला बर वाटल्यावर दोघींनी मार्केटमध्ये जाऊन खूप मस्त खरेदी केली, तिथून निघाल्या मस्त खाऊन पिऊन  घरी परतण्यासाठी निघाल्या,

घरी परतताना एका मुलाचा बॉल सुमनच्या पायाला लागला...

मोठी मूल होती,

त्यातला एक मुलगा समोर येऊन त्याने सुमनच्या पायाजवळून बॉल उचलला आणि जाणून तिच्या पायाला जोरात धक्का दिला, सुमन अगदी पडल्यागत झाली होती निधीने तिला पकडले, तिने तिला सावरले आणि त्या मुलाला आवाज दिला,


“ हे शहाण्या इकडे ये...

दोन तीन वेळा आवाज देऊनही तो मुलगा आला नाही, शेवटी निधी त्याच्या मागे मागे जाऊन निधीनी त्याची मागेहुन कॉलर पकडली त्याला पलटवल आणि त्याच्या गालावर एक लावली, तसाच तो ओरडला,


“ माझ्या वर हात उचलला, स्वतःला काय विश्वसुंदरी समजते..
“ मी विश्वसुंदरी नाहीये , पण तू किती कुरूप आहेस हे आता कळलं, बोल तिच्या वाटी का गेलास?.


“ मी कोणाच्या वाटेला गेलो नाही, मी माझ्या बॉल घ्यायला आलो होतो आणि मी तिच्या वाटी जायला ती काय विश्वसुंदरी आहे...


“ हो आहे ती विश्वसुंदरी, बघायचे तुला तिचा चेहरा..ये चेहरा दाखवते, चल माझ्यासोबत ..


तिने त्याचा हात पकडला आणि त्याला सुमनच्या समोर उभं ठेवलं.. “बघायची आहे विश्वसुंदरी?.


 निधीने सुमनचा झाकलेला चेहरा उघडला..आणि तो किंचाळला..


क्रमश: