Login

सुखाची ओंजळ... भाग 19#मराठी- कादंबरी

Sumncha chehra odhnini zaklela hota nidhini sumnchya chehryavarun othni kadhli

सुखाची ओंजळ भाग 19
आधीच्या भागात आपण पाहिले की,


आठ दिवसानंतर कोर्टाची तारीख ठरलेली...सुमनला राजची खूप आठवण येत होती... तो आता त्याच्यासोबत असावा असं तिला वाटत होतं...राहवून राहवुन तिचे डोळे पाणावत होते...


मावशी तिच्या घरी गेली वाटेत समीरची आई भेटली, तिच्याच मुलाबद्दल सांगत होती, सुमनच्या मावशींनी पण सांगितलं की निधी कशी चांगली आहे, आणि तुमचा मूलगा कसा नालायक, हे पटवून दिले, तीही काहीही न बोलता निघाली..


सुमनकडे प्रोफेसर कदम भेटून गेले त्यानंतर वकील भेटायला आले त्यांनी सुमनला सांगितले की काहीही झालं तरी घाबरायचं नाही, विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर द्यायची, सगळं समजवून ते गेले..


निधी येऊन सुमनला मार्केटला घेऊन गेली..


तिथे एक मुलगा विचित्र वागला...विश्वसुंदरी आहे का  ?वगैरे बोलायला लागला, निधीनी त्याला सुमनच्या समोर आणून उभं ठेवलं आणि म्हणाली
“बघायचा आहे का चेहरा..


आता पुढे,


सुमनचा चेहरा ओढणीनी  झाकलेला होता, निधीनी सुमनच्या चेहऱ्यावरून ओढणी काढली, तो मुलगा चेहरा पाहताच दचकला आणि पटकन त्याने दोन पावलं मागे ठेवले..

त्याचे डोळे पाणावले आणि त्याने दोन्ही हात समोर करत,


“ मला माफ कर ताई, मी चुकलो.. माझी खोडा करायची सवय आहे, पण मला तुझी खोडी काढायला नको होती, मला माफ कर ताई, खरंच मला माफ कर.. 


सुमननी होकारार्थी मान हलवली आणि निधीनी त्याला जायला सांगितलं..


 तो मुलगा तिथून निघून गेला पण सुमनचे डोळे पाणावले .. का तर त्या मुलानी तिला ताई म्हटलं होतं.


चुकीनी का होईना बहीण भावाचं नात निर्माण झालं.. तसही सुमनला भाऊ नाही..


“चल सुमन निघुया.
दोघीही घरी गेल्या..


घरी सगळा घडलेला प्रकार सांगितला...
बाबा म्हणाले,


“त्याला त्याची चूक समजली, हीच खूप मोठी गोष्ट आहे...अनेक जणांना कळत असून देखील ते माफी मागत नाहीत...मुळी माफी मागण्याचा प्रश्न नाही, माफी अशी आतून यायला हवी, माफी मागण्याऱ्याला आतून ते जाणवायला हवं तर त्याला काही अर्थ आहे...


बर जे झालं ते चांगलंच झालं, कधी कधी वाईटातुनही काहीतरी चांगलं घडत ते अस...
निधी जायला निघाली,


सुमन टेन्शन घेऊ नकोस, आराम कर आता...


सुमन फ्रेश होऊन रूममध्ये गेली , थोडं रिलॅक्स फील वाटत होत तिला...


थोड्याच वेळात सुमनच्या मोबाईलची रिंग वाजली, सुमनने फोन  उचलला
 “हॅलो सुमन बोलते का?..


“हो, आपण कोण?....


“माझं नाव मनीष.. मी राजचा मित्र आहे, राज कडूनच तुमचा नंबर घेतलाय, मी थोडावेळ तुमच्याशी बोलू शकतो का ?...


“तुम्ही राजचे मित्र आहात, बोला ना.. राज कुठे आहे?.. कसा आहे?.. काय करतो?.. कुठे राहतो तो?..


“ सुमन सुमन तुम्ही जरा शांत राहा, मी सांगतो सगळं... मी आणि राज एकाच कंपनीत काम करतो आता आम्ही कुठे आहोत हे मी तुम्हाला नाही सांगू शकत, तो कुठल्या कंपनीत काम करतो हे काहीही नाही सांगू शकत मी... फक्त तुमच्या तब्येतीची विचारपूस करायला फोन केला मी...


सुमन थोडी रागात आली,
“ मला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण?..


“ अगदी बरोबर प्रश्न केलात?.. तर मी कोणीच नाही ज्याच्यासाठी मी फोन केलाय त्याच्यापर्यंत ही बातमी कळवायची आहे, आणि त्यासाठी मला तुमच्याशी बोलणे गरजेचे आहे...


“ मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये,  तुम्ही फोन ठेवा.. मी कशी आहे?..काय आहे?.. मला कोणालाही  सांगायची काही गरज वाटत नाही मी फोन ठेवते...


“ एक एक मिनिट, एक मिनिट एक मिनिट सुमन प्लीज फोन ठेवू नका प्लीज,   ज्याच्यासाठी मी करतोय त्याच्यापर्यंत मला ही बातमी पोहोचवायची आहे तो तिकडे तडफडतोय , तुमच्या बद्दल काहीतरी माहिती मिळावी म्हणून आसुसलाय, तुमचा आवाज ऐकायला त्याचे कान तरसलेत पण त्याचा नाईलाज आहे.. तो तुमच्याशी बोलू शकत नाही पण तुमच्या आठवणी त्याच्या आसपास असतात..


 तुम्ही कशा आहात.. तुमचा आवाज खूप गोड आहे राजनी सांगितल्याप्रमाणे, तो तुमच खूप कौतुक करतो.. खूप बोलतो तुमच्याबद्दल.. त्याचा दिवसाची सुरुवात तुमच्या पासून सुरु होतो आणि रात्री तुमच्यावरच संपून जाते... मी फक्त तुम्हाला हे सांगायला फोन केला, की राज बरा आहे.. तुम्ही तुमची काळजी घ्या....


“राज का येत नाही मला भेटायला?…


“ वेळ आल्यावर तो नक्की येईल..


त्याने फोन ठेवला..


सुमननी लगेच रिडायल केला तर स्वीच ऑफ दाखवला..
तिलाही काही कळेना.. कोण होता..काय होता..पटापट बोलून फोन ठेवला, पण तो खर बोलला असेल का?...


आणि खर नसेल तर त्या मुलाकडे माझा नंबर त्याच्याकडे कसा आला..


बापरे किती प्रश्न निर्माण होतायेत...


सुमन पेचात सापडली, तिलाच कळत नव्हतं काय झालं... सुमननी निधीला फोन केला, तिला घडलेली सर्व घटना सांगितली...

तिने सल्ला दिला की ज्या नंबर वरून फोन आला तो नंबर तु पोलिसांना दे ते माहिती काढतील, तो नंबर कुठला आहे?. कोणाचा आहे?.. त्यांना सगळी माहिती मिळेल, तू लगेच इन्स्पेक्टर सरांना फोन करून तो नंबर त्यांच्या मोबाईलवर सेंड करून दे ....


सुमननी इन्स्पेक्टर ला फोन केला,
“ हॅलो सर, सुमन बोलते..


“ बोल बेटा..


“ सर मला या नंबर वरून असा असा फोन आला, सुमननी सगळी घटना सांगितली....सर नंबर मी आत्ता लावते तर तो फोन स्विच ऑफ दाखवतो.. तुम्ही काही माहिती काढू शकाल का?.. 


“ हो नक्की.. 
सुमननी बोलता बोलता नंबर पाठवला..


 “ठीक आहे, मी तुला संध्याकाळपर्यंत सांगतो...


 असं म्हणत इन्स्पेक्टरनी फोन ठेवला ...त्यांनी त्या नंबरची माहिती काढली, तो मोबाईल  स्विच ऑफ होता पण त्यांना माहिती मिळाली की हा नंबर पुण्यातला मनीष पवार नावाच्या मुलाचा आहे, तो कापड कंपनीत काम करतो.. 


 पोलिसांनी सुमनला कळवलं तर तिनी रिक्वेस्ट केली,
“ सर तुम्ही प्लीज तिथे जाऊन काही माहिती काढाल का?.. राज असेल कदाचित तिथे, तो राज बद्दलच बोलत होता.. तुम्ही प्लीज तेवढी माहिती काढालं का?..


“ हो आम्ही प्रयत्न नक्की करू...


“ थँक यु सर थँक यु सो मच....
“कोर्टाची तारीख जवळ आली...


सुमनच्या घरी
 “सुमन बाळा उद्या कोर्टाची तारीख लक्षात आहे ना..
“ हो बाबा.. 


बाळा चल आपण मंदिरात जाऊ येऊ.. आईला आणि आरु पण आवाज दे , सुमननी दोघींना आवाज दिला आणि चौघेही मंदिरात गेले..


 मंदिरात दर्शन घेतलं,सगळ्यांनी मनातल्या मनात प्रार्थना केली
 सुमनचे बाबा : “ हे देवा उद्या खूप महत्वाचा दिवस आहे, जे काही होऊ दे ते चांगलं होऊ दे देवा, माझ्या मुलीच भलं होऊ दे...


 सुमन: “देवा मला शक्ती दे, सगळ्यांशी सामना करण्याचे सामर्थ्य दे... नीट बोलू शकेल असा आशीर्वाद दे...


 सगळे पूजा करून निघाले, सगळे रस्त्याने पायी पायी चालले होते मागेहुन  बाईक वाल्याने सुमनला धक्का दिला,

उडाणटप्पू मुलगा वाटला दहा-बारा मुलं होते, सुमन थोडी अडकली आरुनी हात पकडला म्हणून ती पडली नाही...
 सुमनच्या बाबांनी त्या मुलाला आवाज दिला ते मुलं समोर जाऊन थांबले त्यांनी बाईक पटवली आणि सगळे पलटले आणि या चौघांच्या भोवताल गाडीने गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गोल गिरक्या घालू लागले सुमन चे बाबा बोलले


“ काय रे दिसत नाही का, एका मुलीला धक्का मारून जाता.. लाज नाही वाटत का घरी आयाबहिणी नाहीयेत का?..


“ ए म्हाताऱ्या तुला धक्का लागला का?..


“ तोंड सांभाळून बोल, मोठा आहे मी तुझ्या पेक्षा वयाने...


“असाल, आमच्यासमोर कोणी लहान मोठं नसतं, आम्ही मोठे आणि समोरचा लहान असतो, जास्त टीवटीव करायची नाही..
 आरोही:  बाबा बाबा राहू द्या ,  अशा मुलांशी बोलण्यात काही अर्थ नाही असं म्हणत आरोही समोर होऊन जायला निघाली तर तिथल्या एका मुलाने तिचा दुपट्ट खिचला, तशीच सुमन समोर आली आणि तिने त्या मुलाच्या गालावर एक खिचून लावली, त्याने रागाने मान फिरवली,   त्याचा चेहरा अगदी रागाने लालबुंद झाला होता, त्याने बाईक स्टॅंडवर लावली, तिथे उतरला आणि सुमनचे केस हातात धरून मागे ओढले सुमन केसाला हात लावून किंचाळली तसेच बाबा धावायला आले तर बाकीच्या दोन मुलांनी बाबाला पकडलं , दोघांनी सुमनच्या आईला पकडलं आणि दोघांनी आरोहीला पकडलं.. त्यांनी सगळ्यांनी यांचे हात पकडून ठेवले होते.. त्या मुलाने सुमनचे केस जास्त सोडले आणि तिची ओढणी खाली घसरली तसाच त्या मुलाला तिचा चेहरा दिसला त्यानी केस सोडले आणि तिच्या चेहऱ्याच्या जळलेल्या भागावर खूप जोरात थापड मारली, सुमनच्या चेहऱ्याची आग व्हायला लागली आणि ती रडत खाली बसली...


 मागेहुन एक मुलगा आला,त्याच्याखांद्यावर हात ठेवला, तो पलटला आणि  गालावर खूप जोरात थापड मारली,  त्याचा हात पकडला आणि पाठीकडे धरून मोडला,


“ काय रे साध्यासुध्या लोकांना पाहून अशी धंदे करता तुम्ही.. लाज नाही वाटत, पोलिसांना फोन करू बऱ्या बोलाने इथून निघून जा नाही तर आत्ता मी पोलिसांना फोन करून बोलावतो..


“तुला काय एवढे यांचे पडले आमच्या मध्ये पडू नकोस नाहीतर तुझेही वाईट दिवस यायची सुरुवात होईल..


“ माझे वाईट दिवस येतील की नाही माहिती नाही, पण तुमचे नक्कीच येतील कारण मी पोलिसांना फोन केला आहे आणि आता काही वेळातच ईथे पोहोचतील

आणि खरच थोड्यावेळात पोलिसाच्या गाडीचा सायरनचा आवाज आला आणि ते मुलं तिथून पळून गेले, त्या मुलाने सुमनला उठवलं सुमननी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं हा तोच मुलगा होता

त्यादिवशी ज्याने सुमनची चेष्टा करून नंतर तिला माफी मागितली होती आणि तिला बहीण मानलं होतं.. आज खऱ्या अर्थाने त्याने त्याच्या भावाचं नातं निभावलं...


“ बाबा त्या दिवशी मी निधी सोबत गेली होती त्या दिवशी मी त्या मुलाचा तुम्हाला किस्सा सांगितला ना बाबा हा तोच मुलगा यानेच माझी माफी मागितली आणि मला बहिण मानलं होतं...
 बाबा त्याच्यासमोर हात जोडत


“ थँक्यू बेटा, आज तू आलास म्हणून आम्ही वाचलो खरंच तुझे खूप उपकार झाले आमच्यावर...


“ नाही काका उपकाराची भाषा काय बोलताय मी काही उपकार वगैरे नाही केले मी माझी माणुसकीच्या नात्याने केलं, तुमच्या जागी कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं... 
“ बाळा काय नाव तुझं?..


“ पंकज..


“ कुठे राहतोस?.. कोण कोण आहे तुझ्या घरी?..


“ काका मी अनाथआश्रम मध्ये राहतो, माझे आई वडील वगैरे कोणीच नाही, जेव्हापासून मला समज आली तेव्हाचा मी अनाथाश्रम मध्येच राहतो, तिथेच लहानाचा मोठा झालो, आई काय असते?.. बाबा काय असतात?.. बहिण काय असते?. भाऊ काय असते?. कोणतेच नाते मला नाही माहिती, आश्रमातले सगळे लोक माझे नातेवाईक आणि तोच माझा परिवार बाकी बाहेर माझा कोणाशीही काही संबंध नाही. नातेवाईक कोण आहेत कुठे राहतात हेही माहीत नाही...
“ पण पंकज आता तू एकटा नाहीस आता तू आमच्यातला झालास आमच्या फॅमिली झालास.. सुमनला बहीण म्हणलास ना म्हणजे तू माझा मुलगा झालास. ..


“ नाही काका, थांबा.. मुलाचा दर्जा देऊ नका मला, माझ्यावरचा ओझं वाढेल आणि त्या जबाबदाऱ्या मी नाही निभाऊ शकलो तर...


“ अरे बापरे किती विचारशील आहेस तू, एवढा विचार करू नकोस आता चल तू आमच्याबरोबर घरी...


 आरोही बोलली- आता पोलिसांची गाडी येणार होती ना कुठे पोलिसांची गाडी....


 पंकज हसला त्याने खिशातून मोबाईल काढला आणि त्यातून सायरन रिंगटोन वाजवली हे बघ इथे आहेत पोलीस...


 पंकजनी कशी शक्कल लढवली याचं सगळ्यांना कुतूहल वाटलं आणि सगळ्यांना हसायला आलं...


क्रमशः

0

🎭 Series Post

View all