Login

सुखाची ओंजळ... भाग 20 #मराठी - कादंबरी

Sagle ghari gele pankajhi tyanchyasobat ghari gela saglyansobat pankajni jewan kel ani mag to tyachya partichya rastyavar nighala

सुखाची ओंजळ...भाग 20


आधीच्या भागात आपण पाहिले की,


सुमनला एक कॉल आला त्यानी सांगितलं की राजचा मित्र आहे आणि चौकशीसाठी फोन केला..

सुमननी तो नंबर पोलिसांना दिला पोलिसांनी त्या नंबरची माहिती काढली तर त्याच नाव मनीष, तो एका कापड कारखान्यात काम करतो अशी माहिती मिळाली, सुमन आणि सगळे मंदिरात गेले,

तिथे काही मुलांनी त्यांना त्रास दिला तिथे एका मुलानी त्यांना मदत केली, सुमननी सांगितलं की हा तोच मुलगा आहे ज्याने मला माफी मागितली.. त्याने मोबाईल वर रिंगटोन वाजवून त्या मुलांना पळवल ..


आता पुढे,


सगळे घरी गेले, पंकजही त्यांच्यासोबत घरी गेला.. सगळ्यांसोबत पंकजनी जेवण केलं आणि मग तो त्याच्या परतीच्या रस्त्यावर निघाला..


 थोडया समोर चौकात गेल्यावर त्या सगळ्या मुलांनी पंकजला घेरलं ते तिथे पंकज ची कदाचित वाट पाहातच बसले होते,
ते सगळे पंकज कडे बघून हसत होते त्याच्या भोवताल गिरक्या घालत होते, ज्याच्या गालावर पंकजनी थापड मारली तो मुलगा समोर आला,


“ काय रे मगाशी खूप टिवटिव करत होतास त्या मुली समोर... आता दाखवतो तुला माझी टीवटीव, त्या मुली समोर तुला हिरो व्हायचं होतं, पोलिसांना फोन करून बोलावलं तू... आता इथे तुझा माज उतरवला नाही ना तर मी माझं नाव बदलेल... त्या मुलांनी पंकजला बेदम मारलं...


 सुमनच्या घराच्या काही अंतरावर ते सगळं घडलं, आरोही दार लावायला बाहेर आली तेव्हा तिला हा सगळा प्रकार दिसला...


 ती धावत धावत आत गेली,


“ बाबा बाबा  ती मुलं पंकजला मारत आहेत, बाबा चला.. सगळे धावत धावत गेले, हे चौकात पोहोचेपर्यंत त्यांनी पंकजला बेदम मारून ते तिथून पळाले होते.. यांनी पंकजला दवाखान्यात नेलं तेथे डॉक्टरांनी मलमपट्टी करून त्याला आराम करायला सांगितला 


सुमनच्या बाबांनी पंकजला आश्रमात सोडलं...
 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळे तयार झाले आज कोर्टात जायचा दिवस होता...


 बरोबर अकराला सगळे कोर्टात पोहोचले, जच झाले आणि कोर्टाची सुनबाई सुरू झाली, सुमनला बोलवण्यात आलं,

सुमनला काही प्रश्न विचारले, तिची उलटतपासणी झाली .. प्रतीकची पण उलटतपासणी झाली.. त्याच्या बायकोला पण बोलावण्यात आलं होतं , तिला तर नवऱ्याबद्दल काहीच गोष्टी माहीत नव्हत्या.. कोर्टाची वेळ संपली


कोर्टाने पुढची तारीख दिली..


प्रतीकचे वडील प्रतिकला भेटायला गेले...


 प्रतीक तू खरच काही केलेस नाहीस ना...


“ नाही बाबा, खरच काही केलं नाहीये मी....

“ हे बघ खरं खरं बोललास तर मी तुझी शिक्षा वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करील, खोटं बोललास तर तुला एकही मदत करणार नाही आणि तुला माझ्या प्रॉपर्टी मधून बेदखल करेल....


आता खरोखरच काय झालं ते बोल..


“ हो बाबा मला सुमन आधीपासूनच आवडायची, सुमन आणि मी अकरावीपासूनच सोबत होतो मला ती आधी आवडायची आणि आताही आवडते पण तीला मी कधीच आवडलो  नाही, तिला राज आवडायचा, राजनी आणि सुमननी निधीच्या लग्नातच त्यानी पण लग्न केलं होतं, मी तिला बोललो माझ्याशी लग्न कर मी चांगला आहे.... राज चांगला मुलगा नाहीये तुला सोडून जाईल.. 


 बघा ना बाबा गेला ना तो तिला सोडून, सुमन माझ ऐकली नाही..


“ पण कर्ट्या, तुझं लग्न झालं आता... आता कशाला तिच्या मागे लागलास....


“ बाबा लग्न आत्ता झालं ना सहा महिने आधी, प्रेम तर माझ आधीच होतो....


“ तरी लग्न झाल्यावर दुसरे लग्न करणार होतास का...?
 चेहरा खाली करून नाही बाबा...


“ मग नसत्या उचापती कशाला करायचा....”
“ बाबा सॉरी सॉरी माझं चुकलं बाबा पण मला खरंच आता यातुन वाचवा मी सगळं केलं मी समीर ला तिच्याबद्दल खोटं खोटं सांगितलं आणि त्याचासोबत कट रचून सुमन आणि राजला त्रास देण्याचा ठरवलं....


 मला सुमनच्या चेहऱ्यावर हल्ला करायचा नव्हता, ते त्या दिवशी मी जास्त रागात आलो होतो आणि मी ते बॉटल खिशातून काढून तिच्या चेहऱ्याकडे भिरकावली मला माहिती नव्हतं हे सगळं होईल पण बाबा आता तुम्ही माझी मदत करा ना...


“ आता मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही, कारण कोर्टात ते सिद्ध होईल आणि तुला शिक्षा होईल आणि तुला तुझी शिक्षा कमी करायची असेल तर सुमनशी लग्न कराव लागेल... बोल करणार आहेस तिच्याशी लग्न?.. आता तर तिचा चेहरा किती कुरूप झाला... मान्य आहे तुला आता...
“ पण बाबा आता तर माझं मेघाशी लग्न झालंय ना, मग सुमनशी कस काय लग्न करू?...


“ हो ना मग हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो,  हा विचार तुला आधी यायला हवा होता ना, काय होऊन बसल, जीवनभर कमावलेली माझी इज्जत तुझ्या कर्मापायी वाया गेली, तुझ्या आईला किती त्रास झाला तुला याची कल्पना तरी आहे का..

ती बिचारी देवासमोर हात जोडून बसली आहे की माझा मुलगा लवकर सुटू दे माझ्या मुलगा सुटू दे,  तिला बिचारीला काय माहीत की तिच्या मुलाने किती काय काय कर्म करून ठेवलेत..


 ज्या दिवशी तुला शिक्षा होईल त्या दिवशी तिला हे सगळ सहन होणार नाही की तिच्या एकुलत्या एका मुलाने असं काही केलं...


 तिच्या जागी तुझी बहीण असती अन तुझ्या बहिणी सोबत कोणी असं केलं असतं तर तूला चाललं असतं का?.. किती भयानक कृत्य केलेस, तुला कळतंय का?..


“ बाबा चूक झाली ना, मी.. मी जाणून बुजून नाही केलं...


“ अरे कोणीही जाणून-बुजून करत नाही, अशीच होते ती चूक असते...


“ बाबा मग आता काय करायचे.. आपले वकील काय म्हणाले..


वकिलाने हात झटकले, त्यांना माहिती आहे गुन्हा तू केलाय, तुला शिक्षाही मिळणारच म्हणून तेही जास्त प्रयत्न करणार नाहीयेत आणि तुला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हाच प्रयत्न सगळ्यांचा आहे..


 “पण बाबा...


  बाबा काही न बोलता तिथून निघून गेले...


 घरी आले प्रतीकची आई देवा समोर बसलेली..


 तिच्याकडे बघून, काही देव देव करत बसू नकोस, तुझा देव काही पावणार नाहीये , तुझ्या मुलानी जे कर्म केले ना त्याची शिक्षा तर त्याला मिळेल,  आता देवही त्यातून वाचवू शकत नाही, त्याच्यामुळे आता हे देव देव करण बंद कर...

“अहो,  काय असं बोलता देवासमोर,  तुम्हाला बघवत नाही का?..


“ बघवण्याचा प्रश्नच नाही आहे.. मी आत्ताच मी प्रतिकला भेटून आलो, त्याने त्याच्या गुन्हा माझ्यासमोर कबुल केला आहे, त्यांनीच हे सगळं केलं..


“ हे सगळं?.. तुम्हीच म्हणालात ना की त्यानी काहीच केलं नाही..


“ हो पण तोच आता मला म्हणाला की हे सगळं त्यानीच केलं म्हणून... म्हणाला बाबा मला काही मदत करा पण आता आपल्याला काहीच मदत करता येणार नाही आहे, त्याच्या विरोधात कोर्टात पुरावे सादर झालेले आहे.. त्याला त्याची शिक्षा तर मिळेल.... देव जाणे किती वर्षाची शिक्षा होते,  त्याच्या कर्माचे फळ अजून काय...


 चांगल्या मार्गाने जायचं नाही वाईट मार्गाने पटकन धावायचं आधीपासून त्यानी हेच केले, लहान होता तेव्हाही तसाच होता, लग्न झालं तरी तेच करतो...


 लग्न झालेली बायको घरात असताना हा बाहेर तिच्या मागे मागे फिरतो याला काय अर्थ आहे का?... सोन्यासारखी बायको आहे घरात...


 म्हणाला सुमन मला आवडते पण आता काही फायदा आहे का?.
 झाला ना आता तिचा चेहरा खराब... तूनी तिच जीवन बरबाद केलं..


 एकामुळे दोन मुलींचे आयुष्य बरबाद झाले एक मेघा आणि दुसरी सुमन...
“तुम्हाला त्या दिन मुलीच पड़ल आणि माझा मुलगा.. त्याच आयुष्य बरबाद नाही झालं काय?.. 


“ झालं ना त्याचे आयुष्य बरबाद झालं... तीन जीवन बरबाद झाले याला कारणीभूत फक्त आणि फक्त प्रतीक आहे...
 प्रतीकेच्या कर्मामुळे हे सगळे झाले, त्यानी जर असं काही केलं नसतं, तर आज आपला मुलगा आणि सुन दोघेही सुखात राहिले असते...


“ जाऊद्या तुमच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही आहे, मी माझी देवा समोर जाऊन बसते...
 असं म्हणत प्रतीकची आई देव्हाऱ्यात जाऊन बसली...
प्रतीकच्या बाबांनी वकिलांना फोन केला,


“ बोला इनामदार साहेब काय म्हणताय..


“ बघाना काहीतरी, प्रतीकला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी काही प्रयत्न करता येतील का?..
“ मला शाश्वती खूप कमी वाटते कारण जवळजवळ  ही केस क्लिअर आहे यात काही जास्त पुरावे साक्षीदारांची गरज नाही, डोळ्यादेखत जीने पाहिलं ती साक्ष देणार आहे तेवढेच पुरेस आहे, प्रतीकला काही बाजू जर मांडायची असेल तर आपण त्याबद्दल विचार करू शकतो.. त्याला काही बोलायचे का?..


“ तेच सांगायचे होते मला सर, मी आत्ताच त्याला भेटून आलो तो म्हणतोय की त्यानीच हे सगळं केल..
“ पण का?..


“  एकतर्फी प्रेम होत त्याच, ती मुलगी आवडायची..
“ पण प्रतीकच लग्न झालंय ना..


“ हो ना तेच तर, या मुलाचा अक्कल नाही, मुलं वाईट संगतीला लागून वाईट काम करतात सोन्यासारखी बायको त्याला, तीच काही नाही... 


आम्हाला वाटायचं हा बाहेर आहे काहीतरी करतोय, तर हा उडानटप्पू करायचा, कॉलेज पूर्ण व्हायचं होतं म्हणून कॉलेज करण्याची सूट दिली तर यानी भलतच करून ठेवलं .. बघा काही करता येईल का?...
“  कळवतो मी तस...


 प्रतीकच्या बाबानी फोन ठेवला...


सुमनच्या घरचे बसले होते तितक्यात निधी आली...


“ अरे वा पोरी छान बोललीस आज कोर्टात ..तुझ्यातला हा आत्मविश्वास पाहून मला खरंच खरंच खूप अभिमान वाटतो तुझा... आधी किती साधी होतीस तू आणि आता एकदम स्ट्रॉंग झाली आणि खरच छान पद्धतीने तू सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीस, मला तुझा खूप अभिमान वाटतो निधी बेटा...


“ थँक्यू काका.. पण याचं श्रेय तुम्ही मला देऊ नका, याचं श्रेय जाते पूर्ण सुमनला, तिच्यामुळे आज माझ्यात ऐवढा आत्मविश्वास निर्माण झालाय,  मला जगण्याची नवी ऊर्जा दिली, मी तर हरले होते, माझ्या वाट्याला जे येईल ते मी सगळं सहन करत होते, सहन करून समोर जात होते ,पण सुमननी मला नवीन दिशा दाखवली, नवीन मार्ग  दाखवला, आपल्याला खूप दूरपर्यंत जायच आहे आणि आता आपण कुठे आहोत यातलं अंतर दाखवून दिलं...

तिच्याच आत्मविश्वासामुळे आज माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे याचं संपूर्ण श्रेय हे सुमनला जात...


 कुठे आहे माझी बहादूर मैत्रीण?.. कुठे दिसत नाही आहे...
“ गच्चीवर आहे...


“ आपण छान गच्चीवर एन्जॉय करूया, आज तसही आनंदाचा दिवस आहे.. आरोही आणि निधी गच्चीवर गेल्या...
   सुमन खुर्चीवर बसली होती, या दोघी गेल्या यांनी मोबाईलवर गाणे लावले आणि नाचायला लागल्या...


“ अरे तुम्ही दोघी काय करताय ?..


सुमन बोलली”  थांबवा ते गाणं किती..  काय चाललंय तुमचं...?


  त्या दोघी ऐकायला तयार नव्हत्या, शेवटी सुमननी गाणं बंद केलं...


“ काय चाललं?.. डोकं दुखतंय माझं..


“दि..एन्जॉय..


 आरोही ने पुन्हा गाणे लावले आणि तिघेही मस्त नाचल्या... खूप आवाज येतो म्हणून बाबा बघायला गेले... बाबाही त्यांच्यातलेच होऊन गेले... 


बाबा वरती गेले आणि ते खाली परत का आले नाही हे बघण्यासाठी आई वरती गेली, बघते तर काय गाण्यावर फुल-टू-धमाल करत होते, तिच्या आईने गाणं बंद केलं


“ अहो तुम्हाला मुलींना बोलवायला पाठवलं की तुम्हाला इथे मी डान्स करायला पाठवलं तुम्ही त्यांच्यासोबत लहान झालात... चला खाली...


“ काय गं थोडा वेळ आलो तर तुला करमत नाही का...


“ चहा थंड होतोय आणि थंड झाला तर पुन्हा गरम करून देणार नाही, याच्यासाठी मी तुम्हाला आवाज द्यायला आली.. चला आता...


 बाबा खाली गेले..


 ह्या तिघी झिंगाट वर फुल टू नाचल्या....


क्रमशः

0

🎭 Series Post

View all