सुखाची ओंजळ भाग 21
आधीच्या भागात आपण पाहिले की,
टवाळक्या मुलांनी पंकजला बेदम मारहाण केली, सुमनच्या घरच्यांनी त्याला दवाखाण्यात नेलं, तिथे डॉक्टरांनी मलमपट्टी करून आराम करायला सांगितलं..
दुसऱ्या दिवशी कोर्टात, सगळ्यांची उलटतपासणी झाली, सगळ्यांना प्रश्न विचारण्यात आले...
निधी अगदी आत्मविश्वासाने बोलली, तिनी घडलेली संपूर्ण घटना सविस्तरपणे जचसमोर मांडली..
कोर्टाने समोरची तारीख दिली..
प्रतिकने त्याच्या वडिलांना सगळं काही खर सांगितलं....मला सोडविण्यासाठी काहीतरी करा म्हणून विनवणी करू लागला...त्यांच्या वकिलाने पण हात वर केले..
प्रतीकच्या बाबांनी घरी येऊन त्याच्या आईला सगळं सांगितलं..
निधी सुमनच्या घरी गेली, तिथे सगळ्यांनी निधीच खूप कौतुक केलं..
आता पुढे,
सहा महिने उलटले, या सहा महिन्यात कोर्टाच्या केसेस झाल्या, प्रतीक मान्य करायला तयार नव्हता...
निधीने सगळं सांगितलं निधीचा बयान झाला, सुमनचा ही बयान झाला, समीरला पण बयान द्यायला सांगण्यात आले, तोही प्रतीक विरोधात बोलला.. पण प्रतीक गुन्हा कबुल करायला तयार नव्हता...
शेवटी नऊ महिन्यानंतर कोर्टात प्रतीकने गुन्हा कबूल केला, वकिलाने त्याला कशासाठी आणि का केले याबद्दल सविस्तर बोलायला सांगितले तेव्हा प्रतीक ने बोलायला सुरुवात केली
“ सुमन आणि मी अकरावीपासूनच आम्ही दोघे कॉलेजमध्ये सोबत आहोत, त्यानंतर फर्स्ट इयरला असताना राज झाला.. मला सुमन आधीपासूनच आवडायची मी कधी तिच्याजवळ बोललो नाही पण मला ती आवडायची, राज आला...
तिची आणि राजची मैत्री वाढू लागली... आणि ते मला आवडायचे नाही, तिचे नेहमी राज राज राज सुरू असायचं, कुठेही जायचं असेल, अभ्यास करायचा असेल, काही करायचं असेल तरी तिला राजच हवा असायचा...
राज माझ्या डोक्यात जायला लागला, मला भयंकर राग यायचा... सुमनची मैत्रीण निधी तिच्या लग्नात आम्ही सगळे मित्र मैत्रिणी जमलो होतो, तिथे मी सुमनला म्हणालो ... राज चांगला मुलगा नाहीये मी तुझ्याशी लग्न करतो आपण सुखात राहू पण ती ऐकली नाही....
राजनी सुमनला मंदिरात नेऊन तिच्याशी लग्न केलं आणि घरच्यांना कोणाला काहीच सांगितलं नव्हत...
या गोष्टीवरून मी त्यांना खूपदा ब्लॅकमेल केलं पण दोघेही घाबरले नाही, दोघे ठाम होते.. मी वारंवार वारंवार सुमनला हेच सांगत आलो की प्रतीक चांगला मुलगा नाहीये,तो चांगला मुलगा नाहीये तुला सोडून जाईल, तू माझ्याशी लग्न कर पण ती ऐकायला तयार नव्हती...
पण आता तर राज खरच तिला सोडून गेला, ते जाऊ द्या तो यातला भाग नाही त्यानंतर सुमनने निधीच्या आयुष्यात पण ढवळाढवळ करायला सुरुवात केली समीर आणि निधी दोघे नवरा-बायको...ती सगळं मुकाट्याने सहन करत होती, ती कुणा जवळही काहीही बोलली नव्हती.. सुमन गेली तिथे आणि समीर लाईफ मध्ये ढवळाढवळ केली...
समीरला हे आवडत नव्हतं म्हणून आम्ही दोघांनी मिळून प्लॅन केला की तिला चांगला धडा शिकवायचा.. म्हणजे ही कुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही...
मला तिच्यावर हल्ला वगैरे काही करायचा नव्हता, तसाही माझा बेत नव्हता पण त्यादिवशी सुमन माझ ऐकलीच नाही...
समीर निधीला घेऊन जायचा प्रयत्न करत होता, तिला पण सोडत नव्हती आणि मी तिला माझ्यासोबत चल म्हणालो तर ती माझही ऐकत नव्हती...
माझा राग अनावर झाला आणि मी खिशातून बॉटल काढून भिरकावली ती नेमकी सुमनच्या चेहऱ्यावरच जाऊन पडली... मला असं काही करायचं नव्हतं साहेब..
माझ्या हातून चुकून झालं, मला माफ करा.. माफ करा.. प्रतीकला जे सांगायचं होत तो भराभर बोलला...
कोर्टाने केसचा निकाल पुढील दोन दिवसात सांगण्यात येईल असं म्हणून समोरची दोन दिवसांची तारीख दिली....
समीरचे सहा महिने पूर्ण झाल्यामुळे समीर आता जेलमधून बाहेर आला..
तो निधी ला भेटायला निधीच्या आई-बाबांकडे गेला, निधी त्याला भेटली नाही कारण त्यावेळी निधी सुमनकडे होती तो सुमन कडे आला बाबांनी दार उघडलं बाबांनी त्याला ओळखलं नाही त्यांच्या लक्षात नाही आला चेहरा..त्यांनी विचारलं
“कोण आहे?...
“ निधी तुमच्याकडे आलीये ना...
“ हो आपण कोण?...
“ मी समीर.. निधीचा नवरा... समीर बोलता बोलता थांबला ...
एक मिनिट मी आवाज येतो
“ निधी बेटा.. निधी.. तुला भेटायला कोणीतरी आलय .. ये लवकर बाहेर...
निधी आली बघितलं तर डोळ्यासमोर समीर.. तिला आश्चर्य वाटलं आणि मनोमन बोलली इतकं सगळं करूनही हा मला भेटायला कसा काय आला...
“ तू.. तू इथे काय करतोयस...
“ सहा महिने नव्हतो तर एकदम तुम्ही वरून तू वर आलीस...
“ हे बघ समीर, मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाहीये ...
तू इथून निघून जा, मला सुमनच्या घरी तमाशा नकोय...
“मला इथे यायची काही गरज नाही मी तुझ्या आई बाबांकडे गेलो होतो तू तिथे नव्हतीस म्हणून मी इथे आलो नाही तर मला इथे यायची हाऊस नाही...
“हो ना, मग आता निघून जायचं मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे..
“ पण मला आताच तुझ्याशी खूप काही बोलायचंय..
“ नाही, माझं तुझ्याशी काहीच संबंध नाही आणि मला तू माझ्या डोळ्यासमोर नको आहेस... सो प्लीज जा तू आता....
“ अशी कोणती मस्ती आली तुला?.. कोणाच्या जीवावर करतीयेस एवढा माज... कोणी आले का तुझ्या लाईफ मध्ये?...
“ माईंड युवर लैंग्वेज समीर, मी तुझ्या सारखी नाहीये....
आता मी माझं जीवन नव्याने सुरु केलय, मला माझ्या आयुष्यात तू नकोस आता तुझी सावली सुद्धा माझ्या आजूबाजूला मला नको आहे... समीर प्लीज तु जा...
“ निधी बेटा काय झालं?..आत बसून बोला ना, त्याला आत बोलव... बसून बोला की...
“ नाही काका समीरला घाई आहे, तो निघतोय आता.. सहजच आला होता..
“अग पहिल्यांदा आला ना इकडे बसव त्याला.. बोल त्याच्याशी..
“ नाही काका, तो जातोय आता...
अस म्हणत निधीनी त्याच्या तोंडावर दार लावला आणि रूम मध्ये जाऊन बसली...
“ काय ग निधी, कोण आलं होतं?....
“ समीर होता.. मला म्हणाला बोलायचंय तुझ्याशी, पण मला बोलायचं नव्हतं... मी त्याला सरळ सांगितलं मला बोलायचं नाही आहे...
सोड त्याचा विषय.. मी जाते आता निधी सुमनच्या घरून निघाली
आई-बाबाच्या घराच्या गेटपर्यंत जात नाही तर समीरने तिला गाठलं तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ खेचलं आणि
“ काय ग कशाचा माज आला आहे तुला एवढा?..
माझ्याशी बोलायचं नाही... माझ्या जीवावर जगत होतीस ना आणि आता मला टाळतेस, मी जेल मध्ये काय गेलो तू तर पार बदलून गेली...
“ हात सोड समीर... समीर हात सोड....
समीरने हात सोडला नाही उलट करून मुरगळला
“ जास्त माज करू नकोस आता फक्त मुरगळलाय, जास्त करशील ना तर हातपाय तोडून तुला फेकूनही देईल ना तरी कुणाला काही पत्ता चालणार नाही...
“ मी माज करते.. मी माज करते... माज तर तू करतोयस , सहा महिने जेलमधून सडून आलास तरी तुला अक्कल आली नाही.. ती तुझी आई सहा महिने तिने कसे काढले तिचे तिला माहित, तुला तर तिची काही पडलीच नाही आहे...
ती माऊली आपल्या शीवाय जगली असेल , सहा महिने कशी राहिली याची पुसटशी कल्पनाही तुला नाहीये, तू फक्त तुझ्यातच असतोस...
जेलमधून आलास तरी तुझ्या डोक्यात अक्कल घुसली नाहीये.....
माझा माज काय काढतोस रे तू.. स्वताकडे बघ आणि यानंतर मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस आणि हात लावण्याचा विचार करायचा नाही यापुढे.. असं म्हणत तिने आपला हात झटकला आणि तावातावात आत गेली...
“ आई.. बाबा.. आई..
“ काय ग काय झालं?..
“ बाबा कुठे आहेत?..
“आहेत ना, अहो....
बाबाही आले,
“आई बाबा मी तुम्हा दोघांनाही सांगते समीर जर घरी आला त्याला दाराच्या आतही येऊ द्यायचं नाहीये,
तो आता जेलमधून सुटून आलाय आणि आता मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मी त्याचा त्रास सहन करणार नाही.. मला त्याच्या सोबत नाही राहायचं त्यामुळे मी तुमच्या दोघांनाही सांगून ठेवते घराच्या आतमध्ये त्याला पाऊल ठेवू द्यायचा नाही.. तो हात जोडेल...विनवण्या करेल.. नाटक करेल तुमच्यासमोर,, तुम्हाला विनवण्या करेल पण तरीही त्याला आत घ्यायचं नाही....
“ पण निधी बेटा.. तो सुधारला असेल तर.. त्यानी त्याच्यात काही बदल घडवला असेल तर...
“ आई तो त्याचा स्वभाव आहे आणि माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही ते म्हणतात न
“जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही”
असंच काहीच समजू समीर बद्दल... समीर मरून जाईल ना तरी त्याचा मूळ स्वभाव बदलणार नाही....
“ बेटा त्याला एक संधी द्यावी असं वाटत आम्हाला....निधीचे बाबा बोलले
“ माफ करा बाबा.. पण आता हे शक्य नाही आहे, कारण मी आता खूप समोर आलेत समीर मागे राहिला आणि आता मला मागे पाऊल टाकायचा नाहीये आणि तसही बाबा मी खूप काही दिवस तुमच्यावर ओझ बनून नाही राहणार मी पण माझ्या नोकरीबद्दल विचार करतीये.. फक्त एक चांगली नोकरी लागली की मी एखादी रूम बघून जाईल, मी तुमच्यावर ओझ बनून नाही राहणार...
त्यामुळे तुम्ही माझी प्लीज चिंता करू नका ...
पोरी आपल्या आई-वडीलासाठी मुलं ओझं असतात का?.. आम्हाला तुझी काळजी वाटते ग, तुझं वय जास्त नाहीये पोरी म्हणून आम्ही तुझ्या काळजीपोटी बोलतोय...
“ आई बाबा तुमची काळजी मी अगदी समजू शकते पण म्हणून आपला आयुष्य मी कुणाच्याही हाती का द्यावं बाबा सांगा ना....
निधी एक विचारू...
“ हो विचार ना गं.. जर एखादा चांगला मुलगा मिळाला तर तू दुसरे लग्न करशील...
“ आई खरं सांगू का तुझ्या या प्रश्नाचे उत्तर नाहीये का माझ्याजवळ.... कसा आहे ना.. वरतुन मुलगा कितीही चांगला दिसला पण आतून त्याचा स्वभाव कसा असेल.. आपल्याला कस कळेल.. आपल्याला दुरून सगळंच चांगला दिसत..
“दुरून डोंगर साजरे..”
समज की मी लग्न केलं आणि तोही समीर सारखाच निघाला तर..
आई गप्प राहिली... तिच्या जवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं...
आई सध्या तरी आपल्याला विचार करता येणार नाही..तुझी काळजी मी समजू शकते ग... तुला तुझ्या मुलीला सुखात पाहायचं हो ना.. पण मी आता खरंच सुखात आहे ग....
“ आणि आम्ही गेल्यावर पोरी तुझं कसं होईल काय होईल कशी राहशील....
“ आता हे असं बोलून तू मला उदास करू नकोस... तुम्ही आत्ताच मला सोडून चाललात का....
“ तसं नाही ग, हे जीवन आहे कधी काय होईल सांगता येईल का?....
“ आई तू आता काळजी करू नकोस, चल मला भराभर जेवण करायला दे, तुझ्या हातचा गरमगरम खायला तर मी इथेच थांबले ना, नाही तर कधीच निघून गेली असती....
अच्छा माझ्या हातच गरम गरम जेवण जेवायला थांबली आहेस...
“ गंमत ग...
निधीनी जेवण केले आणि रूम मध्ये जाऊन सुमन ला फोन केला, सुमनला सगळं सांगितलं....
सुमननी पण तिला हाच सल्ला दिला की आता तुला समीर सोबत राहायचं नाही आणि सध्या तरी दुसरा कुणाचाही विचार करायचा नाही, जोपर्यंत तू स्वतः स्टेबल होत नाहीस, स्वतःच्या पायावर उभी होत नाहीस तोपर्यंत कुठलाही विचार करायचा नाही... आता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आणि स्वतः पुरत जगायचं, स्वतःसाठी जगायचं इतर कुणाचाही विचार न करता आनंदी होऊन , स्वच्छंदी होऊन....
सुमनशी बोलून निधीला बरं वाटलं, दोघीही अगदी एकमेकांना सांभाळून घेत होत्या ..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा