सुखाची ओंजळ भाग 22
आधीच्या भागात आपण पाहिले की,
कोर्टामध्ये प्रतीक विरोधात सगळे पुरावे, साक्षीदार सगळं सिद्ध झालं तरी प्रतीक मानायला तयारच नव्हता शेवटी त्यानी सगळं मान्य करून सर्व घटना सांगितली..
कोर्टाने निकाल देण्याची तारीख दोन दिवस लांबवली...दोन दिवसांनंतर तर काय शिक्षा मिळणार हे माहिती होणार होत...
समीर निधीला भेटायला सुमनकडे आला, निधीनी स्पष्ट नकार दिला,
मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे,अस म्हणत त्याच्या तोंडावर दरवाजा आपटला..
निधी घरी जायला निघाली,तिथेही समीरनी गाठलं, तिच्याशी गैरवर्तवणूक केली..
निधीनी आई बाबांना सांगून ठेवलं समीर आला तर त्याला आत येऊ द्यायचं नाही, सुमनला फोन करून कळवलं..दोघीही एकमेकींना आधार देत होत्या..
आता पुढे,
निधीनी इन्स्पेक्टर सरांना फोन केला
“ हॅलो सर, मी निधी बोलते..
“ बोल बेटा...
“ सर समीर तुरुंगातून बाहेर आलाय आणि तो मला त्रास द्यायला लागला...
आज तो सुमनच्या घरी आला होता मला भेटायला ,मी भेटण्यास नकार दिला तर पुन्हा माझ्या घरी आला, मला त्याच्याशी बोलायचं नव्हतं तरी जबरदस्तीने माझा हात पकडुन मुरगडला...
साहेब काही करता येत असेल तर बघा आता रोजच मला त्रास देण्याचा प्रयत्न करेल.. मी काय करू सांगा.. माझी मदत करा हो सर...
“ मी बघतो तू काळजी करू नकोस...
“ ठीक आहे साहेब ठेवते थँक्यू...
दोन दिवस झाले आणि कोर्टाच्या निकालाचा दिवस उजाडला....
सुमनच्या घरी सगळे सकाळी सकाळी कुठून तयार झाले, मंदिरात गेले तिथून दर्शन घेऊन सरळ कोर्टात गेले...
सर्व बाजूची पहाणी करता सगळे पुरावे प्रतीकच्या विरोधात होते आणि प्रतीकनेच ऍसिड हल्ला केला हे सिद्ध झालं होतं...
म्हणून न्यायालयाने प्रतिकला दहा वर्षाची कठोर शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली...
जशी प्रतीकला शिक्षा मिळाली तसेच सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट झाला..
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ही आनंद होता.. कोर्टाच्या बाहेर प्रतीकचे बाबा सुमनच्या बाबांच्या समोर हात जोडून,
“ मला माफ करा, नालायक मुलाचा बाप आहे मी ज्याने तुमच्या मुलीचं जीवन बरबाद केलं नाही ...
“नाही.. तुम्ही माफी का मागताय.. त्याने जे कृत्य केले त्याला त्याची शिक्षा मिळाली आहे हेच खूप आहे
माझ्या मुलीच्या नशिबातं जे होत ते झालं, आता तुम्ही माफी मागून काय फायदा...तिचा चेहरा तर गेला..तो तिला परत मिळणार नाही आहे, सगळे जण तिथून निघाले तिथून पुन्हा सगळे मंदिरात गेले... सुमनची आई नवस बोलली होती तो नवस फेडायला म्हणून सगळे थांबले होते..
आणि सगळे पुन्हा परतीच्या पावलांनी घरी गेले..
काही वेळाने डॉक्टरांचा फोन आला सुमननी फोन उचलला
“ अभिनंदन सुमन, खूप आनंदाची बातमी ऐकली..
“हो डॉक्टर ,घरी सगळे खूप आनंदात आहेत... चला मग तुमच्या आनंदात सामील व्हायला मी येतो संध्याकाळी घरी....
“हो हो डॉक्टर नक्की नक्की या संध्याकाळी...
डॉक्टर आलेत..सगळ्यांच्या गप्पा गोष्टी रंगात रंगत जेवणं झाली आणि सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले....
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमननी इन्स्पेक्टर सरांना फोन केला
“ सर मी तुम्हाला जो नंबर दिला होता, काय नाव त्याच मनीष.. मनीष पवार तो कापड कारखान्यात काम करतो असंच म्हणाला होता तुम्ही त्याची समोर काही चौकशी केली का?.. काही पत्ता लागला का?...
“नाही अजून तरी काही नाही पण लागेल आमचा शोध सुरू आहे पण सुमन आपल्याला याची काही गरज नाही आपली केस सुटली आहे..
त्यामुळे राज आला किंवा नाही आला आपलं काम संपलं..
“ विसरलेच होते, हे काम तर कायद्याने होते मी माझं पर्सनल घेऊन बसलोय…
“ ठीक आहे साहेब, तुम्ही आतापर्यंत आम्हाला खूप मदत केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद फोन ठेवला आणि तिला ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर तिने ट्राय केला पण त्यावर फोनच लागत नव्हता
सुमनच्या सर्जरी ला एक वर्ष होत आला , अजून डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्जरी करायच्या बाकी होत्या.. असं सांगितलं....
आता सुमनच्या बाबांना हे शक्य नव्हतं , त्यामुळे सुमनचे बाबा म्हणाले की काही दिवस, काही महिने आम्ही थांबतो मग समोर बघू यात...
सुमनच कॉलेजही कम्प्लीट झालं आणि तिने इकडे तिकडे जॉब शोधायला सुरुवात केली पण तिचा चेहरा जळाल्यामुळे तिला कोणी जॉबला ठेवत नव्हते, नामांकित कॉलेजमध्ये मुलगी असून सुद्धा तिला कुठेच नोकरी मिळत नव्हती...
सतत तीन वर्ष सुमननी सगळ ट्राय केलं, सगळे तिला काम द्यायचे पण छोटं-मोठं तिच्या एबिलिटी प्रमाणे तिला कामच मिळालं नव्हतं ...
दिवस भरभर समोर सरकत होते, तुमच्या बाबांनी आरोहीच्या लग्नाचा विचार केला, तिला स्थळ यायला लागली पण काही काही लोक सुमन कडे बघू नकार द्यायला लागली...
एक चांगली सुशिक्षित फॅमिली मिळाली त्यांनी आरोहीचा साखरपुडा केला आणि दोन महिन्याच्या आत आरोहीचा विवाह झाला.
आता सुमनला एकटे एकटे वाटायला लागलं होतं.. आई बाबा आणि सुमन...
बाबा कामावर जायचे आई आणि सुमन दोघेच घरी असायचा..
मला आता कंटाळा यायला लागलाय... नोकरीचे बघता बघता ती थकून गेली... काय करावं काय नको असा जिव झाला होता..
निधी आता तिच्या आयुष्यात स्टेबल झाली होती, तिला छान जॉब मिळाला... तिने तिच्या आई बाबांचे घर सोडून ती वेगळी राहायला लागली.. सुमन काही दिवस निधी तिकडे राहायला गेली
“ अरे सुमन तू ?...अरे वा , ये ना आत बस...
सुमनच्या चेहऱ्यावरचा हवभावावरून निधीनी ओळखलं
“काय झालं?.. का अशी अवघडल्यासारखी दिसतेस..
“निधी, काही दिवस तुझ्याकडे राहिल तर चालेल का गं?....
“अरे वा मैत्रिणीकडे आली आणि विचारते सुद्धा..
“ हो ग...
“ काय झालं सांग, मी तुझ्या हक्काची मैत्रीण आहे ना.. निधी माझ्या डोक्यात एक विचार घोळतोय...
बोलू का मग बोल ना त्यात काय विचारायचं ?...
“आपण पुण्याला जाऊयात का?..
“ पुण्याला? पुण्याला कशाला....?
“ त्या ज्या राजच्या मित्राने फोन केला होता तो पुण्याला राहतो तर राजही तिथेच असेल, आपण जाऊन शोधुया का...
“ सुमन तुला खरंच वाटतं असं काही होऊ शकतं ...
“प्रयत्न करायला काय हरकत आहे निधी त्याचा मित्र म्हणाला ना की आम्ही दोघे सोबत राहतो पोलिसांनी जो पत्ता काढला आपण एकदा त्या कारखान्यात जाऊन बघू या...
कारखान्यातून जर काही माहिती मिळाली तर....
“ दोन दिवस थांब, आपण विचार करू आणि जाऊ...
दोन दिवसानंतर सुमन आणि निधी दोघीही पुण्यासाठी निघाल्या.. त्या पुण्याला गेल्या, तिथल्या त्या कापड कारखान्यात सुद्धा गेल्या.. तिथे त्यांना तो मुलगा भेटला पण राज भेटला नाही..
सुमननी त्याला विचारलं
“ राज कुठे आहे?.. तर म्हणाला कि राज काही दिवसापासून कुठे तरी गेला आहे.. सांगून गेलेला नाहीये....
दोघीही निराश आल्या..
आणि परत आल्या..
सुमन निधीकडे पंधरा-वीस दिवस राहुन पुन्हा आई-बाबा कडे परत आली...
आज सुमन घराजवळच्या पार्कमध्ये एकटीच जाऊन बसली..खूप वेळ पर्यंत ती एकटक बघत बसली होती, स्वता: च्याच विचारात गढलेली दिसत होती.. घराशेजारची मुलगी तिच्या बाजूला जाऊन बसली..
“ काय झाले सुमन ताई?.. इतका काय विचार करतेस?.. तेव्हाची बघत आता मी तुला खूप विचारात आहेस?.. काय झालं ताई?…
“ काही नाही ग, ठीक आहे सगळे..
तेवढ्यात तिथे एक छोटी मुलगी झाली तिने सुमनचा हात पकडला आणि तिला म्हणाली आमच्या सोबत खेळशील..
सुमन नाही म्हणणारच होती तर तिथे त्या मुलीची आई आली,
“ नाही नाही तिचे काय खेळण्याचे दिवस आहेत का.. ती नाही खेळणार...बाळा तिला बर नाही ह..
हो ना गं...
बाळा तू जाऊन खेळ...
खरंतर त्या बाईला तिच्या मुलीला सोबत खेळू द्यायचे नव्हते म्हणून ती पटकन उठून सगळं काही बोलून गेली, सुमनला वाईट नाही वाटले.. तिला आता सवय झाली होती त्यामुळे ती जास्त लक्ष देत नव्हती.. काही वेळ पार्क मध्ये बसून सुमन घरी आली....
जेवण करून गच्चीवर फेरफटका मारायला गेली, खुप रात्र झाली होती सगळे झोपले..
सुमन एकटीच गच्चीवर उभी होती...
छान छंद वारा सुटलेला होता, आकाशातल्या चांदण्या टिमटिम करत होत्या
थंड हवेचा झुडूप सुमन वर आला आणि तिची ओढणी हळूच खाली सरकली आणि खाली पडली...
ओढणी उचलायला म्हणून सुमन खाली वाकली, तिला तिथे कोणीतरी आहे असा भास झाला...
कानात आवाज गुंजला,
“सुमन, मी आलोय ..
तुझा राज आला सुमन...
बघ, मागे वळून बघ...
सुमननी मागे वळून बघितलं तर तिथे कुणीही नव्हतं सुमनला वाटलं की मला भास झाला असेल... थोडा वेळ गच्चीवर राहून सुमन तिच्या रूम मध्ये गेली तर रूम मध्ये टेबलावर तिला गुलाबाचं फूल ठेवलेल दिसल....
सुमनने आश्चर्यचकित होऊन त्या फुलाकडे बघितले हे फूल तर इथे नव्हते, आता कस आलं ती विचारात पडली, तिने फुल हातात घेतला तसाच तिच्या बोटात काटा रुतला तिच्या हातातून फुल खाली पडला.. आता ही फुलं नकोत आणि काटेही नकोत असं म्हणत ते फुल बाहेर फेकून दिले.. आणि ती आपल्या बेडवर पडली थोड्याच वेळात तिला झोप लागली. सकाळी उठली बघितलं तर तिच्या उशी जवळ कागद फोल्ड करून ठेवलेला होता...
तिने तो उघडला पानभर खूप काही लिहिलेलं होतं सुमननी वाचायला सुरुवात केली..
प्रिय सुमन...
प्रियच म्हणेन मी कारण आजही मला तू मला तितकीच प्रिय आहेस...
कशी आहेस?.. खरंतर हा प्रश्न मी विचारायला नको कारण माझ्याविना तू आनंदात राहूच शकत नाहीस... याची मला कल्पना आहे...
तुझ्यासोबत इतकं सगळं काही घडलं, मला तुझ्या सोबत रहायला हवं होतं...पण मी गेलो पळपुट्या सारखा..मी तुला त्या अवस्थेत बघू शकलो नसतो.... मी निघून का गेलो, याची कारण मी तुला सध्या नाही सांगू शकत...पण सुमन मला आता यायचं आहे, मला परत यायचं आहे तुझ्या जीवनात ..माझ्या सुमनजवळ....मी तुझ्याविना अपूर्ण आहे ग...माझं जीवन तुझ्याविना अपूर्ण आहे...
मला तुझी माफी मागायची आहे, मला या चार-पाच वर्षात तुझी खुप आठवण आली.. मला प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणात तुझी आठवण येत होती पण मी तुला फोनही नाही करू शकलो.. इच्छा असूनसुद्धा.. स्वतःला सावरले.... मला माफ करशील ना.... माझा स्वीकार करशील... माझा हात हातात घेशील..
ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची मी वाट बघेल.. तुला जर खरच सांगावं वाटलं तर एक हाक मार, त्याक्षणी मी तुझ्यासमोर असेल..
“एक एक क्षण जगूनही
तुझ्याविना मी मरत राहिलो
तुझ्या आठवणीत
रात्र-दिवस जळत राहिलो
आस लावून तू बसली राहलीस
मी मात्र झुरत राहिलो
तुझ्याशिवाय जीवन
हे अगदी निरस आहे
तुझ्याविना मनातल्या मनात
मी कुढत राहिलो..
आता आस आपल्या भेटीची
तुझ्या माझ्या प्रीतीची
हा दुरावा संपून
जवळीक साधण्याची...
माझ्या मनाला आस
तुझ्या प्रेमाची
तुझ्या जीवनात परत येण्याची
सांग सखे परतू का
माझा स्वीकार करशील का?.
माझा स्वीकार करशील का?.."
तुझा आणि फक्त तुझा
राज
राजच पत्र वाचून सुमनच मन भरून आलं...
डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली...
मनात भावना दाटून आल्या..
तिला मनोमन राज हवा होता..
तिचही जीवन त्याच्या शिवाय अपूर्ण होत.....
आता या अपूर्णत्वाला पूर्णत्वापर्यंत न्यायचं होत...
सुमन उठली...तयार झाली..
आज सुमननी राजनी भेट दिलेला ड्रेस घातला..
सुमनचा चेहरा खुललेला दिसत होता..
क्रमशः
