सुखाची ओंजळ...भाग 23
आधीच्या भागात आपण पाहिले की, प्रतीकनी सगळं मान्य केल,त्याला दहा वर्ष कठोर कारावास आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली...
सगळ्यांना खुप आनंद झाला...निधीला जॉब लागला, ती आता आई बाबा पासून वेगळी राहायला लागली..सुमन काही दिवस तिच्याकडे जाऊन आली..दोघीही राजला शोधायला पुण्याला गेल्या पण काहीच उपयोग झाला नाही..
सुमन गच्चीवर एकटीच उभी होती थोडयावेळाने रूम मध्ये आली तर एक गुलाबाचं फुल दिसलं..सकाळी झोपून उठली तर उशाशी पत्र ठेवलेलं दिसल..
तिनी ते उघडलं आणि वाचलं
संपूर्ण पत्र वाचून झाल्यावर सुमनच्या मनात भावना दाटून आल्या, तिचे डोळे भरून आले..
ती उठली, पटापट तयार झाली..
आता पुढे,
सुमन तयार होऊन खाली आली, आईने विचारल
“सुमन सकाळी सकाळी कुठे चाललीस ग?...
“ येते आई, माझ जरा काम आहे..
“ अग पण एकटीच कुठे चाललीस?...
“एकटी नाही, निधीसोबत चालली आहे ,तू काळजी करू नकोस बाबांना सांग कि मी येते...
सुमन घरून निघाली...
ज्या ठिकाणी राज आणि सुमन नेहमी भेटायचे..आज त्याच ठिकाणी सुमन गेली....
सुमननी चारही दिशेने नजर फिरवली..
तिथे एक मोठा दगड होता.. त्या दगडावर सुमननी दोघांची नाव कोरलेली होती..
“राज-सुमन”
ते नाव आजही सुमनला दिसलं तिनी त्या नावावरून हात फिरवला...एक एक आठवणी जाग्या होत होत्या...
तिथल्या झोपाळ्यावर राजनी झुलवलेला तो क्षण सुमनला आठवला...
आज न बोलता ही दोघांना एकमेकांच्या मनातलं कळणार होत... कारण दोघांचे बोलणे न होऊन सुद्धा सुमन तिथे गेली होती होती आणि राज तिथे नक्की येईल याची तिला खात्री होती..
सुमन बराच वेळ थांबली , राज काही पत्ता नव्हता... सुमनला राजसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवायला लागला...
“ त्याच्या आठवणी टी अखंड बुडून गेली... आता मात्र तिला त्याच्या येण्याची ओढ लागली... आता तो कधी येतो मी कधी बघते.. असं झालं होतं सुमनला..
एक तास झाला.. दोन तास झाला.. तरी राज आला नाही....सकाळची दुपार झाली, सुर्यानेही डोकं वर काढलेलं... सुमन त्या रखरखत्या उन्हात तशीच उभी होती....
त्याची वाट बघून डोळेही थकले...
शरीरही त्राण सोडायला लागलं...
सुमन झाडाखाली सावलीत झाडाच्या बुंदयाला टेकून बसली...
बराच वेळ निघून गेला पण राज आलाच नाही, आता मात्र सुमन उदास झाली....
रखरखत्या उन्हाची जागा आता ढगांनी घेतली...आभाळात मेघ दाटून आले...पावसाच्या सरी सुरू झाल्या...
पावसाच्या सरींनी सुमनला ओलचिंब केलं....
सुमनला रडायला आलं...मनातल्या मनात विचार करायला लागली,
खरच ते पत्र खर होत की माझा भास....
तिचे अश्रू अनावर झाले आणि पावसांच्या सरीसोबत तेही जमिनीत विलीन झाले....
आता बांध तुटला आणि ती जायला निघाली तसाच मागेहून आवाज आला
“सुमन...मला न भेटताच निघणार होतीस....
तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले, दुःखाची जागा आता आनंदाने घेतली...
चेहऱ्यावर पसरायला वेळ लागला नाही... ती पटकन वळली.. बघितलं तर राज उभा होता, तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही...
दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहिले....काही क्षण दोघे स्तब्ध उभे होते...
नंतर हळूहळू राज सुमनच्या जवळ आला , तिचा हात हातात घेतला.. सुमन तशीच स्तब्ध उभी होती...
तिचा हात हातात घेऊन
“ सुमन मला माफ कर, मला माफ कर.. जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझी साथ देऊ शकलो नाही.. पण आता तुला मी कधीच ऐकट सोडणार नाही, आयुष्यात कितीही वाईट प्रसंग येऊ दे मी तुझा हात कधीच सोडणार नाही....
सुमन भानावर आली डोळ्यातून अश्रू तरळले
“मला माफ कर सुमन ..मला माफ करशील ना... माझा स्वीकार करशील ना...
ती काहीही न बोलता तिने राजला घट्ट मिठी मारली...
त्याला अगदी घट्ट पकडलं...
राज मी तुझा स्वीकार करेल की नाही हा प्रश्नच उदभवत नाही....
मलाच प्रश्न पडलाय
तू माझा स्वीकार करशील की नाही...
का?..तुला अस का वाटलं, का मी तुझा स्वीकार करणार नाही....
“कारण तू मला अजून बघितल नाही आहेस म्हणून....
ती थोडी समोर होऊन सरळ उभी राहिली, तिनी चेहऱ्यावरची ओढणी सरकवली...
राज मला नीट बघ, पारख मला ...आणि नंतर बोल...
“करशील माझा स्वीकार...
राजनी सुमनकडे बघितलं... त्याने एक पाऊल मागे टाकला आणि पलटला ....
“मला माहित होतं राज...मला माझ्या प्रश्नाच उत्तर मिळालं, तुला काहीही बोलायची गरज नाही...
बाय राज...आज आपली अखेरची भेट... तू मला भेटायला आलास त्यासाठी खरच थांक यु...
मी तुला कधीच विसरु शकणार नाही, राज तू माझं पहिल प्रेम आहेस आणि तूच राहशील.. श्वासाच्या शेवटपर्यंत माझं तुझ्यावर प्रेम , ज्यावेळी माझ्या मनातल प्रेम संपेल तो कदाचित माझा शेवटचा श्वास असेल .. मी जात आहे..
शेवटचं एकदा तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघू देशील मला..
राज पलटला आणि सुमनने त्याला घट्ट मिठी मारली आणि जायला निघाली...
ती थोडा समोर गेली आणि तसाच राज तिच्या मागे मागे धावला आणि तिला मागेहुन दोन्ही हात तिच्या कंबरेच्या घालून तिला पकडलं, तिला बिलगला आणि बोलला
“ तुला असं कसं वाटू शकतं , असा कसा विचार करू शकतेस तू माझ्याबद्दल?.. कोण समजतेस तू स्वतःला?.. कोण समजतेस?..
माझं प्रेम तुला फालतू वाटलं, सुमन माझं पहिलं प्रेम आहे, मी प्रेम केले तुझ्यावर सुमन टाईमपास नाही.. तू माझी सूमन आहेस फक्त माझी...
तुला काय वाटलं तुझ्या बरोबर एक प्रसंग घडला आणि मी तुला सोडून देईन, सुमन तू आधीही खूप सुंदर होतीस आणि आताही सुंदरच आहेस... त्यामुळे मी तुला सोडून जाईल हा विचार कधी करू नको आणि स्वतःला कधीच कमी लेखू नकोस.. तू कोणापेक्षाही कमी नाहीस, तू आधी सारखीच सुंदरच दिसतेस....
चल.. आपण बसू..
मला तुला खूप काय सांगायचेय..
“ राज आता नाही ना जाणार तु मला सोडून...
“ नाही.. कधीच नाही.. मी आता इथेच राहायला येणार आहे, आपण दोघे आता सोबत राहू...
“ पण तू का गेला होतास...?
“ तुझा हा घातपात झाला ना तेव्हा हॉस्पिटल मध्ये मी तुला बघायला आलो होतो, तुझी अवस्था मला नाही बघवली आणि मी तिथून निघालो... स्वतःला खूप सावरले नाही आता आपल्याला सुमन साठी जगायचं तिच्यासाठी करायचे आहे.. आई-बाबानाही सोडलं होत, मी त्यांच्या सोबत राहिलो नाही, मी एकटा राहिलो.. लढलो.. रात्रंदिवस काम केलं, खूप पैसा कमावला... तुझ्या बाबांची अवस्था बघवत नव्हती मला त्यांची परिस्थिती मला माहिती होती म्हणून मी रात्रंदिवस काम करून खूप पैसे कमावले तुझ्या सर्जरीसाठी ....
“चल सुमन तुझ्या आई-बाबांकडे जाऊन त्यांना सगळं काही सांगूया.. आणि लग्न करूया...
“राज खरच बोलतोयस...
“ हो खरं बोलतोय, आता मी तुला सोडून नाही जाणार, कधीच नाही.. मी तिथे फ्लॅट घेतला आहे तिथेच आपण दोघे राहू...
दोघांनी एकमेकासोबत भरपूर वेळ घालवला , जुन्या आठवणी काढल्या खूप हसले, खूप खिडळले....आता अंधार पडायला लागला...
निधी ऑफिस वरून सरळ सुमन कडे गेली, आईने दार उघडलं “
निधी तू.. ये ना.. सुमन कुठे आहे?..
“ माझ्यासोबत नाही , मी तर ऑफिस मधून आले आहे...
“अग घरून सकाळीच निघाली आणि बोलून गेली की ती तुझ्या सोबत आहे म्हणून...
“ तिची माझी भेट झाली नाही आणि फोनवर बोलणं झालं नाही, मी तिलाच भेटायला आले आता...
सुमनच्या आईने डोक्यावर हात ठेवला,
“ अरे देवा ही पोरगी कुठे गेली असेल?.. आता काय करायचं?.. कुठे शोधायचं?..
सुमनचे बाबा ऐकलत का, सुमन निधी बरोबर नाहीये निधी तिला भेटायला आली..
आता काय करायचं?.. हे देवा या पोरीने काय केलं.. तीनं स्वतःच्या जिवाचे काही कमी-जास्त केलं असेल तर, तितक्यात आरोही आली
“ आई.. आई जरा शांत हो.. पाणी घे.. शांत हो मी बाहेर बघते.. बाबांनी तोवर तिच्या दुसऱ्या मैत्रिणीनं फोन केले... सगळ्यांकडून चौकशी केली पण ती कुणाकडे नव्हती..
अर्धा तास सगळीकडे शोधलं होते फोन केला, याला विचार, त्याला विचार, थोडावेळाने दाराचा ठकठक असा आवाज आला.. सुमनने आवाज दिला
“ आई...
सुमनचा आवाज ऐकून सगळे उठून तिच्यासमोर उभे झाले सगळ्यांचा जीवात जीव आला.. सगळ्यांनी हुश्श केल..
“ कुठे गेली होतीस ?.. सकाळपासून गेलीस , निधी सोबत जातो असं सांगून गेली होतीस ना आणि निधी सोबत नव्हतीस तू...
कुठे गेली होतीस ?.कोणाकडे गेली होतीस?.. अशी एकटी जात जाऊ नकोस ग, आमचा जीव भांड्यात पडतो...
“ आई जरा शांत हो सांगते मी सगळं ,मला आत तरी येऊ दे... आई-बाबा आपल्याकडे कुणीतरी आलंय.....
“कोण आले.??
तुम्ही आधी प्रॉमिस करा तुम्ही चिडणार नाही आहात आणि आम्ही जे काही बोलू ते शांतपणे ऐकणार आहात....
“ आम्ही म्हणजे कोण ?..अजून तुझ्यासोबत कोण आल...
सुमन थोडी साईडला झाली तर राज उभा होता, राजकडे बघून सगळ्यांच्या चेहर्यावरचे हावभाव बदलले व बाबांच्या चेहऱ्यावर राग आला आणि ते स्पष्ट दिसत होतं...
सुमन मला या मुलाशी अजिबात बोलायचं नाहीये, तू याला आता इथून जायला सांग, मला याच तोंडही देखील बघायचं नाहीये ....
“बाबा बाबा शांत व्हा, त्याला काही सांगायचे आहे, काही बोलायचे आहे तुमच्याशी एकदा त्याचे बोलणे ऐकून घ्या....
“ काय?. बोलायला काही उरलय..माझ्या पोरीने कसे दिवस काढले याला माहिती आहे... त्याच्या आठवणीत कसे दिवस काढले सांग त्याला.....
“ बाबा.. शांत रहा, माझे सगळे बोलणे झाले त्याच्याशी.. तो का गेला कशासाठी गेला त्यानी सगळ सांगितले बाबा मला....
तुमच्याशी बोलायचे त्याला, आमच्या नात्याला समोर न्यायच आहे.. सगळ्यांचे आशीर्वादाने....
बाबा तुम्हाला वाटतं ना, तुमच्या मुलीला सुखात राहाव... फक्त एकदा त्याच्याशी बोला बाबा त्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला स्वीकार असेल...
“ ठीक आहे बोलव त्याला...
“ थँक्यू थँक्यू बाबा..
राज आत आला.. तो उभा होता.. बाबाने त्याला बसायला सांगितलं आरोही ने पाणी दिलं
“ बोल काय बोलायचे तुला?..
काका मला सुमनशी लग्न करायचे आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने...
मी सुमनचा हात मागायला आलोय....
“ हात मागायला.. माझ्या मुलीचा जेव्हा तिला गरज होती तेव्हा तर सोडून गेला होतास ...
“ त्यावेळी मी गेलो व त्याला काही कारणे होती..पण आता असं काही होणार नाही...
मी तुम्हाला वचन देतो तुमचा आशीर्वाद मला मिळाला तर मी लग्न करून सुमनला सिंगापूरला नेऊन तिथे तिची सर्जरी करणार आहे आणि यासाठी मी पैसे साठवलेत ..मी पूर्ण माहिती काढली त्यात हॉस्पिटलची तिथला खर्च तिथली ट्रीटमेंट सगळ्यांची माहिती काढली आहे...
बाबा: नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही.. माझ्या पोरीला सोडून गेलास तर .. कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर आता.. पुन्हा जर तू असं काही केलस तर... या गोष्टीचा काय काय पुरावा कशावरून तु तिला सोडणार नाहीस....
बाबा मी तुम्हाला वचन देतो मी सुमनला कधीही एकट सोडणार नाही,
आजकालच्या पोरांची तुमची तात्पुरती वचन असतात तुम्ही काय वचन पाळत नाही ...
सुमनच्या आयुष्यात आधीच खूप वादळ आले. तिला अजून दुखण्याचे नाहीये मला..
काका मलाही बोलायच दुखवायच नाही आहे आणि म्हणूनच मी परत आलो, मी ज्या कामासाठी गेलो होतो सध्या ते काम पूर्ण झाले जेवढी पैशाची गरज होती तेवढे आणलेत मी आता ...
तिची सर्जरी होईल,ती बरी होईल तिचा त्रास कमी होईल...
“ तू, निघ.. सांगतो मी विचार करून तुला...
राज तिथून गेला...
उदास चेहऱ्याने सगळे आपापल्या रूममध्ये गेले...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा