Login

सुखाची ओंजळ... भाग 26 #मराठी-कादंबरी

Suman ani raj doghehi hotel var gele chan fresh houn doghanni jevan keli

सुखाची ओंजळ भाग 26


आधीच्या भागात आपण पाहिले की,

सुमन आणि राजच लग्न झालं,  ते दोघेही सिंगापूरसाठी निघाले , तिथे पोहोचल्यानंतर राजनी हॉटेल बुक केला होत...तिथे गेले..  राजनी डॉक्टरांना फोन केला,  त्यांनी सांगितलं आठ दिवसानंतर आपण सर्जरी करूया...


 दोघे फिरायला गेले. गार्डन मध्ये त्यांना एक इंडियन फॅमिली दिसली तिथल्या एका बाईने सुमन अपमान केला, राजने त्याच्याच भाषेत तिला समजावलं.. सुमनला खूप वाईट वाटलं, ती उदास झाली.. राजनी तिला मनवण्यासाठी खूप खूप काही उपाय केले त्यानंतर कुठे ती शांत झाली आणि प्रसन्न झाली...
 दोघे पार्क मधून निघाले,


मै चली मै चली
 देखो प्यार की गली ,
 कोई रोके ना मुझे 
मै चली मै चली 

आता पुढे

सुमन आणि राज दोघेही हॉटेलवर गेले, छान फ्रेश होऊन दोघांनी जेवण केली... दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनला बरं वाटत नव्हतं म्हणून राज तिच्यासाठी मेडिसिन आणायला हॉटेल मधून निघाला,


 मेडिकल शॉप मध्ये गेला तिथं औषध घेतली आणि परततानी राजचा ॲक्सिडेंट झाला....


 इकडे खूप वेळ झाला राज आला का नाही या काळजीने सुमन हेरझाऱ्या मारत होती.. न राहवून तिने त्याच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा फोन अज्ञात व्यक्तीने उचलला होता,


“ राज का आला नाहीस ?..किती उशीर झाला रे.. ये ना लवकर.. किती वेळची वाट बघत आहे..


समोरून आवाज आला
 “कोण बोलताय तुम्ही?...


“ आपण कोण...
 मी सांगतोय पण तुम्ही जर सांगाल तर अधिकच बरं होईल...
“मी सुमन.. राजची वाईफ...
त्यांचा अकॅसिडेंट झालाय..


“काय?..
सुमनच्या हातून फोन खाली पडला...
समोरुन हॅलो  हॅलो..आवाज येण सुरूच होत...


थोड्यावेळाने सुमन भानावर आली तिनी पुन्हा राजच्या मोबाईल वर फोन केला आणि हॉस्पिटलचा ऍड्रेस विचारला आणि  हॉस्पिटलला गेली..


सुमनची अशी पहिलीच वेळ होती,  सुमनसाठी सगळं नवीन होतं,तिला खूप घाबरल्यासारखा झालं , काय करावं काय नाही अशी स्थिती झाली...


 हॉस्पिटलला गेली तिथे चौकशी केली आणि सरळ राजच्या वार्ड मध्ये जाऊन त्याच्याजवळ जाऊन बसली,


“ राज उठ ना ...बोल माझ्याशी.. राज बाजूला नर्स उभी होती..सुमनने तिला विचारलं .
“ एक्सक्युज मी सिस्टर,  कसा आहे आता?... काय म्हणाले डॉक्टर..


आऊट ऑफ डेंजर आहेत ते... पण त्यांच्या डोक्याला थोडा मार लागल्यामुळे शुद्धीवर यायला वेळ लागेल.... 
सुमनने घरी फोन केला,
“ हॅलो आई.... 


“बोल सुमन बेटा...कशी आहेस....


काहीच न बोलता सुमन फक्त रडत होती...


“सुमन बाळा का रडतेस?. काय झालं बोल ना .. काय झालं.? अशी का रडतेस तू?... झाल काय?...


“ अगं मला बरं वाटत नव्हत म्हणून राज माझ्यासाठी मेडिसिन आणायला गेलं होता तर परत येतानी त्याचा एक्सीडेंट झाला....


“काय?... हे देवा....आई जोरजोरात रडायला लागली...


“आई.. आई..रडू नकोस...आई शांत रहा..तू बाबांना फोन दे...
“बाबा नाही आहेत, मार्केट मध्ये गेले आहेत...


“आरु असेल ना, तिला दे...
“नाही ती मैत्रिणीकडे गेली आहे...


“सुमन डॉक्टर काय म्हणाले...
“डॉक्टर म्हणाले की, डोक्याला मार लागला त्यामुळे शुद्धीवर यायला वेळ लागेल....


“ काळजी घे बाळा,   तुझ्या जवळ कोणीच नाही बेटा.. तू एकटीच आहेस , सांभाळ स्वतःला ...


“आणि तुम्ही पण काळजी करू नका,  मी फोन करत राहीन....
“हो ठेवते आई...

सुमननी निधीला फोन केला...
“ हॅलो निधी.. निधी राजचा एक्सीडेंट झालाय ग, त्याच्या डोक्याला खुप मार लागलाय तो अजून शुद्धीवर आलेला नाही आहे...


 सुमन निधीला सांगता सांगता रडत होती


“ सुमन.. सुमन आधी शांत हो, सुमन शांत हो ,डोळे पूस..कसं झालं हे सगळ?....


“ आज सकाळी मला बरं वाटत नव्हतं म्हणून तो माझ्यासाठी मेडिसिन आणायला गेला होता आणि परत येतानी एक्सीडेंट झाला..


“ सुमन काळजी घे स्वतःची पण आणि राजची पण आणि काही लागलं पैसे वगैरे तर सांग आणि हो सुमन सॉरी ग आमच्या जवळच कोणीच तुझ्याजवळ नाही, आता तुला गरज आहे आणि आम्ही तिथे नाही आहोत...


“ मी घेईल काळजी, तुम्ही पण काळजी करत बसू नका.. मी फोन करत राहील...
 सुमनने फोन ठेवला...


रात्रभर सुमन त्याच्या उशाशी बसून होती...पहाटे पहाटे त्याला शुद्ध आली....
त्याने चारही बाजूने नजर फिरवली, त्याला सुमन त्याच्या उशाशी बसून दिसली, तिचा डोळा लागलेला होता..
राजनी हळूहळू त्याचा हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या डोक्यावर ठेवला...


तसे तिने डोळे उघडले,
राज तुला शुद्ध आली...कसा आहेस?...बर वाटतंय का तुला आता...


असा कसा रे तू वेन्धळा ..तुला काही झाल असत तर मी काय केलं असत....
तुझ्याशिवाय मी कशी राहिले असते...


राजनी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि
“मला काहीही झालेलं नाही, ठणठणीत आहे मी, उद्याच कसा उभा राहतो बघ...
“राज ,मी खूप घाबरले होते, जेव्हा मी तुझ्या मोबाइल वर फ़ोन केला आणि त्या माणसांनी सांगितलं ना माझ्या हातून तर फोनच खाली पडला...


आणि मला सुचलही नाही काय करावं ते...
मी खूप घाबरले होते राज..मी खूप घाबरले होते..सुमनने त्याच्या हाताचे चुंबन घेतले...आणि सुमनचे अश्रू ओघडले...
राजने तिचे डोळे पुसत


“मला काहीही होणार नाही आहे, तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मी  अगदी ठणठणीत राहील बघ...


आपण दोघे एकमेकांना कधीच सोडून जाऊ शकत नाही आपलं प्रेम आपल्या सोबत आहे...


तुझ्या प्रेमामुळेच तर आज मी वाचलोय...
तू आराम कर,मी सूप आणते..


सुमन गेली, तिनी सूप आणि काही फळ घेऊन आली..
राज डोळे मिटून होता..
राज मी गरम गरम सूप आणलंय ,उठ ..
“आता इच्छा नाही ग..
“चालणार नाही ...आता मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे...तुला प्यावंच लागेल..


अस म्हणत सुमननी राजला थोडं वर टेकवून बसवलं आणि सूप पाजून दिला...
राज भावुक झाला....
सुमानला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसले..


“काय झालं राज?..
राज नकारात्मक मान हलवून.
“काही नाही...आज माझा एवढासा अक्सिडेंट झाला तर तू किती करत आहेस माझ्यासाठी..


आणि जेव्हा तुला गरज होती तेव्हा मी तुझ्याजवळ नव्हतो...आता जाणवतंय त्यावेळी तू किती त्रासातून गेली असशील...सुमन आय एम सॉरी...खरच ग सॉरी..
“राज वेडा आहेस का?...


आता हे सगळं बोलायची वेळ आहे का..तू जास्त बोलू नकोस, तुला त्रास होईल...तू आराम कर, मी डॉक्टरांना भेटून येते...
सुमन डॉक्टरांकडे गेली..त्यांनी सांगितलं अजून आठ दिवस तरी ठेवावं लागेल...


सुमन रोज त्याच्यासाठी काही खायला घेऊन जायची.. 
एक दिवस घास भरवतानी, 


“तू काही खाल्लस का?..
“हो..मी खाल्लय..
“तुला खोट बोलता येत नाही...नाही जेवलीस ना ..
सुमननी फक्त मान हलवली...


राजनी तिला घास भरवला..
सुमननी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला झोपवलं...राज शांत झोपला...सुमनही त्याच्या बाजूला बसून होती..


आठ दिवस राज हॉस्पिटलमध्ये होता...
 सुमन रात्रंदिवस त्याच्या जवळ बसून असायची...त्याच्यासाठी   तिनी सगळं केलं...


राजला डिस्चार्ज मिळाला, सुमननी सगळी प्रोसेस पूर्ण केली आणि राजला हॉटेलच्या रूम वर घेऊन गेली...


 जवळजवळ एक महिना राजला आराम करायला सांगितला होता राजच्या एक्सीडेंट मुळे सुमनची सर्जरी डेट समोर वाढली...


 एक महिना सुमनने सगळं केलं, राजला आता हळूहळू बरं वाटायला लागलं होतं,..
“ सुमन आता मला बरं वाटतं आपण डॉक्टरांशी बोलून तुझ्या सर्जरीसाठी तारीख ठरवून घेऊ...


“ काही दिवस आराम कर राज, माझ्या सर्जरीमध्ये तुझी धावपळ होईल आणि मग तुला बरं नाही वाटलं तर,नाही..नाही तुझी तब्बेत वाढायला नको... आपलं कोण करायला आहे, आधी तू पूर्णपणे बरा हो.. मग आपण माझा विचार करूया...

“ अगं पण खूप दिवस झालेत आता, अजून लांबवुन नाही चालणार सुमन...
“राज प्लीज अजून काही दिवस थांबूया...  तू अगदी बरा हो..
“अग पण मी बरा आहे...


“ मला माहितीये तू बरा आहेस पण तरी...  तुला आरामाची गरज आहे.. माझ्या सर्जरीमुळे तुला खरच धावपळ होईल...
“ ठीक आहे मी डॉक्टरांशी बोलून बघतो, ते काय म्हणतात ते...


राजनी डॉक्टरांना सगळं सांगितलं तेही तयार झाले...
 सुमन आणि राज तिथल्या एका मंदिरात केले, त्यांनी तिथे दर्शन घेतलं.. थोडावेळ त्या मंदिरात बसले..


राज:  मला खूप बरं वाटलं, खूप दिवसानंतर आपण बाहेर पडलो...
“हो, मला पण...


 दोघांनाही बरं वाटलं थोडं बाहेर आल्यावर... आणि  फ्रेशही वाटलं...
 सुमनने घरी फोन केला आणि कळवलं की राज आता बरा आहे, तुम्ही काळजी करत बसू नका.. मी पण बरी आहे आणि काही दिवसात माझी सर्जरी होईल.. तसा मी तुम्हाला फोन करेल...
 निधीलाही कळवलं...


“ राज आता कसा आहे?..
“ राज बरा आहे, आता त्याला बरं वाटतंय.. काही दिवसांनी माझी सर्जरी होईल.. मी फोन करत राहीन तुला...
“ आणखी काय ग?..कशी आहेस.. समीरचा काही पत्ता.. आताही त्रास देतो का तुला?..

“ नाही नाही आता मला तसा काही त्रास नाही.. तुला सांगायचं होतं..
“ हा बोल ना..


“ माझ्या ऑफिस मध्ये एक मुलगा काम , तीन-चार महिने झाले आम्ही एकमेकांना ओळखतोय... बोलतोय.. कलीग आहे तो माझा पण.... 


“पण काय?.. आता काय झालं निधी?.. 
त्याने मला प्रपोज केलं, लग्नासाठी विचारलं मला..
“ मग तू काय बोललीस?..


“ मी काहीच बोलले नाही, त्याला माझ्यापासून विषयी आधी सांगावं लागेल, त्यानंतर त्यानी मला पुन्हा मागणी घातली तर मी विचार करेन...


“ तू तीन चार महिन्यापासून ओळखतेस त्याला, कसा वाटतो तुला?..
“ स्वभावाने बरा आहे पण आता...
 समीरच एकदा असं झाल्यावर आता विश्वास कसा ठेवावा.. विचारच ...


“ तू आधी त्याला तुझ्या भूतकाळाबद्दल सांग निधी.. तुझ्या आयुष्यात जे काय घडले त्याची कल्पना दे तू त्याला आधी.. उगाच नंतर त्याचा गैरसमज व्हायला नको..


“ मी उद्याच बोलते त्याच्याशी, सुमन वेळात वेळ काढून तू मला फोन केलास मला खरच खूप बरं वाटतय... आता मी तुला फोन करण्याचा विचार करत होते पण तू आता राजसोबत आहेस आणि रात्रही खूप झाली तर तुला फोन करावा की नाही या विचारात होते..


 थँक्स सुमन..मला बेटर फील होतय..


“ मैत्रिणी म्हणतेस आणि थँक्स म्हणतेस हे बरं आहे तुझं ...थँक्स म्हणालीस ना तर तुझी माझी मैत्री संपली समज...
“ नाही ग असं बोलू नकोस, तुझ्याशिवाय कोण आहे मला आता.


“ येणार आहे म्हटलं आता.. आणि तो आला की तू मला विसरशील...
“ तुच माझी सख्खी मैत्रीण राहणार आहेस..


 आधी तू नंतर तो..
 चल काळजी घे मी फोन ठेवते..


 दोघांचं बोलणं झालं सुमननी राजला सगळं सांगितलं , तर राजनी पण हे सजेस्ट केलं की निधीने आधी त्याला तिच्या भुतकाळाबद्दल सगळं सांगावं आणि मग समोर काहीतरी विचार करावा..


 दोघांचं बोलणं झालं,  सुमननी राजला जेवण भरवून दिलं आणि त्याला आराम करायला सांगितला आणि बाल्कनीत जाऊन उभी राहिली...


 बाहेर छान वातावरण झालं होतं , सुमन उभी होती तर राजनी आवाज दिला 
“सुमन.. सुमन एक मिनिट इकडे ये..


 तशी सुमन धावत गेली,
“ बोल ना,  


“तू एकटीच बाल्कनीत उभी आहेस मला घेऊन जा ..
“अरे, तू झोपला होतास म्हणून तुला उठवले नाही...


“ नाही ना मला घेऊन जा, थोडं बरं वाटेल ..
सुमननी राजला हळूहळू बालकणीत नेलं, दोघेही चेअरवर बसले...


 बाहेर थंडा वारा सुरू होता..


 बराचवेळ दोघे एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांजवळ बसून राहिले...


 क्रमश:

0

🎭 Series Post

View all