सुखाची ओंजळ...भाग 27
आधीच्या भागात आपण पाहिले की,
राज आणि सुमन सिंगापूरला गेले..सुमनच्या सर्जरीला काही दिवसांचा अवधी असल्यामुळे तेवढे दिवस फिरण्याच ठरलं..
दोन दिवस दोघे बाहेर फिरायला गेले..
एक दिवस सकाळी सुमनला बर वाटत नव्हतं म्हणून राज तिच्यासाठी मेडिसिन आणायला गेला आणि राजचा अपघात झाला, त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे तो बेशुद्धा अवस्थेत होता.…
सुमनला कळलं ती तशीच हॉस्पिटलला पोहोचली..
तिथल्या नर्सला राजबद्दल विचारलं तेव्हा तिनी सांगितलं की डोक्याला मार लागल्यामुळे शुद्धीत यायला वेळ लागेल...
सुमन रात्रभर त्याच्या उशाशी बसून होती...दुसऱ्या दिवशी राज शुद्धिवर आला, आठ दिवसनंतर राजल डिस्चार्ज मिळाला, तीनी सगळ्यांना कळवल.
निधिनी एका मुलाबद्दल सुमनला सांगितलं ..सुमननी आधी तुझा भूतकाळ सांग आणि मग विचार कर अस सांगितलं,राजनी पण तोच सल्ला दिला..
आता पुढे,
एक महिना उलटला आता राजला पूर्णपणे बरं वाटायला लागलं त्यानी डॉक्टरांशी बोलून सर्जरीची तारीख ठरवली आणि दोन दिवसानंतर सुमनची सर्जरी झाली....
पुन्हा दोन महिन्यानंतर दुसरी सर्जरी होणार होती म्हणून राजने तिथेच हॉटेलवर न राहता फ्लॅट रेंटने घेण्याचा विचार केला आणि त्यानी तशी शोधाशोध सुरू केली......
टू बीएचके फ्लॅट त्याला मिळाला आणि ते तिकडे शिफ्ट झाले.
निधी आणि सुमनच बोलणं झालं सुमन निधीला
“ तु मला बोलली होतीस त्या मुलाबद्दल काय झालं?.काय नाव त्याच...अग पण तू नाव नाही सांगितलं ..
“त्याचं दीपक... दीपक पाटील त्याचं नाव.. सुमन मी त्याला माझ्या भूतकाळाबद्दल सगळं सांगितले, तरीही तो माझ्याशी लग्न करायला तयार आहे...
आता बोल मी काय करू?..
“ निधी तो जरी तयार असला तरी त्याच्या घरचे तयार आहेत की नाही आधी हे त्याला विचार... कारण त्याची फॅमिली असेल, त्याची आई वडील, भाऊ बहीण, चुलते अजून कुणी असतील तर त्याला आधी विचार म्हणावं आणि त्याच्या घरच्या कुणालाही काही फरक पडणार नसेल सगळ्यांनी तुला जर स्वीकार केलं तरच तू लग्नाला होकार दे.. उगाच तुला समोर जाऊन तुला काही प्रॉब्लेम व्हायला नको... एकदा असं झालं आता दुसऱ्यांदा पुन्हा काही व्हायला नको...
“ ठीक आहे मी बोलते त्याच्याशी..
आणि निधी तुझ्या बोलण्यावरून अपसेट दिसतेस
“नाही ग..
“ हे बघ काळजी करू नकोस, सगळं नीट होईल..
निधी दीपकशी बोलली
“दीपक तुम्ही तुमच्या घरी सांगितलं का माझ्या बद्दल?. माझ्या भूतकाळाविषयी, माझ्या घटस्पोटाविषयी ...
“नाही मी अजून बोललो नाही आहे.
“ मग आधी तुम्ही त्यांच्याशी बोला कारण त्यांना हे सगळं सांगणं खूप गरजेचे आहे त्यानंतर जर तुमच्या घरून जर होकार येईल तर मी समोरचा विचार करेल, कारण लग्न जरी आपलं होत असलं तरी दोन कुटुंब जोडली जातात आणि मला त्या दोन कुटुंबात अंतर नकोय...
“ ठीक आहे मी बोलतो आणि कळवतो...
दिपक त्याच्या घरच्यांशी बोलला, त्याच्या घरच्यांनी त्याला विरोध केला.. त्याला खूप समजावलं पण दीपकचा निर्णय ठाम होता दीपकनी सांगितलं
“आई निधी खूप चांगली मुलगी आहे ग, आपण तिचा भूतकाळ का बघतोय आणि तिच वयही जास्त नाहीये , कोणाच्या नशिबात काय असेल काही सांगता येत का ग?...
तिच्या नशिबात ते सगळ असेल म्हणून ते सगळं घडलं, आता बघ ना तिच्या लग्नाला एक वर्षही झाला नव्हता.. आता नवरा चांगला नाही मिळाला तर ती तरी काय करेल, त्यात तिची काय चूक तू सांगा....
“ तू डोक्यातून तिचा विचार काढून टाक...
“आई तू तुझ्या डोक्यातून हे काढ की तिचं लग्न झालं होतं, तिचा घटस्फोट झाला आहे, तू फक्त तिच्याकडे मुलगी म्हणून बघ.. तुझ्या घरात नवीकोरी नवरी आली..
“ पण दीपक सत्य नाकारता येत नाही, समाजात जेव्हा हे कळेल ना तेव्हा समाज थु-थु करेल कारण आपल्या समाजात हे सगळं नाही चालत...
“ आपण समाजाचा विचार का करतोय?.. आपल्या अडीअडचणीमध्ये समाज येतो का धावून, सांग मला.. कितीही चांगलं केलं तरी समाज बोलणार, वाईट केलं तरी तो बोलणारच.. मग आपण त्याचा विचार का करायचा.. आई आपला आयुष्य आपण जगायचा, आपली इच्छा आहे तस..नेहमी दुसर्यांचा विचार करत राहिले तर आपले जगणे मुश्कील होऊन जाईल आपण कसं जगायचं हे आपण ठरवायचं.....
आई बाबा एकदा विचार करा ना.. मी काका काकींना समजावतो पण तुम्ही प्लीज विचार करा ना आणि तुमचा जो काही निर्णय असेल तर सांगा मला तुमच्या कडून होकार अपेक्षित आहे...
त्यानी घरच्यांना समजावल्यानंतर काही दिवसांचा वेळ घेऊन त्याच्या घरचे तयार झाले, दीपक एकुलता एक असल्यामुळे त्याला दुखवायचं नाही हेच घरच्यांनी ठरवलं होतं म्हणून त्यांनी लग्नाला होकार दिला आणि काही महिन्यातच साध्या पद्धतीने मंदिरात निधी आणि दीपक च लग्न झालं...
नवरीचा गृहप्रवेश झाला, दिपकच्या घरच्यांनी मनात काहीही न ठेवता निधीला स्वीकारलं.. त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर निधीला आनंद दिसला आणि ते बघून निधीला खूप बरं वाटलं.. छान गृहप्रवेश झाला.. सगळा विधी पार पडल्या..?
सगळेजण निधीशी छान वागायचे, छान बोलायचे.. निधीला सासरी आहे अस कधी वाटलंच नाही, निधी खूप खुश होती, सगळं व्यवस्थित होतं...
काही दिवसांनी दिपकने फिरायला जायचा प्लान बनवला तर निधी बोलली
“ तुमची काही हरकत नसेल तर आपण सिंगापूरला जाऊया, मला सिंगापूर बघायची खूप इच्छा आहे..
“ सिंगापूर पण निधी....
“ मला माहिती आहे तुम्ही बजेट बद्दल विचार करताना पण मी पैसे साठवून ठेवलेत काही.. होईल जाणं-येणं होईल.. पण प्लीज नाही म्हणू नका ना, मला सिंगापूरला जायचंय प्लीज प्लीज ...
“ओके ओके पण आपल्याला आधी प्लॅन करावा लागेल एकदम अचानक नही जाता येणार...
“ हो हो चालेल.. चालेल..
दिपकने सगळ्या प्रोसिजर कम्प्लीट केल्या आणि दोघेही सिंगापूर साठी रवाना झाले
तिथे पोहोचल्यानंतर निधीनी सुमनला फोन केला,
कशी आहेस सुमन
“मी बरी आहे..
“अग सुमन मी काय म्हणते तू सिंगापूर मध्ये कुठे राहतेस..
“का ग..अग काही नाही मला ना तिथला अड्रेस हवा होता तू मला सांगशील का
मला आता अस नाही सांगता येणार, राज आला की त्याच्याशी बोलून तुला अड्रेस पाठवते
ओके
निधी आणि दीपक हॉटेल वर गेले
सुमनने संध्याकाळी निधीला अड्रेस पाठवला..
सिंगापूर मध्ये राज छोटे-मोठे काम करायला लागला सुमन ची काळजी घेता घेता घरचे काम करायचा आणि फावल्या वेळात बाहेरचे काम करून तो पैसे कमवायचा
दुसऱ्या दिवशी दुपारी सुमन जेवण करून आराम करत होती, राज बाहेर जाण्याचा विचारात होता तितक्यात बेल वाजली...
राज विचारात पडला
“आता कोण आलं असेल आणि तेही इथे, इथे तर आपण कोणाला ओळखत ही नाही..
विचारातच राजनी दार उघडला
समोर निधीला बघून त्याला खूप आश्चर्य वाटलं
चेहऱ्यावर आनंद आला
निधी तू?.. आणि तेही इथे, चक्क सिंगापूर...
“मग एकटेच निघून आलात ना माझ्या मैत्रिणीला घेऊन मग मी पण आले मागेमागे..
निधी..निधी ये ना आत
राज जीजू..एक मिनिटं मी ओळख करून देते..
“हा दीपक ना..
“अरे, एकदम बरोबर ओळखलंत..
“मग.. हाय दीपक
हाय..
या ना तुम्ही दोघेही..
“सुमन कुठे आहे?..
“ती आराम करत आहे..
“तू जा ना त्या रूम मध्ये, आम्ही बसतो तोवर...
निधी हळूच सुमनच्या रूम मध्ये गेली..
सुमन झोपलेली
निधी तिच्या डोक्यावर हात फिरवत
“सुमन कशी आहेस?...बघ कोण आलय...
सुमन नी डोळे उघडले, बघितलं तर समोर निधी...
सुमन खूप जोरात किंचाळली..
राज..राज लवकर ये..राज लवकर ये, मला भीती वाटतीय....
राज धावतच आला
“सुमन काय झालं?.अशी का किंचाळलीस?..
“राज राज बघ ना, समोर कोणी आहे?..
“ हो निधी आहे..
“ अरे तुला पण दिसतय ना.. म्हणजे भूत… भूत मला खूप भीती वाटते सुमन राजला बिलगली...
“ सुमन सुमन वेडाबाई ती खरच निधी आहे तिचा भूत नाहीये , जा जवळ जा तीच्या हात लाव तिला अगं खरंच ती निधीच आहे ...
सुमन हळूहळू निधी समोर गेली तिने तिला हळूच हात लावला तिचा विश्वास बसला की निधी खरच आलीये ती पुन्हा किंचाळली पण आनंदाने तिच्या गळ्यात भेटली आणि खुप जोरजोरात उड्या मारल्या
“ निधी निधी तू इकडे.. इकडे आलीस कधी ..सांगितलंस पण नाही म्हणून तु मला अड्रेस मागत होती बोलली पण नाही तु येणार आहेस...
ते तुला सरप्राईज द्यायचा होता म्हणून, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता म्हणून.. म्हणून मी तुला सांगितलं नाही...
किती महिन्यानंतर मी तुला बघते,कशी आहेस....
“ मी बरी आहे तू कशी आहेस आणि अशी कशी आलीस एकटी....
“एकटी नाही, दीपकसोबत आले, चल मी भेट करून देते....
“ हो चल...
निधीनी सुमनला हळूहळू नेलं, दीपकशी भेट करून दिली..
दोघी खूप खूष होत्या, एक-दोन दिवस निधी सुमन सोबत राहून त्यांच्या हॉटेलवर परत गेले काही दिवसांनी निधी आणि दीपक परत गेले...
पाहता पाहता दोन महिने निघून गेले आत्ता सुमन ची दुसरी सर्जरी होणार होती, राजने सुमनच्या बाबांना फोन केला
“हॅलो काका, मी राज बोलतोय
“ हा बोल बेटा ..कसा आहेस?? सुमन कशी आहे?..
“ सुमन बरी आहे बाबा.. दोन दिवसानंतर पुन्हा सर्जरी होणार आहे हे सांगायला मी तुम्हाला फोन केला... सुमन आराम करत आहे म्हणून म्हटलं चला आपण बोलावं म्हणून फोन केला होता, बाकी घरी सगळे कसे आहेत काका ?...
“बरे आहेत, सगळे बरे आहेत.. तुम्ही तुमची काळजी घ्या तिकडे दोघेच असता, आम्हाला इकडे काळजी लागून राहते...
“ तुम्ही आमची काळजी करू नका आम्ही दोघेही मस्त आहोत..
“ ठेवतो काका आता..
“ राज एक मिनिट..
“ हा बोला ना काका...
“ माझ्या मुलीशी लग्न केलेस ना तू, मग आता तू आमचा जावई झालास म्हणजे तू आपलाच झालास मग मला काका म्हणून म्हणून परकं काय करतोस?.. राज आता मला काका नाही बाबा म्हणायचं मी पण वडील आहे ना तुझा आणि तु ही मला मुलासारखाच आहेस...
हे ऐकून राज भावुक झाला
“ थँक्यू थँक्यू काका सॉरी सॉरी बाबा...
बाबा हसले आणि फोन ठेवला...
सकाळी उठल्यावर सुमननी राजला
“ राज घरी फोन लावून दे ना, बाबांशी बोलायचय, त्यांना सांगून देते आज सर्जरी आहे ते...
“ सुमन डोन्ट वरी मी त्यांना सांगितले , कालच फोन केलेला.. तू काळजी करू नकोस ते छान आहेत, सगळे मस्त मजेत आहे आणि आपण इकडे छान आहोत असं ही मी त्यांना सांगितला आहे त्यामुळे तू आता काळजी करू नकोस ठीक आहे...
राज प्लीज लावून दे ना मला आईची आठवण येते.. प्लिज लावून दे..
“लावून देतो, तू चेहरा लहान करू नकोस मी लावून देतो...
सुमननी फोन केला
“ हॅलो..
हॅलो आरु.. कशी आहेस बाळा?..
“ तू कशी आहेस मी ठीक आहे...
“ आई कुठे आहे आरु?..
“ आई आहे ना थांब मी तिला देते आई सुमनदी चा फोन आहे ये..
“ हॅलो...
“ कशी आहेस आई..
“ मी बरी आहे बाळा.. मला काय होतं तू सांग तुझं सगळं कसं चाललंय....
“ बरं चाललंय....
“काय ग आवाज का असा वाटतो..
“ काही नाही ग,
“ बोल ना ..आईला नाही सांगणार..
“ काही नाही आज तुम्हा सगळ्यांची खुप आठवण येत होती म्हणून डोळे भरून आले...
“ हो ना बाळा..
पहिल्यांदा तु आमच्या पासून दूर गेलीस, ते ही इतक्या दिवसासाठी, आम्हाला तुझी खुप आठवण येते... पण काहीच महिने मग तर तुम्ही परत याल ईकडे...
“हो आई.. बर मी ठेवते..
“ बाय..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा