सुखाची ओंजळ... भाग 28
आधीच्या भागात आपण पाहिले की,
दोन्ही परिवाराच्या संमतीने निधी आणि दीपकच लग्न झालं , निधी खूप खुश होती..तिच्या सासरचे मंडळी पण खूप चांगले होते, तिच्याशी छान वागायचे...
दीपकने फिरायला जायचा प्लान केला, तर निधीने रिक्वेस्ट केली की तिला सिंगापूरला जायचं आहे दिपकही तयार झाला आणि दोघे सिंगापूरला गेले... तिथे सुमनला भेटले दोन दिवस सुमन कडे राहून पुन्हा हॉटेलमध्येला गेले आणि काही दिवस फिरून तिथून परत निघाले..
सुमनने आईला फोन केला तिला सर्जरी बद्दल सांगितलं, आज सुमनला आईची खूप आठवण येत होती बोलून झालं आणि तिनी फोन ठेवला..
आता पुढे,
राजनी सगळं बघितलं, तो तिच्या जवळ आला
“ सुमन आज खूप भरून येतय तुला , आईची खुप आठवण येत आहे..
सुमन मान हलवत
“ मी पहिल्यांदाच इतक्या दूर सगळ्यांपासून दूर राहिले ना, आता इच्छा असूनही त्यांच्याजवळ जाऊ शकत नाहीये ..
“ जाऊया.. आपण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू, फक्त काही महिन्यांची गोष्ट आहे.. सगळं नीट होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल, तुला कधीही कुणापासूनही दूर नेण्याची गरज पडणार नाही..
माझ्यावर विश्वास आहे ना...
“ हा काय प्रश्न झाला राज.. विश्वास आहे म्हणून तर इथपर्यंत आले ना तुझ्यासोबत... नाही तर आले असते का?...
“आज आपण कुठेतरी बाहेर जायच का, खूप दिवस झाले घरातल्या घरातच आहेस...
सुमनने होकार देऊन मान हलवली..
दोघेही तयार झाले आणि बाहेर गेले, आज खुप दिवसानंतर दोघे बाहेर गेले.. थोडी खरेदी केली, दोघांनीही बाहेर जेवण केलं आणि घरी आले...
दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन आणि राज दोघेही हॉस्पिटलला गेले.. आज सुमनची सर्जरी होणार होती..
सकाळी बाबांचा फोन आला
“ राज नेलं का बेटा सुमनला हॉस्पिटलमध्ये?..
“ हो बाबा, आताच आणलं..
“ बेटा मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो, एवढ्या कमी वयात तू किती सगळं केलं माझ्या सुमनसाठी, सगळं करतोयस तिच्यासाठी... खरच असा जावई मिळणे म्हणजे कठीणच.. तू खूप करतोयस माझ्या सुमनसाठी... आता मला पूर्ण विश्वास आहे माझ्या मुलीला आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही आणि तू तिला सदैव आनंदात ठेवशील याची मला पूर्ण खात्री वाटते...
“ थँक्यू थँक्यू बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे हेच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे.. मी आता ठेवतो सर्जरीची वेळ झालीये..
“ हो ठीक आहे...
राजनी फोन ठेवला आणि सुमनजवळ गेला...
“बाबांचा फोन आलेला..
“काय म्हणाले..
“ मेरी तारीफ कर रहे थे.. राज फिल्मी अंदाजमध्ये येऊन बोलला...
“मस्करीची वेळ आहे..?
“अग मस्करी नाही, खरच सांगतोय ते माझ्याबद्दल खूप काही बोलले...आणि आता मी त्यांचा परफेक्ट जावई झालोय...
“खरच सांगतेस..
“हो...
नर्स आली..
“एक्सकुज मी..तुम्ही आता बाहेर बसा प्लीज...
राज बाहेर गेला...
सुमनची सर्जरी सुरू झाली...
राज देवासमोर हात जोडून उभा होता...
“हे देवा, माझ्या सुमनसाठीचा हा शेवटचा प्रयत्न आहे, यात यश मिळू दे...तिची सर्जरी नीट होऊ दे...माझ्या सुमनला लवकर बर कर देवा..मला तिला आधी सारख आनंदीत ठेवायचंय..
काही तासानंतर डॉक्टर बाहेर आले
“डॉक्टर कशी आहे सुमन?..
“ती बरी आहे...आता गुंगीत आहे...त्यामुळे बोलणार नाही...थोड्या वेळाने तू भेटू शकतोस..
“ओके, थांकू डॉक्टर....
“डॉक्टर एक मिनिटं
“हा, बोल..
“तिची स्किन आधी सारखी होईल आता...
“हे बघ राज , ग्लास जर तुटला आणि आपण त्याला जोडलं ,तो जुळतो हे नक्की पण त्यावर तुला जोडची रेषा ही दिसनारच , ती दिसू नये म्हणून तू त्याला कितीही घासलेस किंवा बाकी काही उपाय केलेस तरी जोड दिसणारच..तसच आपल्या स्किनच असत, आपली स्किन किती नाजूक असते...त्यावर एवढा मोठा अटॅक झाला तर नॉर्मल व्हायला वेळ तर लागेल..पण हो राज स्किन हुबेहूब आधीसारखी नाही होणार..कितीही म्हटलं तरी जळलेली स्किन आहे, इंटर्नल इफेक्ट होतो त्यामुळे पूर्ववत यायला वेळ लागतो..
पण तू काळजी करू नकोस..सगळं नीट होईल..
राजनी सुमनच्या आई बाबाकडे फोन करून सांगितलं..आठ दिवसात डिस्चार्ज मिळाला...
राज सुमनला घरी घेऊन गेला.... आणि देवाचे आभार मानले सर्व व्यवस्थित पार पडल...
राज सुमनला आराम करायला सांगून खाली गेला...सुमनला सांगूनही गेला नाही, सुमन आवाज देत होती...अजून पर्यंत हा बोलला कसा नाही म्हणून तीनीच उठून बाहेत बघितलं तर राज नव्हता..
“राज..राज कुठे गेलास..
ती मनातल्या मनात
“येऊदे आता, चांगली मजा चखवते..मला न सांगता कुठे गेला हा..
ती विचारात होती आणि तशीच त्याची वाट पाहत बसली..
थोड्या वेळाने राज आला,
“सुमन...
सुमन रागाने लालबुंद...
“काय झालं?.
“काय झालं वर मला विचरतोस.. कुठे गेला होतास..किती वेळची मी वाट बघत होते..असा कसा न सांगता गेलास..नॉट फेअर...मला ना तुझ्याशी बोलयचंच नाही...
“सुमन सॉरी ग,मी तुला सांगूनच जाणार होतो, पण तुझा डोळा लागला दिसला...म्हणून चुपचाप निघून गेलो..
“सॉरी ग...
“सॉरी म्हणू नकोस,मला भीती वाटते म्हणून.,
तुला एकदा गमावलय मी.. आता पुन्हा तस काही झालं तर..
“सुमन रिलॅक्स, मी तुझ्यासाठी सूप आणायला गेली होती...आणि आता बोलू नकोस .. गरमा गरम सूप पी...
राजनी तिला जवळ घेतलं, चेअर वर बसवलं आणि सूप पाजून दिल...
“सुमन, मी तुला आता सोडुन जाईल हा विचारही मनात येऊ देऊ नकोस...आता अस कधीच होणार नाही...त्यामुळे तू काळजी करू नकोस,.. तुला आरामाची गरज आहे..
आता काही दिवसाने
आपण आपल्या माणसांकडे परत जाणार..
“आपण परत जाण्यापूर्वी थोडं फिरून घेऊ...
“चालेल...पण आता फक्त
आराम. ....कळलं...
सुमन आराम करायला रूम मध्ये गेली..
इकडे निधीचही छान चाललेलं होत.. ऑफिस आणि घर दोन्हीचा ताळमेळ छान बसवून निधी सगळ्यांच करायची त्यामुळे घरचे खुश होते....
निधीच्या इथे सत्यनारायण कथा करण्याचं ठरलं त्याप्रमाणे सगळी तयारी झाली, निधीनी ऑफिसला सुट्टी टाकली दिपकही घरीच होता...
पूजेवर निधी आणि दीपक बसले...पंडितजींनी पूजेला सुरुवात केली..
निधिच्या सासूने काही शेजारच्या बायांना कथेसाठी बोलवलं होत...त्या आल्या.. ,कथा झाली..सुमन आणि दीपक दोघांनी सर्वांना नमस्कार केला...सगळ्यांचा आशीर्वाद घेतला...
शेजारच्या बायांच्या पण निधी पाया पडली...
त्यातली एक बोलली
“काय ग निधी, तुझं हे दुसरं लग्न ना....
निधी काहीही बोलली नाही, ती गप्प उभी होती, दुरून निधीची सासू सगळ बघत होती..तिच्या लक्षात आलं म्हणून ती जवळ आली...
“निधी बेटा, यांना प्रसाद नाही दिलास?..
“आई, दिलाय ...
“जा तू, बाकीच्यांना देऊन ये..
“हो आई...
निधी तिथून गेली...
तिच्या सासुनी बोलयाला सुरुवात केली,
“बोला काय म्हणताय... काय विचारायचं होत तुम्हाला माझ्या सुनेला..
“नाही हो, कुठे काय?..काहीच नाही..
“मला काय कळत नाही म्हणता...तुम्ही किती खालच्या पातळीच्या आहात ते..तुम्हाला नसेल विचारायचं ना तरी मी सांगते....
हो हे माझ्या सुनेच दुसरं लग्न आहे, तिचा पहिला घटस्फोट झालाय पण त्यात तिची काहीच चूक नव्हती, तिचा नवराच वाईट होता, त्याला त्याची कोर्टाकडून शिक्षा पण झाली.. आणि आता राहिला प्रश्न माझ्या सुनेचा तर लाख पटीने चांगली आहे...आमचं सगळ करते, कोणालाही बोलयाला जागा ठेवत नाही...
आमचं करते म्हणून मी स्तुती करत नाही आहे तर ती खरच चांगली आहे...तिचा स्वभाव चांगला आहे,एवढया कमी वयात तिला वाईट अनुभव आले पण ती हरली नाही तर आलेल्या परिस्थितीशी लढली, झगडली..स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवलं...
अजून काय हवंय, अशी सून मिळायला भाग्य लागत..उद्या जाऊन आमच्यावर एखादा वाईट प्रसंग घडला तर ती पळून जाणार नाही तर ती लढेल, अन्यायाविरुद्ध लढा देईल.....
अजून काय हवंय, सांगा ना तुम्ही...मला माहित आहे, आपल्या समाजात अश्या स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण आपण तो बदलायला हवा..आणि सुरुवात आपल्याच घरातून व्हायला हवी नाही का...
आम्हीही तुमच्यासारखाच विचार केला होता पण दीपकनी आम्हाला समजावलं... आणि आता खरचं आपला पश्चाताप नाही वाटत....उलट अभिमान वाटतो आमच्या मुलाचा त्यानी इतका चांगला विचार केला...
माफ करा ह मी खूप बोलले पण जे काही बोलले ना ते एकदम सत्य बोलले तुम्ही राग मानून घेऊ नका..आणि जेवण करून घ्या ..
“नाही हो, दीपकची आई..खरच तुमची सून चांगली आहे आम्ही काय... सहजच तिला विचारत होतो...
“काही हरकत नाही, तुम्ही जेवण आटपून घ्या..
“धन्यवाद....
निधीनी सगळं काही ऐकलं, ती सासुजवळ गेली
“आई थँक्स यू ,आज तुम्ही माझ्या बाजूने बोललात...मला खरच खूप बरं वाटलं...
“तुझ्याबाजूने अस काही नाही, सत्य परिस्थिती जी होती ती त्यांना कळण गरजेचं होतं तेच केलं मी,आता त्यांची तोंड कधीच उघडणार नाही....
सर्व कार्यक्रम झाला, सगळे आपापल्या घरी गेले..
रात्री रूम मध्ये निधीनी दिपकला घडलेला प्रकार सांगितला आणि आईने कशी तिची बाजू मांडली हे ही सांगितलं, दिपकलाही बर वाटल..दोघेही खुश झाले...
दुसऱ्या दिवशी सकाळी निधीनी सुमनला फोन करून सगळं सांगितलं,
“अरे वा, चला बर झालं, तुझ्या सासरच्यानी तुझा मनापासून स्वीकार केला..
“हो ग,खरच मला खूप छान वाटलं, गड जिंकल्याचा आनंद झाला...
“सुमन तू कधी परत येणार आहेस?..
“येऊ ग,लवकरच...
“चल मी ठेवतेये तू लवकर बाय..
“बाय...
सुमनच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून राजनी विचारलं..
“आता निधीच सगळं छान होणार..सुमननी राजला सगळं सांगीतल...
“अरे, वा..हे खूप छान झालं, तिची लाईफ बेटर झाली...
“राज आपण कधी निघायचय...
“निघुया...अजून दहा पंधरा दिवस लागतील निघायला..चालेल ना तुला..
“,मग काय, चालवुन घ्यायला पाहिजे...दोघांनीही निधीला फोन करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या..
“मला फोन वरून शुभेच्छा नको आहेत.
तुम्ही दोघे लवकरात लवकर परत या..
“हो ग निधी, अजून दहा पंधरा दिवस लागतील...
“बाय..
राज सुमनच्या औषधी पासून स्किन वर मलम लावेपर्यत सगळं करायचा..
आठवणीनी तिला फळ, दूध..ड्राय फ्रुईट्स द्ययचा.…
हळूहळू सुमनच्या चेहऱ्यावर ग्लो दिसायला लागला...
स्किन आधीपासून थोडी बरी व्हायला लागली ...
डॉक्टर विक्रमनी सुमनला फोन केला
“हॅलो ..
“हॅलो, सुमन. कशी आहेस?..
“मी बरी आहे...
“तुम्ही कसे आहात डॉक्टर.
“मी एकदम ठणठणीत..
“कशी झाली सर्जरी?
“सगळं व्यवस्थित पार पडलंय...आता आम्ही काही दिवसांनी परत येऊ..
“अरे वा, ग्रेट...या मग लवकर.…ठेवतो ...
“ओके..
सुमनलाही आता परतीचे वेध लागले...तिच्यातही घरी जाण्याची उत्सुकता निर्माण झाली...तिला घरच्यांची खूप आठवण यायला लागली..अजून काही दिवसांचा अवधी होता..मग झालं..
सुमनला ती रात्र आठवली..हॉटेल वरची ती पहिली रात्र, आठवूनच तिच्या शरीरात स्पंदन झाली...
ती उठली आणि राजजवळ जाऊन बसली,
“राज..
“ह..बोल...
“काही नाही....
“हे बर आहे, आधी म्हणायचंय बोल आणि विचारल्यावर काही नाही ...
सुमननी चेहरा पाडला...
“सुमन, रागावलो नाही ग,आणि चिडलोही नाही..बस इथे,काय झालं??.
“काही नाही,मला झोप येत नाही आहे,चल ना माझ्यासोबत..
“ओके, तू जा मी येतो पाच मिनिटात..
राजनी दरवाजा लावला आणि आत गेला .. त्यानी सुमनच्या डोक्यावरून हात फेरीत तिला झोपवून दिल....
थोडया वेळाने राजही झोपला..
दुसऱ्या दिवशी सकाळी राजला लवकर जाग आली तर तो जॉगिंग ला गेला तर.…जॉगिंग करून मन अगदी प्रसन्न झाल ,तिकडून आला आणि सुमनसाठी गरमागरम कॉफी बनवली आणि घेऊन गेला..
बघतो तर काय सुमन बेड वर नव्हती.. त्यानी आवाज दिला...
“सुमन..सुमन..
सुमन वॉशरूम मधून बाहेर निघाली..आली तेव्हा गळल्यासारखी वाटली..
“काय ग,काय झालं?..
“बरच वाटत नाही आहे..
“म्हणजे नक्की काय होतंय.
“तेही सांगता येत नाही आहे..
बर तू बस, कॉफी घे..
राजनी तिला बसवलं आणि कॉफी दिली..
क्रमशः
