Login

सुखाची ओंजळ... भाग 29#मराठी-कादंबरी

Kay zalay suman kay hotay nemak hospitalla jaych ka nahi nahi mala basu de aadhi

सुखाची ओंजळ... भाग 29


आधीच्या भागात आपण पाहिले की,


सुमनची सर्जरी झाली..सर्व व्यवस्थित पार पडल...
निधिकडे सत्यनारायण ची पूजा झाली..शेजारच्या काही बायांनी निधीला प्रश्न विचारले ...

निधीच्या सासूला कळलं, ती आली आणि तिनी चांगल्या शब्दात, चांगल्या भाषेत, चांगल्या प्रकारे त्यांना उत्तर दिले, सगळयांची बोलती बंद झाली..


निधी दुरून हे सगळ बघत होती, तिला खूप बरं वाटलं, सगळ्यांनी स्वच्छ मनानी तिचा स्वीकार केला...


हे ऐकून दीपकही खुश झाला..
राज सकाळी जॉगिंगला गेला, तिथून येऊन सुमनसाठी कॉफी बनवली तर सुमन दिसलीच नाही, त्यानी आवाज दिला तर सुमन वॉशरूम मधून निघाली, तिला बर वाटत नव्हतं..


आता पुढे,


“काय झालय सुमन?..काय होतंय नेमकं?..हॉस्पिटलला जायचं का...


“नाही, नाही मला बसू दे आधी...
“हे घे पाणी घे...आणि लेट थोड्यावेळ...


सुमननी थोड्यावेळ आराम केला सुमनला बर वाटल पण संध्याकाळी पुन्हा तिला मळमळल्या सारख झालं...


“राज खूप मळमळ वाटतीय...
“जायचं का हॉस्पिटलला...


“हम्मम..
“तू तयार हो, मी जायची व्यवस्था करतो...


राज तिला हॉस्पिटलला घेऊन गेला..तिथे डॉक्टरांनी चेकअप केलं काही टेस्ट करायला सांगितल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावलं...


दुसऱ्या दिवशी सकाळी राज रिपोर्ट आणायला गेला...
सुमनची अस्वस्थता वाढत होती ..राज आल्यानंतर काय सांगेल याच तिला टेन्शन आलं होतं..


न राहवून तिनी फोन केला,


“हॅलो राज,मिळाले का रिपोर्ट्स, काय म्हणाल्या डॉक्टर..तू निघालास की वेळ आहे..ये रे लवकर..माझं टेन्शन वाढलंय...
“सुमन.. सुमन अग मला बोलू तरी दे..


तू दार उघड..मी दारातच आहे..
सुमननी पटकन दार उघडला..


“इथेच होतास तर सांगायचं नाही का..मी आपली बोलतच गेले..
“मला आत येऊ देशील..


“हो हो ये..
“पानी दे ना प्लीज...


हो हो.. हे घे पानी
“राज आता तरी सांग ना, काय आलय रिपोर्ट मध्ये?.. डॉक्टर काय म्हणाले?..
 राजनी नर्वस चेहरा बनवला..

“ राज असा चेहरा पाडुन का बसलास?.. सांग ना.. माझं बी पी वाढेला आता... बोल ना काय म्हणाले डॉक्टर...?
 राजनी हळू आवाजात
“ आपण आईबाबा होणार आहोत...


 सुमननी आधी न ऐकल्यासारखं केलं आणि मग तिच्या लक्षात आलं तर ती जोरात ओरडली...
राज उठला आणि हातात हात घेऊन “हो सुमन आपण आईबाबा होणार आहोत... 


“खरच..
सुमनच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता...
“ सुमन सुमन आय एम सो हॅपी तू जगातला सगळ्यात मोठा आनंद मला दिलास, मला सगळच दिलस थँक यु थँक यु सो मच सुमन... बाबा होण्याच भाग्य दिलेस तू मला... मी आज खूप आनंदात आहे, खूप आनंद आहे..


 सुमनच्या डोळ्यात पाणी तरळलं “मी पण खूप आनंदात आहे... देवाला नमस्कार करू..


थोड्यावेळाने , राज सुमनला हॉस्पिटलला घेऊन गेला, एकदा डॉक्टर कडून सगळे चेक केलं डॉक्टरांनी काही मेडिसिन्स आणि काही दिवस आराम करायला सांगितला ..


 आता डॉक्टरांनी सगळं नीट आहे म्हटल्यावर सुमननी लगेच घरी फोन केला बाबांनी फोन उचला 


“हेलो बाबा..
“ सुमन सुमन बेटा कशी आहेस?...
“ बाबा मी बरी आहे, खूप खुश आहे, आनंदात आहे तुम्ही पटकन आईला फोन द्या ...


“काय ग आज बाबाशी बोलायचं नाहीये आईला फोन द्या डायरेक्ट म्हणतेस...


“ बाबा, मी बोलेन तुमच्याशी आधी मला आईला काहीतरी सांगायचं प्लीज तिला फोन द्या ना...
 सुमनची आई, ये सुमनची आई  फोन आहे घे बोल तुझ्याशी बोलायचं म्हणते तुझी लाडली..


“ माझी लाडली काय तुमची लाडली नाहीये ..
बोल आधी ते मग बघू आपण...


“ हॅलो सुमन बोल बेटा कशी आहेस?..
“आई मी खूप आनंदात आहे तुला आनंदाची बातमी सांगायला फोन केला..


“ आनंदाची बातमी द्यायची आहे..


“ आनंदाची बातमी?.. पण काय आनंदाची बातमी आहे?..
“ आई तू आजी होणार आहेस...
“ काय.. काय म्हणालीस तू ?..


“हो तु जे ऐकलेस ना तेच बोलली मी तू आजी होणार आहेस आणि बाबा आजोबा..


 आई तिच्या बाबांना सांगताना अहो ऐकलंत का आपण आजी आजोबा होणार आहोत.. काय सांगतेस तू... हो हे सांगायला फोन केला की आपण आजी-आजोबा होणार आहोत किती आनंदाची बातमी दिली ना आपले लेकीने मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या सुमनच्या आयुष्यात इतका आनंदाचा क्षण येईल देवाची कृपा देवाची कृपा तर आहेच ग,  पण राज.. राज काही कमी करत नाहीये तिच्यासाठी ... हो तेही आहेच..


“ हॅलो सुमन बेटा. बाबा बोलतोय..
“ हा बोला बाबा..


“ अभिनंदन दोघांनाही, खूप खूप अभिनंदन..
“ थँक्यू बाबा..
“ राज कुठे आहे.. त्याला दे फोन..


“ हो बाबा..राज बाबा बोलत आहेत
“ हॅलो नमस्ते बाबा...
“ अभिनंदन राज.. खूप खूप अभिनंदन..


“ धन्यवाद धन्यवाद  आत्ताच आम्ही डॉक्टर कडून आलो सगळे व्यवस्थित आहे त्यांनी काही औषधे लिहून दिले आणि काही दिवस आराम करायला सांगितलं 


“राज तुझ्यामुळे आज माझ्या मुलीच्या आयुष्यात किती आनंदाचे क्षण आले, खरच थँक यु थँक यु सो मच ....


“बाबा तुम्ही थँक्यू म्हणून म्हणून मला परक करताय..
“ आता नाही बोलणार..ठेवतो..


 आई-बाबांशी बोलणे झाल्यानंतर सुमननी निधीला फोन केला
“ हॅलो निधी..
“ हा सुमन बोल.. अगं तुलाच फोन करणार होते...
“ तू मला फोन करणार होतीस, बोल ना...


“ सुमन मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती..
“ये मला सुद्धा..पण निधी आधी तू सांग..
“ ये नाही सुमन आधी तू सांग...


 यांचं तू सांग तू सांग करत करत बराच वेळ गेला..राज सगळे ऐकत होता राजनी सुमनच्या हातून फोन घेतला स्पीकर वर टाकला


“ निधी आणि सुमन तू.. काय चाललय तुमचं काय आधी तू आधी तू करताय काय सांगायचे दोघी एकावेळी सांगा ना..
“ बघाना जिजू .. काही सांगत नाही मला...
“ मग तू सांग ना, ती नाही सांगत तू सांग...


“ ओके मी सांगते.
 सुमन तू मावशी होणार आहेस.....
“ हो.. अगं हेच मी तुला सांगणार होते की तू मावशी होणार आहेस...


“ काय सुमन तू माझी चेष्टा करतेस..
“ नाही ग मी खरच तुझी चेष्टा करत नाहीये मी आत्ताच हॉस्पिटलमधून आले आणि माझ्याकडे एक गुड न्यूज आहे मी राज आणि मी आई-बाबा होणार आहोत....


“ काय सुमन अग मला पण.. मी पण.. म्हणजे माझ्याकडे पण...
“ काय पण पण करतेस सरळ सांग ना की तू आई होणार आहेस... निधी आपल्या दोघींच्या आयुष्यत कसे छान सुरळीत झालं ना गं...


 दोघींकडे आनंदाची बातमी आली आणि तेही एका वेळी म्हणजे आपल्याला जे काही होईल ते मस्त बेस्ट फ्रेंड होतील...


“ हो सुमन, आता तू लवकर इकडे ये ग.. बरेच महिने झालेत .

.
“हो गं आम्ही काही दिवसांनी येऊ, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं राजला सांगते विचारायला जमेल का विचारते आणि मग तसंच आम्ही निघू, तसे मी तुला कॉल करेल आणि निधी खूप खूप अभिनंदन दीपकला पण सांग ग..


“ आणि तुम्हा दोघांना पण खूप खूप अभिनंदन..
 चल मी ठेवते.. बाय ..


दोघी एकमेकींशी बोलल्या दोघींनी एकमेकींच्या बातम्या दिला आणि फोन ठेवला, राज डॉक्टरांशी बोलला आणि सुमन चा ट्रॅव्हलिंग बद्दल विचारलं त्यांनी सांगितलं की चालेल तर पंधरा दिवसांनी दोघेही सिंगापूर वरून निघाले ...


सरळ ते सुमनच्या माहेरी निघून गेले, तिथे तिने निधी आणि दीपकला पण बोलवलं... दाराची बेल वाजली आईने दार उघडलं सुमन आणि राज आत येणारच होते तर आई बोलली


“ थांब सुमन पाऊल टाकायचं नाही  दोघेही दचकले, आईने आरतीची थाल आणली तेव्हा कुठे दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आली.. 
आईनी दोघांनाही ओवाळलं आणि आत मध्ये घेतलं


“ आई कशी आहेस?. 
“ मी बरी आहे..
“ तू कशी आहेस..?
“ मस्त, मजेत, कशी दिसते बघ...


“ छान दिसतेस आधी सारखेच सुंदर..
 बस बाळा बस.. बस, आईने लेकीचे लाड केले तिचं खाण्याचं पिण्याचा सगळं केलं आणि राजला सांगितलं की
“ राज मी काय म्हणत होते, आता सुमनला डिलेवरी पर्यंत इथेच राहू दे... आई जवळ राहिली तर तिला बरं वाटेल, काही कमी जास्त वाटलं तर मी आहेच आणि काही वाटलं तर मी तुला फोन करेल...


“  हो आई चालेल ना ..
“ अगं पण नाही.. मग तिकडे राज एकटाज राहणार, त्याच्या जवळ कोण आहे तिकडे..  


 हो बाळा, पण तुझी पहिलीच वेळ आहे ना, मग काही महिने तुला जपायला हवं..?

तिकडे राज दिवसभर कामावर जाईल आणि तू घरात एकटीच राहशील त्यापेक्षा तू इथेच राहा बाळा समोरचे तीन महिने खूप नाजूक असतात खूप पाळावे लागतात ..


तीन महिने झाल्यावर पुन्हा काही दिवस राहून मग जा.. पण आता जाऊ नकोस चालेल..


 आई तुला माहिती आहे मी तिकडे राज एकटाच आहे, मी फोन केला होता थोड्या वेळात निधी आणि दीपक आले दोघी एकमेकींकडे पाहून खूप खूप झाल्या, दोघींनी खूप एन्जॉय केला एकमेकींना सगळं काही सांगितलं 


“ भराभरा दिवस गेले, बघता बघता सहा महिने पूर्ण झाले, आता आईने सुमनच डोहाळेजेवण करण्याचं ठरवलं ...सगळी तयारी केली, खरेदी झाली, सगळी तयारी झाली..


 आजूबाजूच्या बायांना बोलावलं, काही नातेवाइकांना बोलावलं, सुमनची मावशी पण आली...


 सुमन आणि निधीचा कार्यक्रम एकत्रच करण्याचं ठरलं होतं, त्यामुळे निधीची फॅमिलीपण सुमनकडे आली होती, सगळ्या बाया जमल्या आणि डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली...
 छान दोन झुले सजवले होते त्यावर दोघींना बसवलं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.. एक बाया येऊन त्यांना अभिनंदन देऊन जात होत्या..


 शेजारची एक बाई बोलली,
“ काय गं सुमन तुझा बाळाचा चेहरा जन्मताच तुझ्य चेहर्यासारखा झाला तर, नाही म्हणजे तुझा चेहरा असा जळलेला आहे ना म्हणून म्हटलं... बाळाचा चेहरा असा झाला तर..म्हणून बोलले आणि
 निधी तू बरी आहेस ना, तुझं डोहाळेजेवण यांच्यासोबत करतेस.. तिची परछाई तुझ्या बाळावर पडली तर...


“ अहो ताई काय बोलताय तुम्ही... तुम्हाला कळतय का?..सुमनची आई चिडली 
“हे बघा तुम्हाला जर माझ्या पोरीचं सुख बघवत नसेल तर प्लीज तुम्ही जा... मी माझ्या पोरीच्या आनंदात सामील केलं हेच माझं चुकलं, आता मी हात जोडून विनंती करते प्लीज तुम्ही जा..


 सुमनचा चेहरा खाली पडलेला, निधी तिला


“ सुमन तुला सांगितले ना मी, आपण लक्ष द्यायचं नाही.. आपला आनंद आपल्या हातात असतो दुसऱ्यांच्या नाही.. ती बाई तुला काही बोलली म्हणून उदास होणार आहेस का?.. नाही ना.. माझ्या घरचं कोणी बोलले तुला?.. दीपक बोलला?. मी बोलले?.. माझी फॅमिली बोलली?.. नाही ना.. मग त्या  बाईसाठी तू तुझा चेहरा का उदास करतेस..


 हे बघ सुमन जीवनात असे लोक असतात ज्यांना दुसऱ्याच सुख आणि आनंद कधीच बघवत नाही, आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं..

आपला आनंद, आपलं सुख हे आपल्या हातात असतं. दुसऱ्यांच्या नाही...कोणीही काहीही बोलू दे आपण आनंदी राहायचं..समोरचा कसा बोलला काही बोलला तरी आपण फक्त आनंदी राहायचं हो ना…. आणि आपण आनंदी राहू तरच आपले बाळ आनंदी राहतील.. बरोबर की नाही.. तर मग चल हस बघू.. अस करत निधीने तिच्या चेहऱ्यावर स्माईल आणली....


दोघींचाही कार्यक्रम छान झाला ,रात्री निधी तिच्या घरी गेली.. सुमनही खूप थकली असल्यामुळे लवकर झोपली...

राज तिच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता,


“ सुमन मी तुला कधीच नर्वस होऊ देणार नाही ग, मी सगळा आनंद तुला देईन ..तुला जे जे हवं ते ते सगळं करेन तुझ्यासाठी... 


आय लव यु सो मच सुमन ..


क्रमशः