Login

सुखाची ओंजळ... भाग 24 #मराठी-कादंबरी

Raj nighun gela udas chehryane sagle aapaplya roommadhye gele suman ratrabhar vichar karat rahili

सुखाची ओंजळ भाग 24


आधीच्या भागात आपण पाहिले की,

सुमन सकाळी सकाळी घरून निघाली, ज्या ठिकाणी राज आणि सुमन नेहमी भेटायचे त्या ठिकाणी ती गेली..

तिला आशा होती की राज इथेच येईल.. तिथे ती जुन्या आठवणीत रमली, बराच वेळ झाला राज आलेला ..

तिला वाटल आता तो नाही येणार म्हणून ती परत जायला निघाली... तर राजनी आवाज दिला..


 सुमन मला न भेटताच जाणार आहेस..

त्यानंतर दोघे भेटले दोघांच बोलणं झालं आणि सुमनला आता खात्री पटली कि राज तिला कधीही सोडून जाणार नाही, तिने राजला घरी बाबांना भेटायला आणलं.. बाबा त्याच्याशी बोलायला तयार नव्हते..


 सुमनने रिक्वेस्ट केली, बाबा बोलायला तयार झाले त्यानंतर राजनी बाबांना सगळं सांगितलं.. बाबा बोलले, तु जा आता.. मी विचार करून सांगतो.. 


आता पुढे,


 राज निघून गेला...

उदास चेहऱ्याने सगळे आपापल्या रूममध्ये गेले.. सुमन रात्रभर विचार करत राहिली, बाबा स्वीकारतील का?.. बाबा काय म्हणतील?.. मग राज येईल का?.. की बाबांचा बघून तो येणारच नाही..


 सगळे प्रश्न तिला भेडसावत होते कशी तरी रात्र गेली आणि सकाळी सकाळी राज घरी आला...


“ मी तुला सांगितले ना, मी विचार करून सांगतो. मग तू आता सकाळी सकाळी का आलास?....


“ मी तुम्हाला काही द्यायला आलोय... त्यानी आपल्या बॅगमधून एक मोठा पॅकेट काढला आणि तो बाबांच्य हातावर ठेवला..


“ हे पैसे.. मी सुमन साठी साठवलेत.. हे तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये.. हे तुम्ही ठेवा आणि जेव्हा मी या योग्यतेचा आहे अस वाटलं त्यादिवशी तुम्ही मला बोलवा.. मी येईल.. असं म्हणून तिथून निघून गेला...


“ बाबा, आता तरी तुम्ही विचार करा ना.. राज खरच चांगला मुलगा आहे बाबा... तो माझ्यासाठी खूप करतो, इतके वर्ष माझ्यापासून दूर राहिला तर त्यानी माझ्यासाठी हे सगळं केलं, त्यानी पैसेही तुम्हाला आणून दिले ना बाबा, त्याच्या मनात खोट असती तर तो इथे आला असता का..  


 बोला ना बाबा. आता तरी विचार करा ना.. राज खरच चांगला आहे आणि तो इथेच राहणार आहे तो पुण्याला नाही जाणार आहे त्यामुळे मी तुमच्या डोळ्यासमोरच असेल..


तसही माझ्यासोबत कोण लग्न करणार आहे सांगा मला... माझा चेहरा असा अर्धा जळलेला तरी राज मला स्वीकारतोय हीच एक मोठी गोष्ट नाही का...


  तरीही तुम्ही का नकार देत आहात.. कोणीतरी माझ्याशी लग्न करेल का?..

राज स्वतःहून माझा हात मागायला आला आणि काय हव तुम्हाला?... आणि मला समोर त्रास नाही होणार, त्याची फॅमिली त्याच्यासोबत नाही राहत त्याच्यामुळे सासू-सासरे त्रास देतील असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यातही ते सोबत नाही आहेत.. फक्त राज आणि मी आम्ही दोघेच राहणार आहोत.. बोला ना बाबा..


“ अहो ती बरोबर बोलतोय, ती खरंच तर बोलतोय.. सत्य परिस्थिती आहे, कोण करेल  हिच्याशी लग्न?...


 राज समजून घेऊन तिचा हात मागतोय, तर आपण का नकार देतोय... 
सुमनच्या आईने बाबांना खूप समजावले त्यानंतर ते तयार झाले...


 सुमननी खुश होऊन लगेच राजला फोन केला...
“राज लवकरात लवकर घरी ये, बाबांनी होकार दिलाय...
“ खरंच.. खरंच सांगतेस तू...


“ हो हो तू लवकर घरी ये... मी निधीला फोन करते, मला सगळ्यात आधी ही बातमी तिला द्यायची आहे...
 सुमननी निधीला फोन केला,


“ हॅलो निधी..
“ सुमन बोल....
 “तू लवकरात लवकर घरी ये....


 “काय ग, काय झालं.. काय झालं काय?..
“बाबांनी होकार दिलाय..


 “काय?. काल तर बाबांनी त्याला हाकलून लावलं ना..
“ ते सोड पण आज बाबांनी लग्नाला होकार दिलाय.. तू आत्ताच्या आत्ता इथे ये... मला माझा आनंद तुझ्यासोबत शेअर करायचा आहे...


“ हो मी आलेच.. 
 थोड्यावेळात निधी आली आणि मागोमाग राज ही आला...

“नमस्कार काका...


“ नमस्ते बेटा... बस. काल मी जे काय बोललो मी त्याबद्दल पूर्ण विचार केला आहे आणि माझ्या तुमच्या लग्नाला होकार आहे...


“ थँक्यू थँक्यू काका... तुम्हाला नाही माहिती तुम्ही माझ्या मनावरच खूप मोठं ओझं कमी केलं.. मला असं वाटलं की सुमनला पळवुन न्यावे ,मला असच वाटलं की तुम्ही काही परवानगी देणार नाही..


 त्याच्या बोलण्यावर सगळे हसले.. काका तुम्हाला स्पष्ट सांगतो मी माझं घर सोडले,  माझे आई-बाबा माझ्या सोबत सध्या तरी नाहीत. माझा काही संपर्क नाहीये त्यामुळे लग्नाला माझ्याकडून कुणीच राहणार नाही, आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने लग्न करावं अशी माझी इच्छा आहे...

लग्नानंतर फक्त सुमन आणि मी आम्ही दोघे असू.. त्यामुळे सुमनला कुठल्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही, ती तिच्या पद्धतीने तिला जसे वाटेल तशी ती राहू शकते, वागू शकते, तिला कुठल्याही प्रकारचा बंधन नाही..


“ माझा विश्वास बसत आहे तुझ्यावर, तू माझ्या मुलीला सुखात ठेवशील याची खात्री आहे मला..


 “थँक्स यु काका..


“ मी पंडितजी ला बोलावून मुहूर्त बघायला सांगतो,  आपण लवकरात लवकर हे कार्य संपन्न करूया...


 सुमन, निधी आणि आरोही तिघीही खूप खूष झाल्या...


 दुसऱ्या दिवशी बाबांनी पंडितजी ला बोलवून त्यांच्याकडून मुहूर्त काढून घेतला...

दोन दिवसानंतरचा मुहूर्त शुभ होता..


 सुमन ची आई :अरे बापरे, दोन दिवसात काय तयारी होईल..
 अहो आठ दिवसानंतरचा तरी मुहूर्त बघायला हवा होता, दोन दिवसात कशी तयारी करणार लग्नाची?...


 तयारी म्हणजे काय खरेदी केल्या सारखा आहे काय?.. कशी तयारी करायची...


“ होईल सगळं नीट आपल्याला घरच्या घरी तयारी करायची आहे.. तू काळजी करू नकोस.. होईल सगळं नीट...


 लग्नाची तयारी सुरू झाली, निधी सुमन आणि आरोही तिघींनी मिळून खरेदीत फुल टू धमाल केली, त्या खूप फिरल्या, खूप शॉपिंग केलं, खूप एन्जॉय केलं ..

घरी पण आईने सगळे पदार्थ करून ठेवले, मावशीला फोन केला आदल्या दिवशी मावशी आली..

तीही मदत करू लागली.. प्रीती आली, प्रीती नी पण या तिघी सोबत खूप धमाल केली...


 सगळी तयारी झाली लग्नाचा दिवस उजाडला....


सुमननी सकाळी राजला फोन केला,
“ हाय सुमन, बोल...


“  झाली का तयारी राज .. मला खूप भीती वाटत आहे.. माझ्या छातीत धडधड होत आहे...

“ मला ही असंच होतंय...


“ राज खऱ्या अर्थाने आज आपण बंधनात अडकणार आहोत, खरा अर्थाने आज आपल्या नात्याला पुर्णत्व येणार आहे... 


“ तुला नाही माहित तू माझ्यासाठी किती काय केलं... मी तुझी परतफेड कधीच करू शकणार नाही राज.... 


“ काय बोलतेस तू परतफेड, कसली परतफेड अग आता नवरा-बायको होणार आहोत आपण आणि  परतफेड कुठून आल...

यानंतर असं बोलायचं नाहीये,  मी तुझ्यासाठी काहीही करु शकतो फक्त तुझी साथ मला असू दे गं.. तुझ्याशिवाय मला काहीच शक्य नाही.. माझं जग तूच आहेस.. तू नसतीस तर मी मरून गेलो असतो.. मला फक्त तु हवी आहेस, फक्त तू.. बाकी कोणी नाही..


 चल फोन ठेव आणि तयारी कर, माझी वाट बघत बसणार आहेस ना...


“ हो...
 सुमन तयार झाली पंडितजी आले, सगळी तयारी झाली... राजही तयार होऊन आला...


 लग्न घरीच अगदी साध्या पद्धतीने होणार होतं, पंडितजी ने सगळ्या विधी तयार करून ठेवल्या होत्या...पूजेची मांडणी पण झालेली होती, 
 सुमन आणि राज आले 


विधी सुरू झाले, मंगलाष्टक झाली, सप्तपदी झाली...
 लग्नाचा संपूर्ण विधी पार पडला...


 पाठवणीची वेळ झाली... 
 आरोही खूप रडली, आरोही सुमन ला खूप मिस करणार होती... आता तिला अगदी एकट एकट वाटणार होतं...दोघीही एकमेकींना बिलगून खूप रडल्या..


सुमन आणि राजनी जोड्याने आई बाबा आणि मावशीचा आशीर्वाद घेतला. आणि निघाले.....


 गाडी एका फ्लॅटच्या समोर येऊन थांबली ,राजनी सुमनला खाली उतरवलं आणि तिचा हातात हात घेऊन तिला फ्लॅटवर घेऊन गेला त्याच्याकडचा कोणीच आलं नसल्यामुळे ते दोघंच होते... त्यांनी दार उघडलं आत मध्ये गेला आरतीची थाल आणि माप घेऊन आला...

सुमनला टीका लावून ओवाळल आणि माप ओलांडून घरात यायला सांगितलं...


सुमननी माप ओलांडला.... ती पाऊल समोर टाकणार तेवढ्यात राजनी तिला अडवलं आणि उखाणा  घ्यायला लावला...


“साथ देईन तुझी पदोपदी, प्रत्येक क्षणी

प्रत्येकवेळी
राजच नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी”

 "वेलकम माय डियर वाइफ सुमन वेलकम टू माय हाऊस..."


 सुमनच्या चेहऱ्यावर हास्य आलं आणि ती आत आली...
 लग्नघर असूनही ते लग्नघर वाटत नव्हतं म्हणून सुमन थोडी उदास झाली होती...


“ काय ग, उदास का झालीस?..


“ काही नाही रे ..


“मला माहित आहे, बाकीच्या मुली सारखी तुझी स्वप्न असतील ना की आपल्या गृहप्रवेश घरच्या सगळ्या बाकीच्या बायांनी करावं त्यांनी आपल्याला उखाणा विचारावा,  सगळं हसत खेळत व्हावं.. हो.ना..


“ नाही नाही असं काही नाही..


“ तू बस मी आलोच...


 राजा आत गेला, त्याने मोठ्या पातेल्यात  कुंकवाचा पाणी आणलं त्यात गुलाबाची पाने टाकली आणि दोन अंगठ्या टाकल्या..


 सुमन बस खाली, आपण शोधूया


 दोघांनी तो विधी पार पाडला त्यानंतर राजनी जेवण मागवून घेतलं दोघे जेवले आणि राज सुमनला त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन गेला...


  दारात उभा राहून


“ वेलकम डिअर...

असं म्हणून तिला आत आणलं...


 राजची रूम संपूर्ण गुलाबाच्या फुलांनी सजवलेली होती, बेडवर लाल गुलाबांनी हार्ट काढलेला होता सगळीकडे कॅन्डल्स लावलेली होती..


 सुमनला  सजवलेली रूम पाहून खूप आनंद झाला, तिला वाटलं नव्हतं की असं काही होईल...


“ राज किती छान सजवली आहे रूम.....


“ तुला आवडली ना....
“ हो खूप सुंदर....


 मला माहित होतं, लग्नात तर मी काही जास्त काही करू शकलो नाही म्हटलं चला हे तरी छान डेकोरेट करूया.. तुला अगदी प्रसन्न वाटेल...


“ हो रे, खरच खूप छान डेकोरेट केलीस की आणि मला खरच खूप आवडली...


 सुमन गादीवर बसली त्या गुलाबाच्या पाकड्यांवरून हात फिरवला सुमनचा चेहरा अगदी खुललेला होता, चेहऱ्यावर चमक आली होती.. राज तिच्या बाजूला जाऊन बसला, तिच्या खांद्यावर हात ठेवला


“ सुमन खुश आहेस ना..


“ हो खूप खूप खूप खुश आहे मी.. तू माझ्या लाइफ मध्ये आहेस आता मला काहीही टेन्शन नाही...


 राजनी सुमनला अगदी जवळ घेतलं.. मिठीत घेतलं.. तिच्या डोक्यावरून ओढणी काढली, माथ्यावरची बिंदी काढली... गळ्यातला नेकलेस काढला, तिला हळूहळू बेडवर लेटवलं...


तिच्या अगदी जवळ गेला..... तिच्या गालावरून हात फिरवला, त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली... त्या अलगद  स्पर्शाने तिचे अंतरंग मंत्रमुग्ध झाले...तिनेही अलगद त्याला स्पर्श केला...दोघांनाही तो स्पर्श हवाहवासा वाटला...दोघेही एकमेकांत विलीन झाले,


 लाईट्स ऑफ झाले...


 राजला सकाळी जाग आली.. तेव्हा सुमन बेडवर नव्हती,
“ सुमन.. सुमन.. उठलीस का तू?..


 सुमन वॉशरूम मधून निघाली...
“ अरे वा,  फ्रेश पण झालीस...


 सुमननी फक्त स्माईल दिली, तिनी तिच्या ओल्या केसांनी त्याच्या अंगावर पाणी उडवलं.. तसंच त्याने तिचा हात खेचुन तिला आपल्या अंगावर खेचलं आणि घट्ट पकडलं...
“ राज राज सोड प्लीज... सोड राज..


 तो उठून बसला..
“ तु आरसा बघितलास?..


“ का काय झालं? काय लागले का?

“ तुझा चेहरा खूप जास्त खुलतोय.. खूप सुंदर दिसत आहेस..
“ खरंच?...
“ मग काय मी खोटं बोलतोय...


“ तसं नाही रे....
तो उठला, तिला आरशासमोर नेलं आणि म्हणाला..
“हे बघ, तुझा चेहरा किती खुलतोय...”
सुमननी त्याच्याकडे बघितलं आणि लाजली....


क्रमशः

0

🎭 Series Post

View all