सुखाची ओंजळ भाग 25
आधीच्या भागात आपण पाहिले की,
सुमनच्या बाबांनी लग्नाला परवानगी दिली, सगळे खूप खुश झाले...पंडितजी कडून मुहूर्त काढून घेतला...दोन दिवसानंतर लग्नाची तारीख निघाली...
लग्नाची तयारी झाली,
लग्नाचा दिवस उजाडला... सुमनला खूप धडधड होत होती....तिनी राजला फोन केला, त्याचीही तीच अवस्था होती...
लग्नाचा विधी संपन्न झाला..सुमन तिच्या नवीन घरी गेली...
राजनी खूप छान तीच स्वागत केल...
राजनी त्याची खोली गुलाबाच्या फुलांनी सजविली होती...सुमानला खूप आवडली होती.....
दोघेही एकमेकात विलीन झाले
लाईट्स ऑफ झाले..
सकाळी राजला जाग आली तेव्हा सुमन दिसली नाही, त्याने आवाज दिला सुमन तयार होऊन आली...
दोघांमध्ये थोडी प्रेमळ नोकझोक झाली..
आता पुढे,
“सुमन तू आज आईबाबांना भेटून येणार असशील तर आज येऊन जा...
उद्या आपल्याला सिंगापूरसाठी निघायचंय.. माझी सगळी प्रोसिजर झाली आहे.. पॅकिंग करून उद्या सकाळी आपल्याला जायचंय ...
“मी दुपारी जाऊन येते...
दुपारी सुमन आईकडे गेली, निधीला पण बोलावलं...
आईने दरवाजा उघडताच सुमनला बिलगली, आईला खूप प्रसन्न वाटलं की सुमनच्या चेहऱ्यावरील ती प्रसन्नता आई इतकी खुश झाली होती... आरोही तर अगदी तिला बिलगून गेली ..
“दि तू किती सुंदर दिसत आहेस... निधी बाजुला उभी होती
“ नवरा भेटला तर मैत्रिणीला विसरलीस का ग?...
“ असं होईल का कधी मी तुला विसरेल का... तू माझी खरी लाईफ पार्टनर आहेस.. आधी तू नंतर राज... कळलं तुला... कशी विसरेल मी....
“ काय.. कसा गेला पहिला दिवस?..
“ निधी.. पहिला “दिवस” आज आहे तिला पहिली “रात्र” विचार...
आरोही बोलली...
“ पहिली रात्र... आरु दि ची गंमत करतेस.. दि ला चिडवतेस..
“सॉरी..सॉरी..दि ..
तुमच्या दोघींना तर मी नंतर बघून घेईल....
आई मी आणि राज उद्या सिंगापूरला जाणार आहोत...म्हणून आज मी तुम्हा सगळ्यांना भेटायला आली...
“आरु तुझे काही ड्रेसेस देशील मला प्लीज ...
“हो मी आत्ता आणते...
सुमन सगळ्यांशी भेटली..
संध्याकाळी राज तिला घ्यायला आला....
दोघांची जेवण झाली...
आरोही: राज जीजू, तुम्ही काही हे बर करत नाही आहात....
“मी काय केलं....
“माझ्या दि ला माझ्यापासून दूर नेताय...
“फक्त काही महिण्यासाठी....मग ती नेहमी तुझ्या डोळ्यासमोर असेल...
गप्पा झाल्या आणि दोघेही घरी जायला निघाले.....
“जीजू एक मिनिटं...
“हा बोल आरोही..
“जीजू, एक विनंती करण्याची होती...
“अग ,विनंती नाही...तू हुकूम कर..सालीसाहेबा....
“जीजू..दि आधीपेक्षा आता जास्त हळवी झालेली आहे, तुम्ही प्लीज तिची काळजी घ्या...तिच्या कडून काही चूक झाली तरी तुम्ही तिच्यावर ओरडू नका...रागवू नका...
“आरोही..तू खरच काळजी करू नकोस...
दोघेही घरी गेले..
सुमनने पटापट पॅकिंग केली ...
दुसऱ्या दिवशी ते सिंगापूर साठी निघाले....सुमन खूप एक्सायटेड होती...आणि प्रचंड खुश देखील होती...
प्रवासामध्ये तिची बळबळ सुरूच होती...
स्वप्नांच्या जगात त्यांचं पहिलं पाऊल पडलं...सिंगापूरला पोहोचले..
फ्लॅईट मधून उतरताच बाहेर मोठी लांबसडक कार उभी होती, दोघेही त्यात बसून हॉटेलवर पोहचले...
राजनी ऑलरेडी हॉटेल बुक करून ठेवला होता... त्या हॉटेलमध्ये ते गेले.....
तिथून कीज घेतली आणि रूम वर गेले..
रूम मध्ये इंटर करताच सुमनच्या तोंडून
“wow ,राज किती सुंदर आहे?..इथून खिडकीतून बघ, ते दृश्य किती रमणीय दिसतेय...
राज.. राज राज आय एम सो हॅपी... तुला नाही माहित तू मला किती मोठा आनंद दिला आहेस...
मी आज खूप खूश आहे... सुमन रूम भर नाचली, सगळीकडे तिने सगळं पाहिलं बापरे राज वॉशरूम तर बघ किती मोठा आहे, बालकनी बघ किती सुंदर आहे.. किती सुंदर आहे... किती छान आहे. असा करून ती त्याला बिलगली...
ही छोटी छोटी फुल बघ, आणि तो पाण्याचा धबधबा..खूप छान..
“सुमन..सावकाश..अग हळू..इकडेतिकडे करता करता लागेल तुला काही...
सुमन हसली आणि बेडवर पडली थोड्यावेळ लेटली...आणि दोघेही फ्रेश झाले आणि बाहेर पडले....
थोडा वेळ फेरफटका केला, दोघे थोडे फिरले आणि रूमवर परत आले..
राजनी डॉक्टरांना फोन केला..तो डॉक्टरांशी बोलला...
डॉक्टरांनी आठ दिवसानंतरची तारीख दिली...
“ सर्जरी साठी आठ दिवस बाकी आहेत आपण छान फिरून घेऊया... आजची दिवस आराम करुन घेऊ...
“हो चालेल, मला खूप थकल्यासारखं होतंय...
“ ठीक आहे काही हरकत नाही..
दोघांनी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सिंगापूर फिरण्यासाठी सज्ज झाले...
ते टुरिस्ट गाडीने बोटैनिक गार्डन ला गेले... सिंगापूर मधली खूप सुंदर जागा... तिथला माणूस त्यांना माहिती देत होता...
तुम्हाला अगदी शांतता पाहिजे असेल ना तर या जागेपेक्षा दुसरी सुंदर जागा तुम्हाला सापडणार नाही....तिथली हिरवळ मन मोहुन जाते.. पक्षांचा किलबिलाट कानाला मोहून जातो....
झाडांमधून जाणारी हवा... त्याचा आवाज...सगळ मनाला भावून गेलं...
पूर्ण दिवस तिथे घालवून , रात्री दोघेही जेवण करून रूमवर आले...
आईला फोन केला, आई बाबा आणि आरोहीशी बोलली..
“दि कशी आहेस....
“आरु..आरु मी खुप खुश आहे...आज आम्ही फिरायला गेलो होतो...खूप सुंदर जागा होती...
आरोही तू हवी होतीस ,खूप मजा आली असती.. आपण सगळेच आलो असतो ना किती मज्जा आली असती.. आई-बाबा, तू, मी , राज, निधी.
बापरे आपण खूप धमाल केली असती...
“ दी जिजू कुठे जिजू ला फोन दे...
राज आरोही ला बोलायचंय
“बोल आरोही कशी आहेस?..
“ जीजू नॉट फेयर.... तुम्ही मला नाही घेऊन गेलात.. तिकडे तुम्ही मस्त एन्जॉय करताय आणि मला विचारताय मी कशी आहे?.. मला घेऊन जायचं तुमच्यासोबत ..
“नक्की नक्की पुढल्यावेळी आपण ऑल फॅमिली फिरायला जाऊया..
“ ठीक आहे नाही.. पण तरी मी तुमच्यावर रागावली आहे...
“ आता काय झालं...
“ मी एकुलती एक साळी तुमची तरी तुम्ही मला एक साधी पार्टी सुद्धा दिली नाही... आता फिरून आल्यानंतर मला पार्टी हवी आहे...
“हो ग नक्की, जसं हॉस्पिटलचे काम झालं आम्ही निघून येऊया....
“असे बोलत आहात जसे परत येणार आहात... काही महिने तर लागतील...
“ हो हो.....
सुमननी फोन घेतला...
“काय ग आरु, काय म्हणतेस ..
“काही नाही ग,जिजूला गंमत करत होते...
“अच्छा, चल मी ठेवते फोन आता बाय
“बाय दि..
त्यानंतर तिनी निधीला फोन केला
“हा सुमन बोल.. कशी आहेस?..
“ निधी निधी निधी मी खूप खुश आहे.. खूप आनंदात आहे.. इकडे मी खूप मजा करतीये....
“ अरे वा आवाजातही गोडवा भरलाय तुझ्या ..काय कुठे गेली होतीस मग...
“ काही नाही अगं, इथे एका स्पॉट वर गेलो होतो.... खूप सुंदर जागा आहे, खूप छान वाटलं मला..
“ तू खुश आहेस हे ऐकून खूप बरं वाटलं....
“ निधी तू हवी होतीस सोबत, अजून आपण खूप धमाल केली असती....
“ तू वेडी आहेस का?.. तु राज सोबत गेलीस ना, आम्ही कशाला तिथे.. आता तिकडे गेलीस ना खूप एन्जॉय कर, इकडची काळजी करू नकोस.. कुणाची आठवण काढत बसू नकोस..
तिथे राज सोबत गेली आहेस तर त्याच्या सोबत क्षण घालव... त्याला प्रेम दे त्याच्या अपेक्षा पूर्ण कर...
ठीक आहे ना, उगाच आमचा विचार करत बसून त्याचा मूड खराब करू नकोस..
आता फोन ठेव आपण नंतर बोलूया..
“ ओके बाय निधी..
“ बाय....
दुसऱ्या दिवशी राज सुमनला घेऊन एका गार्डन मध्ये गेला, खूप सुंदर जागा होती ती... तिथे त्यांना काही इंडियन फॅमिली दिसल्या... दोघे पार्क मध्ये फिरले….
मस्त एकमेकांच्या आगोशात बसून खूप वेळ घालवला..
थोड्या वेळाने जायला निघाले,
समोर इंडियन ग्रुप उभा होता, ते सगळे गप्पा मारत होते...
तिथल्या एका बाईने राजकडे बघितलं आणि सुमनकडे बघितलं...
राज दिसायला अगदी हँड्सम, गोरा ,उंच, पिळदार शरीरयष्टी.... ती त्याच्याकडे बघतच राहिली...
“ ओ बाई,अस काय बघताय?...
“ काही नाही... ही कोण?...
“ माझी पत्नी आहे सुमन ..
हे ऐकताच ती बाई हसायला लागली...
“ अहो त्यात हसण्यासारखं काय आहे?...
लव मॅरेज की अरेंज मॅरेज - त्या बाईने विचारलं...
“ लव मॅरेज ....
ती बाई आणखीनच हसायला लागली...
तुम्ही असे का हसताय?.. काय झालं?.. आणि तुम्ही कोण?. तुम्ही आमच्याशी का बोलताय?..
“ नाही ..काही नाही,, तू इतका हंड्सम आणि ही तुझी बायको.... तेही लव मॅरेज....
अशा मुलीवर कसं कुणी प्रेम करू शकत?.. ना रंग ना रूप ना शरीरयष्टी....
“ एक्सक्युज मी माईंड युवर लांग्वेज .... ही माझी बायको आहे तिला बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही... कोण तुम्ही तिला बोलणारे?...
आणि सुंदरतेबद्दल तर तुम्ही बोलूच नका, सुंदरता काय असते, तुम्हाला नाही कळणार...
सुंदरता सुंदर दिसण्यात नाही तर आपल्याच विचारात असते, माणूस बाहेरून कसा दिसतो हे बघण्यापेक्षा त्या माणसाचे विचार कसे आहेत हे बघावं... तिचा चेहरा जरी कुरूप असला तरी तिचे विचार तुमच्या तुमच्यापेक्षा चांगलेच आहेत.....
तुम्ही खूप सुंदर आहात दिसायला पण त्याचा काही उपयोग नाही कारण तुमच्या विचारात कुरूपता आहे....
राज तिला आणखी काय बोलणार होता पण सुमननी त्याचा हात पकडला
“ राज इट्स ओके, चल तू अशा लोकांच्या नादी लागून काही अर्थ नाही....
दोघेही तिथून निघाले..
सुमन थोडी उदास झाली...
आता तिच्या चेहऱ्यावर हास्य कस आणायचं याचा विचार त्याच्या मनात आला आणि त्यानी शक्कल लढवली ...
तिची आवडती फुलं, तिचा आवडता आईस्क्रीम , तिचा आवडता टेडीबियर सगळं तिच्या समोर आणून ठेवलं तर सुमन
“ राज प्लीज माझा मूड नाहीये....
सुमन अशा लोकांसाठी आपण आपला मूड खराब करायचा नाही आणि लोकांना काही बोलू देत तू माझ्यासाठी सुंदरच आहेस, मी तुला काही बोललो का नाही ना ... मग नको उदास बसू.. हा असा उदास चेहरा ना चांगला नाही दिसत नाही...हस बघू थोडं.. हस... हस..
असं म्हणत त्यानी तिला गुदगुल्या केल्या आणि सुमन खळखळून हसली..
ये हसी वादिया
ये खुला आसमान
आ गए हम कहा
ये मेरे साजना ...
इन बहारो मे दिल की
कली खिल गई
मुझको तुम जो मिले
हर खुशी मिल गयी
तेरे होटो पे है
हुस्न की बिजलीया
तेरे गालो पे है
जुल्फ की बदलिया
तेरे दामन की खुशबू से
महके चमन
संगे मरमर के जैसा ये
तेरा बदन...
दोघांनीही एकमेकांना चुंबन दिले...
“राज थांक यू..तू आज माझ्या बाजूने बोललास...
“वेडी आहेस का तू?..मी तुझ्याबाजूने किंवा तुझ्यासाठी नाही बोललो...
“मग...
राजनी हृदयाला हात लावून..
“हे इथे...इथे एक मुलगी राहते, तिच्यासाठी बोललो मी ...माझा काळजाचा तुकडा आहे ती...
तिच्याचसाठी सगळं करतोय मी...
तुझ्यासाठी काहीच केलं नाही मी...
तिनी तिचा हात त्याच्या हृदयाला लावून
“तिच्याचसाठी करतोस ना..मग इतकी धडधड का वाढली...
कशाची भीती वाटते, ती तर तुझ्या हृदयात राहते, म्हणजे ती तुला कधीच सोडून जाणार नाही...हो ना...मग का घाबरतोस ...
“मला पूर्ण विश्वास आहे ती मला कधीही सोडून जाणार नाही ..अखेरच्या श्वासापर्यंत...
“चल चावळट....
“राग गेला असेल तर निघायचं...
“हो..निघुया..
मै चली, मै चली
देखो प्यार की गली
मुझे रोके ना कोई
मै चली, मै चली...
मै चली, मै चली..
देखो प्यार की गली...
सुमननी त्याचा हात हातात घेतला आणि निघाले....
क्रमशः
