सुखाची सावली
⚘भाग 2 अंतिम⚘
अभय शितल च्या रुम मधे न जाता सरळ किचन मधे शिरला...बघितले तर सकाळ पासुन तिने कॉफी वजा काही केले नाही आणि घेतले ही नव्हते....त्याने ठरवले की आज मस्त तिच्या आवडीचा मेन्यू करायचा...पण कधि ही किचन मधे न काम केलेल्या त्याला आता कशाला काय म्हणतात हे गूगल करण्या पासुन सुरवात होती अचानक त्याला आठवले 2 महिन्या पूर्वी तिन कामवाल्या मावशी ना नविन स्मार्ट फोन घेऊन दिला होता तेव्हा त्याने तिच्यावर फारच आरडा ओरडा केला होता...
मग त्याने लगेच मावशी ला वीडियो कॉल लावला...
(कॉल वरचे बोलणे)
मावशी- भाऊ काय झाले? ...तुम्ही फोन केला ताई कुठे गेल्यात? सर्व बरे आहे ना?
अभय- मावशी मी बोलू का
मावशी - ताई दिसेना काय झाले सांगा बर मला भिती वाटते आहे????
अभय - मावशी मला बोलू द्याल तर सांगेन ना...बर मला चपाती, भाजी, आणि डाळ भात बनवायचा आहे...तर पटकन समान सांगा...मी करतो...
मावशी - भाऊ तुम्ही करणार ताई कुठे गेल्या काय झाले भाऊ, ताई ना बरे नाही का??? मला काय समजत नहिये भाऊ सांगा ना...??????
अभय - मधेच अहो बास काही झाले नाही तुमच्या ताई ला काम करतेय आत...असेच मी बनवतोय आता सांगा पटकन सर्व...कोणताही प्रश्न न विचारता
मावशी च्या मदतीने अभय स्वयंपाक करतो खरा पण किचनचे मात्र एका भाजी मार्केट मधे रुपांतर झाले असते
ते सर्व नंतर बघू असे म्हणून तो जेवण एका प्लेट मधे काढून छान तिच्या रुम मधे घेऊन जातो
त्याच्या हातात जेवण बघुन ती बाहेर चे का मागवले मी बनवले असते असे वैतागून बोलते...तो बोलतो अग बाहेर काय तुझ्या बॉस चे होटेल चालू आहे का??
मी स्वता खुद माझ्या हाताने बनवले आहे ती एकदम किंचाळून काय?????
तू जेवण बनवले??? मैगी सोडून काही न येणारा तू जेवण ते पण हे सर्व
मग तो तिला मावशी च्या कॉल ची स्टोरी सांगतो आणि दोघे छान एका प्लेट मधे जेवण करतात...
मग प्लेट ठेवण्या साठी ती किचन मधे येते...किचन बघुन तिला फक्त चक्कर यायची बाकी असते
ती जोरात ओरडून अभय....त्याला माहित असते हे होणार आहे...
तो घाबरत घाबरत किचन जवळ येतो....तशी ती त्याला जाऊन मिठी मारते आणि थैंक यू म्हणते....तो एकदम अचंबित होते हे काय मला वाटले आता दुसरे युध्द होईल...
ती बोलते मी आवरते .... मग दोघे ही मनसोक्त गप्पा मारत किचन चे आवरतात... आणि कामाची वाटणी करुन घेतात
रात्री तो काम आवरून झोपणार असतो...तोच ती लाडात त्याचा जवळ आणि बोलते अभि एक सांगू...तो पण लाडात बोलना....
"काही कर पण परत किचन मधे जाऊ नकोस परत किचन मधे मला भुकंप यायला नको रे
"
ते ऐकून तो तिला जोरात जवळ असलेली उशी मरतो
ती खुप हसत हसत तिच्या रुम मधे निघुन जाते...
---------End--------
लॉक डाऊन ने फक्त वाईटच घडले असे नाही...मान्य आहे खुप लोकाना त्रास झाला, सर्व गरिब, मध्यम वर्गिय, सर्वाना अनेक संकटना तोंड द्यावे लागले......
पण ह्याच लॉक डाऊन मुळे अनेक मुलना त्याच्या आई- वडिल ह्याचा सहवास मिळायला लागला.....अनेक नाती नव्याने बहरू लागली.... फक्त नवरा बायको नाही... कधि ही कामातून वेळ न मिळाल्याने गावी न जाता वर्ष वर्ष आई वडिल मुलांची नातवाची वाट पहात....तेच लोक आता गावीच राहत आहेत गेले किती दिवस झाले....अशी अनेक उदाहरणं आहेत.....येणारे प्रत्येक संकट काही तरी चांगले शिकवण देउन जाते हेच खरे....
मस्त राहा...खुश राहा....काळजी घ्या....
©® हेमांगी सुर्यवंशी ©®
इतर नावाने प्रकशित केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.....
सर्व हक्क राखीव.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा