Login

सुखावणारा पाऊस

एक प्रेम कविता
सुखावणारा पाऊस
त्यात तुझ्या ओल्या आठवणी
मन चिंब करणाऱ्या श्रावणसरी
त्यात तुझ्या प्रीतीची ओढ

कधी झुलणारे झोके
कधी मंद वाऱ्याची झुळूक
देई मला तू जवळ असण्याची आठवण
त्या आठवणीत मन होई अधीर

सुखावणाऱ्या त्या पावसात
मी ही होई मग तुला भेटण्या आतुर
0