तिच्या मनात एक वेळ असा विचार यायचा की मोठे होण्याची एवढी चूक असते... आणि एवढी शिक्षा भोगावी लागते... त्यापेक्षा आपण लहानच बरे होतो...
___________पुढे वाचा.....
___________पुढे वाचा.....
"आजी म्हणाली, " अरे राम्या तुह्या पोरी साठी चांगले स्थळ शोध आता, बस झाली शाळा आता ..पोरगी लहान होती तोपर्यंत शिकली पत्र बित्र वाचता येतं तिला... लिहिताही येऊ लागलं तिला आता चांगलच पोरीच्या जातीला तेवढच शिकवायच...
अग, सूनबाई तुलाही कळत नाही का ग आता कशाला लेकीला साळत पाठवतीस
तरणी ताठी पोर.. बरं वाटतं का ग? तुला ही काही कळत नाही...सून घरात आली. जावई आला... उद्या उठून अजून एक जावई येईल तोपर्यंत तुला समजावंच लागतं...
तरणी ताठी पोर.. बरं वाटतं का ग? तुला ही काही कळत नाही...सून घरात आली. जावई आला... उद्या उठून अजून एक जावई येईल तोपर्यंत तुला समजावंच लागतं...
आई ला आजीच्या कटकटीचा राग आला म्हणून म्हणाली, " हावं आत्या आता बस करा...समजलं सगळं..
आजी:~ जा बाई तुझ्या लेकीसाठी सांगते आहे माझ्या चांगल्या सांगण्याचा पण राग येत असेल तर बसते गुमान,' मला काय करायचं...
तुझी लेक हाय, शाळा शिकिव मास्तरीन बनव दाकतरिन होऊ दे, घरच्या लोकांच्या डोक्यावर मिर्या वाटू दे मला काय करायचं आहे...
तुझी लेक हाय, शाळा शिकिव मास्तरीन बनव दाकतरिन होऊ दे, घरच्या लोकांच्या डोक्यावर मिर्या वाटू दे मला काय करायचं आहे...
एकदा पोरगी हाताबाहेर गेली म्हणजे तेव्हा नको सांगू मला की बघा आत्या बाई हिच्याकडे म्हणून..
आई म्हणाली, "काही नाही सांगणार...एवढी काही माझी पोरगी बिना वळणाची नाहीये...समजदार आणि हुशार आहे समजतं तिला बी सगळं....
हे सासू सूनाचे बोलणे बाबांनी ऐकलेले असते...ते आईलाच बोलतात...
अग सूर्ज्या ची माय, ' माही माय काय खोटं थोडीच सांगते आहे... घरचे धोरण हाय ते कस बी केलं तरी...ते आपल्या सून मुलं नातवंडा साठी सगळं काही बरोबरच सांगत असतात...म्हणून गप,' मायचं ऐक जरा...
आई:~ हो हो ऐकलं
बाबा:~ आणि हो ऐकलत का? उद्या ते चिखलगाव चे पाहुणे येणार आहेत तिला बघायला जरा घरात सगळं आहे की बघून घे ...मी बाजारात जातो आहे नसेल तर घेऊन येईन...
अरे उद्याच येणार आहेत? थोडं लवकर सांगितलं असतं ना?
बाबा:~ अग हो, पण कितीही केलं तरी ते मुलगा वाले ते लवकर कळवतात तरी का?
त्यांच्या घरी आपल्या मुलीचे स्थळ घेऊन गेल्या ला आज पंधरा दिवस झाले पण त्यांनी डायरेक्ट आजच निर्णय दिला की येतो आम्ही उद्या म्हणून...
एवढ्या दिवसापासून त्यांचं पत्र वगैरे निरोप काहीच नव्हता म्हणून मी आशा सोडली होती की त्यांच जमलं असेल दुसरीकडे म्हणून...
सुकन्याची आई म्हणाली," हो अगोदर पाहिलं असेल त्यांनी दुसरी स्थळे आली असतील तेव्हा,' मुली वगैरे आवडल्या नसतील मग आपल्याकडे चान्स बघितला असेल...
बाबा:~ हो ग काहीही असो ते उद्या येणार आहेत लाडूला चांगलं तयार करून ठेवा... वहिनीची चांगली साडी नेस म्हणावं....
तशी आपली लाडो देखणीच आहे... त्यांना मुलगी आवडली म्हणजे कदाचित ठरवलं पण जाईल... म्हणून स्वयंपाकाचा बेत पण करून ठेवा चांगला...
शेवंता, सुकन्याची आई:~हो का? तसं असेल तर थोडा गूळ रवा तूप साखर वगैरे घेऊन या...
तिचे बाबा:~हो तुला काय काय पाहिजे ते सगळे लिस्ट करून दे....
तिने सुनेला सांगून बाजाराची लिस्ट करून दिली...
सकाळी उठून घराची चांगले साफसफाई सुरू झाली...
सुकन्याला आईने सांगितले अगं लाडू उठ आज तुला बघायला पाहुणे येणार आहेत...
सुकन्या एकदम आश्चर्यचकित होऊन," काय? अग आई आज माझे महत्त्वाचे लेक्चर आहेत... मी नाही घरी राहू शकत...
शेवंताबाई म्हणाल्या, "अगं तुझं लेक्चर घाल चुलीत... शिकून कुठे मोठी मास्तरीन व्हायला चाललीस शेवटी चुलच फुंकायची आहे ना ?मुलं सांभाळायची आहेत? आपल्या बाईच्या जातीला तेच करावं लागतं...
सुकन्या:~अग आई असं कुठे लिहिलंय... बाईच्या जातीने शाळा शिकू नये...
शेवंता बाई;~अगं लाडू आता बस कर तुझं लेक्चर... पुन्हा सुरू नको होऊ बाई... सावित्रीबाई फुले, आनंदीबाई गोखले वगैरे वगैरे... त्यांची गोष्ट वेगळी त्यांच्यासारखा त्याग आपल्याला नाही करता येणार... ती खूप मोठ्या मनाची लोक होती आपण तसे नाही आपण सामान्य लोक आहोत चार चौघांसारखेच जगावे लागेल... चार चौघींसारखच राहावं लागेल...
सुकन्याला समजून गेलं की आता आई काही ऐकणार नाही म्हणून ती म्हणाली बर आई पाहुणे आले की मला बोलवायला पाठव मी आत्ता शाळेत जाते कारण ते पावणे केव्हा येतील काय येतील दिवसभरामध्ये आपल्याला पण माहित नाहीत ना?
आई:~ बरं माय जा, तू कशी ऐकणारी नाहीस हट्टी आहेस खूप... पण आता तुझं लग्न होईल हा स्वभाव बदल थोडा ऐकून घ्यायचं शिक..
सुकन्या:~ हो ग माझी माय... आईचे गालगुच्चे पकडून तिला एक मिठी मारून बाय करून ती शाळेत निघून गेली...
आईच्या डोळ्यात पाणी आलं मनात म्हणाली, " खूप भोळ आहे माझं लेकरू कसं होईल काय माहित सासरी...
तेवढ्यात ती माय लेकींचे नाटक बघून तिचे बाबा हसून म्हणाले, " काही भोळ नाही तुझं लेकरू नाटकी आहे खूप कसं तुझ्या हातावर तुरी देऊन निसटून गेली शाळेत...
आता ऐन वेळेला पाहुणे आलेले असतील तेव्हा तिला बोलवावं लागेल शाळेतून...
आता ऐन वेळेला पाहुणे आलेले असतील तेव्हा तिला बोलवावं लागेल शाळेतून...
आई:~ जाऊद्या करून घेऊ द्या तिची इच्छा पूर्ण किती दिवस करणार आहे...
बोलवलं जाईल शाळेतून किती दूर शाळा आहे अशी.... आणि माझी लेक अगोदरच देखनी आहे काही तिला सजायची गरज पण नाही तशीच पाहुण्यांसमोर उभी करून देऊ....
बोलवलं जाईल शाळेतून किती दूर शाळा आहे अशी.... आणि माझी लेक अगोदरच देखनी आहे काही तिला सजायची गरज पण नाही तशीच पाहुण्यांसमोर उभी करून देऊ....
बाबा म्हणाले," प्रत्येक लेकरू आई-बाबाला आप्रुक च दिसतं... ते त्या लोकांनी पण समजून घ्यायला पाहिजे ना?
चल येतो मी बस स्टॅन्ड वर जातो पावणे उतरतील एसटीतून त्यांना घेऊन येतो तू आणि सूनबाई मिळून सगळं व्यवस्थित करून ठेवा...
चल येतो मी बस स्टॅन्ड वर जातो पावणे उतरतील एसटीतून त्यांना घेऊन येतो तू आणि सूनबाई मिळून सगळं व्यवस्थित करून ठेवा...
ते निघून गेले...
"त्याच दिवस ती शाळेत असताना मधल्या सुट्टीत तिला कोणीतरी बोलवायला आलं...
शेजारचा गणू नावाचा मुलगा आला होता..तिला म्हणाला, "ताई ताई तुला लवकर घरी बोलवलं पाहुणे आले आहेत...
ती म्हणाली अरे गण्या, माझा इंग्लिश चा इम्पॉर्टंट तास आहे आता मी नाही येत...
गणू:~ अग ताई तुला पाहुणे आले आहेत बघायला....मी नाही येत हे कसं चालेल..
सुकन्या:~ बरं चल बाबा.... असं म्हणून ती दप्तर घेऊन निघाली... पुढच्या दारी पावणे बसली होती ओसरीत... ही मागच्या दाराने घरात घुसली...
घरात सुग्रास स्वयंपाकाचा सुगंध येत होता पाहुण्यांसाठी स्वयंपाक बनवला गेला होता...
आई म्हणाली सुनबाई हात धू आणि जा लाडोला तयार कर लवकर...
वहिनीने सुकन्याला साडी नेसवली छान मेकअप करून दिला आणि हातात पाण्याचा तांब्या घेऊन डोक्यावरून पदर घेऊन तिला पाहुण्यांसमोर पाठवलं...
सुकन्या अगोदरच सुंदर असल्यामुळे मेकअप केल्याने जास्त सुंदर दिसत होती म्हणून नवरा मुलगा तिला पाहताच खुश झाला...
पाहुण्यांना पण आवडली मुलगी...सुकन्या ने मुलाकडे चोरून बघितले....मुलगा ठीक वाटला...
घरची परिस्थिती पण चांगली होती...
चार एकर शेती दोन भाऊ बागायती जमीन होती... म्हणून हे स्थळ आपल्या लाडक्या लाडू बाई साठी खूप चांगल आहे हे तिच्या आई-वडिलांनी ठरवलं आणि जमवूनच टाकायचं असं ठरवून.... ते पाहुण्यांच्या सरबराईला लागले...
चार एकर शेती दोन भाऊ बागायती जमीन होती... म्हणून हे स्थळ आपल्या लाडक्या लाडू बाई साठी खूप चांगल आहे हे तिच्या आई-वडिलांनी ठरवलं आणि जमवूनच टाकायचं असं ठरवून.... ते पाहुण्यांच्या सरबराईला लागले...
पाहुण्यांना आणि मुलाला मुलगी आवडली त्यांनी सांगून टाकले की आम्हाला मुलगी पसंत आहे खूप मुली पाहिल्या चांगल्या पन्नाशेक मुली पाहिल्या तेव्हा ही मुलगी पसंत आली आमच्या प्रशांत ला.... तर आत्ता देणे घेण्याचे हुंडा वगैरे ठरवून टाका...
ते ऐकून सुकन्याच्या आई-वडिलांना आनंद झाला ते म्हणाले हो हो चालेल की... लगेच झोऱ्या टाकून सगळ्या भाऊबंदीच्या लोकांना बोलावलं पाठवण्यात आले...
*****************************बघू आता पुढच्या भागात लाडू बाई च लग्न जमतं की नाही...
देणे घेण्याचे व्यवहार होताना हुंडा वगैरे ठरवताना हजर राहा तुम्हीही सगळे ?
देणे घेण्याचे व्यवहार होताना हुंडा वगैरे ठरवताना हजर राहा तुम्हीही सगळे ?
क्रमशा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा