ते ऐकून सुकन्याच्या आई-वडिलांना आनंद झाला ते म्हणाले हो हो चालेल की... लगेच झोऱ्या टाकून सगळ्या भाऊबंदीच्या लोकांना बोलावन पाठवण्यात आले...
पुढे वाचा.......
"सुकन्या ने चहा पोहे देताना फक्त एकदाच मुलगा बघितला होता...तिला वाटलं आपल्याला ह्याच्या गळी शेवटी बांधलेच जात आहे तर मुलगा कसा आहे ते तरी चांगले निरखून पाहून घेऊ दे बाई... दिसला तर बराच...रंगाने थोडा सावळा आहे...पण माय म्हणते ना शेतकऱ्याचं लेकरू शेतात जाऊन उन्हातान्हात थोडा रंग फिका तर पडतोच... बरं असू दे नाकी डोळी मात्र सरस आहे...
भाऊबंद चे लोक येत होते एकेक जण जमा होत होते कोणी शेतात गेलेले होते त्यांना बोलावण्यात पाठवले होते...
सुकन्या ला चूलीच्या भिंती आडून मुलगा दिसत होता... ती तिच्या होणाऱ्या नवऱ्या मुलाकडे चोरून चोरून बघत होती...तो सुद्धा तिला तिच्या कडे बघताना च दिसला... दोघांची एकदम नजरानजर झाली... सुकण्या च्या मनात असंख्य फुलपाखरू उडायला लागलीत...तिकडे नवऱ्या मुलाने ही हसून लाजत खाली मान घातली...
" सगळे जमले मुला कडचे रुबाबात बसले....आणि मुलीचा बाप एवढंस तोंड करून बसला होता..
मुलाकडचे बोलू लागले चला तुम्हाला काय द्यायचं आहे हुंडा मानपान सांगा लवकर...
सुकन्याचे बाबा म्हणाले, " अहो आमची परिस्थिती बघून आणि मुलीकडे बघून समजून घ्या आणि टाका उरकवून..
मुलगी सुगरण आहे सुंदर आहे तर एवढं तेवढं हंड्या कडे कशाला बघायचं..
मुलाकडचे बोलू लागले आहे अहो असं काय सांगता तुम्ही? मान्य आहे तुमची मुलगी सुंदर आहे पण मुलगाही थोडीच कुठल्या गोष्टीत कमी आहे?
एवढी शेती बाळी आहे घर आहेत मुलगी पोट भरून खाईल.. घरात धन धान्य मुबलक आहे...मुलीच्या सुखासाठी तर एवढं तेवढं करावंच लागेल ना तुम्हाला?
सुकन्याचे बाबा:~ हो ना तेच तर सांगत आहे मी, रिती रीवाजाप्रमाणे घेऊन टाका मी कुठे नाही म्हणतो आहे हुंडा द्यायला...
झाले, मुलाकडचे हुंडा मानपान वाढवत होते... सुकन्याचे बाबा आणि तिचे काका मामा वगैरे हुंडा कमी करण्यासाठी विनवत होते...
असं चालू असताना मात्र सुकन्याला या गोष्टींची खूप चिड येत होती...
असं चालू असताना मात्र सुकन्याला या गोष्टींची खूप चिड येत होती...
तीला वाटलं इथे फक्त दोन जीवांचे मिलन होणार, दोन जीव एक होणार.. जे सृष्टीच्या नियमाप्रमाणे दोघांनाही गरज आहे.....पण हे दुसरे लोक त्यासाठी असा सौदा का करत आहेत? ही असली कसली रीत? तिला या गोष्टींची भयंकर चीड येत असे अगोदरपासूनच आणि आत्ता स्वतःच्या लग्नाबद्दलच हे चालू होतं तर आत्ता तिला जास्त कसंतरी वाटायला लागलं होतं...
मात्र अगोदरच आईने बाबांनी सगळ्यांनी तिला समजावलं होतं की मुलीच्या जातीला सासरी पाठवताना लग्न करताना असं करावंच लागतं हे आपल्या समाजात रीतच आहे समाजाबाहेर जर आपण गेलो तर तुझं लग्न होणार नाही..
त्यावर तिने उत्तर दिलं होतं की नाही झालं लग्न तरी चालेल मला पण अशा विचित्र पद्धती मला बिलकुल आवडत नाहीत...
तेव्हा आई-बाबांनी तिला समजावले होते की तुला चालेल पण आम्हाला नाही चालणार आम्हाला समाजात राहायचं आहे... समाजाप्रमाणे सगळं करावंच लागेल सगळे लोक करतात आम्हालाही करावं लागेल आमच्या पद्धतीने.. आणि ते आम्ही करणार तू शांत बस जास्त शहाणपणा करू नकोस... नावीलाजाणे सुकन्याला गंमत बघावी लागली...
तिने मुलाकडे बघितले तिला वाटले मी मुलगी आहे मान्य आहे माझं नाही चालत पण या मुलाचं तर चालतं ना.. त्याने तरी बोलायला पाहिजे आपल्या आई-बाबा पुढे...
की हे काय चालवल आहे तुम्ही?माझा सौदा करत आहेत तुम्ही अशा प्रकारे तरी बोलायला हवं पण तो तर अगदी गुपचूप बसला आहे...
की हे काय चालवल आहे तुम्ही?माझा सौदा करत आहेत तुम्ही अशा प्रकारे तरी बोलायला हवं पण तो तर अगदी गुपचूप बसला आहे...
शेवटी हो नाही करत हुंडा ठरला... विहीणबाईचा ननंद बाईचा मानपान ठरला.. नाही म्हणता तरीही मुलीकडच्यांची खूप कात निघणार होती... पण मुलीसाठी करावंच लागणार होतं...
सुकन्याच्या मनाला काही महत्त्व नव्हतं समाज जसा चालतो तसा आपण चालायचं हे आई वडिलांच्या म्हणण्याप्रमाणेच तिला वागाव लागायचं..
" शेवटी तिचं लग्न जमलं... सगळं आनंदी आनंद झाला तिला परत पाहुण्यांमध्ये बोलवण्यात आलं पाट मांडून तिची ओटी भरण केली.. मुलाकडच्यां महिलेने तिला नवीन साडी खारीक खोबरं फळाफुलांची तिची ओटी भरली...
आणि सुकन्याच्या बाबांनी नवरदेवाला नवीन कपडे श्रीफळ देऊन दोघांचं लग्न पक्क केलं... एकमेकांच्या हातात अंगठी घातली...
एकमेकांच्या हातात अंगठी घालताना दोघांनी तेव्हाच एकमेकांकडे बघितलं.. दोघांची नजरा नजर झाली... सगळ्या लोकांमध्ये ते उभे असल्यामुळे लगेच दोघांनी नजरा खाली टाकल्या....
एकमेकांच्या हातात अंगठी घालताना दोघांनी तेव्हाच एकमेकांकडे बघितलं.. दोघांची नजरा नजर झाली... सगळ्या लोकांमध्ये ते उभे असल्यामुळे लगेच दोघांनी नजरा खाली टाकल्या....
त्यावेळेस आत्ता सारखे नवरदेव मुलगा आणि नवरी मुलगी स्पेशल बोलायला कधीच जात नसे किंवा लग्न होईपर्यंत त्यांना एकट्यात कधीच भेटू दिले जात नसे... आणि मोबाईल वगैरे तर नव्हतेच..
म्हणून आता लग्नाची तारीख दोन महिन्यांनी ठरवले गेली तेव्हाच त्यांची भेट होणार होती...
म्हणून आता लग्नाची तारीख दोन महिन्यांनी ठरवले गेली तेव्हाच त्यांची भेट होणार होती...
त्यानंतर सुग्रास भोजनाचा बेत केला लग्न जमलं म्हणून गोडधोड जेवण बनवले होते आनंदाने सगळे जेवले आणि पाहुणे मंडळी गाडीत बसली...
सुकन्याने शेवती अजून एकदा मुलाला बघायचे म्हणून खिडकीतून डोकावून बघितलं तर मुलाची नजर सुद्धा तिच्याकडेच होती मुलगाही सुकन्याला मिळवून खुश होता...
पाहुणे मंडळी गेली...
त्यानंतर शेजार पाजारच्या महिला सुकन्याच्या घरी आली सुकन्याच्या डोक्यावर हात फिरवून तिला आशीर्वाद देऊ लागली की आता मुलगी परकी होणार म्हणून आई उगाच डोळ्यातून अश्रू ढाळू लागली...
वहिनीच्या नात्याच्या महिला सुकन्याची थट्टा मस्करी करू लागले...
सुकन्याचे पेपरही झाले होते आणि आता तिचे शिक्षण बंद होणार होतं... तिला खूप वाईट वाटलं... पण एक समाधान होतं की अख्या गावात कुठल्याच मुलीला एवढं शिकायला मिळालं नव्हतं जेमतेम चौथी पाचवी पर्यंत शिकवायची आणि घरीच बसवायचे कामधंद्याला लावायचे पण सुकन्या लाडकी असल्यामुळे नववीपर्यंत शिक्षण तिने घेतलं...
घरचे लोक आता तिच्या लग्नाची तयारी करू लागले...
भाऊ लवकर लवकर शेती वगैरेची कामे आटोपू लागला..
सुकन्याचे बाबा सावकारापासून जाऊन व्याजाने पैसे मागून घेऊन आला...
सुकन्याचे बाबा सावकारापासून जाऊन व्याजाने पैसे मागून घेऊन आला...
त्यानंतर पैसे एकत्र केल्या नंतर बस्ता म्हणजे लग्नाची खरीदारी केली...
त्याचं हंड्याया पैशातून सोने घेतले...नवरदेवासाठी कपडे आणि सुकण्यासाठी लग्नाचा शालू साड्या वगैरे घेतल्या...
सुकन्याच्या सासुं नंनंद दीर जावा सगळ्यांच्या मानपानासाठी कपडे साड्या घेतल्या...
मूळची भांडी खरेदी केली.. डोक्यावर कर्ज वाढत चालल होतं ते पाहून सुकन्याला खूप वाईट वाटायचे पण काय करणार!
तिचे बाबा तिला बोलू द्यायचे नाही गप्प बसवायचे...
शेवटी दोन्ही घरात लग्नाची तयारी झाली..
लग्नाचा मुहूर्त ची तारीख जवळ आली...
सुकन्याला मैत्रिणींनी मेहंदी लावून सजवलं...
नाच गाणी धमाल केली... हळदीच्या दिवशी... सकाळीच भाऊ बंदकीच्या लोकांनी मिळून...शेतातून आंब्याच्या डहाळी आणून घराच्या छपऱ्यांना खोवण्यात आले... म्हणजे सगळ्या भाऊबंदकींना मानाचे आमंत्रण लग्नासाठी देण्यात आले...
नवरदेवाला घ्यायला फुलांनी सजवून गाडी पाठवली...
मात्र जसजसे लग्नाची वेळ जवळ येऊ लागली तसतसं सुकन्याच्या मनात मात्र धडधडू लागलं...
अगदी बिनधास्त जगणारी सुकन्या आता पूर्ण बंधनात अडकणार होती..
आई वडील लहानपण पासूनच तिचं गाव सगळं सोडून तिला जावं लागणार होतं...
तिचं मन भरून आलं डोळे पाणावले... तिने आपले डोळे हळूच ओढनिने पुसले..
तिचं मन भरून आलं डोळे पाणावले... तिने आपले डोळे हळूच ओढनिने पुसले..
"संध्याकाळी नवरदेवाला हळद लावण्यात आली त्यानंतर नवरदेवाची उष्टी हळद तिच्या मैत्रिणींनी सवाष्ण महिलांनी मिळून तिला हळद लावली..
पिवळ्या हळदीने तिची गोरी त्वचा अजूनच खुलली... ती खूप सुंदर दिसू लागली...
नवरदेवाकडच्या महिला तिला बघायला येऊन म्हणू लागली की नवरी खरच खूप सुंदर आहे म्हणून...
हळद लागली तेव्हापासूनच सुकन्याला सगळे नियम लागू झाले...
डोक्यावर पदर घेऊन नवरदेव कडच्या लोकांना नमस्कार करायचा... खाली मान घालूनच राहायचं हळूच बोलायचं...
तिला तर उगाच धडधडू लागलं...
बघू आता पुढच्या भागात चला तिच्या लग्नाला....
..
..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा