" सांज वेळ झाली होती.... सूर्य पश्चिमेला झुकत जाऊन हळूहळू निस्तेज होत होता...
मात्र आपल्या रंगांच्या छटा आपले अस्तित्व त्याने सगळ्या आभाळभर पसरवले होते...
पक्षी घाई घाईने आपल्या घरट्याकडे वळत होते..
मात्र आपल्या रंगांच्या छटा आपले अस्तित्व त्याने सगळ्या आभाळभर पसरवले होते...
पक्षी घाई घाईने आपल्या घरट्याकडे वळत होते..
पक्षीच नाही रस्त्यावर चालणारी माणसे सुद्धा आपल्या परिवाराला भेटण्यासाठी आतुर दिसायचे...
खाली बागेत लहान लहान मुलं खेळण्यात मग्न होती...
एकमेकां मागे पळत असताना.. एक लहान मुलगा पडला... त्याच्या गुडघ्याला खरचटल... तो मुलगा केवीलवाने पणे रडू लागला....
ते पाहून तिच्या मनात धस्स झालं... ती त्या मुलाला घेण्यासाठी खाली उतरू बघत होती इतक्यात... त्या मुलाच्या मोठ्या बहिणीने त्याला उचलले त्याच्या डोक्यावर हात फिरवून त्याला समजावले.. तिच्या फ्रॉक ने त्याचे अश्रू पुसले आणि त्याला घरी घेऊन गेली..
तिला बरं वाटले...मात्र ते पाहून आठवणीने तिच्या हृदयात एक कळ उठली..
सगळ्याच आठवणी तिच्या मनात ताज्या झाल्या....
दुरून समुद्राची गाज ऐकू येत होती...
वसंत ऋतु ची संध्याकाळ असल्यामुळे दिवसभर कितीही ऊन असले तरी संध्याकाळच्या वेळेस अगदी थंडगार गारवा वातावरणात भरून असायचा...
त्या गार वाऱ्याची झुळूक अंगावर येऊन क्षणभर सुखद गारवा वाटून मन तरतरीत होत होतं...
त्यात मंद वाऱ्याच्या झुळूक सोबतच खाली लावलेल्या सोनचाफ्याची गुलाबाची फुलांचे सुगंधही वातावरणात दरवळत होते...
आणि घराजवळच असलेल्या आंब्याला मोहर आल्यामुळे त्याचा घमघमाट सुद्धा या कातरवेळच्या वाऱ्याच्या झुळूक सोबत वातावरणात फैलावत असे...
त्या सुवासाने मन अजून जास्तच प्रफुल्लित व्हायचं...
एकूण वसंत ऋतुची संध्याकाळ ही संपूर्ण सुगंधमय... थंडगार गारवा देणारी आणि प्रफुल्लित अशीच असायची...
"मात्र एवढी सुंदर सांज वेळ असून सुद्धा... सुकन्याच्या चेहऱ्यावर नेहमीच बारा वाजलेले असायचे....
सांजवेळ च्या निस्तेज सूर्यासारखेच तिच्या चेहरा ही कायम निस्तेज असायचा....
ती बळजबरी हसायचा प्रयत्न करायची चेहरा प्रफुल्लित ठेवायचा प्रयत्न करायची पण तिचं अंतर्मनच जर निस्तेज असेल तर कितीही चेहरा फुलवायचा प्रयत्न केला तर कस होईल...?
या सांजवेळी संपूर्ण दिवसभर घरातली काम आटोपून ती गॅलरीत येऊन बसायची.. मात्र सुंदर सांजवेळचा ही तिच्या मनावर काहीच परिणाम होऊ शकत नव्हता...
कोणीच तिच्या चेहऱ्यावरचा निस्तेजपणा घालवून तेज आणू शकत नव्हतं..
"असं काय घडलं होतं तिच्या आयुष्यात... तर कुठलंही प्रसन्न वातावरणचा तिच्यावर परिणाम व्हायचा नाही...
ती तिची रोजची कामे तिचं कर्तव्य सगळं काही पूर्ण करायची...
मात्र तिच्या मनात एक रुख रुख कायमची होती... कायम तिच्या काळजात त्याची आठवण बसलेली असायची... ती वर वर कोणालाही न दाखवता मनातच कुढायची...
"असं काय होतं तिच्या मनात?
कोणाची आठवण तिला सतत सतावायची?
अशी कुठली जखम तिच्या मनाला झालेली होती?
कुठला अन्याय तिच्यावर झाला होता?
म्हणून तिच्या आवडत्या सांजवेळी सुद्धा सुद्धा तिचा चेहरा निस्तेज असायचा?
******
" आतापर्यंत तुम्हाला समजलच असेल की "क्षण फुलले कातळवेळचे"
" आतापर्यंत तुम्हाला समजलच असेल की "क्षण फुलले कातळवेळचे"
ही नवीन कथा मालिका मी लिहायला सुरू केली आहे.. वरती लिहिला तो कथेचा फक्त ट्रेलर आहे...
वरची सगळे प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी
संपूर्ण कथा वाचून बघा...
संपूर्ण कथा वाचून बघा...
" हो आत्तापर्यंत मी एक दोन कथा सोडून बहुतेक सगळ्या प्रेम कथाच लिहिलेले आहेत... आणि तुम्ही वाचक मंडळींनी अगदी भरभरून प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे... म्हणून तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत....??
मात्र प्रेम कथा लिहियायला आता थोडा कंटाळा यायला लागला... ? तर या वेळेस मी सामाजिक स्रीविशेष कथा घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी थोडा चेंज म्हणून....
ही कथा थोडी सत्य परिस्थितीवर आधारित आहे आणि बाकी मात्र कल्पनेची झालर लावून मी कथा सजवण्याचा प्रयत्न केला आहे...
मात्र ही कथा सुद्धा तुम्ही अगोदर वाचल्या त्या कथासारखेच इंटरेस्टिंग करण्याचा मी प्रयत्न करीन... म्हणून एखाद पार्ट वाचून सोडून देऊ नका कमीत कमी पाच-सहा पार्ट वाचून बघा तेव्हाच तुम्हाला कथा पूर्ण समजून येईल आणि वाचायला इंटरेस्ट वाटेल...
म्हणून नक्की वाचा.... मी वेळोवेळी भाग टाकण्याचा प्रयत्न करीन...
" अरे हो, या कथे बद्दल थोडक्यात माहिती सांगायचं राहूनच गेलं...
"ही सुकन्या नावाची एक चंचल चुलबुली, सुंदर.... खेड्यातच राहणारी मुलीची ही कथा...
आयुष्य म्हणजे काय असतं ? जग काय असतं? दुःख वेदना पासून चार हात लांब असणारी... ही खोडकर हसरी मुलगी सुकन्या तिचं लग्न होतं कमी वयातच...
आणि खरी सुरुवात होते तिच्या आयुष्याच्या परीक्षेला...
आणि तोंड देते एकटीच...
भावाची लाडकी बहीण आई बापाची लाडू बाई, लाडकी मुलगी.... गल्लीतल्या शेजार पाजाऱ्यांची आवडती लाडकी मुलगी....
पण तिच्या आयुष्यात जेव्हा तिला... सगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागते तेव्हा मात्र कोणीच तिच्यासोबत उभे राहत नाही...
ती एकटी पडते.. म्हणून ती तिला वाटेल तसा एकटीच निर्णय घेते... तेव्हा मात्र सगळेजण तिच्यावर बोट ठेवायला उभे राहतात...
आणि बळजबरी तिचे आई-वडील भाऊ... समाजाला घाबरून... आणि त्यांच्या दृष्टीने तिची सुरक्षितता पाहून...तिचं दुसरं लग्न करतात...
पण तिथे तरी तिला सुख मिळतं का?
" एकंदरीत जग कितीही पुढे गेलं असलं तरी....आज ही स्री ला खूप काही सहन करावेच लागते...
सगळेच नाहीत पण खेड्यापाड्यातील गरीब कुटुंबात मध्यम कुटुंबात अजूनही परिस्थितीत बदललेली नाही...
पण ही कथा थोडी जास्तच मागची आहे... म्हणजे 1990 च्या दशकातील... म्हणून कथेचं बॅकग्राऊंड वगैरे त्या दृष्टीनेच घेतला आहे हे लक्षात ठेवायचं...
जसे की त्यावेळेस मोबाईल फोन वगैरे नव्हते, पत्र व्यवहारचा जमाना होता...
घरोघरी टीव्ही नव्हते... गावात दोन-तीन घरात टीव्ही असायचा...
घरोघरी टीव्ही नव्हते... गावात दोन-तीन घरात टीव्ही असायचा...
घरात धुंन भांडी स्वयंपाक पाण्यासाठी आधुनिक उपकरणे नव्हती...
म्हणून कथा वाचताना हे लक्षात राहू द्या...
तसेच वर्णन केलेले असणार म्हणून....
तसेच वर्णन केलेले असणार म्हणून....
माझ्या कथेतून ज्यांनी खेड्यातलं आयुष्य बघितलं नसेल त्यांना खेडेगाव बघायला मिळेल....
खेडेगावातली रीती रिवाज प्रथा सगळे वाचायला मिळेल...निसर्ग अनुभवायला मिळेल... खाणे पिणे सगळेच...नवीन ऐकायला मिळेल...
म्हणून कथा miss करू नका...नक्की वाचा.....
**************************
पुढचा पार्ट टाकते लगेच...
**************************
पुढचा पार्ट टाकते लगेच...
धन्यवाद??
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा