सुनांची परिक्षा
भाग 3
भाग 3
सासरे सगळे पहात होते ,बायको हुशार नाही..तिला पारख नाही..
"बघतील का बाबा आईचे तिन्ही सुना प्रति वागणे..किती तफावत..सीमा साठी वेगळा बाणा, रेवासाठी वेगळा आणि स्वाती गिणतीतच नाही..सोयीस्कर वागणे म्हणतो मी ह्याला.." मोठा मुलगा रागात म्हणाला.
"राहू दे, मला आज कळले नाही मी जाणतो ,रेवा कशी...स्वाती कशी आणि सीमा कशी आहे ते..पण आपलं कुठे चालत घरात...हा वारसा बहुतेक कोणीच घेणार नाही...नको ती वैतागवाडी कोण स्वीकारणार...आणि जर सगळ्यांनी स्वीकारली तर पुढे हा वारसाचं चालणार नाही.." सासरे
सासूबाई त्यांचे टोमणे ऐकून घेत होत्या...आणि तरी त्या त्यांच्या विचारात पाय हलवत ,रेवाकडे आशेने बघत होत्या...मनात हेच होते माझ्या भाचीने हे पुण्याचे काम पदरात घ्यावे...तीच करणार
"काय आई काय विचार करत आहात तुम्ही, मी येऊ का मदत करायला तुमची थोडी.." स्वाती पर्स टेकवत सासूबाई जवळ बसली..
"तू फक्त जाऊन कपडे बदल ,उरलेला स्वयंपाक कर...आणि देवाजवळ दिवे लावून ये..." सासूबाई सरळ तोडत बोलल्या
"आई, आज मी बाहेरून जेवण करून आले आहे ,आणि सोबत हे ही होते तर आमचा आज स्वयंपाक नाही ,मग मी मदत ही करणार नाही. त्यात मटण खाल्ले आहे..मग दिवे नाही लावू शकणार.." स्वाती हे बोलून निघून गेली
तिकडून सीमा बाहेर आली ,स्वयंपाक झाला होता...तिला आता उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती...तितक्यात सासूबाई तिला नजरेतून म्हणाल्या... "देवाजवळ दिवे राहिलेत ग."
तिने निमूटपणे काही न बोलता ,देवाला दिवा लावला...आणि पुन्हा काही बाकी असेल तर सांगा मी परत खाली येणार नाही...पण नसेल काही तर तुम्ही जेवणाच्या वेळेस मला बोलून घ्या..ताट वाढेन
सासूबाई म्हणाल्या ,"रेवाला बोलून घेऊ हो आम्ही ,तू जाऊन झोप आता "
"आई झोप काय ,मी झोपण्यासाठी नाही म्हणत उद्याच्या भाज्या निवड्याच्या बाकी आहेत..त्यासाठी बाल्कनीत बसणार आहे मी..शाळेतील पेपर ही तपासायचे असतात माहीत आहे ना तुम्हाला.." सीमा
"सीमा तू जा ,तू दमली आहेस मी वाढून घेतो बाळा...आणि ती भाजी दे इकडे मी तसा ही विटलो ह्या गप्पांना.." सासरे
"हो बाबा ,थकले आहे मी म्हणून चिडचिड ही होते ,पण मला बोलवा मीच वाढून देईल.." सीमा
"सीमा तू जा ,मी ही येतोच..वाटलं तर ताट घेऊन येतो मस्त बाहेर गॅलरी मध्ये टेबलवर बसून जेवू.." मोठा मुलगा
"सगळेच कमाल आहेत, आता तर काय खूप दमली आहे मोठी सून जणू खूप काम पडलं होतं..इतके तर रेवा ही करते.." सासू
"आई आता तर मीच म्हणतो तुझा वारसा तू रेवालाच दे...आम्हाला हे पुण्य नकोच.. आणि पाहिजे असेल तर अनाथ मुलांना जेवण देऊ..पण कृपया तू तुझ्या आवडत्या सुनेला दे हा वारसा.." मोठा मुलगा
"हो हेच मी ही म्हणतो, रेवा चालवणार नक्की.." सासरे
सासूबाई आता जास्तच रागात होत्या ,त्यांनी वाद घालायला सुरुवात केली ,नवरा आणि मोठा मुलगा ही आता गप्प बसून ऐकणारे नव्हते..त्यांनी ही सांगितले..इथून पुढे आम्ही ह्यात भाग घेणार नाहीत..
सासूबाईचा जास्तच बी पी वाढला तश्या त्या खाली पडल्या...आणि सगळी धांदल उडाली..मोठा मुलगा ,आणि सासरे धावत आले..त्यांना काहीच सुचेना..आई आई करून सीमाने हाक मारली...तिकडून रेवा अर्ध्या झोपेतून उठली...काही तरी झालंय हे वाटत होते..हा ह्यांचा नेहमीचा गोंधळ आहे...असाच नुसता आवाज असतो आत्याचा.. म्हणून झोपून राहिली..
इकडे सीमाने डॉक्टर ला फोन केला ,स्वाती ही डोळे चोळत आली... तिचा नवरा ही आला..दोघांनी मोठ्या मुलाला ,बाबाला डॉक्टर ला बोलवायला सांगितले..
तोपर्यंत डॉक्टर येईना ,तर सीमाने गाडी काढली आणि डॉक्टर कडे जाऊन त्यांना लगेच विनंती करून पाया पडून घरी आणले.. आईला तपासून गोळ्या दिल्या...
त्यांना नको तो ताण घेणे गरजेचे नसून ही त्या ताण घेतात आणि देतात, मग सून धावून येईल लगेच ,पण कोणती तर लाडकी सून..
पण आली असेल का लाडकी सून सासूच्या मदतीला ,नाही की हो
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा