Login

सुनांची परीक्षा भाग 4 अंतिम

Sunanchi
सुनांची परीक्षा

भाग 4 अंतिम

आई च्या बोवती नको ती सून पिंगा घालत होती, तिला त्रास होत होता ,त्यांना असे निपचित पडलेले पाहून...कश्याला करायचा स्वतःला त्रास..तसे ही कुठे सासूच्या लेखी ही सीमा चांगली सून आहे..??

बघू पुढे

डॉक्टर गेले आणि पुन्हा आईला आराम करायला सांगितला..स्वाती आणि तिचा नवरा झोपायला गेले ,पण इकडे बाबा आणि मोठा मुलगा आईजवळ बसून होते..तर सीमा देवाकडे प्रार्थना करत होती ,घाबरली होती...

सकाळ होताच आई उठली तर तिच्या बाजूला सीमा बसल्या बसल्या झोपलेली दिसली...

त्यांना कमाल वाटली, ही इथे आणि माझी म्हणवणारी रेवा कुठे दिसली नाही..

रेवा उशिरा उठली ,तेव्हा तिला बाबांनी विचारले ,"तुझ्या आत्त्याला विचार जरा काय झाले ते...तुझी आठवण काढत होती ती काल रात्री.."

"काय झालं बाबा ,का आठवण काढत होती आत्या माझी..? "

तिकडून सासूबाई खाली उतरत होत्या, तितक्यात बाबा उठले आणि तिचा हात धरला..आणि सोफ्यावर बसवलं...

"काळजी घे स्वतःची स्वतः, काल जे झालं ते अति विचाराचे परिणाम होते..नको तिथे डोकं लावले म्हणून..अति विश्वास ही ताणाचे कारण ठरतो..सत्य स्वीकारणे जमले नाही तरी हे होते..आज ऐनवेळी तुझी सून धावली नसती तर तुझा वारसा कोणाला द्यायचा हा मुद्दा अपूर्ण राहिला असता" सासरे खोचक पणे म्हणाले

"आणि तसे जी मी झोपते रेवाचे नाव घेतलेच नव्हते...मी जीचे नाव घेतले होते मी तिलाच माझा हा वारसा देऊन जाणार हे ठरले आहे..आणि सोबत माझ्या सासूबाईने दिलेले सोन्याचे 9 तोळ्याचे तोडे ही देऊन जाणार वारसा म्हणून.." सासू बाई रेवाकडे बघत म्हणाल्या

स्वाती ही चपापली हे ऐकून ,रेवा ही पुढे आली..तोडे तर मलाच मिळणार ,मीच वारसा चालवणार मग तर...त्यात काही अवघड नाही

"आत्या मला तोडे खूप आवडतात ग ,मी त्यासाठी हा वारसा ही पुढे घेऊन जाईल बघ.." रेवा

"आई मी तर जे तुम्ही म्हणतात ते नेहमीच करत असते..तुम्हाला नाही कधीच म्हटले नाही कश्यासाठी ही.." स्वाती

"राहू द्या ग ,तोडे तर तुमच्या मापाचे ही नाहीत मग कसे घेणार तुम्ही..त्यात वारसा म्हणजे जमिन किंवा फक्त तोडे नाही देणार ,ती तपस्या आहे..ज्यात तुम्हाला 100 माणसं जेवू घालायची असतात ,त्यांना कपडे द्यायचे असतात..त्यांचे पाय धुवायचे असतात...कुष्ठ रोग्यांची सेवा करायची असते..सासू सासऱ्यांना मानपान द्यायचा असतो...आणि जोपर्यंत जेवण पोहचते होत नाही तोपर्यंत जेवायचे नसते ,सर्व स्वयंपाक स्वतः करायचा असतो...आणि जी खरकटी भांडी असतात ती स्वतः धुवायची असतात..जे तुम्हाला कधीच जमणार नाही.."

दोघी ही हे ऐकून मागे सरल्या ,त्यांच्या दोघींच्या नवऱ्याने इशारे करून सांगितले..मागे फिर हे तू करू शकणार नाही..मी ही मदत करणार नाही..

"स्वाती, असे 10 तोळ्याचे तोडे मी करून देईल पण तू त्यासाठी मरमर करू नकोस..बाकी आई कोणाला ही देवो हा वारसा आपल्याला तो
नकोय " स्वातीचा नवरा

"रेवा काय हावरट आहेस ,तू त्या तोडयांसाठी काय नको ते दुखणे अंगाकर घेतेस ते वहिनीला करू दे..आपल्याला नकोच ." रेवाचा नवरा

आईला आपल्या मुलांची हुशारी आणि चाल कळली होती ,त्यांना ही वाटत होते सीमाला हा वारसा द्यावा तीच ह्या वारसा जपून ठेवण्याच्या पात्रतेची आहे..ते दोघे ठरवून आले होते आपली वहिनी घर आणि त्याची रीत उत्तम प्रकारे जाणते..आपल्या आई वडिलांना कधी तिने दुखावले नाही..त्यांची तक्रार ही केली नाही..जे पडेल ते काम ती जबाबदारी तिने निभावली आहे..

"सीमा तू काल रात्री खूप दमली होतीस ,तरी माझ्या पायथ्याशी बसून होतीस ,मी काल कोण जाणे झोपेत तुझेच नाव घेत होते..हे यांनी मला सांगितले.."

"अहो आई ते कर्तव्य नव्हते का माझे ?? " सीमा

"मी एक जाता जाता तुला जबाबदारी सोपवून जाते..हा वारसा वैगेरे काही नाही पण सेवा समज जी तू ही करावी असे वाटते..काही गरीब ,अनाथ मुलांना जेवण आणि कपडे देत होते मी ,आणि हेच तुझ्या आजे सासूने ही केले...त्यातून समाधान मिळते हे फक्त त्यालाच माहीत आहे जो सेवा करण्याला आपला धर्म मानतो, अहंकार ज्या मध्ये नसतो..पण थोडा अहंकार माझ्यात होता बरं !! मी आणि माझी माणसं हेच चांगले समजत होते..पण मी चुकले..तुला ओळखण्यात.."


"चला तर शेवटी चूक मान्य करून अहंकार कमी झाला समजू का मी " सासरे

"आई खूप मोठी जबाबदारी आहे ,ही मला द्या हरकत नाही पण ते तोडे ते नकोत मला.."

"तोडे नव्हतेच ग असे कोणते ,ती स्वार्थाची आणि लोभाची परीक्षा असेल जी तुझ्या सासूबाईने घेतली असेल "

"नाही ,तोडे आहेत आणि ते फक्त मी सीमालाच देणार आहे...नाहीतर वारसा पूर्ण होणार नाही "

स्वाती ,रेवा आणि इतर सगळे ह्या निर्णयाशी सहमत होते..सीमा ही आज खुश होती की सासूबाईला तिची पारख उशिरा का असेना करता आली..