Login

सुनांची परीक्षा , भाग 1

Sunachi Prikshaa
सुनांची परीक्षा
भाग 1

आई,"खूप कठीण आहे सीमा, रेवा, आणि स्वाती ह्यांच्या तिघींना ओळखणे.."

प्रीतम, "तुला आता शाबासकी द्यावी लागेल मग, जर तुला माणसं ओळखता येत नसेल तर."

आई, "माणसं नाही सुना. "

आज खूप वर्षांनी सासूबाईंना आपल्या घरातील सुनांच्या वागण्यात फरक जाणवू लागला होता..कोण खरं कोण खोटं.. कोण तोंडावर खरं वागत आहे हे कळत नव्हते..

आई म्हणून आपली मुलं वाढवत असतांना तिला लगेच कळतं, कोण कसा, किती खरा किती स्वार्थी आहे ते..पण लोकांच्या लेकीचे वागणे सुरुवातीला ही नाही कळले ना आत्ता कळत होते...त्यामुळे सगळ्यांना वाईट ठरवता येत नव्हते आणि सगळ्यांनाच चांगले ठरवता येत नव्हते..कोणा एकीला तरी घरातील परंपरेनं चालत आलेला वारसा सोपवायचा होता..ज्यात आपल्या घरातून दरवर्षी फुकट अन्नदान ,जेवण, आणि कपडे वाटप होत..ते ही देणाऱ्याने अगदी मनापासून करायचे असते..जेवण तर स्वतः लवकर उठून बनवायचे असते...त्या दिवशी उपवास ही करायचा असतो..जोपर्यंत लोकांना अन्न पाठवले जात नाही तोपर्यंत जेवण नाही, पण हा बिडा कोण उचलणार ह्या तिघी पैकी..कोणाचे मन इतके उदार असेल..


आईने ही चर्चा मोठ्या मुलासोबत आणि नवऱ्यासोबत केली, पण त्यांना ही सगळ्या सारख्याच वाटल्या, थोड्याफार काम चुकार.. आळशी...छोटा होता पण अजून ही त्याचे लग्न झाले नव्हते..त्याचे लग्न ठरले होते, पण त्याच्या सासरचे घर जावई होण्यास विनंती करूनच लग्नाला तयार झाले होते..मग त्याला आणि नवीन सुनेला गिणतीत घेतलेच नाही सासूबाई ने.


"सीमा,मोठी आहे ती ठेवेन ही हा वारसा चालू पण ,ती नक्कीच विचारणार आम्हीच का ?? इतर ही आहेत त्यांना ही द्या..." सासूबाई म्हणाल्या

"मग आता कोणाकडे वारसा देणार राणीसरकार ." सासरे

"स्वातीला तर नौकरी आणि स्वतःचे माहेर ह्यातून कधी सासर आणि सासरचे रिती रिवाज ह्याचे कधी काही पडलेलेच नव्हते..तुम्ही आणि तुमचे घर..मी येईल, थोडी मदत करेन आणि निघून जाईल ,इतकेच मी करून देऊ शकते असे ती म्हणते रे.." सासूबाई


"तुम्ही दोघे चर्चा करा ,मी आपल्यासाठी मस्त चहा घेऊन येतो, मग आता ठरवू रेवा काय करणार.." मोठा मुलगा म्हणाला

"हा तर जरा ही म्हणत नाही की माझी बायको करेन ,तिला सोपव हा वारसा.." सासूबाई तिरसट पणे म्हणाल्या

" तू त्याच्यावर का रुसते, त्याच्या ही हाता बाहेर गेली आहे ती केस...म्हणजे सुरवातीला इतर कोणी नव्हत्या तेव्हा खऱ्या अर्थाने तिनेच सगळे भार उचलले होते, पण बाकी दोघी आल्यावर तू तिला हवा तसा वेळ दिला नाही ,तिला कामापूरते वापरून घेऊन नवीन सुनांकडे झुकते माप दिलेस, इथेच तुझे खूप चुकले..." सासरे

"मग आता काय चूक झाली, तर मी माफी मागून ती जबाबदारी घेईल...आणि मी का मागू माफी...किती अहंकार आहे तिला, अश्या अहंकारी नको असतात असा वारसा चालवायला.." सासू

सासू तर रागात ,सून म्हणजे फक्त एकच ती ही रेवा ह्या मताचा सासूला चांगली सून कोण ह्याची पारख होईल का ??