Login

सुनांची परीक्षा भाग 2

Sunanchi Prik
सुनांची परिक्षा

भाग 2

ह्या भागात बघू ,सोन्यासारखी सून की फक्त आपल्या भावाची मुलगी ह्यात फरक कळतो का ,की डोळ्यावर जाणून बुजून झापडं बांधून घ्यायची हेच ठरवलं असेल सासूबाई ने.

"अहंकारी तर तू ही कमी नाहीस ,तू कसा काय संभाळास हा वारसा...कुटुता तुझ्यात ही भरभरून आहेच ना...आणि हा वारसा काय ग ,हा आत्ता आईनेच सुरू केला होता...कारण आपण लोकांमध्ये मिसळावे...त्यांची मदत करावी म्हणून.." सासरे

"हा वारसा वारसा आहे, त्याग करणार व्यक्ती हवा आहे...आता ते रेवा ही ह्याचा कामाची वाटते..ती जरा तरी माझे ऐकते.." सासू

"किती दा ऐकले ग तुझ्या रेवाने तुझे ? " सासरे

"नेहमीच. " सासू

"चल जरा परीक्षा घेऊनच बघ तिची.." सासरे


रेवा सासूच्या भावाची मुलगी, तिने हट्टाने करून आणलेली म्हणून जरा तिच्या कडे माफ झुकते होते...पण रेवा त्यांच्या ह्या स्वभावाचा फायदा घेत...काही चूक झाली तर रेवाला माफी असत...घरात काम केले नाही तिने तरी तिला सासू बोलत नसे..तिच्या नवऱ्याने घर खर्चाला पैसे दिले नाही तरी कधी कटकट केली नाही..पण इतर दोघांकडून वेळच्या वेळी दटाऊन पैसे घेत.. आणि त्या दोघींना काम वाटून दिले जात..


"रेवा,अग रेवा...जरा गच्चीत कपडे वाळत घातले आहेत ते सगळे घेऊन येशील का ग ? ,आणि आपल्या सगळ्यांना चहा ठेवशील का ग ?...सोबत चिवडा ही देशील का ग ?.." सासूबाई हक्काने आणि एकदम विश्वासाने म्हणाल्या

सासूबाईला माहीत होते म्हणूनच रेवाला काम सांगताना त्या प्रश्नार्थक रीतीने विचारत होत्या ,अगदी घाबरत घाबरत...ती पटकन चिडून बोलू नये म्हणून..सासरे सासूची रेवावर असलेली मदार बघत होते...ते हसले..

तितक्यात रेवा बाहेर आली, तिने हातात बॅग घेतली आणि सासूबाईला सांगितले.."काल मी कपडे घेऊन आले होते ,आज तुम्ही स्वातीला सांगा आत्या..आणि तुम्ही तुमचा चहा स्वतः करून घ्या मला तर घ्यायचा नाही..."


इकडे रेवा अशीच वागणार हे सासऱ्यांना माहीत होते ,तिकडून मोठा मुलगा ही गम्मत बघत होता..समोर नुकतीच मोठी सून कामावरून आली होती..तिने ही घडलेला हा प्रकार पाहिला होता..ती आली तशी तिच्या खोलीत गेली...साडी बदलून बाहेर आली...स्वतःसाठी चहा ठेवायला निघाली होतीच..तितक्यात सासूबाई तिच्या कडे बघून म्हणाल्या.
"सीमा ते वाळत घातलेले कपडे घेऊन येशील..आणि चहा नको ठेवू पण स्वयंपाक कर.."

इथे मात्र सासऱ्यांचे सासूच्या सीमा प्रति जो व्यवहार असतो आणि तोच रेवा प्रति असतो ह्यात फरक चांगलाच जाणून होते...जी ऐकणारी आहे म्हणते तिला घाबरते आणि जी आगाऊ आहे तिला हुकुमत करते...दटाऊन सांगते..ती ऐकणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ..आणि तरी ती चांगली नाही..वारसा ती सांभाळू शकणारच नाही.

सासू तर अशी पण सासरे खऱ्या अर्थाने वडिलांचे रूप म्हणावेत