Login

सुंदर चित्र

निसर्गाचे वर्णन करणारी कविता

सुंदर चित्र

मखमलीवरी ओतले मोती
निसर्गाची परि घागर न रिती
देऊनिया अपार, मिळते अपार
ही कैसी दैवाची चालीरीती

नदी, सागर, वृक्ष, वेली, पशू, पक्षी
निसर्गदेवतेची सुंदर सारी लेकरे
रममान होऊनी त्यात धुंद गाती
पाऊसात भिजता दिसे किती गोजिरे

वाऱ्यावरती डोले नाजूक तृणपाते
लखलख करी दवबिंदू हिरे जसे
मखमली वाटे धुक्याची वाट
वाटे चादर दुलईचे पांघरले असे

भरभरून देई निसर्ग सर्व काही
विविध रंगी नटलेले सुंदर चित्र
वेगवेगळ्या कलाकृती करे सादर
निसर्गच असे मानवाचा खरा मित्र

पोहोचवतो का मानवा त्यास हानी?
तोच देतो तुला भरभरून सुख
खेळ करून नको करूस हेळसांड
ऱ्हास करून नको देऊ निसर्गास दुःख