सुनेचं कौतुक भाग १
"इतकं काय कौतुक करते गं त्या मेघाचं? साधासा चहा बनवला आहे." राधाची मैत्रीण प्रमिला राधाला म्हणाली.
"अगं कौतुकाचे दोन शब्द बोलायला काय पैसे लागतात का प्रमिला? आणि खरंच माझी सून जे काही करते ते अगदी मनापासून करते."
"पुरे तुझं कौतुक पुराण." प्रमिला म्हणाली.
प्रमिला राधाच्या शेजारी राहायला होती आणि तिची मैत्रीण देखील.
दोघीही एकाच वर्षी बिल्डिंगमध्ये राहायला आल्या होत्या.
राधा आणि प्रमिला दोघींचा स्वभाव वेगळा होता. प्रमिला जरा फटकळ आणि राधा प्रेमळ, समजून घेणारी.
दोघीही एकाच वर्षी बिल्डिंगमध्ये राहायला आल्या होत्या.
राधा आणि प्रमिला दोघींचा स्वभाव वेगळा होता. प्रमिला जरा फटकळ आणि राधा प्रेमळ, समजून घेणारी.
राधाचा नवरा दोन वर्षांपूर्वी देवाघरी गेला होता. तिचं विश्व म्हणजे तिचा मुलगा प्रमोद. खरंतर राधाच्या अंगी जो समजुतदारपणा होता तो काही एकाएकी आला नव्हता. आयुष्यात आलेल्या अनेक अनुभवांनी तिला खूप काही शिकवलं होतं. तिच्यासाठी तिची खरी संपत्ती म्हणजे तिची माणसं.
एक दिवस प्रमोद आला आणि राधाला ऑफिसमध्ये मेघा नावाची मुलगी आवडते असे सांगितले, तिच्याशी लग्न करायचे आहे सांगितले.
मुलाच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी राधा लग्नाला तयार झाली.
मेघा शिक्षित होती. तिचा देखील स्वभाव छानच होता. राधाला मेघामध्ये स्वतःचा भूतकाळ दिसत होता. मेघा लहान असतांना तिची आई देवाघरी गेली होती. तिच्या वडिलांनी तिचा सांभाळ केला होता.
मेघाच्या मनाची अवस्था ती नाही जाणार तर कोण जाणणार?
राधा देखील आईच्या सुखापसून वंचित राहिली होती. तिची आई देखील गंभीर आजारात तिला सोडून गेली होती. आई गेल्यापासून ती एकटी पडली होती. तिचं विश्व म्हणजे तिचे बाबा.

बारावी झाली आणि तिला चांगलं स्थळ आलं. रामरावांचं स्थळ.
सरकारी नोकरी, स्वतःचं घर, गावी शेती. घरात कसल्याच गोष्टीची कमी नव्हती.
सरकारी नोकरी, स्वतःचं घर, गावी शेती. घरात कसल्याच गोष्टीची कमी नव्हती.
राधाच्या मामानेच स्थळ सुचवलं होतं. रामरावांना राधा पसंत पडली.
राधाच्या वडिलांनी विचार केला सगळं काही व्यवस्थित आहे तर लग्नाला होकार द्यावा.
राधाच्या वडिलांनी विचार केला सगळं काही व्यवस्थित आहे तर लग्नाला होकार द्यावा.
राधा वडिलांच्या शब्दा बाहेर नव्हती.
ती देखील लग्नाला तयार झाली.
अनेक स्वप्न घेऊन तिने सासरी पाऊल ठेवलं. सासूला सासू न मानता ती आई मानू लागली, पण तिला माहीत नव्हतं तिथे तिला सून म्ह्णून आणलं आहे.
तिच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. ती शोधत होती जिव्हाळा,प्रेम, माया. पण तसं काहीच होत नव्हतं. कमी वयात संसाराची जबाबदारी खांद्यावर पडली. जबाबदारी तर निभावत होती, पण काहीतरी चुकल्या सारखे वाटत होतं.
क्रमशः
अश्विनी ओगले.
२६/११/२०२५
अश्विनी ओगले.
२६/११/२०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा