Login

महापुरानंतरचा सूर्योदय भाग -२

महापुरानंतरचा सूर्योदय
जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025

शीर्षक: "महापुरानंतरचा सूर्योदय"भाग -२

दिवसाच्या तिसऱ्या दिवशी मनातली शांती भंगली एका लहान गटाने नदीकिनाऱ्याजवळ काहीतरी बघितले होते.कदाचित कोणती वस्तू होऊ शकतं किंवा काही व्यक्तीचं अवशेष असं सर्वांनाच वाटलं. शोधकार्य जोरात वाढलं. गावातल्या लोकांनी नौकांनी आणि रस्त्यांनी सर्वत्र शोध घेतला. राधिका आपल्या बाबांसाठी काळजीने प्रार्थना करत होती.

चौथ्या दिवशी सकाळी गावातल्या पायथ्याशी धावती पावलांची खळबळ उडाली. एक शेतकरी धावत आला आणि दमणार्या स्वरात ओरडला, “भास्कर सापडला! पण खूप बिकट अवस्थेत आहे!”
सुनंदाचा जीव जागीच कोडमंडला; तिने इकडे तिकडे न बघता सरळ नदीकिनाऱ्याकडे धाव घेतली. तिथे पाण्यातून एक ओल्या कापडात गुंडाळलेला माणूस अर्ध-बेहोश अवस्थेत पडलेला होता तो भास्करच होता. त्याचा श्वास खूप खालावला होता पण जगण्याची आशा अजून होती. सुनंदाने त्याच्या हाताला धरले आणि त्याला आवाज दिला तिच्या आवाजाने त्याने आपले डोळे हळूहळू उघडले.

“सुनंदा… मी शाळेकडे चाललो होतो. अचानक पाण्याची एक मोठी लाट आली… मी तिला रोखू शकलो नाही. वाहून गेलो… पण एका दगडाला घट्ट पकडून राहिलो,” भास्करने हळू आवाजात म्हटलं.
सुनंदाचा चेहऱ्यावर हात फिरवला आणि घाईघाईने त्याला जवळच्या आरोग्य केंद्राकडे नेले.

तो दोन दिवसाने बरा होऊन घरी परतला त्यांच्या घराचे अस्तित्व, शेत, गोठा सर्व काही एका क्षणी नष्ट झाले होते.

महापूर निघून गेल्यानंतरही त्यांच्या जीवनावर त्याचा ठसा राहिला; मावळत्या सूर्याच्या किरणांनी गावाचे नव्याने रंग लावले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन नुकसान मोजलं काही लोकांना नवीन छप्पर बांधण्यात मदत केली, काहींनी आपापल्या हाताने अन्न दिले. सुनंदा आणि भास्करने आपापले दुखणारे मन एकमेकांत गुंफले आणि पुन्हा उभे राहण्याचा निर्धार केला.

राधिकने आपल्या लहान भावाला धरून उभं राहिली तिच्या मनात एक वेगळीच निश्चयाची गर्दी सुरु झाली होती. “आई, आपण पुन्हा सुरुवात करू शकतो ना?” तिने विचारले.
सुनंदाने त्याच्या केसावर हात फिरवून उत्तर दिले, “हो, आपल्या हातांनी, मेहनतीने आणि प्रेमाने नक्की करू. घर मिळवले जात नाही,ते एकोप्याने आणि प्रेमाने बनवले जातं.”

गावाच्या पुनर्निर्माणात सर्वानी देखील हातभार लावला.दिवस नव्याने सुरु झाला.राधिका हि सकाळी उठून लहान कामे करून, महिलांसोबत हातात हात घालून शेतात पाणी हलवणं, घरासाठी लागणारे छोटे-छोटे वस्तू बनवणं. लोकांनी मिळून एका ठोस योजनेंतर्गत नव्या घरांचे पायन्यास ठेवले. भास्करने शेतात बियाणे पुन्हा पेरले आणि गावदारांनी एकमेकांना कर्ज न देता मदत केली.

वर्ष गेले; पळस गावने पुन्हा हिरवंपण पुन्हा जिवंत केले. नव्याने बांधलेली घरं चमकली; शाळेत परत मुलांची हसणारी मंडळी उमटली. परंतु भूतकाळाची आठवण कायमच कोणी विसरली नाही. पावसाळा सुरू होण्याच्या आधीच गावकऱ्यांनी तटबंदी बांधण्याचे, नदीकाठ मजबूत करण्याचे काम सुरू केले. ग्रामसेवकाने आणि भास्करने एकत्रितपणे गावाला सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या योजना आखल्या.

सुनंदा प्रत्येक पावसाळ्यापूर्वी देवासमोर दिवा लावते आणि मनातल्या शब्दांत सगळ्यांची सुरक्षेची प्रार्थना करीत असे. राधिकच्या मनात आता भिती कमी तर जिद्द वाढली होती. तिला कळले होते की निसर्ग कितीही क्रूर असो, परंतु मनुष्याच्या प्रेमाने आणि एकत्रित प्रयत्नांनी असे कित्येक संकटं मात केली जाऊ शकतात.


माझी कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम  माझ्यासाठी अमूल्य आहेत.

©️ कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
0

🎭 Series Post

View all