Login

सुरमयी प्रवास... भाग 17

Love story
सुरमयी प्रवास...भाग 17

सुजय आणि नैना कुलकर्णी काकांचा विचार करत बसले होते.

"काय विचार करताय वडील महत्वाचे की नोकरी आणि पैसा?" अपर्णा त्यांच्या मागे ऊभी होती.

सुजयच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते, आपल्या हातून खरच खूप मोठी चूक झाली हे त्याला जाणवलं. पण आता उशीर झालेला होता. कुलकर्णी काका कशे असतील? कुठे असतील? याची कुणालाही कल्पना नव्हती.

सुजयचे डोळे पाणावले, तो भावुक झाला.

"आता काही उपयोग नाही डोळ्यातून अश्रू गाळून. जे व्हायचं होतं ते झालं. आधीच कुलकर्णी काकांना सोबत घेऊन गेला असतात तर आज ते आपल्या सोबत असते. पण तुम्हाला म्हातारा माणूस घरात नको होता, तुम्हाला तुमची प्रायव्हसी हवी होती, तुम्हाला तुमची स्पेस हवी होती. घरात एक मोठी व्यक्ती राहिली की घराला आधार असतो. छोट्या आरवला आजोबा भेटले असते, दिवसभर एकमेकांसोबत खेळले असते. आज तो पाळणा घरात राहतो तुम्ही दोघेही नोकरी करता. काय अर्थ आहे अश्या जीवनाला. जवळ पैसा आहे पण आपला माणूस नाही." अपर्णा बोलून निघून गेली.

"सुजय आपण नाही जायचं."

"अग नैना तू असं बोलतेस? सगळी परिस्थिती तुला तर माहीतच आहे."

"हो माहीत आहे पण अपर्णा बरोबर बोलली आता आपल्याला महत्व बाबांना द्यायचं आहे. नोकरीचं बघू पुढे.
तुम्ही मेडिकल लिव्ह टाका नाहीच झालं तरी असू द्या, दुसरी नोकरी बघा. आता बाबा भेटणं गरजेचं आहे."
दोघांनी ठरवलं काही दिवस इथेच राहायचं.


अपर्णा ऑफिसला पोहोचली, आज तिला पोहोचायला जरा उशीरच झाला.

ऑफिसला पोहोचताच तिला मेसेज मिळाला की बत्रा सरांनी केबिनमध्ये बोलवलं, अर्जंट आहे. तिने हातातली पर्स टेबलवर ठेवली आणि ती बत्राच्या केबिनमध्ये गेली.

"सर तुम्ही बोलावलं."

"हो बसा मिस अपर्णा."

"थँक्यू सर."

"आज उशीर झाला."

"सॉरी सर, मला उशीर होत नाही पण आज थोडा झाला, घरी थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे."

"घरचे प्रॉब्लेम घरी ठेवायचे यानंतर ऑफिसमध्ये यायला उशीर व्हायला नको, हो ना?"

"यस सर. आय विल रिमेंबर"

"मिस अपर्णा तुम्हाला माझ्यासोबत मिटींगला यायचं आहे, संध्याकाळी सहाला मिटींग आहे. मीटिंग हॉटेलमध्ये आहे, एक तास मीटिंग होईल त्यानंतर लंच आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता."


अपर्णाला थोडं ऑकवर्ड वाटत होतं ती काहीच बोलली नव्हती. गप्प बसून होती.

"काय झालं मिस अपर्णा एनी प्रॉब्लेम."

"नाही सर प्रॉब्लेम काहीच नाही पण संध्याकाळची मीटिंग म्हणजे उशीरच होईल नाही का? आपल्याला दुपारी मीटिंग ठेवता आली तर." ती बोलता बोलता थांबली.

"नाही क्लाइंट बाहेरून येणार आहे ते संध्याकाळी शिवाय पोहचू शकणार नाहीत तिथे म्हणून संध्याकाळची मिटींग आहे."

"ओके सर आय एम रेडी."

"यु मे लिव्ह नाऊ."

अपर्णा कॅबिन मधून बाहेर आली, तिच्या चेहऱ्यावरची उदासीनता बघून स्वरालीने लगेच विचारलं.


"काय ग काय झालं? हसत हसत गेलीस आणि असा चेहरा करून आलीस."


"बत्रासोबत संध्याकाळी मिटींगला जायचे आहे तेही हॉटेलमध्ये आणि त्यानंतर लंच सुद्धा आहे."

"अरे वा हे तर मस्तच आहे." स्वराली हसायला लागली.

"स्वराली प्लिज तुला मस्ती सुचते का? मला नाही जायचं ग एक तर दुपारी मीटिंग ठरवली असली तर ठीकच होतं पण संध्याकाळी सहाला मीटिंग त्यानंतर लंच माझा पूर्णच वेळ जाणार. घरी जाऊन तयार होऊन मिटींगला जावं लागणार, किती दगदग होईल माझी."

"अग मग इथूनच जा ना."

"नाही ग संध्याकाळपर्यंत चेहऱ्यावर थकवा जाणवेल थोडं फ्रेश होऊन गेलं तर बरं वाटेल मला."

त्यांचं बोलणं श्वेतांगने ऐकलं, तो जवळ आला.

"अपर्णा तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी जॉईन होऊ का?"

"नाही पण तू कसा जॉईन होणार सर तुला कारण विचारतील मग काय कारण देणार आहेस तू."

"ते ही आहेच, अच्छा मी काय म्हणतो अपर्णा तू तिथे पोहोचल्यानंतर तिथलं लोकेशन मला पाठव मी तिथेच आजूबाजूला राहील. अदरवाईज काही प्रॉब्लेम झाला तुला जर गरज पडली तर मी तिथे येईल."

"नको इतका त्रास नको करू आणि तसही काही होणार नाही, डोन्ट बी निगेटिव्ह."


अपर्णा पुन्हा बत्राच्या केबिनमध्ये गेली,

"बोला मिस अपर्णा."

"सर मी आज लवकर गेले तर चालेल का? म्हणजे मला घरी जाऊन फ्रेश होऊन मग मीटिंगसाठी निघता येईल."


"हो चालेल ना."

"ओके सर मी माझं काम आवरते आणि निघते.

अपर्णाने तिचं सगळं काम आवरलं आणि ती एका तासाच्या आधी निघणार होती तेच श्वेतांगने तिला आवाज दिला.

"अपर्णा एक मिनिट."

"हा बोल."

"पोहोचल्या पोहोचल्या मला लोकेशन सेंड कर आठवणीने, मी तिथेच असेल."


"श्वेतांग खरंच काळजी करू नकोस रे."


"काळजी वगैरे काही नाही, तू सेफ असावीस एवढेच मला वाटतं."

"ओके मी पाठवते आता मला जाऊ दे."

दोघांनीही एकमेकांना स्माईल देत बाय केलं आणि अपर्णा निघाली.

घरी जाताच सोफ्यावर पर्स टाकली आणि लगबगीने आत गेली.


विनायकराव तिथेच बसले होते, तिच्याकडे निरखून बघत होते.

"काय ग काय झालं? आज इतक्या लवकर आली आणि अशी लगबग कशाची?"

"बाबा मला मिटींगला जायचंय, सहा वाजता पोहोचायचं म्हणून मी ऑफिसमधून लवकर निघाले. आता फ्रेश झाली की मीटिंगसाठी बाहेर जाते आणि हो बाबा जेवणही तिथेच असेल त्यामुळे माझी घरी वाट बघू नका आणि माई कुठे आहे माईला सांगा की आज स्वयंपाक तू करून घे."


"ती शेजारच्या काकू कडे गेली असेल आली की मी सांगतो. तू तुझं आवर आणि निघ."

अपर्णा तयार झाली आणि जायला निघाली.

"काळजी घे बाळा आणि रात्री खूप उशीर झाला तर फोन कर सुहास येईल तुला न्यायला."

"हो बाबा मी कळवते आणि श्वेतांग बहुतेक असणार आहे तिथे."

"तो पण येतोय का मिटींगला?"

"नाही बाबा तो मिटिंगला येणार नाहीये पण तो मला बोलला की तू अनोळखी ठिकाणी, अनोळखी माणसासोबत जातेस तर मला लोकेशन पाठव मी तिथेच आजूबाजूला असेल म्हणजे गरज पडली तर तो माझी मदत करेल."

"बापरे काय ही आजकालची मुले. बाकी विचार चांगला आहे श्वेतांगचा, दूरदृष्टी ठेवतो हा मुलगा. ठीक आहे तू त्याला लोकेशन पाठव आणि सुहासच्या मोबाईलवर पण पाठवून ठेव."

"हो बाबा मी निघते."

अपर्णा निघाली आणि ऑटो करून ती त्या हॉटेलमध्ये पोहोचली, तिथे गेल्यानंतर बत्रा ऑलरेडी तिथे आलेला होता.

"हॅलो सर."

"मिस अपर्णा."


"सर तुम्ही एकटेच नाही म्हणजे क्लाइंट येणार होते तर ते आलेले नाहीत अजून."

"नाही ते येतीलच, त्यांचा कॉल आलेला होता ते पाच मिनिटात पोहोचतील. तुम्ही बसा ना मिस अपर्णा."

ती बसली.

"चहा कॉफी वगैरे काही घेणार तुम्ही मिस अपर्णा."

"नो सर थँक्यू."

"ओके."


अपर्णा मोबाईल चाळत बसलेली होती, बत्रा ही त्याच्या मोबाईल मध्ये गुंग झालेला होता. पाच मिनिटे झाली दहा मिनिटे झाली, अजूनही ते आलेले नव्हते. तब्बल एक तास उलटून गेला.

"सर एक तास झाला आपण असेच बसून आहोत अजूनही कुणी आलेले नाही आहेत प्लिज तुम्ही फोन करा ना."

"मी मेसेज केलाय त्यांना ते निघालेच आहेत, पोहोचतील इतक्यात. तोपर्यंत तुम्ही काहीतरी घ्या."


"वेटर दोन ज्यूस प्लिज."

वेटर ज्यूस घेऊन आला.

अपर्णा ज्यूस प्यायली त्यानंतर मात्र तिला गरगरायला लागलं.

"काय झालं मिस अपर्णा? तुम्ही बरे आहात ना?"

"हो सर मी बरी आहे."

अपर्णाने डोक्याला हात लावला.

"मिस अपर्णा तुम्हाला बरं वाटत नाहीये का?आपण एक काम करूया तुम्ही रूमवर चला थोडा आराम करा, तुम्हाला बरं वाटेल.