सुरमयी प्रवास...भाग 45
ऑफिसमध्ये दुसऱ्या ब्रांच मध्ये शिफ्ट केल्याची बातमी ऐकून श्वेतांग आणि अपर्णा उदास चेहरा करून बसलेले होते.
"श्वेतांग मला आता इथे बसण्याची इच्छा नाहीये, मी घरी चालली आहे तू येतोयस का?" अपर्णा उदास चेहरा करत त्याला बोलली.
"हो चल मी तुला सोडतो, मलाही आता इथे राहायची इच्छा नाहीये." श्वेतांगचाही मूड गेलेला होता.
दोघेही ऑफिस मधून बाहेर निघाले.
श्वेतांगने अपर्णाला घरी सोडलं.
"श्वेतांग ये ना घरी, बस थोडा वेळ." अपर्णा
"नाही आत्ता नको, मूड नाहीये." श्वेतांग
"अरे म्हणूनच म्हणते, बस थोडा वेळ. माझाही मूड नाहीये प्लिज ये ना." अपर्णा
"ओके." श्वेतांग
ते दोघं आत आले, त्या दोघांना असं या वेळेवर येताना बघून कुसुम बाहेर आली.
"काय रे तुम्ही या वेळेवर कसे इथे?" कुसुमला आश्चर्य वाटलं.
अपर्णा काहीच न बोलता उदास होऊन सोफ्यावर बसली.
"काय झालं तुझ्यावर रागावली का?"
तिने हळूच श्वेतांगला विचारलं.
त्याने नकारार्थी मान हलवली.
'बापरे दोघे बोलायला तयार नाहीत. काय झालं कुणास ठाऊक.' ती आत गेली त्या दोघांसाठी पाणी घेऊन आली. दोघं पाणी प्यायले.
"काय झाले रे बाबा आता तरी बोला तुम्ही दोघे, चेहरा पाडून का बसलात? काय झालं नक्की सांगा मला?" तिची उत्सुकता वाढत होती.
"माई सरांनी आम्हाला दुसऱ्या ब्रांचमध्ये शिफ्ट केलंय."
"काय?"
"हो माई सरांनी आमच्या दोघांना दुसऱ्या ब्रांच मध्ये शिफ्ट केले."
"पण असं अचानक?" तिलाही आश्चर्य वाटलं.
"तेच काही कळलं नाही, असं अचानक कसं काय झालं?सर बोलले की त्या कंपनीला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे त्यामुळे तुमच्या दोघांनाही मी तिथे पाठवत आहे. आश्चर्य आम्हालाही वाटलं पण काही कळलं नाही काय झालं?"
*************
मानस घरी गेला,
तो अपसेट दिसत होता,
"काय रे मानस? सगळं ठीक आहे ना."
"हो आई."
"चेहऱ्यावरून दिसत नाही आहे."
"आई मी त्या दोघांना दुसऱ्या ब्रांच मध्ये शिफ्ट केलंय."
"काय काय बोलतोस तू?"
"हो आई मी रात्रभर खूप विचार केला आणि त्यानंतरच हा डिसिजन मी घेतला. ते दोघे माझ्या डोळ्यासमोर राहिले असते तर कदाचित मला त्रास झाला असता आणि आता मला कुठलाही त्रास नकोय. मला माझ्या बिझनेस मध्ये डिस्टर्बन्स नकोय आणि म्हणून मी हा निर्णय घेतला."
"अरे पण हे कितपत योग्य आहे?"
"योग्य अयोग्य याचा विचार केला नाही मी, आई मी दुसरा कुठलाही विचार केला नाही फक्त मला त्रास नको म्हणून मी हा डिसिजन घेतला आहे आणि ठीक आहे ना त्यांनी इथे काम केलं काय की तिथे काम केलं काय त्यांना सारखंच आहे आणि मी काही कुणाला एकट्याला पाठवलेलं नाहीये दोघांनाही पाठवले सो दोघे हॅपी असतील, दोघे सोबत असतील अजून काय हवं."
"आणि तुझं काय?"
"माझं काहीच नाही ग, माझं माझं काय राहिलंय आता." तो उदास होऊन बोलला.
"का असा विचार करतोस रे तू स्वतःबद्दल?"
"मग काय करू आई, सगळ आयुष्य निरस झालंय कुठेच काही चांगल्या गोष्टी घडत नाहीयेत. मग तू सांग मी काय करू?"
"तुला जर ती आवडत होती तर का नाही बोललास तिला?"
"अग आई असं अचानक कुणाला काय बोलणार? माझं खरंच प्रेम होतं की आकर्षण होतं मलाही माझं ठाऊक नाही आणि मी असं अचानक तिला काय बोलणार होतो. माझं माझंच काही पक्क नव्हतं."
"मग तुला हे आता जाणवतंय की तुझं तिच्यावर प्रेम आहे."
"माहीत नाही पण त्या दोघांच्या लग्नाची बातमी ऐकली आणि मला धक्काच बसला. मला कदाचित आवडलं नाही मला आनंद झाला नाही."
"तू तिच्या प्रेमात पडलास?"
"असं कसं शक्य आहे? आयुष्यात प्रेम तर एकदाच केलं जातं ना?"
"असं नाही आहे रे."
"मग काय? आवडणं म्हणजे प्रेम होतं का?"
"एखादी व्यक्ती आपल्या जवळ असावी एखाद्या व्यक्तीशी आपल्याला वारंवार बोलणं व्हायला हवं अशी इच्छा होती यालाच तर प्रेम म्हणतात अजून काय."
"जाऊ दे आता मला कुठलाच विचार करायचा नाही, मला माझ्या बिझनेसवर फोकस करायचा आहे बाकी काही नाही."
दुसऱ्या दिवशी सकाळी श्वेतांग आणि अपर्णा दोघेही दुसऱ्या ब्रांच ऑफिसला गेले, तिथे त्यांचं काम सुरू झालं.
दिवस सरकत गेले अपर्णा आणि श्वेतांचा साखरपुडा करण्याचा ठरलं.
साखरपुडा करण्याच्या आधी श्वेतांगच्या आईने अपर्णाच्या घरच्यांना त्यांच्या घरी बोलावलं.
आज श्वेतांगच्या घरी बैठकीचा कार्यक्रम ठरला.
सो घरी कार्यक्रम ठरलेला होता ,बारा वाजता पाहुणेमंडळी येणार होती.
श्वेतांगच्या आईने, सगळी तयारी करून ठेवलेली होती.
श्वेतांगच्या आईने, सगळी तयारी करून ठेवलेली होती.
अगदी साफसफाई पासून ते पडदे बदलण्यात पर्यंत सगळे करून झालेलं होतं.
मुद्दा काय तर मुलीला घर आवडायला हवं, आता राहिला खाण्यापिण्याचं कांदेपोहे नेहमीच होतात म्हणून त्यांनी काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं.
समोसे, कचोरी, कॉफी, अप्पल ज्युस एवढे सगळा मेनू तयार झालेला होता.
अकरा वाजले तरी श्वेतांग महाशय झोपलेले.
"श्वेतांग उठ बाळा....उठ रे लवकर ....पाहुणे यायची वेळ झाली" त्याच्या आईने त्याला उठवलं.
त्याची रूम अत्यंत विस्कटलेली होती.
"बापरे श्वेतांग, हे काय आहे? किती हा पसारा?"
तिने आवरायला घेतलं.
तिने आवरायला घेतलं.
"अरे आज अपर्णाच्या घरचे येतायेत, विसरलास का तू?तुझ्या रूम मध्ये जर आले, तर हा काय पसारा दाखवणार आहेस त्यांना."
आईची बडबड सुरू होती पण श्वेतांगची झोप काही उघडली नव्हती.
आईची बडबड सुरू होती पण श्वेतांगची झोप काही उघडली नव्हती.
"मावशी किचनची कामे अवरली, अजून काही करायचं राहील का?" कमलाने श्वेतांगच्या आईला विचारलं.
"मी याला उठवते, हा उठला की तू याची रूम आवरून ठेव."
त्याची आई त्याच्याजवळ जाऊन बसली ,त्याच्या डोक्यावर हात फिरवत
"श्वेतांग उठ, आज सुट्टी आहे म्हणून झोपून राहणार आहेस का?"
"ये आई, फक्त पाच मिनिटे झोपू दे ग?"
"पाच मिनिट वगैरे काही नाही, लवकर उठ."
"मी हे सगळं आवरून घेते, तू फ्रेश हो. पाहुणे यायची वेळ झाली आहे."
"काय ग आई, तू पण ना त्या बाकीच्या टिपिकल आईसारखीच करतेस."
"हो मी पण तुझी टिपिकल आईच आहे."
त्याचं नाक पकडत ती बोलली.
"लबाडडडड..चल उठ."
श्वेतांग उठून फ्रेश झाला.
पंधरा मिनिटाआधी सगळे तयार होऊन हॉलमध्ये येऊन बसले, पाच मिनिटांनी दारासमोर एक गाडी घेऊन थांबली.
विनायकराव, कुसुम, अपर्णा, सोहम उतरले,
सगळे आत आले.
अपर्णा थोडया समोर येऊन गोट्याला अडकून पडनारच तेवढ्यात श्वेतांगने तिला पकडलं.
दोघांची नजरानजर झाली.
दोघांची नजरानजर झाली.
दोघांनी एकमेकांकडे बघितलं.
"अग सांभाळून.."
"थँक यू."
"अग थँक यू काय ग?"
"चल सगळे आत गेले."
अपर्णा जातच होती, की त्याने तिचा हात पकडला.
"आज खूप सुंदर दिसत आहे. तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटतंय."
"चल चावळट. जाऊ दे मला."
ती पटकन आत गेली.
सगळे आत आले.
"नमस्कार विनायकराव या या, कुसुम ताई तुम्ही पण या. बसा."
ते दोघे सोफ्यावर बसले.
अपर्णा, सोहम या तुम्ही इकडे. इथे बसा माझ्या जवळ."
अपर्णा त्याच्या आईच्या बाजूला बसली.
अपर्णा त्याच्या आईच्या बाजूला बसली.
"घर शोधायला अडचण तर नाही ना आली?"
"नाही अपर्णाने बघितलं असल्यामुळे काही अडचण आली नाही. छान आहे तुमचं घर."
"अपर्णा आज खूप सुंदर दिसत आहे."
तिने लाजून खाली मान टाकली.
"अरे कशी लाजत आहे?"
सगळे हसायला लागले.
त्यांनी चहा नाश्ता आणला.
"चहा, नाश्ता घ्या, बोलणी काय होतं राहील."
गप्पा मारत नाश्ता आणि चहा झाला, श्वेतांगने त्यांना त्याच पूर्ण घर दाखवलं.
"काय मग मुलांनो, आनंदात आहात ना? सगळं तुमच्या मनासारखं घडतंय."
दोघांनी होकारार्थी मान हलवली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा