Login

सुरमयी प्रवास...भाग 46

Love story
सुरमयी प्रवास...भाग 46

पंधरा दिवसानंतरची साखरपुड्याची तारीख ठरली,

"श्वेतांग मी काय म्हणते सरांना फोन करून इंव्हिटेशन द्यायचं का? त्यांना यायचं असेल तर येतील नाही वाटलं तर नाही येणार."


"ओके तुला वाटते ना फोन करावा मग तू फोन कर आणि सांग त्यांना."


"ओके मी फोन करते त्यांना."


अपर्णाने मानसला फोन केला.


"हॅलो सर मी अपर्णा बोलतीये."


"बोला मिस अपर्णा."


"सर कसे आहात?"


"मी छान, तुम्ही सांगा तुम्ही कश्या आहात?"

"मी छान आहे मस्त."


"आणि मिस्टर श्वेतांग."

"सर तोही छान आहे."

"बोला, फोन कसा काय केला?'

"साक्षगंधाची तारीख ठरली आहे त्याच्यासाठीच तुम्हाला इंव्हिटेशन द्यायला फोन केला आहे. तुम्ही आणि तुमच्या आई याल ना साक्षगंधाला? मी वेणू तुम्हाला मोबाईलवर पाठवते."


"बघतो जमलं तर येतो म्हणजे मी नक्की नाही सांगू शकत माझ्या काही मीटिंग आहेत बघतो शेड्युल बिझी नसेल तर येतो."

"येण्याचा प्रयत्न नक्की करा सर तुम्ही आलात तर आम्हाला आनंदच होईल जमलं तर नक्की या ठेवते सर बाय."

मानस ऑफिस मधून निघून सरळ बारमध्ये जाऊन बसला आणि त्याच्या एका मित्राला तिथे बोलावलं.

"काय रे आज घरी जायचं सोडून इथे का आलास?"


"काही नाही सहजच, म्हटलं यानिमित्ताने तुझ्याशी भेट होईल."


"नाही हे सहजच नाहीये, सांग काय प्रॉब्लेम आहे तुला?"

"खरच काही प्रॉब्लेम नाहीये."

"तर मग तू इथे कसा काय? बोल भावा मुलगी वगैरे आवडली की काय?"

"नाही रे आपल्या नशिबात कुठून मुलगी? नशीबच साल फुटक आहे? कुणी मुलगी येत नाही आणि आली ती टिकत नाही, सोड चल पॅक मारूया."


दोघांनी गप्पा मारत बराच वेळ बारमध्ये घालवला, त्यानंतर त्याच्या मित्राने त्याला घरी सोडलं."


"काय रे काय अवस्था करून ठेवली याची?"


"काकू तो बराच वेळ बारमध्ये बसला होता, समजावलं पण ऐकायला तयार नव्हता. बघा आता तुम्ही सांभाळा त्याला."


"बापरे मानस काय अवस्था करून ठेवली आहेस स्वतःची?"

"याला रूम मध्ये घेऊन चल रे."

त्याचा मित्र त्याला रूम मध्ये होऊन गेला, तिथे बेडवर लेटवलं. तो तिथून निघून गेला.

त्याच्या आईने त्याचे शूज काढले, सॉक्स काढले, त्याच्या अंगावर पांघरून घातलं आणि त्याला झोपू दिल.


दुसऱ्या दिवशी सकाळी मानस उठला, त्याचं डोकं खूप दुखत होतं.

डोक्याला हात पकडतच किचनमध्ये गेला.

"आई लिंबू पाणी दे ग, खूप डोकं दुखतंय."


"दुखणारच रात्री किती प्यायला होतास कोणास ठाऊक?"

"इट्स ओके आई आता बोलून अजून माझं डोकं दुखवू नकोस, प्लिज लिंबू पाणी बनवून दे"

"बस आणते मी."

त्याच्या आईने त्याला लिंबू पाणी बनवून दिल.


"ऑफिस सुटल्यानंतर रोज घरी येतोस ना? मग काल तिकडे जायची काय गरज होती तुला? आपल्याला भावत नाही मग कशाला करायचं? उगाच तब्येत बिघडली तर मी कुणाकडे बघायचं? मी कुठे धावाधाव करायची? तुला ना माझी काळजीच नाहीये, माझ्याबद्दल विचारच नाही फक्त स्वतःचा विचार करत रहा."


"आई असं काहीही झालेले नाहीये."


"तरी पण माझा विचार कर ना आता."


"तुझा काय विचार करू म्हणजे?"

"तू तुझ्या लग्नाचा विचार कर घरात सून येऊ दे मलाही थोडी शांती मिळू दे."

"आई तू अजून सुरू होऊ नकोस ग प्लिज प्लिज आधीच माझं डोकं खूप दुखतंय तर तू तुझं अजून बोलू नकोस."


"मग काय करू मी सांग काय करू?"


"मलाही वाटते माझ्या घरी सुन यावी, नातवंडे यावे तुला माझी काही चिंताच नाही."
आई बोलत बोलत काम करत होती.

मानस खोलीत निघून गेला, फ्रेश झाला आणि त्याच्या आईला काही न सांगता ऑफिसला निघून गेला.

साखरपुड्याची तयारी छान चाललेली होती.

नवरामुलाचे कपडे, नवरीमुलीचे कपडे, दागदागिने सगळी खरेदी झाली, अपर्णाचे कपडे  सगळे तिच्या पसंदीने घेतले होते.


साखरपुड्याचा दिवस जसा जसा जवळ येत होता तशी तशी अपर्णाची धडधड वाढत होती, म्हणजे तिच्या मनात विचार यायचा

'आपण नीट निभावून घेऊ की नाही, आपल्याला जमेल की नाही. एक मैत्रीण वेगळी असते, बायको वेगळी असते.
सगळं जमेल ना? नाही मला जमवावं लागेल. काकूंसोबत तर माझं छान जमत.' ती विचार करत बसली होती.


तिने श्वेतांगला फोन केला.


"हॅलो श्वेतांग, अपर्णा बोलतीय."


"ह, बोल ग, काय म्हणते?"

"आपण भेटू शकतो का थोड्यावेळासाठी?"


तो थोडा विचार करून

"ओके संध्याकाळी भेटू कॉफी शॉप मध्ये."

"ओके बाय बाय."


संध्याकाळी दोघे भेटले.

"हाय श्वेतांग."

"हाय, बस ना. काय झालं ,काही प्रॉब्लेम झालाय का? तू असं अचानक बोलवलंस?"


"नाही, प्रॉब्लेम असा काही नाही, आता चार दिवसावर आपला साखरपुडा आलय ना, मला खूप भीती वाटतेय."

"भिती? भिती कसली? अंग मी बरा आहे, मला घाबरण्याची गरज नाहीये." तो जोरजोरात हसायला लागला.

"श्वेतांग प्लिज हसू नकोस ना. तसं म्हणत नाही आहे मी.

"मग काय झालं?"

"जसा दिवस जवळ येतोय ना माझी धडधड वाढत आहे."

"अग तू का एवढा विचार करतेस? तुला एवढा विचार करण्याची गरज नाही, तू तर माझ्या आईला ओळ्खतेस. माझं घरही बघितलं आहे, मग तरी भीती कशाची?"त्याने तिच्या हातावर हात ठेवला.

"श्वेतांग मी एक विचारू का रे?"

"हो विचार ना."

"तुझे बाबा कसे आहेत रे म्हणजे मला माहित नाही म्हणून विचारत आहे."

तो काहीच बोलला नव्हता.

सॉरी मला तुला दुखवायचं नाही आहे पण मला हे विचारायचं होतं की तुझे बाबा आपल्या लग्नाला राहतील का?"


"अपर्णा तुला असं वाटतं का की ते आपल्या लग्नात रहावेत."


"हो, माझी इच्छा आहे की आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा."

"ते पॉसिबल नाहीये."


"त्यांची तब्येत कशी आहे?"

"मला काहीच माहिती नाहीये आणि मला माहित करूनही घ्यायचं नाहीये."


"तू काकूंशी बोलणार होतास ना याबाबतीत?"


"बोलणार होतो पण माझं काही बोलणं झालेलं नाहीये पण तू बोललीस ना?"

"बोलले मी पण आमच बोलण अर्धवटच राहिलं त्यामुळे.."


"इट्स ओके हा टॉपिक आता बंद कर, आपल्याला आपल्या आयुष्यात आपला विचार करायचा आहे इतरांचा नाही किंवा परक्या माणसाचा तर नाहीच नाही. ते आपल्या लग्नात असो किंवा नसो मला काही फरक पडणार नाही. माझ्या आयुष्यात मला तो माणूस नकोच आहे."

"ओके ओके तू चिडू नकोस प्लिज उगाच चिडचिड करू नको. सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल, कुणी तुझ्यावर कसली जबरदस्ती करणार नाही पण तू चिडू नकोस."


श्वेतांगने तिला समजावलं आणि मनाशी गाठ पक्की केली की आता बाबाचा विषय काढायचा नाही.

'याच्या बाबाची इच्छा असेल तर? शेवटचे दिवस आपल्या मुलांसोबत बायको सोबत घालवायचे असतील तर? त्यांच्या मनात जे काही आहे ते जाणून घ्यायला हवं. मला त्यांच्याशी एकदा बोलायला हवं पण कसं भेटणार? मला तर काहीच माहिती नाहीये आणि श्वेतांग काही सांगणार नाही. काकुशी बोलावं लागेल कदाचित त्यांच्याकडून काहीतरी माहिती मिळेल.'

अपर्णा विचार करत बसलेली होती, त्याच्या बाबांचे विचार तिच्या डोक्यातून जात नव्हते. नको नको ते विचार मनात घोळत राहिले

ती घरी गेली, विचार करत बसलेली होती, तिला झोप लागली आणि ती झोपली.


दुसऱ्या दिवशी सकाळी स्वराली घरी आली.

"अरे स्वराली तू आज इतक्या सकाळी सकाळी?"


"हो मग काय तू आज खरेदीला चाललीस ना?"

"तुला कुणी सांगितलं मी खरेदीला जात आहे म्हणून? अग खरेदी झाली आहे."


"अग ज्वेलरी बाकी आहे ना, म्हणून ऑफिसला सुट्टी टाकली मी, माझ्या बेस्ट फ्रेंडची एंगेजमेंट आहे आणि मी तिथे नसेल असं कधी होऊ शकत का?"


"तू खरच वेडी आहेस."असं म्हणून अपर्णा हसायला लागली.