Login

सुरमयी प्रवास...भाग 47

Love story
सुरमयी प्रवास...भाग 47

अपर्णा आणि स्वरालीचं बोलणं सुरू होतं इतक्यात तिथे कुसुम आली.

"माई आज आपल्याला शॉपिंगला जायचंय तू चलणार आहेस ना सोबत?"


"मी कशाला ग? तुम्ही दोघीजणी जाऊन या आणि वाटल तर श्वेतांगला सोबत घेऊन जा."


"नाही ग, तो बाहेर जाणार आहे त्याला वेळ नाही मग आम्ही दोघी जाऊन येऊ का चालेल?"

"तुम्ही दोघी जाऊन या. पण हो अपर्णा विचारपूर्वक खरेदी कर."


"हो माई तू काळजी करू नकोस."

दोघीही खरेदीला गेल्या.

अपर्णाने श्वेतांगला फोन केला,


"हॅलो तू येणार आहेस का खरेदीला? मी आणि स्वराली निघालोय घरून."


"मला नाही जमणार तुम्ही दोघी जाऊन या."

"श्वेतांग आला असतास तर बर झाल असतं."

"आज थोडा थकलोय ऑफिसमध्ये खूप काम होतं. तू छान सुट्टी मारलीस पण मला सुट्टी टाकता आली नाही. तुम्ही दोघी जाऊन या, जमलं तर येतो मी."


"ओके चालेल."


दोघींनी खरेदी करायला गेल्या.

ज्वेलरीची खरेदी झाली मुख्य म्हणजे अंगठीची खरेदी कुसुम करणार होती.

दोघीही घरी गेल्या.

घरी आल्या आल्या,

"माई."

"अरे आलात तुम्ही दोघी?"

"हो, माझी ज्वेलरी बघून आधी."

"हो हो बघते तुम्ही थकल्या असाल ना आधी काही खाऊन घ्या."

"नाही आधी तू माझी ज्वेलरी बघ मग नंतर आपण जेवण करूया."

"थकली असशील ना?"


"काही थकलेली नाहीये, मी तुझ्यासाठी एक साडी आणली आहे, आवडते का बघ?"

"छान आहे, दोन्ही साड्या छान आहेत. ज्वेलरी पण छान आहे."

"माई मला सांग, तू आणि बाबा खरेदीला कधी जाणार आहात? अग श्वेतांगसाठी अंगठी घ्यावी लागेल ना?"


"हो आम्ही बघतो कधी जायचं ते तू काळजी करू नकोस होईल सगळं ठीक."

"श्वेतांग आला होता का गं सोबत?"


"नाही माई तो नव्हता, तो थकला होता त्याला ऑफिसला जावं लागलं ना खूप काम होतं म्हणाला आणि तो थकल्यामुळे नव्हता आला."


"ठीक आहे चला तुम्ही दोघी फ्रेश व्हा आणि जेवण करून घ्या."

"काकू मी घरी निघते ना,  घरी जाते मी."

"नंतर जा, आता आली आहेस तर जेवण करून जा."


"नाही काकू मी आता निघते मला उद्या ना घरी केळवण करायचंय अपर्णाचं. मी विचार करत होते की अपर्णाला केळवन साठी बोलवते."

"पण आत्ताच का बोलवते साखरपुडा होऊ दे ना मग बोलवं."


"नाही नाही आईला बरं राहत नाही,  तिची तब्येत बरी नसली आणि मला जर बोलवता आलं नाही तर म्हणून उद्याच बोलवते मी."


"ठीक आहे तू ज."

"हो मी निघते आणि उद्यासाठी तुला फोन करते वेळात वेळ काढ आणि ये."


"माई केळवण का करतात ग?"

अग केळवणाची पण एक वेगळीच मज्जा असते. मी तुला एक गम्मत सांगते.


माझ्या मावस बहिणीचे लग्न ठरले होते, तर सर्व नातेवाईक जमलो होतो केळवण करण्यासाठी, माझा लहान भाऊ सर्व पहात होता. सारखं केळवण, केळवण ऐकलं होतं, तर जेवण वगैरे झाल्यावर अगदी निरागस पणे त्याने विचारलं, केळवण सम्पलं का? पण मला केळी कुठेच नाही दिसली. सगळे हसायला लागले.
तो एक गमतीचा भाग झाला.
पण मी तुला सांगते.

लग्न, मुंज करायचे ठरल्यानंतर मुलगी,मुलगा ,मुंजा आणि त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा वगैरे घरातील माणसांना जवळचे नातेवाईक, ओळखीचे लोक आपल्या घरी रीतसर आमंत्रण देऊन जेवायला बोलावतात त्याला केळवण म्हणतात.

कार्य ठरलेल्या घरात हजार कामे असतात,अशा वेळी स्वयंपाक वगैरेचा वेळ वाचतो.

तसेच पूर्वी लग्न झाले की मुलगी एकदा सासरी गेली की सम्पर्काची दळणवळणाची साधने कमी असल्याने भेटीगाठी फार कमी होत असे. तसेच मुंज झाल्यावर मुलगा गुरुगृही जाई. तर ह्या केळवणाच्या निमित्ताने निवांत भेटणे, कोडकौतुक वगैरे करता येणे हा उद्देश असावा.

केळवण हा काही धार्मिक विधी नाही, त्या मुळे बोलावलेल्या पाहुण्यांचे योग्य आदरातिथ्य करणे, ऐपतीप्रमाणे ओटी भरणे,भेटवस्तू देणे, इतकंच करतात.

एकंदरीत दोन कुटुंबातील संबंध प्रेमाचे रहावेत ह्या उद्देशाने समाजप्रिय माणसाने सुरू केलेली प्रथा,इतकाच साधा उद्देश असावा.

महाराष्ट्रात नवीन लग्न ठरलेल्या वधूवरांचे केळवण करण्याची पद्धत आहे. हा विधी लग्नाआधी केला जातो. या निमित्ताने मित्रमंडळी, नातेवाईक नववधू अथवा वराच्या घरातील मंडळींना जेवणाचं आमंत्रण देतात. वधू वराच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खाऊ घालतात. प्रेमाचं प्रतिक म्हणून वधूवरांना गिफ्ट दिलं जातं आणि भरपूर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. केळवणात बऱ्यातदा साडी, कपडे, दागदागिने, मौल्यवान वस्तू, रूखवतातील वस्तू, संसारासाठी उपयुक्त वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात. लग्नाआधी घरचं केळवण करण्याची देखील पद्धत आहे. ग्रहमखाआधी वधूवरांच्या अगदी जवळची नातेवाईक मंडळी एकत्र जमतात आणि सहभोजनाचा आनंद घेतात. केळवणातून प्रेम, आदर, नातेसंबध दृढ होतात. आजकालच्या घाईगडबडीच्या काळातही आवर्जून केळवणाचे बेत आखले जातात.

काळानुसार बदलत जाणाऱ्या इतर काही प्रथांप्रमाणे केळवणं सुद्धा बदलली आता कधी बाहेरून मागवून तर कधी सरळ हॉटेलात जाऊन केळवण करायचे किंवा नाही हो त्याला किंवा तिला वेळच नाही नावाखाली सरळ टाळायचे ही प्रथा सुरु झाली.
आजकाल एखाद दुसरी सोडली तर फार केळवणं करत नाहीत कोणी. गम्मत होती पूर्वी, आपल्या प्रत्येक नातेवाईकाकडे ह्या निम्मिताने जाणे होई आणि महत्वाचे म्हणजे जिच्या घरी कार्य आहे त्या बाईस थोडा आराम म्हणून हे केळवण असावे."


"मस्त ग किती छान वाटते ना हे सगळं."

दुसऱ्या दिवशी अपर्णा ऑफिस करून सरळ स्वरालीच्या घरी गेली.

स्वरालीने केळवणची सगळी तयारी करून ठेवलेली होती.

"ये ग अपर्णा, आत ये. बस."


"बापरे स्वराली हे काय केलेस तू? किती छान सजावट केली आहेस, किती सुंदर दिसते आहे हे सगळं."

"तुला आवडलं ना?"


"हो खूप भारी आहे."

"ही रांगोळी किती छान आहे ना, मला खूप आवडली. खूप छान तयार केलीस."

"तुला आवडलं ना? मग झालं. तू बस."


स्वरालीने पाट सजवून ठेवलेला होता. पाटाच्या भोवताली रांगोळी काढलेली होती. बॅकग्राऊंड मध्ये साडी लावून केळीच्या पानांनी सजवलेलं होतं. आंब्याचे पान, झेंडूचे फुले लावलेली होती. खूप छान सजावट दिसत होती. स्वरालीने तिला तिथे बसवलं, तिचं औक्षण केलं आणि त्यानंतर तिच्या जेवणाचा ताट आणलं.


"बापरे एवढे पदार्थ?"


"मग काय खावंच लागणार आहे तुला."

"श्रीखंड पुरी, मसालेभात, कॉर्न कटलेट, गाजराचा हलवा, पुरणपोळी,बटाटेवडे, गुलाबजाम, बासुंदी, मटारकरंजी, पनीर कोफ्ता, काजू करी बापरे हे पदार्थ बघूनच माझं पोट भरेल."

"जेव ग तू."

"काकू नाही आहेत का ग?"


"नाही ग आईला बरं नाही ना दवाखान्यात गेली."


"हा एवढा स्वयंपाक तूच केला स्वराली? तुला इतकं सगळं बनवता येतं?


"हो बनवते मी आणि काही काही पदार्थ मी मोबाईल वरून बघून केले. चव खूप छान झाली आहे तू खाऊन बघ तुला आवडेल."


"स्वराली अग मलाच आता कसंतरी होतंय, माझ्या केळवणाचं जेवण तुला एकटीलाच करावं लागलं."

"अग त्यात काय? आई असती ना तर तिनेच सगळं केलं असतं."

"तू पण बस ना माझ्यासोबतजेवायला."

"नाही ग, मी आहे ना तुझ्या बाजूला बसते तू जेव."


"अग पण मला कंपनी तरी दे."

"नको तू जेवण कर आरामात."

"तू काही ऐकणार नाहीस."

"नाही मी काही ऐकणार नाही."

दोघीही हसल्या.

अपर्णांने जेवण केलं.

"सगळे पदार्थ खूप छान झालेत, जेवण खूप छान बनवलेस तू. यातले काही पदार्थ मलाही शिकव. मला खूप आवडले."

"हो नक्की सांगेन मी तुला."

"चल आता मी निघू? बराच उशीर झाला आहे. काकूंना
माझा नमस्कार सांग."

"हो हो सांगते आणि तू आरामात जा आणि पोहोचल्यानंतर मला फोन कर."